चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रे
-
Sale! Add to cartआयफेल टॉवर म्हणजे केवळ पॅरीसची नव्हे तर सार् या फ्रान्सची ओळख ! इंजिनीयिंरग मार्व्हल मानला जाणारा हा हजार फुटी उंच मनोरा आधी कल्पनेत पाहणारा अन् नंतर प्रत्यक्षात साकारणारा प्रतिभावान अभियंता : आयफेल गुस्ताव. अनेक चढउतारांनी भरलेले, यशोमालिकांनी रंगलेले अन् लोकापवादांनी माखलेले आयुष्य जगलेला हा अभियंता. त्याच्या या विलक्षण आयुष्याचा वेध घेणारे चरित्र !
All BooksEiffel | आयफेल
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Sale! Add to cartया आत्मकथनाचे लेखक समीर भिडे यांच्या आयुष्यात एक दिवस अचानक अत्यंत अकल्पित अशी घटना घडली. त्या घटनेने त्यांचे आयुष्य मुळापासून उन्मळून पडले. लाखात एकाच्या वाट्याला येणाऱ्या पक्षाघाताच्या झटक्याने त्यांचे आयुष्य कायमचे बदलून गेले. कधीही कल्पना केली नव्हती एवढे परावलंबित्व वाट्याला आले, नोकरी गमवावी लागली आणि पाठोपाठ घटस्फोटालाही सामोरे जावे लागले. पण एक दिवस अचानक ही त्यांच्या व्याधीची नाही, तर व्याधीतून पुनश्च उभे राहण्यासाठी निकराने दिलेल्या लढ्याची कथा आहे. या लढ्यासाठी त्यांना वेगवेगळ्या समाजांतील मित्रपरिवार आणि मदतनीसांची साथ मिळाली. हे आव्हान पेलताना पाश्चात्य वैद्यक आणि पौर्वात्य स्वास्थ्योपचारांचे साहाय्य लाभले. या प्रवासात समीर यांचा दृष्टिकोन कायम सकारात्मक आणि कृतज्ञ राहिला. त्यातूनच त्यांना वास्तव जसे आहे, तसे स्वीकारण्याचे बळ मिळाले. त्यांची ही कहाणी वाचताना वाचकालाही अकस्मात उद्भवलेल्या संकटाला धीराने सामोरे जाण्याचे बळ लाभेल याची खात्री वाटते.
All BooksEk Divas Achanak | एक दिवस अचानक
₹289.00Original price was: ₹289.00.₹217.00Current price is: ₹217.00. Save ₹72 Add to cart -
Sale! Add to cartअधिकाधिक उपभोगांच्या हव्यासामुळे, एका विचित्र वळणावर सारी मानवजात येऊन ठेपली आहे. आता आपल्या सर्वांपुढे केवळ दोनच पर्याय उरलेले आहेत. नैसर्गिक साधनसंपत्तीचा विनाश करणा-या आजवरच्या या आत्मघातकी मार्गावर हताशपणे वाटचाल करायची किंवा परत मागे फिरून कार्व्हरनं दाखवलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीच्या संवर्धन-विकास-उपयोग-पुनर्भरण या शाश्वत कृषिसंस्कृतीचा स्वीकार करायचा. भावी पिढ्यांच्या सुख-समृद्धीचा पाया घालायचा असेल तर प्रत्येक सुजाण नागरिकानं वाचायलाच हवं असं पुस्तक.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेEk Hota Carver | एक होता कार्व्हर (डिलक्स आवृत्ती)
₹395.00Original price was: ₹395.00.₹296.00Current price is: ₹296.00. Save ₹99 Add to cart -
Sale! Add to cart' प्रभातकालच्या अभिनेत्रीच्या जीवनावरील ही कादंबरी ! ही आहे तिच्या कलाजीवनावरची आणि अविवाहित आईपणाची कहाणी ! तिनं आयुष्यात खूप काही मिळवलं, आणि तितकंच गमावलंही ! ती स्वतःच्या आंतरिक ऊर्मीनं जगली. सुखी की दुःखी ? यशस्वी की पराभूत ? कोणास ठाऊक ! पण तिची हिंमत असामान्य होती...
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेEk Hoti Bay | एक होती बाय
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cartशिक्षण आाणि व्यवसायात यशस्वी झालेली ती ! मुंबई महानगरात उच्चभ्रूंचे जीवन आनंदात जगत होती. पण एके दिवशी दैवाने जबरदस्त तडाखा दिला. ती व्यक्तिगत दु:खाने विव्हल झाली, निराशेच्या खोल गर्तेत गेली. अवचित एका क्षणी तिच्या लक्षात आले, आपल्यापेक्षा अधिक दु:खी माणसे भोवती आहेत. आपण त्यांच्यासाठी काही करू शकतो. तिच्या निराशेला पंख पुâटले त्यातून उभा राहिला ऑटिझमग्रस्त मुलांसाठी एक प्रकल्प. ती कहाणी एक इझम ... निरागस
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेEk Isam… Niragas | एक ‘इझम’… निरागस
₹225.00Original price was: ₹225.00.₹169.00Current price is: ₹169.00. Save ₹56 Add to cart -
Sale! Add to cartहा आजारी पडला, तर अमेरिकेची अर्थव्यवस्था काळवंडून जायची आणि हा प्रसन्न झाला, तर अनेक देशांत दिवाळी साजरी व्हायची. कित्येक राष्ट्रप्रमुख, उद्योगपती याच्या कृपाप्रसादासाठी तासनतास तिष्ठत बसायला तयार असायचे. हा शेख अहमद झाकी यामानी. सौदी राजघराण्याशी संबंधित. उच्चविद्याविभूषित तरुण. ओपेक, ओआपेकसारख्या संघटनांचा पस्तीस वर्षांहूनही अधिक काळ सूत्रधार राहिलेला तज्ज्ञ. कार्लोससारख्या कुप्रसिध्द दहशतवाद्यालाही शह देऊ शकणारा सौदी तेलमंत्री. तेलाच्या अर्थकारणाचा व जागतिक राजकारणाचा रागरंगच पालटवून टाकणारा एक अवलिया. एक अफलातून तेलिया. त्याची ही कथा... डोळे दिपवणारी आणि तरीही अस्वस्थ करणारी !
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेEka Teliyane | एका तेलियाने
₹495.00Original price was: ₹495.00.₹371.00Current price is: ₹371.00. Save ₹124 Add to cart -
Sale! Add to cartडॉ. शरद बापट यांच्या ९३ वर्षांच्या आयुष्याने सातारा, लाहोर, पुणे, अहमदाबाद, लंडन, मुंबई असा प्रवास केला आहे. पण हे पुस्तक म्हणजे निव्वळ डॉ. बापट यांचे आत्मकथन नाही. युरोलॉजी या वैद्यकीय शाखेच्या भारतातील वाटचालीचाही हा आलेख आहे. पूर्ण देशात ज्यांनी एंडोस्कोपिक युरोलॉजीचा पाया घातला, त्यात डॉ. बापट अग्रगण्य आहेत. मुंबईच्या सार्वजनिक आरोग्यव्यवस्थेतील युरोलॉजीचा पहिला स्वतंत्र बाह्यरुग्णविभाग त्यांनी सायन इस्पितळात सुरू केला. शिक्षक म्हणून युरोलॉजिस्टांच्या चार पिढ्या त्यांनी घडवल्या. मूत्रपिंड आरोपणाच्या तंत्रावर हात बसावा म्हणून त्यांनी कुत्र्यांवर दोन वर्षे प्रयोग केले होते. तर अलिकडे रोबोटिक कॉन्सोल शस्त्रक्रियेचे तंत्र भारतात आणण्यातही त्यांचा पुढाकार होता. गेल्या ६० वर्षांतल्या या अचाट तांत्रिक प्रगतीचा प्रवास इथे सोप्या शैलीत उलगडून दाखवला आहे. त्याचबरोबर, वाढलेल्या प्रोस्टेटपासून लघवीची जळजळ होणे अशा नेहमीच्या तक्रारींवरच्या उपचारांचे अनुभव आणि त्याबाबतची निरीक्षणेही यामध्ये रंजकपणे मांडलेली आहेत. सामान्य वाचकांपासून वैद्यकीय विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांनाच मार्गदर्शक ठरेल, असा हा दस्तावेज आहे.
All BooksEka Yashasvi Urologistchi Vatchal | एका यशस्वी युरोलॉजिस्टची वाटचाल
₹450.00Original price was: ₹450.00.₹338.00Current price is: ₹338.00. Save ₹112 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read more..त्यांनी गोडीगुलाबीने प्रजेची मने राजी केली; त्यांजपुढे आलेल्या मोठमोठया प्रश्नांचा उदार अंत:करणाने निकाल करून लोकांस खुष ठेविले; अत्यंत सुधारलेल्या प्रभूने अर्धवट सुधारलेल्या प्रजेचे संगोपन कसें करावें हें पूर्णपणें जाणून मुंबई इलाख्याचें राज्य चालविले इत्यादि गोष्टी जोपर्यंत लोक आठवतील, तोपर्यंत एलफिन्स्टन साहेबांचे नांव मागे राहिल.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेElphinstone | एलफिन्स्टन
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Read more -
Sale! Add to cartफैज अहमद फैज. एक सुप्रसिद्ध उर्दू शायर. मूळचे लाहोरचे. फाळणीनंतर त्यांनी भारतात राहावं म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूंनीसुद्धा प्रयत्न केला, पण ते तिकडेच गेले. आणि अपेक्षाभंगाचं दु:ख आपल्या गझलांमधून व्यक्त करीत राहिले. तसे फैज होते मार्क्सवादी, डाव्या विचारसरणीचे. रशियाचे समर्थक. लेनिन पारितोषिकाचे पहिले मानकरी. आणि तरीही पाकिस्तानी साहित्यविश्वात रमणारे. त्यांचं हे चरित्र. फैज यांच्या गाजलेल्या गजला, त्यांची पत्रकारिता, त्यांची तुरुंगवारी, त्यांची प्रेमप्रकरणं, त्यांच्या आयुष्यातले असंख्य चढउतार... आणि त्या सर्वांपेक्षाही वरचढ ठरलेली त्यांची अर्धीमुर्धी स्वप्नं... जगावेगळं तेजोवलय लाभलेल्या एका कवीचं रसीलं चरित्र. फैज अहमद फैज
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेFaiz Ahamad Faiz | फैज अहमद फैज : एक प्यासा शायर
₹220.00Original price was: ₹220.00.₹165.00Current price is: ₹165.00. Save ₹55 Add to cart -
Sale! Add to cartखरं तर हा सर्वसामान्य माणूस. चारचौघांसारखंच आयुष्य गेलं असतं त्याचं. बालपण, शिक्षण, मग नोकरी अन् पोटासाठीची पायपीट. पण या प्रवासात त्याला मिळाली सेवेची प्रेरणा, करुणेचा वसा. ती प्रेरणा, तो वसा घेऊन पुढे पीडितांसाठी तो काम करत राहिला. कुठेही थांबला नाही, दमला-भागला नाही, स्वत:च्या सुखाचा विचारही त्याच्या मनात आला नाही. तो निरंतर चालत राहिला. पडल्या-झडलेल्या आणि तुटक्या-फाटक्या माणसाला अडचणीतून मार्ग दाखवण्यासाठी दिशाहीन वा नाउमेद झालेल्या तरुणाईला पुढे चालावेसे वाटेल, मार्ग निघत जाईल, जीवन बदलत जाईल असा पुढील पिढ्यांना दिलासा मिळेल या विश्वासातून केलेला अनघड प्रवास.
All BooksFakiree | फकिरी
₹395.00Original price was: ₹395.00.₹296.00Current price is: ₹296.00. Save ₹99 Add to cart
">
Skip to content