चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रे
-
Sale! Add to cartअहिल्याबाई होळकर ! जन्म ३१ मे १७२५. मृत्यू १३ ऑगस्ट १७९५. ती सत्ताधारी होती, पण ती सिंहासनावर नव्हती. ती राजकारणी होती, पण ती सत्तेच्या चढाओढीत नव्हती. ती पेशव्यांशी निष्ठावंत होती. पण ती त्यांच्यापुढे नतमस्तक नव्हती. ती व्रतस्थ होती, पण ती संन्यासिनी नव्हती. जेव्हा लढाई हे जीवन होते आणि लूट हा जेत्यांचा धर्म होता, हुकमत हा सत्तेचा स्वभाव होता, तेव्हा तिच्या कल्याणी प्रतिभेचे किरण नदीवरच्या घाटांमधून उमटले. तिच्या जीवनदायिनी प्रेरणेने तळी, अन्नछत्रे, धर्मशाळांचे रूप घेतले. तिच्या अनाक्रमक धर्मशीलतेचे मंगल प्रतिध्वनी भरतखंडाच्या मंदिरामंदिरांतून घुमले. मात्र ती सर्वगुणसंपन्न देवता नव्हती. तिला माणूसपणाच्या सगळ्या मर्यादा होत्या. अठराव्या शतकातल्या मराठ्यांच्या इतिहासाच्या पटावर ती शुक्राच्या चांदणीसारखी लुकलुकली.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेDnyat – Adnyat : Ahilyabai Holkar (Lokavrutti) | ज्ञात-अज्ञात : अहिल्याबाई होळकर(लोकावृत्ती)
₹400.00Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00. Save ₹100 Add to cart -
Sale! Add to cartसूर्य पृथ्वीभोवती फिरतो, ही प्राचीन काळापासूनची समजूत. तिला धक्का देऊन, पृथ्वी सूर्याभोवती फिरते, हे वैज्ञानिक सत्य प्रथम मांडणारा धाडसी वैज्ञानिक म्हणजे गॅलिलिओ गॅलिली. त्याच्या संघर्षमय जीवनप्रवासाची उत्कंठावर्धक गूढरम्य कथा
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेDoordarshi | दूरदर्शी (गॅलिलिओचे चरित्र)
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartदुष्काळी भाग. पाण्याचं दुर्भिक्ष्य. हजार अडचणी उभ्या ठाकलेल्या. पण माणदेशातील माणसं हिंमतीनं जगत असतात, कधी मागं हटत नाहीत. आत्महत्येचा वेडा विचार मनात आणत नाहीत. या माणसांसारखीच एक वेलवर्गीय वनस्पती - दौशाड'! इथल्या माणसासारखी जगणारी, ओढ्याकाठी, खडकावर, वाळूतसुद्धा पाणी नसताना वाढणारी. कितीही दुष्काळ असला; तरी ती दमत, थकत नाही, जोमानं फुलत राहते. जाड वेली, शेंडे, तुरे, गोफारे वागवत वाढत असते. तिला लाल फुलं अन् गोल अंडाकृती फळं असतात. सर्वांना सावली देते. भर उन्हाळ्यात ओढ्याकाठी शेळ्यामेंढ्या या दौशाड्याच्या सावलीत उभ्या राहतात आणि तिचा पाला खाऊन गुजराण करतात. अशी ही अडचणीतून वाट काढणारी वनस्पती. तिचं शास्त्रीय नाव Combretum-albidum-G.Don. प्रत्येक भागात तिची वेगवेगळी नावं - जसं दवशिरा, पिळुकी. आमच्या भागात तिला म्हणतात दौशाड'. ती सांगत असते, कितीही अडचणी, वाईट प्रसंग आले; तरी डरायचं नाही. तिचाच आदर्श आम्ही घेतला.
All BooksDoushad | दौशाड
₹680.00Original price was: ₹680.00.₹510.00Current price is: ₹510.00. Save ₹170 Add to cart -
Sale! Add to cart'डॉ. आई तेंडुलकर. नावापासूनच सारे विलक्षण. बेळगावजवळील छोटयाशा गावातला बुध्दिमान तरूण, गणपत तेंडुलकर शिक्षणासाठी युरोपात जातो. तेथेच तीन विवाह करतो. डॉ. आई तेंडुलकर या नावाने जर्मन वृत्तपत्रांत भारतीय स्वातंत्र्यलढयाचे चित्रण करू लागतो. आणि अचानक दुस-या महायुद्धाचे पडघम वाजू लागतात. हा युवक भारतात परतून मराठी वृत्तपत्र सुरू करतो. स्वातंत्र्य चळवळीतील सहभागासाठी पाच वर्षांचा तुरुंगवास भोगतो. गांधीजींच्या आश्रमातील एका तडफदार तरुणीशी विवाह करतो. स्वतंत्र भारतासाठी पोलाद उद्योग सुरू करतो. त्याचे सगळे आयुष्यच विलक्षण आणि जगावेगळे. दोन देशांत घडलेली, डॉ. आई तेंडुलकर यांची, त्यांच्याच कन्येने सांगितलेली ही अदभुत कहाणी.'
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेDr. Aai Tendulkar | डॉ. आई तेंडुलकर
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cartआपला समृध्द आणि प्रगत मायदेश मागे सोडून डॉ. आयडा वेलूरला आल्या. धुळीने भरलेल्या, सततच्या दुष्काळाने आणि म्हणून दारिद्रयाने गांजलेल्या भुकेकंगाल प्रदेशाला त्यांनी आपलं म्हटलं. सलग पन्नास वर्ष या प्रदेशाची दुखणी-खुपणी निस्तरताना त्यांनी एक स्वप्न उराशी बाळगलं. ते साकार करीत असताना त्या या मातीत मिसळून गेल्या. एक होता कार्व्हर या पुस्तकाच्या लेखिका वीणा गवाणकर यांचे एका दुर्लक्षित विषयावरील पुस्तक डॉ. आयडा स्कडर
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेDr. Ida Skudder | डॉ. आयडा स्कडर
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartलोकमान्य टिळकांच्या सांगण्यावरून १९०६ साली त्याने मायदेश सोडला. अमेरिकेत कृषिशिक्षण घेत असतानाच त्याने क्रांतिकेंद्रे काढली. गदर उठावाच्या आखणीत तो आघाडीवर होता. लाला हरदयाळ, पं. काशीराम, विष्णू गणेश पिंगळे, वीरेन्द्रनाथ चट्टोपाध्याय, भूपेंद्रनाथ दत्त हे क्रांतिकारक त्याचे सहकारी होते. सशस्त्र लढा संघटित करण्यासाठी त्याने जपान, अमेरिका, कॅनडा, इराण, मॉस्को, बर्लिन अशी भ्रमंती केली आणि अपार साहसे अंगावर घेतली. डॉ. सन् यत सेन आणि डॉ. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर हे त्याचे आदर्श होते. म्हणूनच सशस्त्र स्वातंत्र्यलढयानंतर पंचवीस वर्षे मेक्सिकोत कृषिक्रांती घडवून आणण्यासाठी तो झटत होता. स्वराज्य मिळाल्यानंतर त्याचे सुराज्यात रूपांतर करण्यासाठी तो मोठया उमेदीने मायदेशी परतला. इथे मात्र या महान क्रांतिकारक नि श्रेष्ठ आंतरराष्ट्रीय कृषितज्ज्ञाच्या वाटयाला आली ना चिरा ..... ना पणती ....
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेDr. Khankhoje (Nahi Chira…) | डॉ. खानखोजे (नाही चिरा…)
₹320.00Original price was: ₹320.00.₹240.00Current price is: ₹240.00. Save ₹80 Add to cart -
Sale! Add to cartआपले सारे आयुष्य पक्ष्यांच्या रंगभ-या सुंदर विश्वावर उधळून देणा-या ऋषीतुल्य पक्षीतज्ञाची आणि जागरूक पर्यावरणवाद्याची जीवनकथा.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेDr. Salim Ali | डॉ. सालिम अली
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreडॉ. विश्राम रामजी घोले. अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्यसमरात प्रत्यक्ष युद्धभूमीवर काम करणारे निष्णात शल्यविशारद. पुण्यातल्या जहालांचे आणि मवाळांचे, ब्राह्मणांचे आणि ब्राह्मणेतरांचे मित्र. शेती उद्योग, वैद्यक, शिक्षण... अनेक क्षेत्रांतल्या विधायक उपक्रमांचे साथी. नगरपालिकेचे दीर्घकाळचे जागरूक सेवाभावी सभासद. त्यांचे जावई डॉ. रघुनाथराव खेडकर हेही प्रख्यात धन्वंतरी. कोल्हापूर संस्थानातच नव्हे, तर पुणे, भावनगर, नहान, नेपाळ - सर्वत्र त्यांची कीर्ती पसरलेली. यादव समाजाचे अखिल भारतीय पातळीवरचे ते पहिले संघटक नेते आणि वेदान्त तत्त्वज्ञानाची ध्वजा स्वामी विवेकानंदांच्या पाठोपाठ इंग्लंड-अमेरिकेत फडकत ठेवणारे तेजस्वी धर्मप्रसारक. या दोन बुद्धिमान आणि कर्तबगार माणसांची ही चरितकहाणी आहे.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेDr. Vishram Ramji Ghole Aani Tyancha Pariwar | डॉ. विश्राम रामजी घोले आणि त्यांचा परिवार
₹140.00Original price was: ₹140.00.₹105.00Current price is: ₹105.00. Save ₹35 Read more -
Sale! Add to cart'पंतप्रधान इंदिरा गांधी अनेक वर्षे प्रकाशझोतात राहिल्या. साहजिकच त्यांची अनेक रूपे सर्वसामान्यांसमोर आली. तथापि त्या सर्व रूपांपेक्षा अगदी वेगळ्या रूपात त्यांना पाहण्याची, अनुभवण्याची दुर्मीळ संधी त्यांच्या स्वीय डॉक्टरना लाभली. त्या डॉक्टरना इंदिराजी कशा दिसल्या, किती भावल्या, हे त्यांनी या पुस्तकात मोठ्या रोचकपणे सांगितले आहे. दृष्टीआडच्या इंदिरा गांधी
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेDrushtiaadchya Indira Gandhi | दृष्टीआडच्या इंदिरा गांधी
₹160.00Original price was: ₹160.00.₹120.00Current price is: ₹120.00. Save ₹40 Add to cart -
Sale! Add to cartदुर्दम्य म्हणजे नेमकं काय? जिगरी दोस्त मन्नू रावतचा फोन आला, हाऊ आर युअर लेग्ज, पंकज?'' नेहमीच्या टोलेजंग हास्यानिशी पंकज जोशींनी उत्तर दिले, कौनसी टांगें, मन्नू? टांगें तो अब हैंही नहीं!' त्यांच्या पोटात, मूत्रपिंडात आणि यकृतात एकूण नऊ गोळ्या घुसल्या होत्या. माणेकशा यातून केवळ जगलेच नाहीत, तर स्वतंत्र भारताचे पहिले फील्डमार्शलही झाले...! ले. जनरल एसपीपी थोरात, अॅृडमिरल भास्करराव सोमण, फील्डमार्शल सॅम माणेकशा, ले. जनरल प्रेम भगत, ले. जनरल सगतसिंग आणि ले. जनरल पंकज जोशी. भारतीय सैन्यदलातील पराक्रमाची सहा उत्तुंग शिखरे! त्यांच्या अमर कर्तृत्वाच्या या स्फूर्तिदायक कहाण्या...
All BooksDurdamya : Bharatiya Sainya Netruttvaache Uttung Shikhare | दुर्दम्य
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart
">
Skip to content