चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रे
-
Sale! Add to cartजेम्स कनिंगहॅम ग्रँट डफ हा मराठ्यांचा आद्य इतिहासकार म्हणून ओळखला जात असला, तरी त्याच्याबद्दल अनेक समज-गैरसमज प्रचलित आहेत. मराठ्यांचे राज्य लयाला गेल्यानंतरच्या काळात सातारला त्याने बजावलेली प्रशासकीय कामगिरी तर दुर्लक्षितच राहिलेली आहे. या पार्श्वभूमीवर खुद्द इंग्लंडमधील अस्सल कागदपत्रांचा धांडोळा घेऊन लिहिलेले हे त्याचे चरित्र खरोखरच वैशिष्ट्यपूर्ण आहे. मराठ्यांचा इतिहास लिहिण्यामागच्या डफच्या मूळ प्रेरणा, तो इतिहास लिहिताना त्याला आलेल्या अडचणी, साधनसामग्री गोळा करण्यासाठी त्याने घेतलेले अपार कष्ट आणि तरीही प्रशासकीय जबाबदारी सांभाळताना इतिहासकार म्हणून त्याच्या लेखनाला पडलेल्या मर्यादा व राहिलेल्या उणिवा... हे सारे काही स्पष्ट प्रकाशझोतात आणणारे हे चरित्र मराठ्यांच्या इतिहासाबद्दल आस्था असणा-या सर्वांनीच अवश्य वाचले पाहिजे.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेJames Kaningham Grant Duf (Marathyancha Itihaskar-Prashasak) | जेम्स कनिंगहॅम ग्रँट डफ (मराठ्यांचा इतिहासकार-प्रशासक)
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartजावेद अ़ख्तर म्हणजे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व. सलीम-जावेद या जोडगोळीनं एके काळी एकाहून एक यशस्वी चित्रपटांची माळ लावली. त्यानंतरही जावेद यांच्या लेखणीतून किती तरी गाजलेल्या पटकथा अन् कैक संस्मरणीय चित्रपटगीतं उमटली. तरकश अन् लावा या कवितासंग्रहांमध्ये बुद्धी अन् मन, विचार अन् भावनांचा समन्वय त्यांनी साधला. त्यांची चित्रपटकारकीर्द यशानं झळाळणारी, तर त्यांची वेळोवेळी केलेली वक्तव्यं वादाचा धुराळा उडवणारी. आपलं भारतीयत्व, आपला विवेकवाद, आपली धर्मनिरपेक्षता, आपलं एथेइस्ट असणं या सर्वांचा जाहीर स्वीकार करणारे, त्या सार् याचा सार्थ अभिमान बाळगणारे अन् त्यानुसार हिरिरीनं वागणारे जावेदजी. त्यांच्या या बहुरंगी व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारं चरित्र.
All BooksJaved Akhtar : Navya Suryachya Shodhat | जावेद अख्तर
₹270.00Original price was: ₹270.00.₹203.00Current price is: ₹203.00. Save ₹67 Add to cart -
Sale! Add to cartदळवी म्हणत, माणसाच्या भागधेयात सोळा-सतराच्या वयात जे घडतं, ते त्याला जन्मभर पुरतं आणि तेच त्याचा जन्मभर पिच्छाही पुरवतं. मग दळवींचं भागधेय काय होतं ? त्या वयात त्यांनी काय पाहिलं, काय अनुभवलं, की, ज्यानं आयुष्यभर त्यांचा पिच्छा पुरवला ? जे सतत त्यांच्या साहित्यात डोकावत राहिलं ? आरवली ते अमेरिका या प्रचंड भटकंतीत दळवींची अधिक ओळख झाली ती माणसाच्या दु:खाशीच ! त्यांनी दुस-या-च्या दु:खाचा पाठपुरावा केला, पण स्वत:च्या दु:खाची कुठे वाच्यता केली नाही. आयुष्यभर दळवींनी आपल्या वागण्यानं इतरांच्या मनात कुतूहल निर्माण केलं, आणि मरणानंतरही ते तसंच जागं ठेवलं. दळवी खरे कसे होते ? हा आहे त्यांना जाणून घेण्याचा एक प्रयत्न. त्यांच्या पूर्वायुष्यातील काही घटनांमधून. साहित्यात प्रतिबिंबित झालेल्या त्यांच्या व्यक्तिगत अनुभवांतून. त्यांच्या पत्रव्यवहारातून. मित्रमंडळी आणि नातेवाईकांशी झालेल्या संभाषणांतून. आणि खुद्द दळवींशी झालेल्या गप्पागोष्टींमधून. या प्रयत्नाचं नाव आहे.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेJayvant Dalvinvishayi | जयवंत दळवींविषयी
₹180.00Original price was: ₹180.00.₹135.00Current price is: ₹135.00. Save ₹45 Add to cart -
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रे
Jevha Gurakhi Raja Hoto | जेव्हा गुराखी राजा होतो
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartमातीच्या ढेकळाला हात लावील तर त्याचे सोने करील आणि लाकडाच्या ओंडक्याला हात लावील तर त्याचे पोलाद बनवील अशी अद्भुत किमयागार... ध्यानीमनी नसतानाही जी झांशीसारख्या मातब्बर संस्थानची राणी झाली आणि नियतीच्या लहरी स्वभावामुळे जी अकाली विधवाही झाली, अशी एक कालपटावरची बाहुली... वैधव्यानंतरचे केशवपनासारखे जाचक निर्बंध युक्तीप्रयुक्तीने दूर सारणारी एक स्वयंभू स्त्री... संस्थाने खालसा करण्यामागचा कंपनी सरकारचा कावा 1854 सालीच ओळखून त्या सरकारचा दुटप्पीपणा वेशीवर टांगणारी पहिली भारतीय संस्थानिक... कसलेल्या इंग्रज सेनाधिका-यांनीही जिचे युध्दनेतृत्व गौरवले अशी असंख्य भारतीय क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता... झांशीची राणी लक्ष्मीबाई हिच्या अशा विविधांगी व्यक्तिमत्त्वाचा अप्रकाशित, अस्सल कागदपत्रांच्या आधारे घेतलेला हा वेध...
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेJhashichi Rani Lakshmibai | झांशीची राणी लक्ष्मीबाई
₹340.00Original price was: ₹340.00.₹255.00Current price is: ₹255.00. Save ₹85 Add to cart -
Sale! Add to cartबांधकाम क्षेत्रात नवे तंत्रज्ञान आणून कल्पकतेने ते यशस्वी करून दाखविणारे धडाडीचे उद्योजक म्हणून बी.जी.शिर्के हे महाराष्ट्रास सुपरिचित आहेत. शिर्के म्हणजे सिपोरेक्स हे समीकरण कोणास सांगावयास नको. परंतु या भव्य यशामागे केवढे अपार कष्ट, सततचे संघर्ष, उत्तमतेचा ध्यास, ध्येयसिध्दीची जिद्द, भ्रष्टाचाराची चीड व समाजसुधारणेची आच या गोष्टी दडलेल्या आहेत, हे अनेकांना माहीत नसेल. अनेक संकटांवर मात करीत व प्रतिकूल परिस्थतीशी झुंज देत स्थापत्य क्षेत्रात नवे तंत्र-मंत्र आणूनच शिर्के स्वस्थ बसले नाहीत; तर बांधकाम क्षेत्रातील गैरव्यवहार व देशाचे नुकसान करणा-या चुकीच्या पध्दती यांच्यावर ते घणाघाती हल्ले चढवीत आले. कधी शासकांचा तर कधी समव्यावसायिकांचा रोष पत्करून नुकसान सोसले; पण धडाडी, जिद्द व आशावाद सोडला नाही. म्हणून घरबांधणी क्षेत्रातील सर्व सुविधा एकाच छत्राखाली पुरविणारा जगातील एकमेव उद्योगसमूह म्हणून बी.जी.शिर्के आणि कंपनीने ख्याती मिळवली आहे. सातारा जिल्ह्यातील पसरणी या लहानशा खेडयात छोटया शेतक-याच्या घरात जन्मलेला बहुजन समाजातील हा मुलगा. शिक्षणाची कौटुंबिक पार्श्वभूमी नाही, उद्योजकतेची परंपरा नाही, अशा प्रतिकूल परिस्थितीत साहसी जिद्दीने शिक्षण पूर्ण करून व्यवसायाचा ध्यास घेऊन त्यात यशस्वी झालेले हे विलक्षण उत्साही व्यक्तिमत्व. शिर्के यांच्या व्यक्तिगत, व्यावसायिक व सामाजिक संघर्षाची त्यांनीच आपल्या वैशिष्टयपूर्ण शैलीत सांगितलेली ही कथा उद्योजकतेची स्वप्ने पाहणा-या धाडसी मराठी तरूणांना स्फूर्तिदायक ठरेल, यात शंका नाही. त्याचबरोबर व्यवसायातील गैरप्रकारांचा त्यांनी केलेला दंभस्फोट वाचून अनेकांना धक्काही बसेल. अशी मराठीतील अपूर्व व्यावसायिक आत्मकथा, व्यक्तिगत जीवनातील संघर्षाचे संवेदवशील पदर असलेली एका उद्योगी माणसाची आत्मकहाणी.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेJiddha | जिद्द
₹160.00Original price was: ₹160.00.₹120.00Current price is: ₹120.00. Save ₹40 Add to cart -
Sale! Add to cartजिगसॉबाबत पहिली गोष्ट म्हणजे अलीकडच्या काळात, व्यक्तिचित्रांच्याच नव्हे, तर इतर कोणत्याही पुस्तकानं मला इतकं गुंतवून ठेवलं नव्हतं. यातली बरीच माणसं माझ्या व्यक्तिविशिष्ट परिचयातली. त्यामुळे तीही उत्सुकता होती. पण लेख वाचल्यावर ह्या व्यक्तींची - अगदी जवळच्याही - नव्यानं ओळख होतेय, असं मला वाटलं. जी माणसं अपरिचित होती, तीही खूप जवळ, अगदी हस्तांदोलनाच्या अंतरावर आल्यासारखं वाटलं. ही तुमच्या लेखनाची करामत. ती मला खरोखरच थक्क करणारी होती. त्यात एक आनंददायक अपेक्षाभंग होता. इतकं अव्वल दर्जाचं लेखन तुम्ही करू शकता, हे मला माहीत नव्हतं. चित्रकार समोर ठेवलेल्या वस्तूचं वा दृश्याचं बारकाईनं निरीक्षण करतो आणि आपल्याला जाणवलेल्या रूपात, रंगात त्याचं चित्रण करतो - त्यात तटस्थता असते, पण त्रयस्थता नसते. निवड करताना त्या दृश्याशी तो एका भावबंधनाने जोडलेला असतो. विविध क्षेत्रांतील आणि पातळयांवरील व्यक्तींच्या वृत्तींची आणि कृतींची अलगद हातानं उकल करण्यात तुम्ही अशीच आप्तसंबंधांचं भान ठेवणारी तटस्थता राखलेली आहे. कोठेही भावविवशता नाही, पण कोरडेपणाही नाही. पाणलोट नाहीत, पण अधिक हृद्य वाटणारा ओलावा आहे. प्रेमादर अंध नाही, डोळस आहे. पण त्या दृष्टीतही सर्वत्र आत्मीयतेचं मार्दव आहे. आणि मुख्य म्हणजे ह्या सर्वाला समर्थक अशी नितळ, सरळ पण प्रगल्भ अशी भावशैली आहे. तिला मेकअप करण्याचा प्रयत्न (आम्ही करतो तसा) कोठेही दिसत नाही. एवढंच सांगतो, कलमाई तुमच्यावर प्रसन्न आहे. ती अधिक काही मागते आहे. - वि. वा. शिरवाडकर
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेJigsaw | जिगसॉ
₹225.00Original price was: ₹225.00.₹169.00Current price is: ₹169.00. Save ₹56 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read more'प्रिय दिलीप जिगसॉ, जिव्हाळा, माझं संकल्पित पुस्तक जिज्ञासा या तिन्ही पुस्तकांची प्रेरणा समान आहे. माझ्या वाढत्या वयापासून थोर प्रतिभावंत आणि विचारवंत यांच्याशी माझा संबंध येत गेला. आमच्या योग्यतेतील फरक लक्षात न घेता त्यांनी मला जवळ येऊ दिलं. आमच्यामधील संवाद -विसंवाद आणि तरीही स्नेहभावना यांचा वेध घेण्याचा माझा चाळा सुरू झाला. गेली पंचेचाळीस वर्षं तुम्ही माणूसमधून आणि त्यानंतर राजहंस प्रकाशनाच्या माध्यमातून माझ्या लेखनाचा पाठपुरावा करत आलात. मराठी प्रकाशनाच्या कामात माझा ज्यांच्याशी संपर्क येत गेला त्या गंगाधर गाडगीळ यांच्यापासून विश्राम आणि मालतीबाई बेडेकर यांच्यापर्यंत युगप्रवर्तक लेखकांविषयी लिहिताना छाती दडपून जाते. वसंत कानेटकर, दुर्गा भागवत, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, ग्रेस सारीच अद्वितीय माणसं. तारा वनारसे, ज्ञानेश्वर नाडकर्णी आणि श्री.पु. भागवत ही माझी अखंड मित्रमंडळी. या सा-यांबद्दल लिहिणं हे अत्यंत जबाबदारीचं. न लिहावं तर यांच्याशी दीर्घकाल जवळीक साधता आली ती इतरांपर्यंत न पोहचवण्याचा अप्पलपोटेपणा. ते सारं लिहून वाचकांपर्यंत नेण्यात जिव्हाळा हीच माझी प्रेरणा आणि जिव्हाळा हेच माझं समर्थन. -रामदास
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेJivhala | जिव्हाळा
₹400.00Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00. Save ₹100 Read more -
Sale! Add to cart'टाटा समूहात आता जेआरडींची सत्ता नसून आपली आहे, हे सर्वांना दाखवून देण्याचं रतन टाटांनी ठरवलं असावं. जेआरडींनाही पटलं नाही, तरी आपलाच शब्द अंतिम राहील, हेही त्यांना दाखवून द्यायचं होतं. जेआरडींच्या मर्जीतल्या दिग्गजांच्या दृष्टीनं त्याचा अर्थ, जेआरडींनीच त्यांना देऊ केलेलं सर्वकाही गमावणं असा होता. या संदर्भात रतन टाटांनी पहिला प्रयोग माझ्यावर केला. मला वाटतं, रतन टाटा इतक्या तातडीनं आपल्या हाती प्रत्यक्ष कारभाराची सूत्रं घेतील, याचा अंदाज जेआरडींना आला नसावा... '
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेJrd – Mi Pahilele | जेआरडी- मी पाहिलेले
₹240.00Original price was: ₹240.00.₹180.00Current price is: ₹180.00. Save ₹60 Add to cart -
Sale! Add to cart'केवळ अधिक पगाराच्या नोकरीची गरज म्हणून कुणी कैद्यांना फाशी देण्याचे काम स्वीकारेल, हे जरा अविश्वसनीयच. परंतु पोलीस खात्यात नोकरी करणाऱ्या जेम्स बेरी या एका ब्रिटिश नागरिकाने आर्थिक अडचणींवर उतारा म्हणून फाशी देणाऱ्या जल्लादाचे काम स्वीकारले... अन् त्याच्यापुढे एक अदृश्य, अज्ञात असे जग सर्व गुंतागुंतींसह उलगडू लागले. कसे होते हे जग ? या जगाचे अनेक विस्मयजनक पैलू उलगडून दाखवणारे एका जल्लादाचे आत्मकथन
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेJyachya Hati Fasachi Dori | ज्याच्या हाती फासाची दोरी
₹100.00Original price was: ₹100.00.₹75.00Current price is: ₹75.00. Save ₹25 Add to cart
">
Skip to content
