चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रे
-
Out of stock
Out of stock
Sale! Read more'बाबूराव अर्नाळकर. मराठी रहस्यकादंब-या अन् रहस्यकथांचे अनभिषिक्त सम्राट. दीड हजाराहून अधिक कादंब-या लिहून आपलं नाव गिनीज बुक मध्ये नोंदवणारा विक्रमवीर. ज्याच्या पुस्तकांवर अक्षरश: लाखो वाचकांच्या वर्षानुवर्षं उड्या पडत राहिल्या, असा विलक्षण लोकप्रिय लेखक. नामांकित साहित्यिक अन् कलावंतांपासून सामान्य कष्टक-यांपर्यंत सा-यांनाच ज्याच्या लेखणीनं खिळवून अन् गुंगवून टाकलं, असा कलमबहाद्दर. बाबूरावांचं चरित्र, महेश एलकुंचवारांची प्रस्तावना, अनेक नामवंत साहित्यिकांचे अन् कलाकारांचे विशेष लेख, बाबूराव अर्नाळकरांच्या गाजलेल्या अकरा कादंब-या अन् पाच कथा यांनी सजलेला हा ग्रंथ म्हणजे मराठी रहस्यकादंब-यांच्या या बादशहाला मानाचा मुजरा ! निवडक बाबूराव अर्नाळकर
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेNivdak Baburav Arnalkar | निवडक बाबूराव अर्नाळकर
₹700.00Original price was: ₹700.00.₹525.00Current price is: ₹525.00. Save ₹175 Read more -
Sale! Add to cart'आपली सध्याची भेसळयुक्त भाषा.... आपली सध्याची माध्यमग्रस्तता...... आपली सध्याची शिक्षण (अ)व्यवस्था...... आपली सध्याची पालकनीती (?).... आपली सध्याची डगमगणारी......इ.इ. थोडक्यात, तुमच्या-आमच्या सध्याच्या जगण्यावरचा तिरकस पण हसरा कटाक्ष.. विचारगर्भ पण मिस्कील भाष्य... आणि खेळकर शैलीतील मार्मिक निरीक्षणं म्हणजे मंगला गोडबोले यांचं विनोदी लेखन ! गेली ३५ वर्षं सातत्यानं आपल्या प्रसन्न, नर्मविनोदी आणि झुळूकदार विनोदानं हसू फुलवणाऱ्या आणि विचारप्रवृत्तही करणाऱ्या मंगला गोडबोले यांच्या निवडक विनोदी लेखनाचा संग्रह......
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेNivdak Mangala Godbole | निवडक मंगला गोडबोले
₹325.00Original price was: ₹325.00.₹244.00Current price is: ₹244.00. Save ₹81 Add to cart -
Sale! Add to cart'शकुंतला परांजपे ! रँग्लर र. पु. परांजपे यांची कन्या. संततिनियमनाचे पायाभूत कार्य करणाऱ्या समाजकार्यकर्त्या. त्यांची दुसरी ओळख म्हणजे प्रख्यात नाटक-चित्रपटकर्त्या सई परांजपे यांच्या आई ! पण या पुस्तकातून दिसतात वेगळ्याच शकुंतलाबाई विविधछंदी, पशुप्रेमी, विचारवंत अशा बहुपेडी व्यक्तिमत्वाच्या त्यांच्या या बहुरंगी लिखाणात त्यांनी रंगवली आहेत परांजपे कुटुंबातली माणसं, शेजारीपाजारी, गडीमाणसं. उधार माल देणारे दुकानदार, वस्ताद टांगेवाले. बसमध्ये कंडक्टरशी भांडणारी पुणेरी माणसं. दिल्लीच्या संसदेत आरडाओरडा करणारे खासदार. मांजरं, शेळ्या, घोडे, बैल यांच्या गमतीदार कहाण्या. खुमासदार शैलीत रंगलेलं हे ताजंतवानं चित्र म्हणजेच निवडक शकुंतला परांजपे
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेNivdak Shakuntala Paranjape | निवडक शकुंतला परांजपे
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart -
Sale! Add to cartनृत्य हाच श्वास... नृत्य हाच प्राण... तोच मार्ग आणि तेच गंतव्य.... असणाऱ्या कथक नृत्यांगना शमा भाटे यांच्या नृत्यमय जीवनाची ही गाथा ! आपल्या प्रतिभावान निर्मितीमधून आणि नृत्यतपस्येतून भारतीयच नव्हे, तर विदेशी नृत्यक्षेत्रातही आपली नाममुद्रा कोरलेlल्या श्रेष्ठ कलावतीच्या प्रौढ प्रगल्भ तरीही नर्मविनोदी शैलीतून ही गाथा वाचणं म्हणजे आपली रसिकता समृद्ध करणं ! लय-नाद-ताल यांच्यामध्ये सार्थक सापडलेल्या या कलावतीच्या आत्मचरित्रात आपल्याला गेल्या पाच दशकांची सांस्कृतिक स्पंदनेही जाणवतील. शमा भाटे यांचा 'नाद-रूप' प्रवास म्हणजे हे आत्मचरित्र ! नृत्यमय जग्... नर्तनाचा धर्म...
All BooksNrutyamaya Jag…Nartanacha Dharma… | नृत्यमय जग… नर्तनाचा धर्म…
₹750.00Original price was: ₹750.00.₹563.00Current price is: ₹563.00. Save ₹187 Add to cart -
Sale! Add to cart'मराठवाड्यातील एक सर्वसामान्य हिंदू कुटुंबात जन्माला आलेली आणि निजामी राज्यात स्वकर्तृत्वाच्या जोरावर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदापर्यंत पोचलेली पहिली व्यक्ती म्हणजे केशवराव कोरटकर. त्यांचे हे छोटेसे चरित्र. काशिनाथराव वैद्य या एका निकटवर्तीयाने लिहिलेले. १९३३ साली त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनी प्रसिध्द केलेले... न्या. कोरटकर यांच्या कार्याचे ऐतिहासिक मोल लक्षात घेऊन मुद्दाम त्या चरित्राची ही नवी संपादित आवृत्ती. नरेन्द्र चपळगावकरांच्या विवेचक प्रस्तावनेसह... '
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेNyaymurti Keshavrav Koratkar | न्यायमूर्ती केशवराव कोरटकर
₹100.00Original price was: ₹100.00.₹75.00Current price is: ₹75.00. Save ₹25 Add to cart -
Sale! Add to cartमहाराष्ट्राला हिरे घराण्याची आणि हिरे घराण्याला महाराष्ट्रातील राजकारण, समाजकारण, संस्कृती याची एक दीर्घ परंपरा आहे. या परंपरेनं महाराष्ट्रातील खूप मोठा भाग शंभर-सव्वाशे वर्षांपासून विधायकतेनं व्यापला आहे. मराठी माणसाला या परंपरेचा स्वाभाविकच आनंद आहे. या परंपरेला बाजूला ठेवून आधुनिक महाराष्ट्राच्या व्यापक जडणघडणीचा इतिहास कोणी लिहू शकणार नाही. याच परंपरेतील एक महत्त्वाचे पाते म्हणजे डॉ. प्रशांत हिरे होय. केवळ राजकारणच नव्हे तर समाज, साहित्य, कला आणि संस्कृती यांना त्यांनी गच्च जोडून घेतलं आहे. या जोडलेपणातूनच ‘ओंजळीतले मोती’ हे व्यक्तिचित्रणपर पुस्तक जन्माला आले आहे. खूप वर्षांपासून प्रशांत गंभीर आणि ललित लेखन करत आहेत. मराठी साहित्यात एकेकाळी व्यक्तिचित्रणाची मोठी हुकमत होती. बराच कालखंड ही व्यक्तिचित्रणं मराठी साहित्यात झळाळत राहिली. काळाच्या ओघात अन्य काही साहित्य प्रकाराबरोबरच व्यक्तिचित्रणालाही ओहोटी लागली. अशा काळात प्रशांत हिरे यांनी लिहिलेलं महत्त्वपूर्ण व्यक्तिचित्रण वाचकांच्या हातात येत आहे. सर्वप्रथम मी त्यांना शुभेच्छा देतो. व्यक्तिचित्रणं वाचायला आवडत असली, तरी ती तशी लिहायला कठीण असतात. समाज व्यक्तींचा बनतो. एखादा माणूस समाजाला जसा घडवतो, तसा समाजही व्यक्ती घडवत असतो. आपल्या आयुष्यात कोणत्या-ना-कोणत्या कारणानं पायरव करणाऱ्या माणसांना आतून-बाहेरून समजून घेणं, आपल्या मनावर त्यांना कोरून ठेवणं आणि मग त्यांना समजून घेण्याचा, त्यांना मोठ्या समाजात सादर करण्याचा प्रयत्न होतो. माणूस तसा अनाकलनीय प्राणी. आत आणि बाहेर अशा दोन जगात जगणारा प्राणी. त्याला समजून घेण्याचा, शद्बबद्ध करण्याचा, त्याचा प्रत्येक पैलू हेरण्याचा प्रयत्न व्यक्तिचित्रण लिहिणारे करत असतात. प्रशांत हिरे यांनीही तसाच प्रयत्न केलाय. घडवून घडवून त्यांना मोती बनवलेत. अर्थात मोती बनवण्याची प्रक्रिया तर खूपच कठीण असते, पण प्रशांत हिरे यांनी त्यासाठी प्रयत्न केलाय. हे जे मोती दिसतात ते वेगवेगळ्या जीवनप्रवाहातून, घटकातून आलेले आहेत. जेव्हा या साऱ्यांची एक सुंदर माळच बनते, तेव्हा मानवी स्वभावातील विविध पैलूंचं सहज, सुंदर दर्शन घडत जातं. वाचकाला ते भावत जातं. व्यक्तीचं चित्रण म्हणजे चित्रच असतं. ते काढण्यासाठी प्रशांत हिरे यांनी अचूक आकृत्या, भावरम्य रंग वापरले आहेत. सहजता, सुलभता हा एक वैशिष्ट्यपूर्ण भाग मानावा लागेल. वरचे, तळातले, मधले, वेगवेगळ्या क्षेत्रातले दिग्गज, सामान्य, अधिकारी, नट, राजकारणी, महिला, योगी-महात्मे अशा कितीतरी व्यक्तींना माळेत गुंफण्यात आले आहे. चकाकणारे, लक्षवेधी, भावणारे असे हे मोती साहित्यातही चकाकत राहतील, अशी अपेक्षा आहे. व्यक्तींच्या चित्रणासाठी वापरलेला कॅमेरा जेवढा सुंदर आहे, तेवढाच कॅमेऱ्यामागचा डोळाही सुंदर आहे. व्यक्तिचित्रणासाठी आवश्यक असणाऱ्या दोन्ही गोष्टींचा मिलाम येथे आहे. या पुस्तकाला माझ्या शुभेच्छा.
All BooksOnjalitil Moti | ओंजळीतील मोती
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart -
Sale! Add to cartतो होता एक यशस्वी वैज्ञानिक. अणुबाँबच्या निर्मितीत त्याने हिरीरीने भाग घेतला, पण हायड्रोजनबाँबच्या निर्मितीला मात्र विरोध दर्शवला... मग राजसत्तेने त्याला शत्रू मानले, सरकारने त्याला जवळजवळ आयुष्यातूनच उठवले... जे. रॉबर्ट ओपेनहायमर त्याचे नाव ! तरल कल्पनाशक्ती आणि विकृत वासना, लौकिक संपन्नता आणि मानसिक विषण्णता... अशा अनेक विरोधाभासांचा धनी ठरलेल्या एका लोकविलक्षण माणसाची, त्याच्या गुणदोषांची, त्याच्या सुखदु:खांची ही शोकात्म संघर्षकथा.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेOpenhaymar | ओपनहायमर
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cartइंदिरा गांधींच्या यशस्वी काळातील भारतातील कदाचित सर्वात प्रभावशाली व बलशाली वरिष्ठ सनदी अधिकारी आणि ज्यांनी इंदिरा गांधींची प्रतिमा उंचावणे व ती निष्ठेने जपणे ही आपली जबाबदारी मानली, अशा पी.एन. हक्सर यांचे हे पहिलेच विश्वासार्ह चरित्र. बँकांचे राष्ट्रीयीकरण, संस्थानिकांचे तनखे व इतर सवलती बंद करणे, भारत-रशिया करार, बांगलादेशची निर्मिती, शेख अब्दुल्लांशी समझोता, पाकिस्तानशी सिमला व नवी दिल्ली येथे केलेले करार, शेती, अंतराळ आणि अणुक्षेत्रातील देशाची प्रगती व नंतर सिक्कीमचे भारताबरोबरचे एकीकरण अशा इंदिरा गांधींच्या मोठ्या कामगिऱ्यांमध्ये हक्सर यांचे महत्त्वाचे योगदान होते. भारताच्या धर्मनिरपेक्ष परंपरांचे रक्षण, सार्वजनिक क्षेत्राला बळकटी, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार आणि तंत्रज्ञानासंबंधीच्या स्वयंपूर्णतेत वाढ यांसारख्या राष्ट्रीय चळवळींचे ते आश्रयदाते होते. इंदिरा गांधीनंतर आलेले पंतप्रधानही त्यांचा सल्ला घेत असत. विस्मरणात जाऊ पाहणाऱ्या एका असामान्य व्यक्तिमत्त्वाचे सरकारी कागदपत्रे, टिप्पणे, टाचणे व पत्रे या सर्वांच्या साहाय्याने केलेले यथातथ्य चित्रण.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेP.N. Haksar Ani Indira Gandhi: Don Ayushyanchi Gunfan | पी.एन. हक्सर आणि इंदिरा गांधी: दोन आयुष्यांची गुंफण
₹650.00Original price was: ₹650.00.₹488.00Current price is: ₹488.00. Save ₹162 Add to cart -
Sale! Add to cartपाश्चात्य लेखकांचे लेखन तर सोडाच, कित्येकांच्या नावांशीही आपण परिचित नसतो. पण रवींद्र पिंगे त्यांची अशी काही ओळख करून देतात की, हे सारे सारस्वत आपल्या आसपासचेच वाटू लागतात. शेक्सपिअर-थोरो-डिकन्स-हार्डीपासून हेमिंग्वे-डोरा रसेल-नायपॉल-कार्टलँडपर्यंत अनेक पाश्चात्य प्रतिभावंतांची रास मांडणारी- पश्चिमेची धनदौलत
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेPachimechi Dhandoulat | पश्चिमेची धनदौलत
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Sale! Add to cart'पुण्यातल्या मध्यमवर्गीय कुटुंबातला शाळेत जाणारा मुलगा. शालेय वयातच तो व्यसनींच्या संपर्कात आला. बघता बघता व्यसनाच्या विळख्यात ओढला गेला. आईची माया, बहिणीRचा जिव्हाळा, - काहीच त्याला रोखू शकलं नाही. ना धड शिक्षण, ना नोकरी, ना व्यवसाय ! रस्ता हेच घर. व्यसन हेच जीवन. पोलीस-कोठडीची हवाही खाल्ली. पण त्याचा अंतरात्मा जागा होता. तो व्यसनातून सुटू पाहत होता. सुटल्यासारखा वाटला, तरी पुन्हा खेचला जात होता. अखेर त्याने व्यसनावर मात केली. एवढंच नाही तर स्वत: एक व्यसनमुक्ती केंद्र उभं केलं. गरगरणा ऱ्या भोवऱ्यातून स्वत: बाहेर पडून इतरांना मदतीचा हात देत असलेल्या एका फिनिक्सचं विलक्षण प्रांजळ आत्मकथन. '
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेPalavi | पालवी
₹275.00Original price was: ₹275.00.₹206.00Current price is: ₹206.00. Save ₹69 Add to cart
">
Skip to content