चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रे
-
Out of stock
Out of stock
Sale! Read moreमोहित सेन भारतातील साम्यवादी चळवळीमधील एक बिनीचे शिलेदार... विसाव्या शतकातील तिशीनंतरच्या साठ-सत्तर वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडात त्या चळवळीने अनेक चढउतार पाहिले, वेडीवाकडी वळणे पार केली, उद्दिष्टे साध्य केली, पराभव पचवले. त्या सर्व घडामोडींचे साक्षीदार असणारे एक तत्त्वनिष्ठ नेते. त्यांनी लिहिलेल्या या आत्मचरित्राला प्रेमाची, मैत्रीची, विविध नातेसंबंधांची, वैयक्तिक आठवणींची अशी जोड मिळाली आहे की, साम्यवादी नेत्यांच्या आत्मचरित्रांमध्ये हे आत्मचरित्र त्या वेगळेपणामुळे ठळकपणे उठून दिसते. वैयक्तिक आणि सामाजिक अशा दोन्ही स्तरांवर मिळालेल्या विविध भूमिका प्रामाणिकपणे पार पाडणा-या एका मनस्वी कार्यकर्त्याची ही नितळ पारदर्शी आत्मकथा तितक्याच प्रवाही भाषाशैलीत आता मराठी वाचकांना उपलब्ध होत आहे.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेPanthasta : Mohit Sen Yanche Aatmacharitra | पांथस्थ : मोहित सेन यांचे आत्मचरित्र
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Read more -
Sale! Add to cart१९६२ च्या गलवान येथील लढाईत सशक्त नेतृत्वाचे प्रदर्शन करीत केलेले पराकोटीचे प्रयत्न आणि त्यानंतर एक युद्धकैदी - एवढीच कर्नल श्रीकांत हसबनीस यांची ओळख नाही, तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आणखी कितीतरी पैलू या आत्मकथनातून शब्दांकित झाले आहेत. त्यांचे पूर्वज - पेशव्यांच्या सैन्यातील शंकराजी फडके हे वसईच्या लढ्यात मर्दुमकी गाजवलेले शूर सेनानी. या पराक्रमी सेनानीचा वारसा आणि विठ्ठलमाउलीवरची अपार भक्ती यांचे एक आगळेवेगळे रसायन ज्यांच्या धमनीतून वाहत होते, ते नाना आणि त्यांची अर्धांगिनी होऊन घेतलेला वसा पुरेपूर निभावून नेणाऱ्या त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सुजाता हसबनीस यांचा एकत्रित जीवनप्रवास एक वेगळे जीवनस्तोत्र शिकवून जातो. ज्यांच्याकडून भक्ती आणि शौर्याचे बाळकडू घेतले, ते आईवडील व हाच वारसा पुरेपूर निभावणारी त्यांची संतती अशा या संपूर्ण हसबनीस घराण्याचा जीवनप्रवास म्हणजे परि तुझा मुद्रांकित'ची कहाणी. -श्रीमती वसुधा माझगावकर
All BooksPari Tuza Mudrankit | परी तुझा मुद्रांकित
₹360.00Original price was: ₹360.00.₹270.00Current price is: ₹270.00. Save ₹90 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read more'नारायण आहिरे यांच्या मनात बालपणीच नर्मदा परिक्रमेबद्दल कुतूहल जागं झालं, या कुतूहलानं हळूहळू ध्यासच घेतला, नर्मदा परिक्रमा झालीच पाहिजे. प्रत्यक्षात मात्र त्यांनी साठीनंतर परिक्रमा केली. त्यांच्या दृष्टीनं, प्राचीन काळी जिच्या किना-यावर सतत यज्ञयागाची धूम्रवलयं उठत होती, ती नर्मदा अगदी पवित्र नदी आहे. तिच्या परिसरात मोठमोठी राज्यं होऊन गेली. कवी-तपस्वी,योगी-त्यागी-त्यागी-भोगी नर्मदेच्या काठी वास्तव्याला होते. नर्मदा परिक्रमा म्हणजे सुखद आनंदयात्रा आहे, पवित्र तीर्थयात्रा आहे आणि कसोटी पाहणारी साहसयात्रा आहे. या परिक्रमेतले अनुभव इतरांना कथन करण्याच्या ओढीने हे लेखन केले आहे.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेParikrama Narmadechi | परिक्रमा नर्मदेची
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Read more -
Sale! Add to cartप्रवरा-म्हाळुंगीचा स्वच्छंद तीर, देखणं संगमनेर, मायेचं घर, शालेय जीवन, तारुण्याचे दिवस अशी गोष्ट विवेक गाडगीळ सांगतात आणि तत्कालीन समाज, कुटुंब, गाव यांचा एक मौलिक ऐवज साकारत कथा पुढे जाते... मग एक होतकरू तरुण अभियंता आपल्या नवपरिणीत पत्नीला घेऊन अजस्र बांधकामक्षेत्राच्या नोकरीत पंचमहाभूतांशी नित्य नवी झुंज घेतो. आपल्या अफाट कर्तृत्वाने दक्षिण भारताचा सागरतीर, हिमालयाचे नि:शब्द पहाड, इराकची युद्धभूमी, अग्निभूमी, जीवनमरणाच्या निसरड्या वाटा यात एक चैतन्य फुलवतो. मानवी अस्तित्वाशी सगळे एकेक कडीने जोडतो, जणू जीवन फुलवणारे...
All BooksPashanache Pazar | पाषाणाचे पाझर
₹950.00Original price was: ₹950.00.₹713.00Current price is: ₹713.00. Save ₹237 Add to cart -
Sale! Add to cartफिनिक्स ही कादंबरी नाही. आणि ती कुणाची प्रेरक यशोगाथाही नाही. जीवनातल्या एका आघातातून विस्कटलेल्या आयुष्याची घडी बसवण्याच्या प्रवासाचे हे एक वस्तुनिष्ठ वर्णन आणि दर्शन आहे. हा प्रवास सांगणाऱ्याला आणि लिहिणाऱ्याला कुणाचाही राग नाही, लोभही नाही. जे घडलं ते जसंच्या तसं सांगण्याची प्रबळ इच्छा आहे. मानसिक धक्क्यातून सावरायला लागलेला वेळ, मग निराशा, परावलंबित्व आणि त्यातून बाहेर पडण्याच्या जिद्दीतून जन्माला आलेली ध्येयासक्ती या मनाच्या प्रवासाचं या पुस्तकामध्ये तपशीलवार वर्णन आहे. कुठलंही भावनिक प्रदर्शन न करणारं असं लेखन वाचायला मिळणं ही आजच्या वाचकाची गरज आहे. आणि ती गरज भागवल्याबद्दल मेघा आणि धनंजय यांचे मनापासून आभार. ज्या तटस्थपणे ते लिहिलं गेलं आहे, त्याच तटस्थपणे वाचकांनी ते वाचावं, अशी माझी इच्छा आहे. डॉ. मोहन आगाशे प्रख्यात मनोविकारतज्ज्ञ ----------------------------------------- आपल्या आयुष्यातील एखादा प्रसंग अगर क्षण आपल्यापासून काय काय हिरावून घेऊ शकतो आणि ते हिरावून घेतल्यानंतर जेव्हा आपल्यापाशी जगण्याची उमेद राहत नाही; तेव्हा अचानक एक उमेदीचा जिवंत झरा आपल्यात आहे, ह्याची जाणीव कळत नकळत होत असताना पुन्हा एकदा आपल्या पायावर भक्कमपणे उभं राहण्याची ही गोष्ट. एक प्रकारे आपल्याला आपल्या आत डोकवायला लावणारी आणि आपल्यातल्या अपार शक्तीचे दर्शन घडवणारी. अत्यंत परिणामकारक आणि तरी साध्या भाषेत तुमच्याशी संवाद साधणारी आणि तुमच्यातल्या एकाकी माणसाला साथ देणारी अशी ही एका फिनिक्स माणसाची अनवट यात्रा! ह्यातल्या धनंजयना आणि त्यांना जवळून साथ देणाऱ्या मेघाला सलाम! सागर देशमुख प्रख्यात अभिनेता, लेखक, दिग्दर्शक ----------------------------------------- काट्याचा नायटा व्हावा, तशी एका साध्या अपघातातून अनंत यातनांची मालिका सुरू झालेली धनंजयची ही कथा. त्याच्या सहनशीलतेची परीक्षा घेणाऱ्या वेदनांचा प्रवास वाचताना नकळत डोळ्यातून अश्रू ओघळतात. त्याची जिद्द, डॉक्टरांची आपुलकी, फिजिओथेरपीचे विलक्षण अनुभव आणि कुटुंबीयांची खंबीर साथ बघून मन अचंबित होते. धनंजयची वाटचाल ही सामान्यातून असामान्याकडे घेतलेली झेप आहे. आणि त्याची आंतरिक खळबळ डॉ. मेघा देऊसकर यांनी अशी शब्दबद्ध केली आहे की, पुस्तक एकदा वाचायला घेतले की, खाली ठेवावे असे वाटत नाही. स्वामिनी विक्रम सावरकर समाजसेविका, लेखिका
All BooksPhoenix | फिनिक्स
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Sale! Add to cartख्रिस्तवासी पोप दुसरे जॉन पॉल यांचे आयुष्य म्हणजे असंख्य नाटयपूर्ण घटनांची मालिकाच ! या कॅथलिक धर्माचार्यांच्या पोलंडमधील पूर्वायुष्यासह व्हॅटिकनमधील प्रदीर्घ प्रभावी कारकिर्दीचा फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी या पुस्तकात सविस्तर आढावा घेतला आहे आणि त्याबरोबरच त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दडलेल्या असंख्य मानवी पैलूंवरही प्रकाशझोत टाकला आहे.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेPop Dusre John Paul: Jeevangatha | पोप दुसरे जॉन पॉल : जीवनगाथा
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cart'डोरोथी नॉर्मन... लोकशाहीबद्दल आस्था बाळगणारी एक अमेरिकन तरुणी. इंदिरा गांधी... जवाहरलाल नेहरूंची लाडकी कन्या. ऑक्टोबर १९४९ मध्ये दोघींची अमेरिकेत पहिली भेट झाली आणि सुरू झाला दोघींमधला पत्रव्यवहार. त्या एकमेकींच्या व्यथावेदना पत्रांतून जाणून घेत, परस्परांना रोखठोक सल्लेही देत. फार मोठा भावनिक आधार वाटे एकमेकींना ! इंदिराजींच्या दु:खद निधनानंतर तो पत्रव्यवहार थांबला. डोरोथी नॉर्मन यांनी आपल्याजवळ जपून ठेवलेल्या निवडक पत्रांचा एक संग्रह १९८५ साली आपल्या जिवलग मैत्रिणीला श्रद्धांजली म्हणून प्रसिद्ध केला. त्या जुन्या, गाजलेल्या दुर्मीळ पत्रसंग्रहाचा हा अनुवाद... इंदिराजींच्या व्यक्तिमत्त्वाच्या एका हळव्या पैलूवर टाकलेला प्रकाश! '
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेPriy Dorothi | प्रिय डोरोथी
₹225.00Original price was: ₹225.00.₹169.00Current price is: ₹169.00. Save ₹56 Add to cart -
Sale! Add to cart'तब्बल शंभर वर्षांपूर्वी जन्मलेला... अठरा वर्षांपूर्वी कालवश झालेला... मात्र दरम्यान तब्बल सहा दशकांचा काळ मराठी मनाला मनसोक्त रिझवणारा... हा अष्टपैलू प्रतिभावान असंख्य मराठी मनांचा एक कप्पा कायमचा व्यापून बसला आहे! पुलंचं असणं... पुलंचं नसणं... ह्याचं ज्यांना अगत्य आहे, त्या सर्वांसाठी सुप्रसिद्ध लेखिका मंगला गोडबोले यांनी पुलंना शोभेशा शैलीत घेतलेला वेध पुलंच्या जीवनाचा, त्यांच्या काळाचा, काळावर त्यांनी उमटवलेल्या अमिट नाममुद्रेचा ! पु.ल. चांदणे स्मरणाचे '
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेPu. La. Chandane Smaranache | पु. लं. चांदणे स्मरणाचे
₹430.00Original price was: ₹430.00.₹323.00Current price is: ₹323.00. Save ₹107 Add to cart -
Sale! Add to cart'सोविएत संघराज्याचं विघटन झाल्यानंतर रशियात निर्माण झाली निर्नायकी. रशियाला साम्यवादाच्या जोखडापासून जास्तीत जास्त दूर नेण्याच्या नादात बोरिस येल्त्सिन यांनी अनेक प्रयोग केले. ते बहुतांशी फसले; तथापि व्लादिमीर पुतिन यांना सत्तेच्या सिंहासनावर बसवण्याचा प्रयोग मात्र अपवाद ठरला. पुतिन निघाले महाबेरकी आणि तितकेच क्रूरही. यथावकाश येल्त्सिनना बाजूला सारून पुतिननी देशाची सारी सत्तासूत्रं आपल्या हातात घेतली. विरोधकांचा काटा काढताना त्यांनी कसलाही विधिनिषेध बाळगला नाही. रशियाला पुन्हा एकदा महासत्ता बनवण्याचा ध्यास घेऊन देशविदेशांत त्यांनी जी पावलं उचलली, ती खूप वादग्रस्त ठरली. राष्ट्रवादाचा मुलामा दिलेली त्यांची व्यक्तिकेंद्रित हुकूमशाही प्रदीर्घ काळ टिकली तरी कशी, हा भल्याभल्या राजकीय निरीक्षकांची सत्त्वपरीक्षा पाहणारा एक महत्त्वाचा प्रश्न. त्या कटूप्रश्नाची एका व्यासंगी आणि गोष्टीवेल्हाळ पत्रकारानं करून दाखवलेली ही उकल... आंतरराष्ट्रीय राजकीय इतिहासाचा वेध घेता घेता एका जगावेगळ्या व्यक्तिमत्त्वाची त्याच्या असंख्य भल्याबु-या कंगो-यांसह करून दिलेली ही ओळख...
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेPutin – Mahasattechya Itihasache Asvastha Vartaman | पुतिन – महासत्तेच्या इतिहासाचे अस्वस्थ वर्तमान
₹450.00Original price was: ₹450.00.₹338.00Current price is: ₹338.00. Save ₹112 Add to cart -
Sale! Add to cart'सतरा वर्षांचा एक तरुण माय आणि मायभूमी यांच्यापासून दूर, एका अनोळखी जगात जातो, तेव्हा त्याच्या शिदोरीमध्ये बांधलेली असते अपार जिज्ञासा आणि अथक ध्यासवृत्ती ! आणि मग सुरू होते ज्ञानपंढरीकडे जाणारी त्याची वाटचाल... विश्वाची पायाभरणी करणा-या मूलकणांची रहस्यं उलगडणारी, जणू विधात्याच्याच मनाचा वेध घेणारी अशी वाटचाल ! अशी वैज्ञानिक वाटचाल करत राहणारा डॉ. आशुतोष कोतवाल यानं आपल्या उपजत प्रज्ञेला दृढसंकल्पाची, चिकाटीची, परिश्रमांची आणि मनोधैर्याची जोड दिली. मूलकण-विज्ञान-क्षेत्रातलं आजचं त्याचं अग्रगण्य स्थान हे जलपृष्ठावर दिसणा-या हिमशिळेच्या टोकासारखं आहे. त्याच्या यशामागं दडलेली आव्हानं, संघर्ष आणि अविचल आशादृष्टी यांची ही त्याच्या आईनंच सांगितलेली कथा अनेक युवकांना प्रेरणादायी ठरू शकेल.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेPutra Vhava Aisa | पुत्र व्हावा ऐसा
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart
">
Skip to content