पर्यावरण
-
Sale! Add to cartपर्यावरणाच्या वैशिष्ट्यांची किंवा समस्यांची केवळ माहिती देऊन हे पुस्तक थांबत नाही; तर पर्यावरणाची जी एक दृष्टी मुलांच्या मनात विकसित व्हावयास पाहिजे ती निर्माण करते. ही दृष्टी अधिकाधिक विकसित करून पर्यावरणाच्या समस्या सोडविण्यासाठी काय काय करता येईल हे नेमकेपणानं सांगते. हसत-खेळत चाललेल्या गप्पांमधून एकीकडे मुलांना रंजकपणे विषयाची माहिती मिळत राहतेच; पण त्याचबरोबर समस्या आणि उपाय ह्या दोन्हींशी आपण अतूटपणे जोडलेले आहोत हे जाणवत राहून मुलांना कृतीसाठीही प्रेरणा मिळते. ७वी ते ९वी ह्या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक अपरिहार्य आहे !
पर्यावरणHasare Paryavaran | हसरे पर्यावरण
₹120.00Original price was: ₹120.00.₹90.00Current price is: ₹90.00. Save ₹30 Add to cart -
Sale! Add to cartवनस्पती म्हणजे काय, वनस्पतीचं काम कसं चालतं ते या पुस्तकात सांगितलं आहे. वनस्पतिशास्त्र शिकवणारी पाठयपुस्तकं असतात. पाठयपुस्तकात वनस्पतीचे विविध भाग, वनस्पतीची वाढ, वनस्पतीमधल्या विविध प्रक्रिया इत्यादी गोष्टी सांगितलेल्या असतात. पाठयपुस्तकातला मजकूर फक्त विद्यार्थ्यांसाठीच असतो. झाड आणि माणूस या पुस्तकातला मजकूर वर्गात न जाता कळणारा आहे. शाळा, फळे, भिंती, मास्तर, परीक्षा, पास, नापास इत्यादी गुंत्याच्या बाहेर राहून वनस्पतीशी मैत्री करण्याचा प्रयत्न या पुस्तकात आहे. हे पुस्तक वाचून वनस्पतीची गंमत कळते. या पुस्तकाची दुसरी गंमत अशी की यातल्या मजकुराला एक स्वतंत्र शैली आहे. या मजकुरात माणसं आहेत, प्रसंग आहेत, घटना आहेत, किस्से आहेत आणि अर्थातच शास्त्राचा आधार असलेली माहिती आहे. म्हटलं तर ही गोष्ट आहे. म्हटलं तर ही पत्रकारिता आहे. म्हटलं तर हे शिक्षणही आहे. ज्ञान आहे आणि गंमतही आहे. कथा, कादंबरी, पत्रकारिता, शिक्षण इत्यादी हेतूंसाठी तयार केल्या जाणाऱ्या मजकुराचे साचे ठरलेले आहेत. शैल्या ठरलेल्या आहेत. मजकुरांची साचेबंद शैली सवयी दूर सारून लेखक वाचकांशी बोलला आहे.
पर्यावरणManus Ani Zaad | माणूस आणि झाड
₹100.00Original price was: ₹100.00.₹75.00Current price is: ₹75.00. Save ₹25 Add to cart -
Sale! Add to cartश्रीपाद अच्युत दाभोलकर म्हणजे वृक्षवल्लींशी, फळाफुलांशी, शेतीभातीशी थेट संवाद साधणारा प्रतिभावान कृषितज्ज्ञ. दाभोलकर फक्त निसर्गाशीच बोलायचे, असं नाही; तर खेड्यापाड्यातील, वाड्यावस्तीत राहणाऱ्या निरक्षर शेतकऱ्यापासून प्रयोगशील, पदवीधर शेतीतज्ज्ञापर्यंत साऱ्यांशी मनमोकळा संवाद साधायचे. वरकरणी अद्भुत वाटणाऱ्या कल्पना शास्त्रशुध्द ज्ञानाच्या मदतीनं वास्तवात कशा आणायच्या, हे प्रात्यक्षिकासहित सप्रयोग सिध्द करणारे दाभोलकर प्रत्येकाला नवी दृष्टी द्यायचे. आपल्या सहवासात येणाऱ्या प्रत्येक पानाफुलाशी, फळापिकाशी, झाडवेलीशी अन् अर्थात माणसाशीही घट्ट नातं जोडणारा दाभोलकरांचा हृदयसंवाद.
पर्यावरणMi Dabholkar Boltoy | मी दाभोलकर बोलतोय: श्रीपाद अच्युत दाभोलकर
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Sale! Add to cartकळीचं फूल जितक्या नकळत होते तसे किरण पुरंदरे पक्षांचे, निसर्गाचे नादी झाले. झाडं, फुलं, फुलपाखरं, पक्षी, झरे, ढग, आकाश, डोंगर हे सगळं ते झपाटल्यासारखे पाहत राहिले. आपल्या अवतीभवतीच्या परिसरातल्याच निवडक मोजक्या पक्ष्यांची त्यांनी बारकाईने निरीक्षणे केली, सखोल माहिती मिळवली. आपल्या निसर्गप्रेमाला, पक्षीप्रेमाला त्यांनी अभ्यासाची दिशा दिली. मधमाशीच्या चिकाटीने गोळा केलेली ही अत्यंत मनोरंजक माहिती त्यांनी तितक्याच सुबोध शैलीत या पुस्तकात मांडली आहे.
पर्यावरणMuthevarcha Dhobi | मुठेवरचा धोबी
₹50.00Original price was: ₹50.00.₹38.00Current price is: ₹38.00. Save ₹12 Add to cart -
Sale! Add to cartकुठे कोरडा दुष्काळ, तर कुठे ओला. कुठे ढगफुटी, तर कुठे अवकाळी गारपीट. एकीकडे वारंवार वणवे, तर दुसरीकडे महापूर. सर्वत्र चर्चा एकच : हवामान कल्लोळ! यात दोष कुणाचा? निसर्गाचा नक्की नाही. तो तर पोरका होतोय! बेसुमार वृक्षतोड, बेफाम खाणकाम. अनिर्बंध बांधकाम आणि अविचारी पाडकाम. मानवाने निसर्गाची हत्या चालवली आहे. पण निसर्गाची हत्या म्हणजे माणसाची आत्महत्या. कशी, ते सांगत आहे...
All BooksNisargakallol | निसर्गकल्लोळ
₹280.00Original price was: ₹280.00.₹210.00Current price is: ₹210.00. Save ₹70 Add to cart -
Sale! Add to cartपर्यावरणाची समस्या ही आज पर्यावरणाइतकीच सर्वव्यापी झाली आहे. निसर्गाशी लढा देऊन त्याच्यावर विजय मिळवण्याच्या प्रयत्नात आपण त्याची खूपच हानी केली आहे. निसर्गाचं चक्र त्यामुळे भेदलं जात आहे. पर्यावरणाची समस्या ही अशा प्रकारे बाह्य निसर्गातील असली, तरी तिचं मूळ आहे आपल्या मनोवृत्तीत - आपल्या विचारांत. आपली भोगवादी वृत्ती, हाव, आक्रमकता ही ह्या समस्येला कारणीभूत आहे आणि केवळ ही एकच नव्हे, तर शस्त्रस्पर्धा, दुर्बलांवरचे अत्याचार, गुन्हेगारी, व्यसनाधीनता, मानसिक तणाव, स्वैराचार अशा अनेक समस्या त्याच मनोवृत्तीमुळे आपल्या समोर उभ्या ठाकल्या आहेत. ही मनोवृत्ती जोवर बदलत नाही, तोवर ह्या समस्या सुटणार नाहीत. हा बदल कसा असला पाहिजे ? तो कशानं शक्य होईल ? आधुनिक पाश्चात्त्य विज्ञान आणि प्राचीन पौर्वात्य तत्त्वज्ञान ह्यांच्या आधारे या बदलाची दिशा शोधणारं हे पुस्तक.
पर्यावरणNisargayan | निसर्गायण
₹290.00Original price was: ₹290.00.₹218.00Current price is: ₹218.00. Save ₹72 Add to cart -
Sale! Add to cartअतिसूक्ष्म रेणूपासून पृथ्वीच्या पाठीवर पसरलेल्या महासागरापर्यंत एकपेशीय अमीबापासून बुद्धिमान मनुष्यप्राण्यापर्यंत सर्वत्र संचार करणारं पाणी. या पाण्याची सांगोपांग ओळख म्हणजे हे पुस्तक. कारण हा प्रवास आहे पाण्याचे अनोखे पैलू उलगडणारा, पाण्यापासून सुरू होणारा आणि पाण्यातच विलीन होणारा !
पर्यावरणPani Te Pani | पाणी ते पाणी
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartमानवानं निसर्गाच्या विरोधात युद्ध पुकारलं आहे. आणि हे आत्मघातकी आहे. प्रक्षुब्द्ध झालेला निसर्ग निकरानं परतीचा प्रबळ हल्ला करत आहे. पाणथळ जागा संपत चालल्या असून वाळवंटं वाढत आहेत. अरण्यतोड थांबत नाही. जैवविविधता कोसळत आहे. दहा लाख प्रजाती समूळ उच्चाटनाच्या धोक्यात आहेत. सर्व महासागर प्लॅस्टिकने तुंबून जात आहेत. आपल्या डोळ्यांदेखत पर्यावरणीय यंत्रणा नष्ट होत आहेत. सध्या जग कडेलोटाच्या बिंदूवर येऊन ठेपलं आहे. सध्या चालू असलेल्या ह्या बहुविध अराजकाला मानवी कृत्येच जबाबदार आहेत. याचा अर्थ मानवी कृतीच त्यांना रोखू शकते. आणि त्यासाठी हे दशक निर्णायक ठरणार आहे. माणसाने चालवलेले अनन्वित अत्याचार झेलणाऱ्या सहनशील धरतीकडून मिळालेला निर्वाणीचा इशारा..
पर्यावरणPruthvicha Aakhyan | पृथ्वीचे आख्यान
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Sale! Add to cartविकास ही संकल्पना सध्या केवळ भौतिकवाढीत अडकून बसली आहे - संकुचित झाली आहे. दरडोई उपभोग वा दरडोई जी.एन्.पी. वाढवणं ह्या झापडबंद रीतीनं विकासाचा आलेख चढता ठेवण्याचा सध्याचा आपला प्रयत्न आहे. आपल्या मनांवरचं ह्या संकल्पनांचं गारूड इतकं बळकट आहे की, त्यांचे व्यक्ती, समाज आणि पर्यावरण ह्यांच्यावर होणारे भयंकर दुष्परिणाम जाणीवपूर्वक दुर्लक्षून आपण वेगानं त्याच दिशेत पुढे जात आहोत. तिकडे अर्थशास्त्राच्या मोजपट्टया विकास होत असल्याचं दाखवतात; पण प्रत्यक्ष अनुभव येत आहे तो सार्वत्रिक अध:पतनाचा - सर्वांगीण विनाशाचा. अशा ह्या अशाश्वत, विनाशक विकासाची कारणमीमांसा करून ख-याखु-या विकासाची दिशा शोधण्याचा हा प्रयत्न. व्यक्ती, समाज आणि पर्यावरण ह्या तिन्हींची धारणा करणारा; भौतिक वाढीला असणा-या निसर्गाच्या अपरिहार्य मर्यादेचं भान ठेवून त्या मर्यादेचा आदर करणारा; जाणिवेच्या अनंत विस्ताराचा विकास अभिप्रेत असणारा असा हा सम्यक् विकास आहे. संकल्पना आणि व्यवहार ह्यांची सांगड घालत त्याचा ऊहापोह करणारं हे पुस्तक.
पर्यावरणSamyak Vikas | सम्यक विकास
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
पर्यावरण
Sheti Israelchi | शेती इस्त्राईलची
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Read more
">
Skip to content