पुरस्कार प्राप्त पुस्तके
-
Sale! Add to cartभाबडा चिमणराव आणि बालनाटयातल्या दुष्ट चेटकिणीपासून हसवाफसवीतल्या एकसे एक सरस सहा भूमिकांपर्यंत धूम धमाल हसवणारे, चौकटराजा मधल्या नंदू आणि श्रीयुत गंगाधरे टिपरेतल्या आबांपासून लगे रहो मुन्नाभाईमधल्या गांधींपर्यंत घराघरांत पोहोचलेले दिलीप प्रभावळकर यांचा मिस्कील मानसपुत्र म्हणजे हा बोक्या सातबंडे ! तो आहे निर्मळ मनाचा नि धाडसी वृत्तीचा. व्रात्य पण वांड नाही व खोडकर पण खोडसाळ नाही. गरजूला मदत करणं व ढोंगी माणसांच्या वर्मावर घाला घालणं हा त्याचा धर्म ! प्रत्येक संकटातून, अग्निदिव्यातून तो सहीसलामत पार पडतो. दिलीप प्रभावळकरांची लेखनशैली मुळात मिस्किल नि खटयाळ. बोक्या सातबंडयासारखा समानधर्मी भेटला की, मग तर विचारायलाच नको. प्रभावळकरांच्या खटयाळपणाला उधाणच येतं. किशोरांना ते खुद्कन् हसवतात, रिझवतात. बोक्याच्या हाती आनंदाचं भिरभिरं देऊन त्याला ते मस्त घुमवतात! गुगली, 'नवी गुगली', 'हसगत', 'कागदी बाण' व 'झूम' नंतरचं प्रभावळकरांचं 'बोक्या सातबंडे' हे एक झकास पुस्तक ! प्रसन्न विनोदाचा शिडकावा करणारं.
पुरस्कार प्राप्त पुस्तकेBokya Satbande (Part 4 To 5) | बोक्या सातबंडे (भाग ४ ते ५)
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cartबोल माधवी ............ किती चातुर्मास प्रायश्चित्त घ्यायला हवंय मानिनी ? सांग मला कुणी चतुर्मुख, चतुर्भुज नाही सांगणार... वासनांची चतुरंग सेना शृंगारून चार चार सेनापतींनी एका अनभिज्ञ अबलेवर निर्घृण अत्याचार केलेत... त्या गुन्ह्यांच्या ओझ्याखाली दबलेला पुरुषांचा वंशज मी एक पुरुष आज मुक्त होऊ पाहतो आहे त्या अश्लाघ्य पितृ-कर्मातून... सत्य, द्वापार, त्रेता, आणि कली... चार युगांच्या या अंतिम टोकावर उभा आहे मी शून्याच्या मधोमध नचिकेताई जिज्ञासांनी चहुकडून घेरलेला... बोल, बोल माधवी स्त्री कधी बोलणारच नाही काय ?
कवितासंग्रहBol Madhavi | बोल माधवी
₹125.00Original price was: ₹125.00.₹94.00Current price is: ₹94.00. Save ₹31 Add to cart -
Sale! Add to cartब्राह्मोस ! आपल्या लक्ष्यावर अचूक आघात करणारे, ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणारे जगातले सर्वात वेगवान क्रूझ क्षेपणास्त्र. या क्षेपणास्त्राच्या विकास आणि निर्मितीचा भारत आणि रशिया यांच्या संयुक्त प्रयत्नांतून साकारलेला प्रकल्प म्हणजे 'ब्राह्मोस'! अज्ञात वाटेवरील संशोधनाचे हे साहस म्हणजे 'आपण हे करू शकतो' असा आत्मविश्वास जागवणारा पहिलावहिला अनुभव ! मर्यादित गुंतवणूक, व्यावसायिक व्यवस्थापन, गतिशील निर्णयप्रक्रिया, अनोखी कार्यपद्धती आणि पारदर्शी प्रामाणिकता यांच्या संयोगातून वास्तवात उतरलेले हे स्वप्न. या प्रकल्पातून जन्मलेले यशस्वी प्रारूप आत्मनिर्भर राष्ट्रनिर्मितीसाठी अन्य क्षेत्रांमध्येही उपयोगात आणता येईल. या प्रकल्पाची त्याच्या निर्माणकर्त्याने सांगितलेली जन्मकथा: वेधक तितकीच प्रेरकही !
पुरस्कार प्राप्त पुस्तकेBrahmos | ब्राह्मोस
₹375.00Original price was: ₹375.00.₹281.00Current price is: ₹281.00. Save ₹94 Add to cart -
Sale! Add to cart...भिंतीवर बसवलेला मोठा कर्णा आणि ते विचित्र यंत्र तिनं पाहिलं. तिला गंमत वाटली. मी याच्यात गायचं, गैसबर्ग ? तिनं विचारलं. होय, बाईसाहेब. गैसबर्ग उत्तरला. ध्वनिमुद्रणाची तयारी करण्यात तो गुंतला होता. सगळी यंत्रसामग्री आपापल्या जागी बसल्यानंतर तो तिच्याकडे आला आणि म्हणाला, आम्ही तयार आहोत, तुम्ही ? ती हसली, तिनं होकारार्थी मान हलवली आणि कर्ण्यापाशी गेली. तिचा तो जादूभरा, वरच्या पट्टीचा अन् मधुर आवाज कर्ण्यात घुमताच भारतीय शास्त्रोक्त संगीतानं फारच मोठी मजल मारली होती. तवायफांच्या कोठ्यांतून आणि श्रीमंतांपुरत्या मर्यादित बैठकांतून हे संगीत सामान्यांच्या घराघरात पोचलं होतं. गौहर जान भारताची पहिली ग्रामोफोन गायिका ठरली होती !
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेGauharjan Mhantat Mala | गौहरजान म्हणतात मला!
₹225.00Original price was: ₹225.00.₹169.00Current price is: ₹169.00. Save ₹56 Add to cart -
Sale! Add to cart‘काळ्यानिळ्या रेषा' हे केवळ एका चित्रकाराचे आत्मकथन नाही, तर हा समाजातील एका वंचित वर्गाचा अस्वस्थ करणारा उद्गार आहे. राजू बाविस्करांनी आधी आपल्या अभिव्यक्तीसाठी रेषा वापरली, रंग वापरले आणि आता आपल्या अनुभवांना शब्दांमधून वाट करून दिली आहे. आपल्या वाट्याला आलेले गावकुसाबाहेरचे उपेक्षेचे जगणे आणि झगडणे समंजसपणे उलगडत ते वाचकांना आपल्या चित्रांच्या दुखऱ्या मुळांपर्यंत घेऊन जातात. एका सर्जनाची मुळे दुसऱ्या माध्यमातील सर्जनप्रक्रियेत गवसणे हा अत्यंत विरळा असा अनुभव त्यांना आला. व्यक्तिचित्रणाच्या अंगाने जाणाऱ्या या आत्मकथनातून आपल्यालाही त्यामुळे अंतर्मुख करणारा अस्सल वाचनानुभव मिळतो. प्रफुल्ल शिलेदार
All BooksKalyanilya Resha | काळ्यानिळ्या रेषा
₹690.00Original price was: ₹690.00.₹518.00Current price is: ₹518.00. Save ₹172 Add to cart -
Sale! Add to cart'एक निसर्गरम्य खेडं. तिथं वाढणारा एक किशोरवयीन मुलगा. त्यानं पाळलेली खार. समृद्ध निसर्ग, पीकपाणी, रानमेवा, जनावरं, करामती मित्र यांत रमलेला, गुंतलेला मुलगा. एके दिवशी गावाच्या नदीवर धरण बांधणा-या मशिनरीची घरघर, थोड्याच दिंवसात अख्खा गावगाडा हलतो. नांदत्या वस्त्या उठतात. मुलगा कुटुंबासह गाव सोडतो. ती खार मात्र तिथंच राहते. उमलत्या हळव्या वयातल्या उलथापालथीची सहजपणे सांगितलेली खरी गोष्ट.
पुरस्कार प्राप्त पुस्तकेKharichya Vata | खारीच्या वाटा
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Sale! Add to cartमला माहीत होतं थडग्यांवर जीव लावणारी माणसं सर्वच धर्मांत असतात माणसांवर जीव लावणारी माणसं सापडत नाहीत कुठेही ! धर्मानं बांधल्या होत्या कधीच्याच कबरी माणसाचं अस्तित्व खोल पुरून कधी मंदिरावर उभारलेल्या कळसामधून कधी मशिदीवर रोवलेल्या चंद्रकोरीमधून माणसांच्या विचारांना विचारांनी तिलांजली देणारी माणसं विवेकाचा कत्लेआम करत असतात दररोज...
कवितासंग्रहMi Sandarbha Pokhartoy | मी संदर्भ पोखरतोय
₹280.00Original price was: ₹280.00.₹210.00Current price is: ₹210.00. Save ₹70 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreमोहित सेन भारतातील साम्यवादी चळवळीमधील एक बिनीचे शिलेदार... विसाव्या शतकातील तिशीनंतरच्या साठ-सत्तर वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडात त्या चळवळीने अनेक चढउतार पाहिले, वेडीवाकडी वळणे पार केली, उद्दिष्टे साध्य केली, पराभव पचवले. त्या सर्व घडामोडींचे साक्षीदार असणारे एक तत्त्वनिष्ठ नेते. त्यांनी लिहिलेल्या या आत्मचरित्राला प्रेमाची, मैत्रीची, विविध नातेसंबंधांची, वैयक्तिक आठवणींची अशी जोड मिळाली आहे की, साम्यवादी नेत्यांच्या आत्मचरित्रांमध्ये हे आत्मचरित्र त्या वेगळेपणामुळे ठळकपणे उठून दिसते. वैयक्तिक आणि सामाजिक अशा दोन्ही स्तरांवर मिळालेल्या विविध भूमिका प्रामाणिकपणे पार पाडणा-या एका मनस्वी कार्यकर्त्याची ही नितळ पारदर्शी आत्मकथा तितक्याच प्रवाही भाषाशैलीत आता मराठी वाचकांना उपलब्ध होत आहे.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेPanthasta : Mohit Sen Yanche Aatmacharitra | पांथस्थ : मोहित सेन यांचे आत्मचरित्र
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Read more -
Sale! Add to cartजगात या ग्रंथाच्या रोज हजारो प्रती विकल्या जातात... 'ऑल टाइम बेस्टसेलर' म्हणून ओळखला जाणारा हा ग्रंथ! जगात या ग्रंथाचा हजाराहून अधिक भाषांमध्ये अनुवाद केला गेला आहे; आपल्या भारतातच तब्बल दोनशे बोलीभाषांमध्ये या ग्रंथाचा अनुवाद उपलब्ध आहे... महात्मा गांधी, लिओ टॉलस्टॉय, पंडिता रमाबाई, साधू सुंदरसिंग, मदर तेरेसा, विनोबा भावे, अल्बर्ट श्वाइट्झर... या आणि यांच्यासारख्या असंख्य लोकांनी या ग्रंथातून प्रेरणा घेतली, असे इतिहास सांगतो. हे सारे खरे असले, तरीदेखील सर्वसामान्य मराठी वाचकांना बायबलची पुरेशी माहिती असत नाही. ख्रिश्चनांचा धर्मग्रंथ किंवा येशूचे चरित्र एवढीच जुजबी ओळख असते. अनेकांना नवा करार (न्यू टेस्टमेंट) ऐकून माहीत असतो, काहीजणांना चार गॉस्पेल्स म्हणजेच संपूर्ण बायबल वाटत असते. जुना करार (ओल्ड टेस्टमेंट) आणि नवा करार (न्यू टेस्टॅमेंट) मिळून होणारा बायबल म्हणजे एकच एक ग्रंथ नसून अनेक पुस्तकांचा संग्रह आहे, हे बहुतेकांना ठाऊक नसते. जिज्ञासेपोटी वाचू इच्छिणा-यांना अपरिचित धार्मिक परिभाषेचा आणि परकीय सांस्कृतिक वर्णनांचा अडसर हमखास कंटाळा आणणारा ठरतो. क्वचितप्रसंगी समज-गैरसमजांना वाव मिळतो. वास्तवाची ही दोन टोके लक्षात घेऊन सांस्कृतिक सेतू उभारण्याचा अभिनव प्रयत्न म्हणजे बायबलची ही नवी आवृत्ती... जुना आणि नवा दोन्ही करार पूर्णार्थाने सामावून घेणारी... आधुनिक ललितरम्य शैलीत भावानुवादाच्या रूपात अवतरणारी... तपशीलवार, विस्तृत टिपांमुळे ख-या अर्थाने सुबोध ठरणारी... नामांकित चित्रकारांच्या असंख्य चित्रांमुळे संग्राह्य झालेली... मराठीतील धार्मिक साहित्याच्या दालनात लक्षणीय भर घालणारी...! बायबलची नवी आवृत्ती!
तत्वज्ञान / व / धर्मSubodh Bible – Juna Karar, Nava Karar | सुबोध बायबल – जुना करार, नवा करार Set
₹1,500.00Original price was: ₹1,500.00.₹1,125.00Current price is: ₹1,125.00. Save ₹375 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreमराठीमध्ये वाङ्मयाच्या सैद्धांतिक समीक्षेचा अभाव आहे. वाङ्मयविषयक सर्व जटिल प्रश्नांची समर्पक उत्तरे देणाऱ्या आणि वाङ्मयकृतीच्या अस्तित्वाचा आणि तिच्या सर्व घटकांच्या परस्परसंबंधाचा उचित अर्थ सांगून तिच्या मूल्यमापनासंबंधीचे याेग्य निकष देणाऱ्या भूमिकेचा नव्याने शाेध घ्यावा, ही प्रेरणा मराठी समीक्षेत दिसून येत नाही. दीडशे वर्षांच्या मराठी समीक्षेच्या इतिहासात असे दाेनच प्रयत्न झाले. बा.सी. मर्ढेकरांनी सर्व ललित कलांच्या आंतररचनेसंबंधीचा आपला लयसिद्धांत मांडला. त्यानंतर लगेचच विंदा करंदीकरांनी सर्व ललित कलांमधून वाङ्मयकला बाजूला काढणारा आणि वाङ्मयकलेचे वेगळे स्वरूप अधाेरेखित करणारा ‘जीवनवेधी कले’चा सिद्धांत मांडला. मराठीत जशी मर्ढेकरांच्या लयसिद्धांताची दखल घेतली गेली, तशी करंदीकरांच्या जीवनवेधी कलेच्या सिद्धांताची घेतली गेली नाही. किंबहुना त्यांच्या वाङ्मयविषयक सैद्धांतिक भूमिकेची उपेक्षाच झाली. खरे म्हणजे करंदीकरांनी केवळ जीवनवेधी कलेचा सिद्धांतच मांडला नाही, तर त्यांनी हा सिद्धांत केंद्रस्थानी ठेवून समग्र काव्यशास्त्रच उभे केले. या पुस्तकातून सुप्रसिद्ध समीक्षक डॅा. सुधीर रसाळ यांनी पहिल्यांदाच विंदांच्या काव्यशास्त्राची सैद्धांतिक समीक्षा मांडलेली आहे.
पुरस्कार प्राप्त पुस्तकेVindanche Gadyaroop | विंदाचे गद्यरूप
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Read more
">
Skip to content