प्रवास
-
Sale! Add to cartनिसर्गाविषयीचे अपार कुतूहल आणि साहस करण्याची मनाची तयारी या बळावर कोल्हापुरातील एक सुविद्य मध्यमवर्गीय दांपत्य शिडाच्या बोटीतून अंटार्क्टिका मोहिमेवर जाते. एके काळी समुद्रबंदीच्या बेडीने आपल्या समाजाला जखडून ठेवले होते, याचे आज आश्चर्य वाटेल. तो काळ आता मागे पडला आहे. मात्र डॉ. गायत्री आणि डॉ. गुरुदास हर्षे यांनी इतरही कितीतरी सांकेतिक, पारंपरिक निर्बंधांच्या बेड्यांतून स्वतःला मोकळे करून घेतले आहे, हे या लेखनातून ठळकपणे जाणवते. त्यांची साहसकथा वाचताना त्या रोमांचक थराराचा अनुभव वाचकांनाही येतोच; पण निसर्गविज्ञान, इतिहास, भूगोल यांविषयीचे संदर्भआपले आकलन अधिक समृद्ध करतात. त्यामुळेच हा केवळ वैयक्तिक अनुभव न राहता एक प्रेरक, मार्गदर्शक ठेवाही ठरतो
All BooksAloukik Antarctia | अंटार्क्टिका
₹240.00Original price was: ₹240.00.₹180.00Current price is: ₹180.00. Save ₹60 Add to cart -
Sale! Add to cartही आहे मुक्त मुशाफिरी..... नानाविध प्रदेशांची, भौगोलिक, तसेच मानसिकही. कधी पर्वतशिखरे आणि खोल द-यांत निसर्गाच्या विराट रूपांचा आनंद घेण्यासाठी केलेली, तर कधी स्टेमसेल्स, संप्रेरके आणि विकरे, या निसर्गाच्याच सूक्ष्मतम रूपांत बौध्दिक आनंद मिळवण्यासाठी केलेली. कधी शरीराची ताकद आजमावण्यासाठी, तर कधी स्वत:च्या मनात डोकावून प्रेयस, श्रेयस, नाती आणि समष्टी यांचे गुंते समजावून घेण्यासाठी केलेली. हेतू, साधने आणि साध्य काहीही असो, आहे कमालीची आनंददायी आणि चिंतनगर्भ.
All BooksAnandachya Dahee Disha | आनंदाच्या दाही दिशा
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cartमिलिंद गुणाजी म्हणजे एक बहुपेडी व्यक्तिमत्वाचा कलंदर कलावंत. मळलेली वाट सोडून वेगळी वाट तुडवण्याचा त्यांचा स्वभाव. अशा वेगळया वाटेने ते द-याखो-यातून, शहराबंदरातून, गडकोटावर, सागरकिना-यावर, नदीतटावर, रानाडोंगरातून वाचकांचे बोट धरून हिंडतात. कधी त्यांचा कॅमेरा लकेर घेतो, कधी त्यांची लेखणी चित्र काढते आणि अशा आगळयावेगळया भटकंतीतून साकारते एक अनोखी मैफील.
प्रवासAnvat : Shabd, Sur, Dongarwata | अनवट: शब्द,सूर,डोंगरवाटा
₹190.00Original price was: ₹190.00.₹143.00Current price is: ₹143.00. Save ₹47 Add to cart -
Sale! Add to cartOn the surface, Yogesh Gupta had it all-a successful career as a petro chemical engineer at Shell in the Netherlands, an adorable French girlfriend, and a cozy home they had built together. But Yogesh wasn't happy and his mind was cluttered with existential doubts. When the noise in his head became unbearably loud, he took a sabbatical and escaped to Nepal, where while trekking to the Everest Base Camp he discovered the joys of solitude whereas months later in Vietnam, he found meaning in doing nothing. By the end of his first sabbatical, Yogesh had tasted blood and wanted a deeper peek into his mind; and so, a second sabbatical soon followed when he zoomed across Central and South America on a motorbike. It was then, while volunteering in an orphanage in Peru that he finally started finding the answers to his fears and doubts. Yogesh discovered what he truly wanted and a fancy job did not even make it to the bottom of his list. He packed his bags and left the Netherlands for home, to India, on a bicycle. This long two-wheeled journey eventually brought him home to himself, to Yogi.
All BooksBecoming Yogi | Becoming Yogi
₹275.00Original price was: ₹275.00.₹206.00Current price is: ₹206.00. Save ₹69 Add to cart -
Sale! Add to cartआतापर्यंत आयुष्यात अनेक उद्योग केले. इंजिनिअरिंगपासून अभिनयापर्यंत. मनस्वी भटकणं आणि छायाचित्रण हे त्यांपैकी काही. आता उमगू लागलंय की सर्वांत जास्त आनंद मला भटकंतीतून मिळतोय, किंबहुना माझ्या सगळ्या घडणीचा पायाच ही भटकंती आहे. या-ना-त्या निमित्ताने सह्य-सातपुड्याच्या रांगांमधून फिरण्याची संधी मला मिळाली आहे. त्या परिसरातल्या म-हाटमोळ्या मंडळींमध्ये ऊठबस करताना मला जे अनुभव आले ते मी माझी मुलुखगिरी या माझ्या पहिल्या पुस्तकातून तुमच्याशी शेअर केले. भटकंती हे पुस्तक म्हणजेही मनमुराद भटकण्यातून मला मिळालेला आनंद तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न आहे....
प्रवासBhatakanti | भटकंती
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cart'देवभूमी हिमालयात वसलेला आपला नितांतसुंदर शेजारी देश म्हणजे भूतान... पैसे किंवा दरडोई उत्पन्न याला जास्त महत्त्व न देता जिथे आनंदाचा निर्देशांक आवर्जून पाहिला जातो, तो जगातला एकमेव देश म्हणजे भूतान... वाहतुकीचे नियम अगदी अभावानेच मोडणाऱ्या लोकांचा देश म्हणजे भूतान... सगळा देशच जागतिक वारसा आहे, असे मानून मनापासून तसे वागणाऱ्यांचा देश म्हणजे भूतान... हॉटेलपासून दुकानांपर्यंत महिलांचाच दबदबा असलेला देश म्हणजे भूतान ! अशा या जगावेगळ्या देशाचा तपशीलवार परिचय करून देणारे पुस्तक.
प्रवासBhutan | भूतान
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreप्रसिध्द गिर्यारोहक सर एडमंड हिलरींना कुणीतरी एकदा विचारलं, की जीव एवढा धोक्यात घालून तो हिमालय चढायचाच कशासाठी? त्यावरं त्यांचं उत्तर होतं, ''कारण तो तिथे आहे म्हणून!'' कोणत्याही प्रकारच्या वेडया साहसाला त्यामुळेच 'का' हा प्रश्न कधी कुणी शहाण्या माणसानं विचारू नये. नाहीतर अशी पुस्तकंच जन्माला येणार नाहीत.
प्रवासBikevarcha Birhad | बाइकवरचं बि-हाड
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Read more -
Sale! Add to cartदुनियेच्या बाजारी जरा हिंडू या, देशाटनातून अनुभवाची शिदोरी साठवू या' या विचारानं परदेशात गेलेला एक संवेदनशील व्यवस्थापन तज्ज्ञ आपल्या जगभरच्या भ्रमंतीत त्याने टिपले अनेक अनुभव न्याहाळल्या अनेक घटना, त्याला भेटली अनेक माणसं या साऱ्या कणचित्रातून अन् क्षणचित्रातून बनलेलं कोलाज ब्रॅकनेलच्या खिडकीतून
प्रवासBraknelchya Khidkitoon | ब्रॅकनेलच्या खिडकीतून
₹120.00Original price was: ₹120.00.₹90.00Current price is: ₹90.00. Save ₹30 Add to cart -
Sale! Add to cartमला सांगा, गोव्यात काय नाही ?' हा प्रश्न विचारणारा मुशाफिर तुम्हांला वेगळाच गोवा दाखवतोय. त्यामुळे गोवा पर्यटनाच्या अधिकृत गाइडमध्ये जी आणि जेवढी माहिती असते, ती आणि तेवढी तुम्हांला या पुस्तकात कदाचित सापडणार नाही. पण गोव्याला जायला हवं, अमुकतमुक पाहायलाच हवं, ही ओढ मात्र हे पुस्तक तुमच्या मनात नक्की निर्माण करेल. स्वच्छंदीपणे, अगदी मनासारखा ज्यांना गोवा फिरायचाय, त्यांना 'इथे आणखी केवढं, काय-काय आहे' याची झलक नक्की यातून मिळेल.
प्रवासChala Mazya Govyala | चला माझ्या गोव्याला
₹90.00Original price was: ₹90.00.₹68.00Current price is: ₹68.00. Save ₹22 Add to cart -
Sale! Add to cartदुबई म्हणजे वाळवंटात निर्मिलेले जणू नंदनवनच ! जिद्द, मेहनत आणि दुर्दम्य आशावाद या त्रिगुणांच्या जोरावर अरबी माणसाने सर्वस्वी प्रतिकूल परिस्थितीवर मात केली. पाण्याच्या चार घोटांसाठी वणवण करणारा हा अरब आज सेंट्रली एअरकंडिशन घरातील सुखासीन आयुष्य जगतोय. हा बदल 'याचि देही याचि डोळा' अनुभवणाऱ्या मेघना अशोक वर्तक. १९७६ ते २०२५ या कालखंडात मेघनाताईंनी आपले पती श्री. अशोक वर्तक यांच्याबरोबर दुबईत वास्तव्य केले. मेघनाताईंच्या नजरेला बदलणारी दुबई जशी भावली, तशी त्यांनी ती शब्दांकित केली. दुबईच्या जीवनशैलीच्या प्रत्येक वैशिष्ट्यपूर्ण कंगोऱ्याचे कालानुरूप बदलते रंग आपल्याला आलेल्या अनुभवांसहित त्यांनी रेखाटले आहेत. आणि म्हणूनच स्थानिक वाचक दुबईच्या भूतवर्तमानाशी समरस होतील, त्यांना ही आपलीच गोष्ट वाटेल. दुबईचे यथार्थ दर्शन घडवणारे आणि दुबई-दर्शनाची ओढ लावणारे दुबई काल आणि आज
All BooksDubai : Kal Ani Aaj | दुबई : काल आणि आज
₹480.00Original price was: ₹480.00.₹360.00Current price is: ₹360.00. Save ₹120 Add to cart
">
Skip to content