रसग्रहण / समीक्षा
-
Sale! Add to cart'समग्र मराठी साहित्य-परंपरेमध्येच नव्हे तर राष्ट्रीय स्तरावरदेखील विजय तेंडुलकर यांचे स्थान लेखक म्हणून अढळ व अनन्यसाधारण आहे. नाटक, कथा, कादंबरी, एकांकिका, ललितगद्य व पटकथा - संवाद अशा सर्व लिखित व दृक् - श्राव्य माध्यमांवर तेंडुलकरांनी आपल्या अम्लान प्रतिभेची लखलखीत मुद्रा उमटवली. समकालीनता व सार्वकालीनता समर्थपणे अभिव्यक्त करणाऱ्या तेंडुलकरांच्या साहित्याचे अर्थनिर्णयन व पुनर्मूल्यांकन करण्याचा प्रयत्न एकूण सोळा लेखकांनी अंत:स्फूर्तता आणि वैचारिकता यांचा मेळ घालत येथे केला आहे. कारण कटू सत्याचे प्रयोग करणारे तें तथा तेंडुलकर अ-जून, आजही प्रस्तुत ठरतात.
रसग्रहण / समीक्षाA-Jun Tendulkar | अ-जून तेंडुलकर
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cartराजकारण आणि समाजकारण या दोन तलवारी एकाच म्यानात राहत नाहीत, हे वचन खोटं ठरवणार् या कार्यकर्त्या. स्थानिक प्रश्नांवर काम करताना वैश्विक घडामोडींचे भान ठेवून उत्तरे शोधणार् या नेत्या. आपत्ती व्यवस्थापनात स्त्रियांच्या गरजांचा आणि अडचणींचा स्वतंत्र विचार करणार् या कुशल व्यवस्थापक. तिसर् या जगातील स्त्रियांचे प्रश्न आंतरराष्ट्रीय मंचावर पोचवण्यासाठी धडपडणार् या अभ्यासक. उत्तम वक्कत्या आणि अभ्यासू लेखिका. नीलमताईंच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू या गप्पांमधून समोर येतात आणि उलगडत जाते एका सामाजिक कार्यकर्तीचे मानस व चिंतनशील राजकारणीचे अंतरंग.
All BooksAispais Gappa Neelamtainshee | ऐसपैस गप्पा नीलमताईंशी
₹360.00Original price was: ₹360.00.₹270.00Current price is: ₹270.00. Save ₹90 Add to cart -
Sale! Add to cart'जी. ए. कुलकर्णी म्हणजे एक अरभाट साहित्यिक! अवघ्या सत्त्याण्णव कथांमधून जीवनाचा भला मोठा पैस कवेत घेणारे कथाकार. जितके प्रतिभेच्या तेजाने तळपणारे, तितकेच गूढतेचे धूसर वलय बाळगणारे. ना कोणात मिसळणारे, ना कुणाला भेटणारे. ना सभासमारंभात मिरवणारे, ना कुणाला सामोरे जाणारे. कसा शोध घ्यायचा या लेखकाच्या मनातल्या अंत:प्रवाहाचा? वाचकाला थक्क करणारी त्यांच्या कथासृष्टीतली पात्रे, परिसर, कथानक आले तरी कोठून? जी. एं. च्या वैशिष्टयपूर्ण अर्पणपत्रिकांनी वि. गो. वडेर यांना साद घातली. आणि त्यातून ते शोधत गेले - जी. एं. च्या आयुष्यातील व्यक्ती आणि कथांतील पात्रे. या प्रयासातून उभे राहिलेले हे पुस्तक !
रसग्रहण / समीक्षाArpanpatrikatun G.A. Darshan | अर्पणपत्रिकांतून जी.ए. दर्शन
₹400.00Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00. Save ₹100 Add to cart -
Sale! Add to cartपाश्चात्य तत्त्वज्ञानाच्या इतिहासात अस्तित्ववादी विचारसरणाने क्रांतीच घडविली. या घटनेचे श्रेय कीर्केगार्ड, नीत्शे, यास्पर्स, मार्सेल, हायडेगर, काम्यू व सार्त्र यांच्याकडे जाते. अस्तित्ववादाने सुमारे चारेक दशके पाश्चिमात्य जगतातील साहित्यनिर्मिती, समीक्षादृष्टी व कलाविचार यांवर आपली कायमची मुद्रा उमटविली. दोन महायुध्दांच्या आसपासचे राजकीय- सामाजिक वातवरण , स्तब्ध झालेला धर्मविचार, उद्ध्वस्त समाजमानस आणि बेभरवशाचे व्यक्तिजीवन यांचा अस्तित्ववादाच्या उदयाशी व विकासाशी जवळचा संबंध आहे. १९६० ते १९८० या कालावधीत मराठी साहित्य व समीक्षा यांवरही अस्तित्ववादाचा प्रभाव होता. रेखा इनामदार-साने यांनी 'अस्तित्ववाद आणि मराठी कादंबरी' या ग्रंथामधून अस्तित्ववादाच्या उदयाशी तसेच जडणघडणीची नेटकी मीमांसा केली आहे. तसेच आस्तिकता-नास्तिकता, निवडीचे स्वातंत्र्य, परात्मता, असंगतता, अस्सल जीवनसरणी इत्यादी अस्तित्ववादी आशयसूत्रांचा सप्रमाण उलगडा केला आहे. तत्वज्ञान आणि साहित्य यांमधील परस्परसंबंधाची सूक्ष्म चिकित्सा करून मराठी कादंबरीविश्वात मूलगामी परिवर्तन घडविणा-या 'कोसला', 'बॅरिस्टर अनिरूध्द धोपेश्वरकर,' 'पुत्र', 'सात सक्कं त्रेचाळीस', 'एन्कीच्या राज्यात' या कादंब-याचे अस्तित्ववादाशी असणारे नाते त्यांनी विश्लेषणपूर्वक स्पष्ट केले आहे. अस्तित्ववाद आणि कादंबरी या दोहोंचे सांगोपांग विवरण करणारा हा मराठीतील पहिला ग्रंथ आहे. विलास खोले
रसग्रहण / समीक्षाAstitvavad Aani Marathi Kadambari | अस्तित्ववाद आणि मराठी कादंबरी
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart -
Read more‘बेगम बर्वे’ची जन्मकथा सांगितली, तरी नाटकाच्या निर्मितिप्रक्रियेचा संगतवार उलगडा मलाही करता येणार नाही. वाटते की, प्रत्यक्ष कलाकृती निर्मितीच्या कहाण्या ह्या हिमनगासारख्या असतात. नाटककराने त्यांच्या स्पष्टीकरणाचा कितीही प्रयत्न केला, तरी बराच भाग पाण्यातच राहतो. एकूणच रंजनप्रधान रंगभूमीच्या विरूद्ध टोकाला असलेले हे नाटक भारतीय नाटक व रंगभूमीच्या चर्चेच्या परिघात, देशात व परदेशात गेली तीस वर्षे राहिले आणि आता नाटकावर हा टीकाग्रंथही सिद्ध झाला आहे. नाटककाराला तरी यापेक्षा अधिक काय हवे असते? - सतीश आळेकर
-
Sale! Add to cartगुरुनाथ आबाजी कुलकर्णी तथा जीए. मराठी कथाविश्वात सूर्यासारखे तळपणारे हे नाव. ज्ञानपीठ पारितोषिकाच्या तोडीचे मराठी साहित्य निर्माण करणारा साहित्यिक असा लौकिक अवघ्या सत्त्याण्णव कथांमधून मिळवणारा प्रतिभावान साहित्यिक जीएंच्या कथांचे नेपथ्य जसा त्या कथेवर, कथेतल्या व्यक्तींवर, त्यांच्या आयुष्यांवर, वाचकांवर अमिट परिणाम घडवते; तसा जीएंवर, त्यांच्या घडण्यावर, त्यांच्या प्रतिभेवर त्यांच्या आजूबाजूच्या आसमंताने काय परिणाम घडवला असेल? या उत्सुकतेतून प्रा. अ. रा. यार्दी आणि प्रा. वि. गो. वडेर या दोघांनी सुरू केला एक शोध. एक असामान्य कथाकाराच्या साहित्यातील परिसराचा प्रत्यक्ष धांडोळा घेऊन त्या कथाकाराच्या प्रतिभेचा वेध घेण्याचा मराठी साहित्यातील विरळा आणि वेगळा प्रयोग म्हणजे जीएंची कथा : परिसरयात्रा
रसग्रहण / समीक्षाGA chi katha : Parisaryatra | जीएंची कथा : परिसरयात्रा
₹400.00Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00. Save ₹100 Add to cart -
Sale! Add to cart'सत्यजित राय... साहित्याचे मोल जाणणारे, साहित्यातील पात्रांना, प्रसंगांना आपल्या चित्रपटांमधून वेगळी मिती मिळवून देणारे प्रतिभाशाली चित्रपट-दिग्दर्शक. रवींद्रनाथ ठाकूर, मुन्शी प्रेमचंद, विभूतिभूषण बंदोपाध्याय, इब्सेन अशा नामांकित साहित्यिकांच्या साहित्यकृतींवर आधारित चित्रपट सत्यजित राय यांनी बनवले. एका प्रतिभावंताच्या कृतीमधून दुसऱ्या प्रतिभावंताने निर्मिलेली तशीच प्रभावी कलाकृती म्हणजे जणू आकाशाचे सागरात उतरणे. अशा गाजलेल्या साहित्यकृतींवर आधारित सत्यजित राय यांच्या चित्रपटांचा मार्मिक रसास्वाद...
रसग्रहण / समीक्षाGagan Samudri Bimble | गगन समुद्री बिंबले
₹260.00Original price was: ₹260.00.₹195.00Current price is: ₹195.00. Save ₹65 Add to cart -
Sale! Add to cart'त्रिंबक नारायण आत्रे यांनी १९१५ साली लिहिलेल्या गावगाडा या बहुचर्चित ग्रंथाची ही शताब्दी आवृत्ती. त्यांनी स्वत: या ग्रंथाचे वर्णन Notes on Rural Sociology and Village Problems with special reference to Agriculture असे केलेले आहे. या आपल्या ग्रंथात त्यांनी गावाचे स्वायत्त स्वयंसिद्ध प्रशासन, गावाच्या आर्थिक व्यवहारातील शेतक-याचे केंद्रवर्ती स्थान, बलुतेदारी, वतनपद्धती आणि तत्कालीन गावगाडयाची कोसळू लागलेली अवस्था इत्यादींची साधार, सप्रमाण चिकित्सा केलेली आहे. या विशेष आवृत्तीमध्ये लेखक आत्रे यांच्या गावगाडा ग्रंथाच्या पहिल्या आवृत्तीची मूळ संहिता, त्यावरील महत्त्वाची अशी समकालीन समीक्षा, धनंजयराव गाडगीळ, स. ह. देशपांडे व सुमा चिटणीस या अभ्यासकांनी स्वातंत्र्योत्तर काळात केलेली सामाजिक-आर्थिक चिकित्सा आणि ग्रंथशताब्दीच्या निमित्ताने मुद्दाम लिहवून घेतलेले मिलिंद बोकील व नीरज हातेकर राजन पडवळ यांचे लेख, तसाच सदानंद मोरे यांचाही लेख समाविष्ट आहे. संपादक द. दि. पुंडे यांची सुदीर्घ विवेचक प्रस्तावना आणि परिशिष्ट यांतूनही आत्रे यांच्या ग्रंथाचे अंतरंग उलगडून घेण्यास साहाय्य होणार आहे. आत्रेरचित गावगाडाची ही शताब्दी आवृत्ती ग्रामीण अर्थशास्त्र, समाजशास्त्र, कृषिविज्ञान इत्यादी क्षेत्रांतील अभ्यासकांना तर उपयुक्त आहेच; पण त्याशिवाय गावप्रशासनात गुंतलेल्या सर्व प्रशासकीय अधिका-यांना तसेच जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व ग्रामपंचायती यांमधील जबाबदार कार्यकर्त्यांनाही विशेष मार्गदर्शक ठरणारी आहे.
रसग्रहण / समीक्षाGawgada : Shatabdi Aavrutti | गावगाडा : शताब्दी आवृत्ती
₹750.00Original price was: ₹750.00.₹563.00Current price is: ₹563.00. Save ₹187 Add to cart -
Sale! Add to cart'बालकुपोषण ही केवळ आदिवासी अन् आर्थिकदृष्टया निम्नस्तरातील वर्गाची समस्या नाही. मध्यमवर्गातही ती कमीअधिक प्रमाणात आढळते. ही समस्या सोडवणे शासनाची जबाबदारी आहे, असे म्हणून हात झटकणे ही शुद्ध आत्मवंचना आहे. महाराष्ट्रात लाखभर अंगणवाडी सेविका आणि साहाय्यिका तुटपुंज्या साधनांनिशी या समस्येशी लढत आहेत. पण तेवढे पुरेसे नाही. कौटुंबिक, सामाजिक, सांस्कृतिक पातळीवरही प्रयत्न व्हायला हवेत. महाराष्ट्रात राजमाता जिजाऊ मिशन यासाठी भरीव काम करत आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमधील अंगणवाडयांच्या प्रत्यक्ष पाहणीतून कुपोषणविरोधी लढयाचा मांडलेला लेखाजोखा.
रसग्रहण / समीक्षाGood Morning! Namaste! | गुडमॉर्निंग! नमस्ते!
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Sale! Add to cart'टीकास्वयंवर / जास्वंद / छान्दसी / पोत / युगान्त / हरिभाऊ / विश्रब्ध शारदा / ज्ञानदेवी / माझा प्रवास / ज्वाला आणि फुले / झुल / अमृतसिद्धी / गोखले चरित्र या ग्रंथांवरील लेख म्हणजे केवळ ग्रंथपरीक्षणे नव्हेत. किंबहुना ग्रंथपरीक्षणाची कडवी शिस्त मला-माझ्या स्वभावाला मानवणारीही नाही. या ग्रंथाबाबत लिहीताना अनेकदा आपोआप काही विचार मनात आले, काही प्रश्न उभे राहिले. कित्येकदा तर एकूण मराठी वाड्.मयप्रवाहाबाबतच काही कोडी पडली. ते सर्व खुलेपणाने येथे लिहिलेले आहे. कीर्तनकार जसे मूळ आख्यान सोडून इकडेतिकडे फिरतो, तसेच काहीसे इथे झाले आहे. मात्र कीर्तनकाराप्रमाणे अधिकारवाणीने सांगण्या पेक्षा जाणण्या चे कुतूहल बाळगणे मी अधिक पसंत करतो. मराठी साहित्य आणि मराठी समीक्षा यांबाबत माझ्या मनात जे कुतूहल प्रारंभापासून आहे, ते इथे मोकळेपणाने वावरते आहे, असे म्हणूयात. गो. म. कुलकर्णी
रसग्रहण / समीक्षाGranthkirtan | ग्रंथकीर्तन
₹70.00Original price was: ₹70.00.₹53.00Current price is: ₹53.00. Save ₹17 Add to cart
">
Skip to content