समाजकारण / राजकारण
-
Out of stock
Out of stock
Sale! Read more'महात्मा गांधींनी भारतीय स्वातंत्र्यलढयाचे नेतृत्व तर केलेच; पण स्वतंत्र भारताची राज्यघटना कशी असावी, याबद्दलही वेळोवेळी ते मार्गदर्शन करीत होते. स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनांमध्ये संमत झालेल्या अनेक ठरावांमध्ये गांधीजींच्या विचारांचे स्वच्छ प्रतिबिंब पडलेले आढळते. प्रत्यक्ष स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपली जी राज्यघटना तयार करण्यात आली, ती मात्र गांधीवादी विचारसरणीशी फारशी सुसंगत आहे, असे म्हणता येत नाही. असे का झाले असावे ? महात्मा गांधी आणि त्यांचे वारसदार असणारे पंडित जवाहरलाल नेहरू या दोघांमध्येच मूलभूत मतभेद का होते ? ती मतभिन्नता कशा बाबतीत होती ? अशा विविध प्रश्नांची उत्तरे देता देता भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीचा इतिहासही उलगडून दाखवणारे एका ज्येष्ठ न्यायविदाचे हे पुस्तक... गांधीजींच्या व्यक्तिमत्त्वाच्या एका आगळया पैलूवर अधिक प्रकाशझोत तर टाकतेच; पण काही मूलभूत राष्ट्रीय प्रश्नांचा पुनर्विचार करण्यास वाचकांना प्रवृत्तही करते.
समाजकारण / राजकारणMahatma Gandhi Ani Bharatiya Rajyaghatana | महात्मा गांधी आणि भारतीय राज्यघटना
₹160.00Original price was: ₹160.00.₹120.00Current price is: ₹120.00. Save ₹40 Read more -
Sale! Add to cart'सामाजिक वाटचालीच्या एका टप्प्यावर थोडे थांबून काही विचारवंतांनी केलेले चिंतन आणि काही कार्यकर्त्यांनी केलेले सिंहावलोकन... विचारांना चालना आणि कृतीला दिशा देणारे...
समाजकारण / राजकारणMaratha Samaj : Vastav Aani Apeksha | मराठा समाज : वास्तव आणि अपेक्षा
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cartआपोआप फाटणारे, पेटणारे कपडे, अंगावर बिब्याच्या फुल्या, अन्नात विष्ठा, डोळयातून निघणारे खडे- असे गूढ, भीतिदायक प्रकार म्हणजे भानामती-काळी जादू. त्यातून समाजात पसरतो गैरसमज- ही सारी विज्ञानापलीकडची अतर्क्य शक्ती ! मराठवाडयातील भानामती तर आणखी निराळी. फक्त स्त्रियांनाच छळणारी. मग त्या घुमतात, लोळतात, भुंकतात, बेभान अवस्थेत भानामती करणा-याचे नाव सांगतात. ज्या व्यक्तीचे नाव उच्चारले जाते, त्याचे जगणे अवघड बनते. अंधश्रध्दा निर्मूलन समितीने गेल्या पंचवीस वर्षांत शेकडो भानामती प्रकरणे शंभर टक्के यशस्वीरीत्या हाताळली. भानामती घडते, तेव्हा ती दूर करण्यासाठी क्रोधापेक्षा करुणेची, उपहासापेक्षा आपुलकीची गरज असते- हे भान देणारे रहस्यकथेहून रोमांचक वाटेल असे
समाजकारण / राजकारणMati – Bhanamati | मती-भानामती
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Sale! Add to cartगुजरातचे मुख्यमंत्री झाल्यापासून भारताचे पंतप्रधान या नात्याने सात वर्षांची कारकीर्द पूर्ण करीपर्यंत नरेंद्र मोदी यांनी जी मजल मारली, तिचा विविध क्षेत्रांमधील मान्यवर साक्षीदारांनी घेतलेला आढावा... प्रथम तेरा वर्षे राज्यात आणि नंतर केंद्रीय स्तरावर सात वर्षांत त्यांनी घडवलेल्या परिवर्तनाचा विस्तृत परिचय... अशक्य वाटणार् या अनेक गोष्टी शक्य करून दाखवणार् या एका किमयागार नेत्याच्या विलक्षण यशाचे रहस्य उलगडून दाखवणारा प्रभावी लेखसंग्रह. प्रस्तावना भारतरत्न लता मंगेशकर सहभागी लेखक पी. व्ही. सिंधू शोभना कामिनेनी सुरजित एस. भल्ला अमीश त्रिपाठी अमित शाह प्रदीप गुप्ता अनंत नागेश्वरन अरविंद पणगडिया डॉ. शमिका रवी उदय एस. कोटक अजय माथुर अनुपम खेर अशोक गुलाटी डॉ. देवी शेट्टी नंदन नीलेकणी नृपेन्द्र मिश्रा सद्गुरू सुधा मूर्ती अजित डोभाल (कीर्तिचक्रविजेते) मनोज लडवा, भरत बरई डॉ. एस. जयशंकर
All BooksModi@20 | मोदी@20
₹895.00Original price was: ₹895.00.₹671.00Current price is: ₹671.00. Save ₹224 Add to cart -
Sale! Add to cartमुस्लिम मन मुख्यत: इस्लाममधून घडलेले आहे. मुस्लिम मनाचा शोध म्हणजे पर्यायाने मूळ इस्लामचा अभ्यास होय. मूळ इस्लामचा अभ्यास म्हणजे मूलत: तीन गोष्टींचा अभ्यास : मुहंमद पैगंबरांचे चरित्र, कुरआन व हदीस. या तीनही बाबी परस्पराधारित आहेत. पैगंबर चरित्राचा अभ्यास केल्याशिवाय कुरआनातील वचनांचा अन्वयार्थ कळत नाही. कुरआन म्हणजे एक प्रकारे प्रेषितांच्या जीवनाचे प्रतिबिंब होय. प्रेषितांच्या उक्ति व कृती म्हणजे हदीस होय. हदीस म्हणजे एक प्रकारे कुराणाचा शब्दकोश होय. कुराणातील वचनांचा अर्थ लावण्यासाठी हदीस चाही आधार घ्यावा लागतो. या तीनही बाबींचा एकत्रित अभ्यास केला, तरच मूळ इस्लामचे सम्यक आकलन होऊ शकते. असा अभ्यास करून लिहिलेला हा ग्रंथ आहे. प्रेषितांनंतरच्या काळात इस्लाममध्ये अनेक पंथ निर्माण झाले. पण या सर्व पंथांना एकमताने मान्य असणारा हा मूळ इस्लाम प्रत्येकाने समजून घेणे काळाची गरज आहे.
समाजकारण / राजकारणMuslim Manacha Shodh | मुस्लिम मनाचा शोध
₹1,000.00Original price was: ₹1,000.00.₹750.00Current price is: ₹750.00. Save ₹250 Add to cart -
Sale! Add to cart'या पुस्तकाचा उद्देश तुम्हाला काही पटविण्याचा वा विकण्याचा नाही, तर काही विचार तुमच्यासमोर तपासायला ठेवण्याचा आहे. कोणत्याही विचारसरणीबद्दल तुम्हाला साशंक बनवण्याचा आहे. मग तो विचार विज्ञानातला असो वा देवाधर्माचा ! देव आणि धर्म याबाबतीत आधुनिक विज्ञानाने जे प्रश्न उपस्थित केले आहेत आणि अनेक क्षेत्रांमधील अनेक प्रश्नांची विज्ञानाने जी समर्पक उत्तरे दिली आहेत, त्यांचा गोषवारा वाचकापर्यंत पोहचविणारी तर्कवादाच्या दिशेने टाकलेली पाच पावले म्हणजे नास्तिकयात्रा'
समाजकारण / राजकारणNastikyatra | नास्तिकयात्रा
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart -
समाजकारण / राजकारण
Navabharatmadhil Lekh | नवभारतमधील लेख
₹600.00Original price was: ₹600.00.₹450.00Current price is: ₹450.00. Save ₹150 Add to cart -
Sale! Add to cartनिवडणुका कशा लढवाव्यात आणि जिंकाव्यात ? जनमत चाचण्या कशा कराव्यात ? आपलं राजकीय व्यक्तिमत्त्व कसं घडवावं ? आपली राजकीय प्रतिमा कशी उंचवावी ? जाहिरात, प्रचार कसा करावा ? कार्यकर्याँ कडून काम कशा प्रकारे करवून घ्यावं ? संघटनेची बांधणी कशी करावी ? निवडणुकीच्या युध्दातील पूर्वतयारीपासून अंतिम विजयापर्यंतची संपूर्ण व्यूहरचना शास्रशुध्द पध्दतीने उलगडणारे.
समाजकारण / राजकारणNivadnuk Jinknyasathi Sarva Kahi | निवडणूक जिंकण्यासाठी सर्व काही
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cart'२६/११ ची काळरात्र. मुंबईवर दहशतवाद्यांनी केलेला भीषण हल्ला. त्याच्या प्रतिकारासाठी सुरू झाला एक धाडसी लढा. कसाब जेरबंद झाला. बाकी दहशतवाद्यांचा बिमोड झाला. कसाबशी संबंधित न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाली. कसाबच्या मानेभोवती फास आवळला गेला. आणि चार वर्षांनी 'ऑपरेशन एक्स' पूर्ण झालं. या मोहिमेचा पडद्यामागच्या तपशिलांसह साद्यंत आढावा
समाजकारण / राजकारणOperation X | ऑपरेशन एक्स
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cart'दुसऱ्या महायुद्धात वीस लाख हिंदुस्तानी सैनिक लढले. जेथे जेथे ब्रिटिश युद्धात उतरले, तेथे तेथे हिंदुस्तानी सैन्य जाऊन पोचले. फ्रान्स आणि ग्रीसपासून ते मलायापर्यंत त्यांनी जर्मन, इटालियन आणि जपानी फौजांविरुद्ध निकराचा लढा दिला. असे असूनही भारताच्या इतिहासात या सैनिकांना स्थान नाही. आपण भारतीय त्यांना स्वत:च्या भूतकाळाचा भाग मानत नाही. भारतीय भाषांमधील साहित्य त्यांची दखल घेत नाही. भारतीय चित्रपटसृष्टी कधीही त्यांच्या जीवन-मरणाचे चित्रण पडद्यावर आणत नाही. दोस्त राष्ट्रांनी जसे त्यांना अनुल्लेखाने मारले, तसेच आपणसुद्धा त्यांना विस्मृतीच्या पडद्याआड ढकलून मोकळे झालो. हिंदुस्तानी सैनिकांनी इम्फाळ-कोहिमामध्ये बलदंड जपान्यांना धूळ चारली म्हणून हिंदुस्तान जपानी साम्राज्याच्या पकडीत सापडला नाही. अन्यथा केवळ हिंदुस्तानचाच नाही, तर संपूर्ण जगाचा चेहरा-मोहरा बदलला असता. जपानी हिंदुस्तानात घुसले असते, तर तिकडे जर्मनी, इटली यांचेही बळ वाढले असते आणि नाझी भस्मासुराने हिंदुस्तानातही पाय रोवले असते. तसे होऊ नये म्हणून ज्यांनी जिवाचे रान केले, प्राण गमावले, अशा अज्ञात वीरांची ही कथा.
समाजकारण / राजकारणPalbharahi Nahi Hay Hay | पळभरही नाही हाय हाय
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart
">
Skip to content
