समाजकारण / राजकारण
-
Sale! Add to cartसोळा ते पंचवीस या वयात माणसाचे मन श्रद्धावादी तरी बनते किंवा बुद्धिवादी तरी बनते. बहुतेक व्यक्ती तडजोडवादी वृत्ती स्वीकारतात. म्हणून अंधश्रद्धांचा त्याग करण्यासाठी आवश्यक तो प्रचार कॉलेजमधील युवकयुवतींमध्येच प्रामुख्याने व्हावयास हवा. क्षणोक्षणी मांत्रिकाकडे, गुरूकडे अथवा देवाकडे धाव घेण्याची सवय लागली की, पुरुषार्थ निकालात निघतो, हे त्यांना समजले पाहिजे किंवा समजावून सांगितले पाहिजे. अंधश्रद्धेचे भारताला लागलेले खग्रास ग्रहण श्री. दाभोलकरांच्या प्रयत्नांनी जरी अंशतःच सुटले, तरी ते इष्टच ठरणार आहे. विज्ञानाचा सूर्य माथ्यावर आलेला असताना अंधश्रद्धेची झापडे बांधून ठेचकाळत राहण्यात शहाणपण ते काय ? ना. ग. गोरे
समाजकारण / राजकारणBhram Aani Niras | भ्रम आणि निरास
₹180.00Original price was: ₹180.00.₹135.00Current price is: ₹135.00. Save ₹45 Add to cart -
Sale! Add to cartसर्वनाश झाल्याशिवाय नवं निर्माण होत नाही. गडद अंधार होतो तेव्हाच प्रकाशाच्या आगमनाची चाहूल लागते. हा निसर्गाचा नियम आहे ! आज सगळीकडे दिसतो आहे तो दु:खाचा, अशांततेचा, हिंसेचा उसळलेला प्रचंड आगडोंब... बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा आपण केलेला पराभव! पण तरीही बुद्ध हसतो आहे... आणि म्हणतो आहे, पाहा, माझ्या येण्याचा रस्ता तुम्ही मला मोकळा करून देत आहात. मी येणारच आहे. माझं येणं अटळ आहे आणि मी यावं अशी परिस्थिती तुम्ही निर्माण केली आहे..
समाजकारण / राजकारणBuddha Hasto Aahe | बुध्द हसतो आहे
₹375.00Original price was: ₹375.00.₹281.00Current price is: ₹281.00. Save ₹94 Add to cart -
Sale! Add to cartकर्तबगार सत्ताधारी स्त्री दुराग्रही आणि तिच्यात दडलेली आई आंधळी झाली म्हणजे जन्माला येते, लोकशाहीचा घास घेऊ पाहाणारी आणीबाणी. २५ जून १९७५ रोजी इंदिरा गांधींनी या देशावर आणीबाणी लादली आणि घटनाबाह्य सत्ताकेंद्र म्हणून संजय गांधींचे नेतृत्व उदयाला आले. याबद्दलची साधकबाधक चर्चा करणारी अनेक पुस्तके यापूर्वी प्रसिध्द झाली आहेत. पण त्या अनेक ऐतिहासिक घडामोडींचा साक्षीदार असणा-या बी.एन.टंडन या पंतप्रधानांच्या कार्यालयातील संयुक्त सचिवाची ही तत्कालीन दैनंदिनी त्या सर्वांपेक्षा वेगळेपणाने उठून दिसणारी आहे. प्रत्यक्ष आणीबाणी लादली जाण्यापूर्वी आठ महिने ही दैनंदिनी सुरू होते. कोणतेही भाष्य न करता घटनाक्रमच ती अशा रितीने उलगडत जाते की, त्या भीषण नाटकातील विविध पात्रे आपापल्या स्वभाववैशिष्ट्यांसह, गुणदोषांसह जिवंत होऊन आपल्यासमोर उभी राहतात. सत्तासंघर्षाचा खेळ जसजसा रंगत जातो, तसतशी राष्ट्रीय संकटाची जाणीव अधिकाधिक गहिरी होत जाते. ही दैनंदिनी म्हणजे एका जागल्या ने जनतेच्या दरबारात केलेले अप्रत्यक्ष वृत्तांतकथन आहे. लोकशाही टिकून राहावी, समृध्द व्हावी, असे वाटणा-या प्रत्येक सुजाण नागरिकाने कर्तव्यबुध्दीने वाचावे असे हे लक्षणीय पुस्तक आहे.
समाजकारण / राजकारणChahul Aanibanichi | चाहूल आणीबाणीची
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cartघोटाळे, लाच, शिफारसी, गुंडगिरी म्हणजे राजकारण अशी राजकारणाची सध्याची व्याख्या. राजकारण करायचं म्हणजे बख्खळ पैसा हवा, रग्गड मनुष्यबळ हवं, कुठल्याही टोकाला आणि कोणत्याही पातळीला जायची तयारी हवी- ही सामान्य माणसाची राजकारणाबद्दलची समजूत. म्हणूनच त्याला 'राजकारण' हा प्रांत आपला वाटत नाही. पण हे सगळं थांबवायचं, बदलायचं कोणी ? कसं ? केव्हा ? सुरुवात कोठुनतरी, केव्हातरी करायची ना ? मग ते केव्हातरी आताच का नाही ? चांगली माणसं राजकारणात यावीत, त्यांनी चांगली कामगिरी करावी त्यांना मार्गदर्शन, प्रोत्साहन मिळावं, त्यायोगे राजकारण म्हणजे समाजाचं उन्नयन आणि प्रगती घडवणारं एक उपयुक्त साधन ठरावं यासाठी...
समाजकारण / राजकारणChala Rajkarnat | चला राजकारणात
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cart'शेषराव मोरे यांनी उपस्थित केलेले अस्वस्थ करणारे प्रश्न : देशाची फाळणी हिंदूंच्या फायद्याची झाली का? लीगने केलेल्या पाकिस्तान-ठरावाच्या वेळीच गांधींनी फाळणी मान्य केली होती का ? बेचाळीसची चळवळ ही गांधींनी व काँग्रेसने उठवलेली हूल होती का ? जिनांना पाकिस्तान नको होते; तर अखंड भारतात पन्नास टक्के सत्ता हवी होती का ? आणि सर्वांत कळीची समस्या. हिंदू-मुसलमानांचे समान स्तरावरील सहजीवन शक्य आहे का ? या मूलगामी प्रश्नांची मान्यवर लेखकांनी केलेली सर्वांगीण व मार्मिक समीक्षा आणि शोधलेली खळबळजनक उत्तरे... सहभागी लेखक : . आनंद हर्डीकर प्रा. फकरुद्दीन बेन्नूर डॉ. अलीम वकील अब्दुल कादर मुकादम श्री. मा. भावे डॉ. के. रं. शिरवाडकर . विश्वास दांडेकर डॉ. सदानंद मोरे रमेश पतंगे . दिलीप करंबेळकर डॉ. माधव गोडबोले प्रदीप रावत
समाजकारण / राजकारणCongressne Aani Gandhijinni Akhand Bharat Ka Nakarla? Ya Granthacha Pratiwad | काँग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला? या ग्रंथाचा प्रतिवाद
₹375.00Original price was: ₹375.00.₹281.00Current price is: ₹281.00. Save ₹94 Add to cart -
Sale! Add to cartभारत-पाकिस्तान, भारत-चीन, इस्त्रायल,-पॅलेस्टाइन असे देशादेशांमधील संघर्ष. सा-या जगाला टांगत्या तलवारीसारखा भेडसावणारा दहशतवाद. पर्यावरणाची हानी, त्यातून नजीकच्या भविष्यात उभ्या राहणा-या अन्नधान्याच्या आणि पाण्याच्या गंभीर समस्या. भारत आणि भारतासारख्या अनेक देशांपुढे उभे असलेले गरिबी, कुपोषण, अनारोग्य, बेकारीचे प्रश्न. अशा आव्हानांना सामोरे जाण्यासाठी भारतातील सामान्य माणसाचा जीवनस्तर उंचावण्यासाठी रस्ता दाखवत आहे जागतिक स्तरावर कार्य करणारा एक विचारवंत. जगातील पन्नास देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी सल्लामसलत करणा-या संदीप वासलेकरांचे भारतीय युवकाला ध्येयदर्शन घडवणारे एका दिशेचा शोध
समाजकारण / राजकारणEka Dishecha Shodh | एका दिशेचा शोध
₹400.00Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00. Save ₹100 Add to cart -
Sale! Add to cartडॉ. संग्राम पाटील या युवकाचं हे अनुभवकथन म्हणजे एका एकांड्या शिलेदाराची झुंज. सत्तेची तटबंदी आणि भ्रष्टाचाराचे बुरूज. तो निघाला होता यांना खिंडार पाडायला. हातात हत्यारं प्रामाणिकपणा आणि जिद्द. साथीला मूठभर समविचारी सवंगडी. परदेशातील सुस्थिर जीवन, सुरक्षित व्यवसायातून लाभणारी समृद्धी हे सारं झुगारून आपल्या सहचरीबरोबर तो या लढ्यात उतरला. कोण जिंकलं या लढ्यात ? गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळ्या पाय-यांवर लढली जाणारी एका निवडणुकीची गोष्ट
समाजकारण / राजकारणEka Nivadnukichi Goshta | एका निवडणूकीची गोष्ट
₹100.00Original price was: ₹100.00.₹75.00Current price is: ₹75.00. Save ₹25 Add to cart -
Sale! Add to cartशिक्षण असो वा प्रादेशिक अस्मिता, आर्थिक प्रश्न असो वा राजकीय/ सामाजिक आंदोलने, अनेक क्षेत्रांमधल्या वेगवेगळया समस्या आपल्याला घेरून उभ्या आहेत. सेक्युलर की कम्युनल ? एम्प्लॉयमेंट की जॉब सिक्युरिटी? समता की सर्वोदय ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला शोधायची आहेत. राजीव साने मांडत आहेत या शोधाला एक नवे वळण देणारी समस्यांकडे पाहण्यास एक नवी दृष्टी देणारी समंजस उजवेपणाची भूमिका. या भूमिकेतून प्रचलित दुराग्रह व गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न म्हणजे
समाजकारण / राजकारणGallat Gaflat Gahjab | गल्लत गफलत गहजब
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Sale! Add to cart'मोहनदास करमचंद गांधी. दीडशे वर्षांपूर्वी जन्मलेला एक सामान्य माणूस आपल्या अफाट कर्तृत्वाने महात्मा बनला. आश्चर्य असे की, जाऊन सात दशके लोटली, तरी गांधी संपलेले नाहीत ! त्यांचे विचार अद्यापि जिवंत आहेत. नुसतेच जिवंत आहेत असे नाही; तर जगभर प्रसार पावताहेत. त्यांचा सर्वत्र अभ्यास होत आहे, अनेकांना ते अद्यापि प्रेरणा देत आहेत. ह्याचे कारण एकच : त्या विचारांचा मूलगामीपणा आणि व्यापकता. ह्यातूनच ते बनलेत वैश्विक आणि सार्वकालिक. मग आज ज्या समस्या भारताला, जगाला भेडसावत आहेत; त्यांवर ह्या विचारांतून कोणता आणि कसा मार्ग दिसतो ? ह्या दृष्टीने गांधी-विचारांकडे पाहण्याचा, त्यांच्या भविष्यकालीन उपयोगितेवर सारे लक्ष केंद्रित करून त्यांतून उद्या साठी योग्य मार्ग शोधण्याचा हा प्रयत्न. गांधी उद्यासाठी '
समाजकारण / राजकारणGandhi Udyasathi | गांधी उद्यासाठी
₹600.00Original price was: ₹600.00.₹450.00Current price is: ₹450.00. Save ₹150 Add to cart -
Sale! Add to cartएकटी राहणारी बाई म्हणजे समाजाच्या मनात प्रचंड शंका ! तिचं वर्तन, तिचा दिनक्रम,तिच्याकडे येणारे जाणारे लोक - सगळयावर समाजाची बारीक नजर ! जिला स्वेच्छेनं एकटेपणी जगायचंय किंवा जिच्यावर नाइलाजानं एकटं जगण्याची वेळ आलीय, अशा स्त्रीची मन:स्थिती समाजाला कशी कळणार ? बहुतेक स्त्रिया लग्न करतात, म्हणून प्रत्येकीनं लग्न केलंच पाहिजे, ह्या सक्तीच्या जीवनपध्दतीचं तिला ओझं होतंय, त्या विरोधात तिला काही म्हणायचंय, ते ऐकण्याची तयारी समाज केव्हा दाखवणार ? विधवेला,घटस्फोटितेला, अविवाहितेला सर्वांत अधिक दु:ख आपणच देतो, हे इतर स्त्रियांना कधी समजणार ? -एकटेपणी जगणा-या स्त्रियांच्या मनाचा विषण्ण करणारा शोध.'
समाजकारण / राजकारणHe Dukkha Kunya Janmache | हे दु:ख कुण्या जन्माचे
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart
">
Skip to content