नवी पुस्तके, नवे विषय
-
Sale! Add to cartवाचनीयता व सुरसपणा हा लिखित मजकूरास अत्यंत आवश्यक असा गुण आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील प्रसिद्ध इंग्लिश नाटककार नोअेल कॉवर्ड म्हणतो ‘वाचकाचा नेहमी विचार करा. त्याला कधी बिचकू नका किंवा तुच्छ लेखू नका. त्याची नस पकडा, त्याला तुमच्या लेखनाच्या मोहात पाडा, त्याची उत्सुकता जागवा, त्याला उत्तेजित करा; गरज पडल्यास धक्का द्या, हसवा, रडवा; पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याला कधीही, कधीही, कधीही कंटाळा येऊ देऊ नका.’
या संग्रहातील कथा वाचकांना वाचनीय आणि सुरस वाटल्या, तर लेखक म्हणून मला समाधान वाटेलच; पण या कथांच्या आशयातून वाचकांना आणखी काही जाणवलं, तर या कथांमधून त्यांच्या अधिक जवळ पोचल्याचा आनंद मला लाभेल.
कथा चाळिशी‘वाचकाचा नेहमी विचार करा. त्याला कधी बिचकू नका िंकवा तुच्छ लेखू नका.
त्याची नस पकडा, त्याला तुमच्या लेखनाच्या मोहात पाडा, त्याची उत्सुकता जागवा,
त्याला उत्तेजित करा; गरज पडल्यास धक्का द्या, हसवा, रडवा;
पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याला कधीही, कधीही, कधीही कंटाळा येऊ देऊ नका.’
प्रसिद्ध इंग्लिश नाटककार नोअेल कॉवर्डजन्म-मृत्यू, व्याधी, दु:ख, स्वार्थ, परमार्थ,
अशी विविध आशयसूत्रं हाताळणार्या -
परिचिताला अपरिचित बनवणार्या
वास्तव अन् फँटसी अशा टोकांमध्ये पूल बांधणार्या
सुरस अन् वाचनीय कथांचा संग्रहकथासंग्रहKatha Chalishee | कथा चाळिशी
₹390.00Original price was: ₹390.00.₹293.00Current price is: ₹293.00. Save ₹97 Add to cart -
Sale! Add to cartवास्तव, जादुई वास्तव, आणि अतिवास्तवाच्या मिश्रणातून आकाराला आलेलं एक धूसर जग. त्यात आदिम वासना आहेत. भावनांचा कल्लोळ आहे. कथानकात घुसखोरी करणारी अन् त्यातून बाहेर पडणारी पात्रं आहेत. त्यांच्या दोऱ्या कधीकधी आपल्या हातात आहेत, अशा समजात गुरफटलेला लेखक आहे. तरीही या मजकुराबाहेरचा लेखक म्हणतो, 'वरील सर्व मजकूर खोटा आहे. किंबहुना खोटा खोटा आहे. पण खरा वाटावा असा आहे. कारण खोटं हे दुहेरी सत्य असतं.' प्रत्यक्ष अन् कल्पनेच्या अजब सरमिसळीतून साकारलेली अनवट कादंबरी. खोटं खोटं खरं
All BooksKhota Khota Pan Khara | खोटं खोटं पण खरं
₹220.00Original price was: ₹220.00.₹165.00Current price is: ₹165.00. Save ₹55 Add to cart -
Sale! Add to cartत्याने आख्खे जग वेठीला धरले होते. जगभरच्या सगळ्या मानवजातीचे आयुष्य उलथेपालथे केले होते. त्याने 'आपल्याआधी' आणि 'आपल्यानंतर' असा समग्र इतिहास दुभंगून टाकला. रोजरोजच्या चाकोरीबद्ध दिनक्रमापासून दीर्घकाळच्या जीवनशैलीपर्यंत मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात त्याने आमूलाग्र भलेबुरे बदल घडवले. हो, हे सगळे घडवून - बिघडवून तो अदृश्य राहिला, त्याचे नाव कोरोना. या अदृश्य वैऱ्याबरोबर दोन हात करणाऱ्या अनेकांपैकी हाही एक. व्यवसायाने डॉक्टर, त्यामुळे सारे अधिक जवळून पाहणारा. वृत्तीने संवेदनशील, त्यामुळे खूप अस्वस्थ होणारा. त्या कठीण कठोर काळातले कित्येक कोविड क्षण आपल्या मनावर गोंदवत डॉ. राजेंद्र मलोसे यांनी सांगितलेल्या कोविडच्या खऱ्याखुऱ्या कहाण्या -
All BooksKoronayan | कोरोनायन
₹650.00Original price was: ₹650.00.₹488.00Current price is: ₹488.00. Save ₹162 Add to cart -
नवी पुस्तके, नवे विषय
Lokmata Godavari | लोकमाता गोदावरी
₹750.00Original price was: ₹750.00.₹563.00Current price is: ₹563.00. Save ₹187 Add to cart -
Sale! Add to cartविलास शेळके.
एक बहुआयामी सर्जनशील व्यक्तिमत्त्व.
शिक्षणाने आणि पेशाने अभियंता.
संवेदनशील कवी. जाणकार मर्मज्ञ रसिक.
सूक्ष्म निरीक्षणशक्ती लाभलेले अनवट कादंबरीकार,
अशा व्यक्तीचे बोट धरून
आपण या अक्षरप्रवासाला निघालो की,
ठिकाण कुठलेही असो, निमित्त कोणतेही असो,
सगळा प्रवासच आनंदाचे निधान बनतो.
त्या व्यक्तीच्या अनुभवक्षणांनी
आपणही समृद्ध बनतो.
विलास शेळके आपल्या अनोख्या नजरेतून
घडवत आहेत उगवत्या सूर्याच्या दिशेला
वसलेल्या सहा देशांचे दर्शन.All BooksMadhyamayan | मध्यमायन
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreप्रमाणलेखन' हा भाषेचा पायाभूत घटक असला, तरी त्याकडे नेहमीच दुर्लक्ष होत आलेले आहे. अशा पार्श्वभूमीवर डॉ. नागेश अंकुश यांचा 'मागोवा : प्रमाण मराठी भाषेच्या प्रमाणलेखनाचा इतिहास' हा ग्रंथ विशेष महत्त्वपूर्ण ठरतो. या अभ्यासपूर्ण संशोधनपर ग्रंथात ते मराठी भाषेच्या विकासाची नोंद घेताना निर्दोष लेखनाच्या चारशे वर्षांच्या जडणघडणीचा साक्षेपी आढावा घेतात. प्रमाणलेखनाचे नियम सांगून थांबण्याऐवजी ते भाषिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीचे समतोल विवेचन करतात. निर्दोष लेखनपरंपरेचा उगम, प्रवास आणि तिच्यामागील भाषिक विचार यांची सुबोध मांडणी यातून दिसते. प्रमाणलेखनाला आकार देणाऱ्या विविध घटकांची समग्र ओळख करून देणाऱ्या या ग्रंथातून मराठी लेखनाच्या शिस्तबद्धतेची सहज ओळख होते. डॉ. अंकुश प्रमाणलेखनाकडे केवळ व्याकरणाच्या चौकटीतून नव्हे, तर भाषेच्या सांस्कृतिक जबाबदारीचा एक भाग म्हणून पाहतात. त्यांच्या आधीच्या ग्रंथांतील भाषाजागृती 'मागोवा' मध्ये संशोधन आणि चिंतनाच्या रूपाने प्रकर्षाने जाणवते. विविध संस्थात्मक कार्यांची बारकाईने नोंद घेत त्यांनी प्रमाणलेखनाशी निगडित अनेक दुर्लक्षित संदर्भ उलगडले आहेत. मराठीच्या प्रमाणलेखनाचा प्रवास समजावणारा आणि भाषेच्या उत्कर्षासाठी पायाभूत ठरणारा हा ग्रंथ एक उत्तम असा संदर्भग्रंथ आणि माहितीकोश ठरतो. 'मागोवा' हा मराठी प्रमाणलेखनाचा परामर्श घेणारा मराठीतील बहुधा पहिलाच ग्रंथ असावा. प्रमाणलेखनाची जडणघडण आणि वाटचाल समजून घेण्यासाठी अभ्यासकांपासून ते भाषेवर नितांत प्रेम करणाऱ्या वाचकांपर्यंत सर्वांनाच तो अत्यंत उपयुक्त ठरेल, अशी मला खात्री वाटते. सुधीर रसाळ
All BooksMagova | मागोवा
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Read more -
Sale! Add to cartपं. भीमसेनजी आणि लतादीदी : आवाज वेगळे, गायकी वेगळी आणि शैलीही वेगवेगळ्या. एक अभिजात संगीतातलं दैवत तर दुसऱ्या सुगम संगीतातल्या देवता ! पंडितजींचा आवाज भारदस्त तर लतादीदींचा आवाज कोमल. पण दोघांमध्ये श्रोत्यांची मनं वाचता येणं आणि भावपूर्णता हे दोन समान गुण होते.
All BooksMaifal Bhaktirasachi | मैफल भक्तिरसाची
₹180.00Original price was: ₹180.00.₹135.00Current price is: ₹135.00. Save ₹45 Add to cart -
Sale! Add to cartडिमोना ही इस्रायलची छुपी अणुभट्टी.
तिचं रहस्य ‘दि संडे टाइम्स' या दैनिकासमोर उघड करणारा
इस्रायली जागल्या मोर्देचाई व्हॅनुनू.
पण हे इस्रायलला कसं चालणार ?
मग त्यानं एका मदनिकेकरवी व्हॅनुनूवर टाकलं सौंदर्याचं जाळं.
व्हॅनुनूला स्वत:च्या जाळ्यात ओढून ‘मोसाद' या गुप्तचर यंत्रणेला व्हॅनुनूचं अपहरण करण्यात मदत करणारी चेरील बेंटॉव्ह उर्फ सिंडी.
सिंडी एकाच वेळी ‘सीआयए' आणि ‘मोसाद' या दोन यंत्रणांसाठी गुप्तहेर म्हणून काम करत होती का?
युनायटेड स्टेट्स , फ्रान्स, बेल्जियम आणि दक्षिण आफ्रिका
या राष्ट्रांनी इस्रायलला आण्विक ज्ञान आणि तंत्रज्ञान मिळवण्यात गुप्तपणे कशी मदत केली?
अपहरणानंतर मोर्देचाई व्हॅनुनू डिमोनाचं रहस्य उघड करू शकला का?
तो आपल्या ध्येयात यशस्वी झाला का?
सिंडीचं पुढे काय झालं?
या सर्व घटनांवर भेदक प्रकाश टाकणारी,
इस्रायलच्या ‘मोसाद' या गुप्तचर यंत्रणेचं क्रूर जाळं छेदणार्याे जागल्याची कहाणी...All BooksMosad Mohini | मोसाद मोहिनी
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cart‘तुम्ही म्हणजे चालता बोलता ज्ञानकोश आहात,
परंतु माहिती म्हणजे ललित साहित्य नव्हे.
वनशास्त्र हा शास्त्रीय विषय असल्यानं सर्वच लेखन
ललित पद्धतीनं लिहिता येईल का, ह्याचा विचार करा.
ह्या शास्त्रातील विद्वानांची जंगलशास्त्राविषयीची विधानं
उद्धृत करून लिहा. तुमच्या शास्त्रीय ज्ञानाला माणसांचा संदर्भ देऊन लिहा, म्हणजे निर्मितीच्या पातळीवर जाणारं असं लेखन वाचकांना नक्कीच आवडेल. भाषा मात्र सोपी वापरा.' व्यंकटेश माडगूळकरांच्या या सल्ल्याला प्रतिसाद देऊन चितमपल्लींनी आपले सर्व साहित्य सर्व स्तरांवरील वाचकांना आणि अभ्यासकांनाही रंजक, माहितीप्रद व उपयुक्त ठरेल अशा सोप्या भाषेत लिहिले आणि समाजमान्यता मिळवली.
आपल्या आयुष्यातील पासष्ट वर्षे जंगलात काढत तपस्व्याच्या निग्रहाने जंगलातील प्राणिजीवनाचा शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करणार्या मारुती चितमपल्लींचा परिचय विशेषकरून कुमारवयातील मुलामुलींना करून द्यावा, त्यांच्यामध्ये पशू, पक्षी, कीटक, फुलपाखरे, वनस्पती ह्यांच्याबद्दल ओढ निर्माण व्हावी, त्यांना पर्यावरणाचे महत्त्व समजावे, अशा हेतूंनी लिहिलेले वेधक चरित्र.नवी पुस्तके, नवे विषयMulanche Chitampallee | मुलांचे चितमपल्ली
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartडॉ. अनंत सरदेशमुख हे कामगार क्षेत्रामध्ये अनेक वर्षापासून कार्यरत असून आपल्या प्रभावी नेतृत्व गुणामुळे कामगारांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यांचे मार्गदर्शन कामगारांना, उद्योग व्यवसायिकांना व कायदेशीर सल्लागारांना अत्यंत उपयोगी आहे.
नवीन कामगार संहितामुळे नोंदणी परवाना ऑनलाइन सुविधा व उद्योगांचे नियमन सोपे झाले आहे. २९ कायद्यांऐवजी ४ संहितांमध्ये एकत्रिकरण झाल्यामुळे सुटसुटीतपणा आला आहे. असे केंद्रसरकारचे मत असले तरी कामगार चळवळीत मात्र सर्वांचे शंका समाधान झालेले नाही. या परिस्थितीत वस्तुनिष्ठ विश्लेषण व ठोस माहिती आवश्यक होती.
आता या पुस्तकामुळे कायद्यातील बदल सोप्या भाषेत समजून घेऊन त्याप्रमाणे लाभ मिळवणे कामगारांना सोपे झाले आहे व यासाठी श्री. अनंत सरदेशमुख यांनी अत्यंत मोलाचे कार्य केले आहे. सोप्या मराठीत एकत्रितरीत्या कायदा मांडणी केल्यामुळे सर्वसामान्य मराठी समजणाऱ्या कामगारापर्यंत कायद्याचे ज्ञान सुलभतेने उपलब्ध होत आहे.
कायदेशीर तरतुदी सोबत ऐतिहासिक पार्श्वभूमी, व्याख्या व नियम यांचे सोप्या भाषेत विवेचन सर्वांसाठी उपलब्ध झाले आहे. या पुस्तकाद्वारे पूर्वीच्या कायद्यातील झालेले बदलही तक्ता स्वरूपात उपलब्ध करून दिले आहेत.
कामगारांचा मूलभूत हक्क जपण्यासाठी व त्यांच्या सामाजिक सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक ज्ञानाची शिदोरी श्री. अनंत सरदेशमुख यांनी सर्वांसाठी सोप्या भाषेत उपलब्ध करून दिली आहे. त्या दृष्टीने सर्व कामगार, व्यावसायिक, उद्योजक व कायदेतज्ञ यांनी संग्रही ठेवण्यासारखे पुरतक आपल्याला उपलब्ध झाले आहे. या पुस्तकास माझ्या हार्दिक शुभेच्छा !
कायदाविषयक - अर्थव्यवहारNave Kamgar Kayade Ani Apan | नवे कामगार कायदे आणि आपण
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart
">
Skip to content
