All Books
-
Sale! Add to cartसरधोपटता वजा केली, की तुम्हाला थोडं अधिक चांगलं लिहिता येऊ शकतं, हे नोरा एफ्रॉन या विदुषीचं तत्त्वज्ञान कविता महाजन यांनी त्यांच्या कथात्म लेखनकाळातच ओळखलं होतं. अकथनात्मक लेखन, अनुवादासाठी देशाच्या कानाकोपर् यातील लेखक-लेखिकांचं वाचन, संपादन या सर्व बाबींमुळे त्यांच्या लेखणीला धार आलेली दिसते. रा. भि. जोशींच्या प्रवासलेखनकुळाशी बरंचसं जवळचं नातं सांगणार् या घुमक्कडी' या पुस्तकामध्येही आहे प्रवासाच्या गोष्टी आणि गोष्टींचा प्रवास. तो किती खोलवर आहे, याचा अंदाज यातील कोणताही लेख वाचल्यानंतर उमजून येईल. पृथ्वीची उत्पत्ती, सूर्याची, अग्नीची, पावसाची इतकंच नाही, तर मिठाची उत्पत्ती याबद्दलच्या लोककथांचा प्रवास कविता महाजनांच्या प्रवासाशी एकरूप होऊन रूढार्थानं प्रवासवर्णन नसलेलं एक अचंबित करणारं पुस्तक तयार झालंय. ब्लॉगसाठी लिहिल्या गेलेल्या या प्रवासनोंदी, पण अत्यंत गंभीर आणि अनंत तपशिलांना कवेत घेणार् या.
All BooksGhumakkadi | घुमक्कडी
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cartएखाद्या संवेदनशील स्त्रीनं आपल्या जाणत्या सखीला कधी मनोगत तर कधी हृद्गत सांगावं, तसा या 'गोंदणखुणा' - चा आशय आहे. निसर्गातील एखाद्या घटकाचा अनपेक्षित साक्षात्कार, मानवी स्वभावातील अतर्क्य भावनाट्य, रुणझुणत्या कवितेच्या चरणाशी सहज घडलेला अर्थमेळ, स्त्री-संवेदनेशी जोडलेल्या घटना-प्रसंगांची चलतचित्र किंवा जीवनाच्या एखाद्या प्राणसूत्राचं स्वतःला निःसंदर्भ करून केलेलं आत्मचिंतन - अशा अनेक आशयसूत्रांची स्मरणी या लेख- संग्रहात आहे. त्यात क्षणात आपला आकार बदलणाऱ्या मेघांचं दर्शन आहे; तसंच शांतनिवांत आकाशाचं सूचक निःशब्दपणही आहे. अंतर्याम आणि भवताल यांतील तरल रेषा विरून जावी इतकी अनुभवाला सामोरं जाण्याची सिद्धता निघोजकरांकडे आहे. सुजाण वाचक 'गोंद णखुणा' पाहतील, नव्या दृष्टीनं पाहतील असा भरवसा वाटतो. हेमकिरण पत्की
All BooksGondankhuna | गोंदणखुणा
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cartशेतकर् यांपासून कामगारांपर्यंत, उद्योगपतींपासून गृहिणीपर्यंत, अगदी नोकरदारापासून संतमहंतांपर्यंत प्रत्येकाचा प्रत्यक्षाप्रत्यक्ष बँकेशी संबंध येतोच. जशी व्यक्तीची अथवा संस्थेची कुठली ना कुठली बँक, तशी बँकांची बँक, सार् या देशाची बँक म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँक. कधी स्थापन झाली ही बँक ? कसा झाला या बँकेचा आजवरचा प्रवास ? स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात काय होती या बँकेची भूमिका अन् कार्यपद्धती ? देशातील सरकार, प्रशासन, अर्थव्यवस्था अन् सामान्य जनतेच्या दैनंदिन आयुष्यापासून दीर्घकालीन परिणामांपर्यंत अनेक घटकांवर परिणाम करणार् या धोरणांची आखणी करणारी बँक म्हणजे रिझर्व्ह बँक. भारतासारख्या खंडप्राय विशाल देशाच्या वाटचालीत महत्त्वपूर्ण सहभाग असणार् या रिझर्व्ह बँकेचा रोचक इतिहास अत्यंत रंजक पद्धतीने सांगत आहेत सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ विद्याधर अनास्कर. गोष्ट रिझर्व्ह बँकेची
All BooksGoshta Reserve Bankechi | गोष्ट रिझर्व्ह बँकेची
₹625.00Original price was: ₹625.00.₹469.00Current price is: ₹469.00. Save ₹156 Add to cart -
Sale! Add to cartAnna's family gifted her diamond earrings for her birthday. But she didn't like them at all. She just wanted one gift - books ! Anna became a great scientist. What problems did she face ? How much did she have to work ? What did she invent ? Come, let's read in this book. Great Scientist Anna Mani
All BooksGreat Scientist Anna Mani | Great Scientist Anna Mani
₹120.00Original price was: ₹120.00.₹90.00Current price is: ₹90.00. Save ₹30 Add to cart -
Sale! Add to cartशारदा सहनिवास' म्हणजे सतत काही ना काही उलथापालथ चालू असणारं जग. त्यात सगळ्यात भाव खाणार् या गोष्टी म्हणजे बॅडमिंटनचा खेळ अन् गणेशोत्सवाचं नाटक. आंतर सहनिवास बॅडमिंटन करंडक' शारदा सहनिवासने कसा जिंकला ? तो करंडक हरवला कसा ? अन् त्याचा शोध कसा लागला ? या सार् याचा गणेशोत्सवाच्या नाटकाशी काय संबंध ? दिलीप प्रभावळकर यांनी आपल्या खुसखुशीत, खमंग शैलीत उलगडलेल्या धमाल अन् कमाल आठवणी !
All BooksHaravlelee Trophy Aani Itar Katha | हरवलेली ट्रॉफी आणि इतर कथा
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Sale! Add to cartहिंदुत्वा'ची दोन मूलभूत वैशिष्ट्यं म्हणजे आध्यात्मिक जीवनदृष्टी, आणि त्यातून घडणारी संयमित उपभोगाची जीवनशैली. तसं जगणं, म्हणजेच खऱ्या अर्थानं 'धर्मपालन'; कारण, त्यातूनच पर्यावरणाची 'धारणा' सुनिश्चित होऊ शकते. पश्चिमी विचार-आचारांच्या प्रभावामुळे आपणच त्याला सोडचिट्ठी दिलेली आहे! त्यामुळे, साऱ्या जगाप्रमाणेच आपल्यालाही पर्यावरणाच्या विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशा काळात, सध्याचं भरकटलेलं हिंदुत्व नाकारत, निसर्गरक्षणासाठी उपयोगी ठरणाऱ्या मूळ हिंदुत्वाची युगानुकूल मांडणी करणारं, आणि त्याच्या आचरणाचा आग्रह धरणारं हे पुस्तक : स्वतः तसं जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका अभ्यासू आणि तळमळीच्या कार्यकर्त्यानं लिहिलेलं.
All BooksHarita Hindutwa | हरित हिंदुत्व
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Sale! Add to cartअन्नाच्या वाढदिवसाला तिच्या घरच्यांनी हिऱ्याचे कानातले भेट दिले. पण तिला ते मुळीच आवडले नाही. तिला एकच भेट हवी होती - पुस्तकांची ! अन्ना पुढे मोठी हवामानशास्त्रज्ञ झाली. तिला कुठल्या अडचणींना तोंड द्यावे लागले, तिने काय काय कष्ट सोसले आणि तिने कोणते शोध लावले ? चला, या पुस्तकात वाचू या.
All BooksHavamanshastradnya Anna Mani | हवामानशास्त्रज्ञ अन्ना मणी
₹100.00Original price was: ₹100.00.₹75.00Current price is: ₹75.00. Save ₹25 Add to cart -
Sale! Add to cartजनुकीय विज्ञानात महत्त्वपूर्ण संशोधन करणारी एक नामांकित कंपनी, सदर्न जेनेटिक्सचे सर्वेसर्वा हर्ष मित्तल आपल्या संशोधनाच्या गुप्ततेसाठी विलक्षण जागरूक असतात. त्यांनी या संशोधनाच्या सुरक्षिततेची जबाबदारी 'एआय'वर कृत्रिम बुद्धिमत्तेवरसोपवली. अभेद्य वाटणारी ही सुरक्षाव्यवस्था कोणी मोडली ? हर्ष मित्तल यांच्या हत्येतून सुरू झालेली दुर्घटनांची साखळी कोणत्या दिशेने गेली ? एआय अयशस्वी ठरण्यामागे कोणाचा हात होता ? कोणी केली एआयवर मात करणारी खेळी ? मानव आणि एआय यांच्यात निर्माण होत असलेल्या गुंतागुंतीच्या नात्यातील विविध पैलूंचा वेध घेणारी 'अनपुटडाउनेबल' थरारक कादंबरी.
All BooksHee Medha Kon? | ही मेधा कोण ?
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cartThe mere mention of the word teenage puts a rosy blush of memories on our cheeks and a naughty smile on our face. However, when it comes to parenting these same amazing teenagers, our stomach twists into a knot, forehead wrinkles with frowns, and eyes cloud with concern. Though most parents understand what should be done to deal with the tender age of their teenage child, it is the implementation that puzzles them. Help! Teenager at home... gives handy and practical tips to deal with many sensitive issues such as dialogue with teenagers, their discipline, career, virtual world, diet, relationships, responsibilities, college-life and much more. Written by a paediatrician and an adolescent practitioner, this book will help make your parenting journey mindful, satisfying and joyful !
All BooksHelp – Teenager At Home … | HELP!
₹400.00Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00. Save ₹100 Add to cart -
Sale! Add to cartकोणतेही अस्तित्व निखळ चांगले किंवा निखळ वाईट नसते. प्रत्येक अस्तित्वाचा काही उद्देश असतो. शतकपूर्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या हिंदुत्व परिवार आणि मार्क्सवादी परिवारावरसुद्धा चांगल्या वाईटाचे शिक्के बसले. स्वातंत्र्याचे उद्दिष्ट साध्य झाल्यावर काँग्रेस परिवार देशाच्या राजकारणात वैचारिक कोलांट्याउड्या मारत राहिला. काळाच्या ओघात काही पक्ष नाहीसे झाले, तर काहींचे अस्तित्व मर्यादित राहीले. अनेक चांगल्या संघटना आणि संस्था डबघाईला आल्या किंवा त्यांचे महत्त्व कमी झाले. पण हिंदुत्व परिवार आणि मार्क्सवादी परिवार यांनी त्यांची तत्त्वे आणि त्यांची कॅडर यांच्या बळावर ठाम उभे राहून, हातात सत्ता असताना व नसतानाही देशाच्या राजकारणात आणि समाजकारणात महत्त्वाची भूमिका निभावली. हे दोन परिवार आणि भारत यांच्या राजकीय वाटचालीचा हा मागोवा.
All BooksHindutava, Marxvaad Ani Bharat | हिंदुत्व, मार्क्सवाद आणि भारत
₹1,000.00Original price was: ₹1,000.00.₹750.00Current price is: ₹750.00. Save ₹250 Add to cart
">
Skip to content