WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: H-01-2012 Category: Brand:

Congressne Aani Gandhijinni Akhand Bharat Ka Nakarla? | काँग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला?

लेखक: Sheshrao More | शेषराव मोरे

Original price was: ₹900.00.Current price is: ₹675.00. Save ₹225

सर्वनाशे समुत्पन्ने अर्धं त्यजति पंडित:। मथितार्थ : सगळ्याचा नाश होण्याची वेळ आली, तर शहाणा मनुष्य अर्ध्याचा त्याग करतो (आणि उरलेल्या अर्ध्याचा स्वीकार करतो). फाळणीचे मूलकारण कोणते होते ? जिनांनी द्विराष्ट्रवाद फाळणीसाठी मांडला होता की अखंड भारतासाठी ? फाळणीऐवजी येणा-या अखंड भारताची राज्यघटना कशा स्वरूपाची राहणार होती ? राष्ट्रवादी मुसलमानांना कोणत्या

स्वरूपाचा अखंड भारत पाहिजे होता ? त्यांचा फाळणीला विरोध कशासाठी होता ? अखंड भारतात तीन विषयांपुरते तरी ५६५ संस्थानांचे विलीनीकरण झाले असते काय ? हैदराबाद संस्थानाचे काय झाले असते ? फाळणी झाली नसती, तर सर्व भारतच पाकिस्तानच्या मार्गाने गेला असता! असे सरदार पटेल का म्हणाले होते ? आणि १९५५ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, जर भारत अखंड राहिला असता, तर हिंदूंना मुसलमानांच्या दयेवर जगावे लागले असते... मुसलमान शासनकर्ती जमात बनली असती... जेव्हा फाळणी झाली; तेव्हा मला वाटले की, परमेश्वराने या देशावरील शाप काढून घेतला असून हा देश एकसंघ, महान व वैभवशाली बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बुद्धिवादी आंबेडकरांनाही येथे परमेश्वराचे नाव का घ्यावे लागले ? अशा अनेक प्रश्नांच्या संदर्भात नव्वद वर्षांच्या स्वातंत्र्याच्या व फाळणीच्या इतिहासाची वस्तुनिष्ठ मांडणी करणारा, फाळणीकडे पाहण्याचा परंपरागत दृष्टिकोनच बदलून टाकणारा, राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातून निर्भीडपणे लिहिलेला विचारप्रवर्तक ग्रंथ.

तपशील
ISBN : 978-81-7434-651-3
परिमाण : 21.25 × 13.75 × 5 cm
प्रकाशन तारीख : ऑगस्ट 2012
बुक कोड : H-01-2012
वजन : 820 g
पाने : 734
आर्टिस्ट : कमल शेडगे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : नोव्हेंबर 2021

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">