इतिहास
-
इतिहास
1857 Cha Jihad | १८५७ चा जिहाद
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Read more -
Sale! Add to cartवेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम्... अशा पवित्र वंदे मातरम् च्या जयघोषात पुण्यवंतांनी केला पराकोटीचा त्याग, तेव्हा कुठे दीडशे वर्षांनंतर उगवली स्वातंत्र्याची पहाट ! आता ७५ वर्षांनंतर, काय आहे चित्र आपल्या देशाचं नि समाजाचं? गर्वानं ऊर भरून यावा असं काही घडलं का? वेदनांचा पूर यावा इतकं काही बिघडलं का? हुतात्म्यांचा त्याग लागला का सार्थकी? केली का आपण पायाभरणी एका बलाढ्य राष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यकाळाची? आपले सैनिक, शिक्षक, शेतकरी, आपले शास्त्रज्ञ, राज्यकर्तेही आपलेच आणि अधिकारीही आपणच... आणि आपण सारेच नागरिक? केली का आपण आपापल्या क्षेत्रात कर्तव्यपूर्ती? उद्दिष्टप्राप्ती? शेतकीपासून शिक्षणापर्यंत, अवकाश मोहिमेपासून अणुकरारापर्यंत, हरितक्रांती, दुग्धक्रांती, माहिती तंत्रज्ञानामधली क्रांती, दूरसंचारातली प्रगती, अन्नसुरक्षा, ऊर्जानिर्मिती, आर्थिक विकास, दारिद्र्याशी दोन हात, दहशतवादावरती मात... नानाविध क्षेत्रांत जगातल्या इतर कुठल्याही नवस्वतंत्र राष्ट्रापेक्षा खूप काही जास्त साध्य केलं आपल्या भारत देशानं... पुरावे हवेत? तर हा घ्या आपल्या अमृतमहोत्सवी कामगिरीचा आलेख. काय कमावलं, कसं मिळवलं यांचा धावता लेखाजोखा मांडणारं हे पुस्तक ७५ सोनेरी पाने स्वतंत्र भारताच्या इतिहासातील अविस्मरणीय क्षणचित्रे अविनाश धर्माधिकारी यांच्या सिद्धहस्त लेखणीनं प्रभावी भाषाशैलीत घेतलेला हा ओघवता, वस्तुनिष्ठ आढावा, आपल्या संग्रही हवाच...
All Books75 Soneri Paane | ७५ सोनेरी पाने
₹1,000.00Original price was: ₹1,000.00.₹750.00Current price is: ₹750.00. Save ₹250 Add to cart -
इतिहास
Aanandmath | आनंदमठ
₹130.00Original price was: ₹130.00.₹98.00Current price is: ₹98.00. Save ₹32 Read more -
Sale! Add to cartआर्यांचा प्रश्न हा मानवी इतिहासातील सर्वांत जटिल समस्या आहे. ते कोण होते, कोठून आले आणि त्यांचा काळ याबद्दल विद्वानांत प्रचंड वाद आहे, परंतु त्याची समाधानकारक उकल अद्याप झालेली नाही. असे असले तरी स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय उपखंडात जी पुरातत्त्वीय उत्खनने झाली आहेत, त्यांच्या पुराव्यावरून दिसून येते की, सुमारे सात हजार वर्षांपूर्वी काही नवे लोक भारतात आले आणि सांस्कृतिक विकास सुरु झाला. सिंधुच्या खो-यातून ते सरस्वतीच्या खो-यात स्थिरावले. तेथे सिंधु संस्कृती उदयास आली. परंतु चार हजार वर्षांपूर्वी पर्यावरणातील प्रतिकूल बदलामुळे तिचा -हास सुरू झाला. ही उत्तरसिंधु संस्कृती वैदिक आर्यांची असावी, असा परिस्थितीजन्य पुरावा आहे. हे पुस्तक आहे त्याचीच विस्तृत चर्चा.
इतिहासAaryanchya Shodhat | आर्यांच्या शोधात
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Sale! Add to cartआज सारं जग त्यांना धर्मांध माथेफिरू म्हणून ओळखतं. अनेकदा त्यांचा धिक्कार केला जातो, तर कित्येकदा त्यांना चिरडण्यासाठी मोठमोठया लष्करी मोहिमा आखल्या जातात. त्यांच्या हातातलं इस्लामचं निशाण पाहून किंवा त्यांच्या तोंडची जिहादची भाषा ऐकून त्यांच्या धर्माबद्दलचे भलेबुरे समज-गैरसमज पसरवले जातात. भस्मासुरासारखं अक्राळविक्राळ रूप धारण करणा-या अशा दहशतवाद्यांच्या मूळ प्रेरणा कोणत्या आणि स्वार्थासाठी त्यांना कठपुतळयांप्रमाणे नाचवणाऱ्या साम्राज्यवादी सूत्रधारांचे मनसुबे कोणते, याचा नावनिशीवार केलेला हा पंचनामा म्हणजे वाचकांचे लक्ष खिळवून ठेवणारी एक रहस्यकथाच ! धर्म-अधर्माचा तात्त्वि काथ्याकूट न करता प्रत्यक्ष व्यवहारातील संघर्ष चितारणारी ही शोधकथा अनेकदा चीड आणते आणि तशीच अस्वस्थही करून सोडते.
इतिहासAdharmayuddha | अधर्मयुध्द
₹420.00Original price was: ₹420.00.₹315.00Current price is: ₹315.00. Save ₹105 Add to cart -
Sale! Add to cartअशी होती शिवशाही हा रूढार्थाने शिवशाहीचा इतिहास नाही. म-हास्ट राज्या चे संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू त्यांच्याच शब्दांत इतिहासाच्या समकालीन अस्सल साधनांवरून उकलून दाखवण्याचा प्रयत्न येथे केला आहे. शिवाजीराजे हे केवळ लष्करशहा नव्हते , तर बहुतजनांसी आधारु असे श्रीमंत योगी ; जाणते, रचनात्मक कार्य करणारे, काळाच्या पुढे जाणारे मुत्सद्दी राजे होते, हे त्यांच्या विविध धोरणात्मक पत्रांवरून येथे मांडले आहे. हे राज्य सर्वांचे आहे, असा पक्का अभिमान त्यांनी मराठी माणसांत निर्माण केला. मोडिले राज्य तिघे ब्राह्मण आणि तिघे मराठे सावरतील , असा आत्मविश्वास त्यांना होता. रात्रंदिन आम्हां युध्दाचा प्रसंग हे मनात बाळगून मोठ्या झुंझारपणाने मराठे स्वातंत्र्यासाठी लढले. सामान्य वाचक डोळ्यांसमोर ठेवून, इतिहासाशी इमान राखून, पण ललित अंगाने शिवशाही लोकांपर्यत पोहचवण्याचा हा एक प्रयत्न आहे.
इतिहासAshi Hoti Shivshahi | अशी होती शिवशाही
₹160.00Original price was: ₹160.00.₹120.00Current price is: ₹120.00. Save ₹40 Add to cart -
Sale! Add to cartलोकमान्य टिळक यांचा १८९८ ते १९०८ हा राजकीय कर्तृत्वाचा माध्यान्हकाळ मानला, तर ते याच काळात भारतीय असंतोषाचे जनक बनले. वास्तविक कोणा एका व्हॅलेंटाइन चिरोल नामक ब्रिटिश पत्रकाराने त्यांना हे बिरूद जरी दूषण देण्यासाठी चिकटवले, तरी ते त्यांचे भूषण ठरले. स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य ही राष्ट्रीय जीवनाची चतु:सूत्री त्यांनी सांगितली. त्याचवेळी त्यांनी ब्रिटिशांना राजकारण करणे म्हणजे राजकारस्थान करणे नव्हे! असे बजावले. अखिल भारताचे ते नेते झाले ते याच काळात. १९०८ची राजद्रोहाची शिक्षा त्यांनी असामान्य धैर्याने आणि स्थितप्रज्ञ वृत्तीने स्वीकारली. याचवेळी त्यांची कीर्ती त्रिखंडात दुमदुमली आणि मानवी इतिहासात ते एक महापुरुष म्हणून मानले गेले. आधी ते नामदार टिळक होते, ते लोकमान्य झाले. याच त्यांच्या लोकमान्यत्वाच्या पैलूंविषयी सांगत आहेत लोकमान्यांचे अभ्यासक अरविंद व्यं. गोखले.
All BooksAsthawadhani Lokmanya | अष्टावधानी लोकमान्य
₹275.00Original price was: ₹275.00.₹206.00Current price is: ₹206.00. Save ₹69 Add to cart -
Sale! Add to cartहैद्राबाद मुक्तिसंग्राम हे भारताच्या इतिहासातील एक सोनेरी पान. या मुक्तिलढ्यातील गोवर्धन सराळा च्या लढाईत पराक्रमाची शर्थ करणारा तरुण - शिवाजीराव गऊळकर. अदम्य धाडस, निर्णयक्षमता, नेतृत्वगुण हे शिवाजीरावांचे स्वभावपैलू स्वातंत्र्यसैनिक म्हणून झळाळून उठले. साहित्यिक वृत्तीच्या गऊळकरांनी आपल्या आठवणींमधून केवळ स्वत:चे आयुष्य मांडले नाही; तर तो काळ, त्या काळातील विलक्षण माणसे अक्षरश: जिवंत केली आहेत. सत्ता या घटकाकडे आवर्जून पाठ फिरवलेल्या पिढीतील एका बहुआयामी पण काहीशा दुर्लक्षित व्यक्तिमत्त्वाची प्रेरक कहाणी.
All BooksBakhar Anamikachi | बखर अनामिकाची
₹330.00Original price was: ₹330.00.₹248.00Current price is: ₹248.00. Save ₹82 Add to cart -
Sale! Add to cartही बखर कुण्या एका राजाची वा त्याच्या एखाद्या वीर शिलेदाराची नाही. ही आहे भारतीय शास्त्रज्ञांच्या अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रातील पराक्रमाची बखर. इस्रो म्हणजे भारतीय अंतराळ संशोधन संस्था. आज नावारूपाला आलेल्या या संस्थेची ही कथा. तिच्या पंखांखाली वावरणा-या जिद्दी आणि देशाभिमानी शास्त्रज्ञांची. त्यांनी उभारलेल्या अग्निबाणांची आणि ते अंतराळात सोडण्यासाठी लागणा-या वाहनांची. प्रयोगांच्या यशापयशाची, शास्त्रज्ञांमध्ये दडलेल्या माणसांमधील संघर्षाची. व्यक्तिगत मानापमानाची आणि सामूहिक सुखदुःखांचीसुध्दा !
इतिहासBakhar Isrochya Agnibananchi | बखर ‘इस्त्रो’च्या अग्निबाणांची
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cart'स्वातंत्र्यपूर्व काळच्या हिंदुस्थानातील संस्थाने आणि संस्थानिक म्हणजे ब्रिटीशराजच्या इतिहासातील बहुरंगी पाने. कुणाचा इंग्रजांना टोकाचा विरोध, तर कुणी इंग्रजांचे पराकोटीचे लांगूलचालन करणारे. या संस्थानिकांच्या एकमेकांमधील स्पर्धा, त्यांचे विक्षिप्त छंद, विलासी आयुष्य, विचित्र सवयी या साऱ्यांच्या कहाण्या, आख्यायिका अन् दंतकथा बनल्या. एका टोकाला फंदफितुरी, कटकारस्थाने; तर दुसऱ्या टोकाला कला-क्रीडा-साहित्य यांना उदार आश्रय. एकीकडे प्रजेचा पुत्रवत सांभाळ करणारे प्रजाहितदक्ष राज्यकर्ते, दुसरीकडे प्रजेची पिळवणूक करणारे लहरी कुशासक. अशा अनेकविध रंगांनी रंगलेली, महत्त्वपूर्ण संस्थानांच्या वस्तुनिष्ठ इतिहासाचा वेध घेणारी, तरीही कथा-कादंबरीसारखी रंजक असणारी बखर संस्थानांची
इतिहासBakhar Sansthanachi | बखर संस्थानाची
₹600.00Original price was: ₹600.00.₹450.00Current price is: ₹450.00. Save ₹150 Add to cart
">
Skip to content