WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Indira : Antim Parva | इंदिरा : अंतिम पर्व

लेखक: Ashok Jain | अशोक जैन

Original price was: ₹160.00.Current price is: ₹120.00. Save ₹40

Availability: 25 in stock

सनावली व घटनांच्या जंत्रीतून मांडलेला हा इतिहास नाही. भारताच्या इतिहासावर आपली ठसठशीत मुद्रा उमटवणा-या श्रीमती इंदिरा गांधी यांच्या अखेरच्या कालखंडाचा साक्षीदार असलेल्या लेखकानं झगमगत्या पर्वाचं घडवलेलं हे दर्शन आहे. पंतप्रधानांचे प्रमुख सचिव म्हणून काम करताना डॉ. पी.सी.अलेक्झांडर यांना इंदिराजींचे कितीतरी करारी व कोमल पैलू पाहायला मिळाले. नातवंडांत रमणा-या, गंमतशीर किस्से

सांगणा-या, परदेश दौ-यात तळपणा-या, पंजाब प्रश्नानं सचिंत झालेल्या, राष्ट्रपतींच्या संबंधातील ताणतणाव सांभाळणा-या, मंत्रीमंडळ फेररचना अत्यंत गुप्तता बाळगणा-या व सहका-यांना सहसा न दुखावणा-या पंतप्रधान अशी त्यांची नाना रूपं इथं भेटतात. एकदा तर पंतप्रधापदाचा राजीनामा देऊन राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्याची त्यांची इच्छा होती असं अज्ञात असलेलं सत्य इथं सामोरं येतं. गंभीर-हस-या,पोलादी-प्रेमळ, मुत्सद्दी-मिश्किल अशा इंदिराजींच्या कितीतरी प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहतात. १९८० ते १९८४ या काळातील पडद्यामागील घडामोडींचा हा अस्सल, वस्तुनिष्ठ आलेख. जितका ऐतिहासिक तितकाच चकित करणारा.

तपशील
ISBN : 978-81-7434-046-7
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : ऑक्टोबर 1995
बुक कोड : J-03-1995
वजन : 210 g
पाने : 146
आर्टिस्ट : पुंडलिक वझे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : मार्च 2017

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">