WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Mahanayak (Sampadit Avrutti) | महानायक (संपादित आवृत्ती)

लेखक: Vishwas Patil | विश्वास पाटील

Original price was: ₹650.00.Current price is: ₹488.00. Save ₹162

Availability: 25 in stock

अडतीस कोटी देशबांधवांची गुलामीतून मुक्तता; याच एका प्राणप्रिय ध्येयासाठी एका कडव्या, लढवय्या देशभक्ताने अर्ध्या जगात मारलेली गरुडभरारी ! जीवनभरचा धगधगता संघर्ष, जिवलग स्वकीयांशी आणि ब्रिटिश साम्राज्यासारख्या परकीयांशीही. त्याला व्यक्ती म्हणून नव्हे, तर एक लढाऊ राष्ट्र मानून, जपानसारख्या हिशेबी देशानेही अभूतपूर्व मदत केली. 'चलो दिल्ली'ची त्याची गर्जना साकारण्यासाठी इंफाळ-कोहिमा-ब्रह्मदेशाच्या अरण्यात जुंपला

एक घना रणसंग्राम ! नियतीच्या आडव्यातिडव्या भेसूर नाचानेही ज्याची कवचकुंडले कधीही निस्तेज झाली नाहीत असा - महानायक ! देशोदेशींच्या दफ्तरखान्यांत आजवर अडकून पडलेल्या दुर्मिळ दस्तऐवजांचा, नव्या संशोधित कागदपत्रांचा वेध घेऊन व त्या 'रणवाटा'वरून भ्रमण करून चितारलेली नेताजींची अपरिचित जीवनकहाणी.

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 5 cm
प्रकाशन तारीख : नोव्हेंबर 1998
बुक कोड : K-01-1998
वजन : 754 g
पाने : 730
आर्टिस्ट : सतीश देशपांडे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग - जॅकेट
आवृत्ती : जुलै 2025

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">