WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
SKU: F-05-2000 Category: Brand:

Maharashtra Gatha Part 1 | महाराष्ट्रगाथा (भाग १)

लेखक: H. M. Ghodke | ह. म. घोडके

Notify Me when back in stock

महाराष्ट्र देशाने प्राचीन काळापासून आपले स्वत्व जपले, प्रादेशिकतेचा अतिरेक न करता राष्ट्रधर्म वाढवला. संपूर्ण हिंदुस्तान यवनांच्या तावडीत सापडलेला असताना महाराष्ट्राने मराठी धर्म, संस्कृती टिकवण्याचा यशस्वी प्रयोग केला. मराठी समाजाने देशाला अनेक लोकविलक्षण व्यक्ती आणि संस्थांचे योगदान केले. ब्रिटिश राजवटीत राजकारण, समाजकारण व सांस्कृतिक क्षेत्रात झपाट्याने अध:पतन चालू असताना महाराष्ट्राने स्वत:ला

सावरले आणि परकीय राजवटीच्या बुद्धीभेदाला बळी न पडता आपले प्रबोधन व आधुनिकीकरण घडवून आणले. एकोणिसाव्या शतकात महाराष्ट्रात अनेक ऐतिहासिक, रोमहर्षक घडामोडी झाल्या. राष्ट्रवादा, सामाजिक सुधारणा, पाश्चात्य विचारसरणीतील उदारमतवाद, सशस्त्र क्रांती, राष्ट्रीय चळवळ - एक ना दोन शेकडो घडामोडी. अन त्यात गुंतलेल्या, त्यांच्या कर्त्या करवित्या कैक मराठी वा अमराठी व्यक्ती. एकोणिसाव्या शतकातील राजकारण, धर्म, संस्कृती, शिक्षण पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांमधील महाराष्ट्राच्या स्तिमित करणा-या कर्तृत्वाचा वेधक आलेख.

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 2 cm
प्रकाशन तारीख : जून 2000
बुक कोड : F-05-2000
वजन : 302 g
पाने : 288
आर्टिस्ट : -
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : जून 2000

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">