Miracale | मिरॅकल
₹200.00 Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50
Availability: 25 in stock
कडव्या दहशतवाद्यांचा नायनाट घडवला रणरागिणी झालेल्या स्त्रियांनी ! त्यांच्या मदतीला होती विशिष्ट किरणं आणि विशिष्ट घुबडं ! सर्जिकल स्ट्राईक एक दुर्मीळ वनस्पती. तिच्या फळांचा रस पिऊन जन्माला आला एक राक्षस ! काय होती या राक्षसाची करणी ? राकेस करणी जिवंत माणसाची हत्या करून त्याच्या व्यक्तिमत्त्वासकट अन् स्वभाववैशिष्ट्यांसकट त्याचं रंगरूप साकारणारा
परग्रहवासी यंत्रमानव. त्याच्या हल्ल्यापासून पृथ्वीवासीयांचा बचाव झाला का ? फॉलसोबो कर्णानं दान केली आपली कवचकुंडलं. आज आपलं हृदय कोणी दान करील का ? मानवी हृदयाप्रमाणे काम करणारं कृत्रिम हृदय बनवता येईल का ? कार्डीओ ७७ दहशतवादाशी लढा देणारा कृत्रिम काजवा ! पोलीसयंत्रणेला अन् लष्कराला त्याची मदत झाली का ? फायर फ्लाय ॲक्शन मरणासन्न अवस्थेतील प्रियकर कोमामध्येही आपल्या प्रेयसीबरोबरचं जीवन जगतो. मात्र सत्य समजल्यानंतर तो धक्कादायक निर्णय घेतो. काय होतं ते सत्य ? कोणता होता त्याचा निर्णय ? मिरॅकल हुबेहूब माणसाप्रमाणे दिसणारे यंत्रमानव माणसाची सर्व कामे चोख करत आहेत. माणसाला त्यांची सर्व प्रकारची मदत मिळत आहे. हा आहे येणारा भविष्यकाळ ! गुरूमहाराज विज्ञान-तंत्रज्ञान आज मानवी जीवनाच्या प्रत्येक पैलूचं अविभाज्य अंग झालं आहे. आजच्या विज्ञानाच्या पायावर भविष्यातील विज्ञानकल्पनेचा महाल उभारणा-या - मानवी भावभावनांचा, परस्परसंबंधांचा वेध घेणार्या - उत्कंठावर्धक, चित्तथरारक अन् रंजक विज्ञानकथांचं सप्तरंगी इंद्रधनुष्य !
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content