WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: J-03-1999 Category: Brand:

Mukhavta (Lokaavrutti) | मुखवटा (लोकआवृत्ती)

लेखक: Arun Sadhu | अरुण साधू

Original price was: ₹400.00.Current price is: ₹300.00. Save ₹100

Availability: 25 in stock

रक्ताच्या नात्याचा संबंध देखील उरला नाही, अशा घराच्या रगाड्याला जुंपलेली ती आहे सत्तर वर्षांची निपुत्रिक बालविधवा. तिला कादंबरीची नायिका तरी कसे म्हणायचे ! आहे खरी कथाभागाच्या केंद्रस्थानी. उसन्या नातेवाईकांच्या मुला-बाळांना मायेच्या घट्ट धाग्यांनी जखडून ठेवणारी. शेतीला जखडलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबाची ससेहोलपट, त्यामुळे नव्या-जुन्या पिढ्यांमध्ये होणारी घुसमट, वंशसातत्याची सनातन आस, पुरुषी संस्कृतीने

स्त्रियांच्या व्यापक सर्जनशीलतेकडे फिरविलेली पाठ आणि उच्चकुलीनतेचा टेंभा मिरविणा-या घराण्याच्या अंधा-या तळघरातील अज्ञात रहस्ये अशा विविध स्तरांवर वावरणा-या व-हाडच्या पाश्र्वभूमीवरील या बहुपदरी व गुंतागुंतीच्या कादंबरीत तसे अनेक नायक व नायिका सापडतील. मग या वृद्धेलाच नायिका का करू नये ? तिनेच आपल्या कर्तृत्वाने व निष्ठेने या घराण्याच्या परंपरा जपून त्यांना नवी वळणे दिली आहेत. अखेर प्रत्येक घरातील वैशिष्ट्यपूर्ण कुलसंस्कृती, आचार-विचार व स्वयंपाक-संस्कृती देखील डोळ्यात तेल घालून जतन करतात व त्यात भर घालतात त्या परक्या घरातून आलेल्या स्त्रियाच ना !

तपशील
ISBN : 978-81-7434-159-4
परिमाण : 21.25 × 13.75 × 3 cm
प्रकाशन तारीख : ऑक्टोबर 1999
बुक कोड : J-03-1999
वजन : 420 g
पाने : 416
आर्टिस्ट : सतीश देशपांडे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : जून 2018

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">