-
ललित लेखन
Kovali Unhe | कोवळी उन्हे
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Read more -
Sale! Add to cartकृष्णविवर हा शब्द काव्यात्म वाटला तरी ती संकल्पना वैज्ञानिक आहे. ती खगोलशास्त्रीय संकल्पना बरीच गुंतागुंतीची आणि किचकट असल्यामुळे समजून घ्यायला अवघड आहे. त्या संकल्पनेशी संबंधित गणिती सूत्रे म्हणजे सर्वसामान्यांच्या दृष्टीने तर दुर्लघ्य पर्वतच. पण असे क्लिष्ट विषय सोप्या भाषेत समजावून देण्याची हातोटी ज्या मोजक्या मान्यवर मराठी लेखकांना साधली आहे, त्यांच्यात प्रा. मोहन आपटे यांचा आवर्जून समावेश करावा लागेल. त्यांनी लिहिलेले हे पुस्तक म्हणजे कृष्णविवराबद्दलची श्वेतपत्रिकाच आहे, असे म्हटले तर ते मुळीच वावगे ठरणार नाही. कृष्णविवर म्हणजे काय, या प्रश्नापासून कृष्णविवराच्या निर्मिती-स्थिती-लय या त्रिविध अवस्था असतात का, या प्रश्नांपर्यंत अनेक प्रश्नोपप्रश्नांची सविस्तर, साधार उत्तरे या पुस्तकात दिली आहेत. सृष्टीच्या निर्मितीचे गूढगुंजनात्मक कोडे सोडवण्याच्या प्रयत्नात असणा-या असंख्य खगोलशास्त्रज्ञांच्या संशोधनाचे निष्कर्ष-दुवे एकमेकांशी जोडून कृष्णविवराचा रहस्यभेद करणारी ही सुसंगत कथा प्रा. आपटे यांनी जिज्ञासू वाचकांना सांगितली आहे. गणिती सूत्रे ज्यांना क्लिष्ट वाटतात त्या वाचकांना गणितावर आधारित खगोलशास्त्रीय संकल्पना निव्वळ विवेचनातून समजावून देण्याचे अवघड काम यशस्वीपणे त्यांनी पार पाडले आहेच, पण तशा सूत्रांची भीती न बाळगणा-या जिज्ञासूंसाठी कृष्णविवरच्या संकल्पनेशी निगडित असणारी काही सोपी गणिती सूत्रेही त्यांनी मुद्दाम पुस्तकाच्या शेवटी दिली आहेत. जिज्ञासूंबरोबर जाणकारांनीही आवर्जून वाचावे आणि दाद द्यावी, असे हे पुस्तक.
विज्ञानKrishnavivar | कृष्णविवर
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Sale! Add to cartवडलांचा आदेश शिरसावंद्य मानून, आयुष्यभर निष्काम कर्मयोग आचरीत आलेल्या जयंतराव पाटलांची ही जीवनकहाणी आहे. कृषिक्षेत्रातले आपले सखोल ज्ञान आणि प्रदीर्घ अनुभव उपयोगात आणून आदिवासींच्या जीवनात समृध्दीचा प्रकाश आणणा-या एका प्रयोगशील नियोजनकर्त्याची ही गाथा आहे. ठाणे जिल्ह्यातील बोर्डीसारख्या एका मागासलेल्या भागाचा कायापालट घडवून आणणा-या फळशेतीच्या क्रांतिकारक उपक्रमाची ही अनुकरणीय अशी कथा आहे. जयंतराव पाटलांसारखीच साधी, सरळ आणि तरीही समाधानाची समृध्दी मिळवून देणारी...
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेKrushisadhak | कृषिसाधक
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Sale! Add to cartKrishna Basin has witnessed many prosperous period during Its long history. The glorious historical account of time of the Acharya Nagarjun, the Chalukyas, the Vijayanagar Kingdom and Chhatrapati Shivaji has been an inspiring heritage for all. The Basin is again destined to play a critical role in the future prosperity of india. But the local, social & administrative organizations and the productive water Infra-structures in the basin will have to be suitably upgraded in a systematic manner to make the most appropriate use of the basins natural resources. It calls for a comprehensive understanding of the Basin s set up and a collective integrative approach to the beneficial management of the Krishna Waters. This book is a humble effort to put together the different issues that have been raised in this context and to suggest a way forward.
इंग्रजी पुस्तकेKrushna Water Dispute | कृष्णा वॉटर डिसप्युट
₹1,200.00Original price was: ₹1,200.00.₹900.00Current price is: ₹900.00. Save ₹300 Add to cart -
Sale! Add to cartहा आहे एका चिरंजीव मैत्रीचा प्रवास. म्यूझिक क्लासमधल्या बाकावर सुरू झालेला आणि पाच दशके फुलत गेलेला. मित्रांच्या या जोडीतले कुमार गंधर्व आपला चिरतरुण, सदाबहार स्वर मागे ठेवून अनंताच्या प्रवासाला गेले असले; तरी या मैत्रीचा प्रवास चालू आहे. डॉ. चंद्रशेखर रेळे यांच्या मनात तो रुणझुणतो आहे. असंख्य स्वरांनी, आठवणींच्या हिंदोळयांनी, स्मरणातून उमटणा-या चित्रपटांनी आणि कुमारांच्या आजही होणा-या अलौकिक स्पर्शांनी. दोस्तीचा हा विलक्षण ऐवज डॉ. रेळे आता वाचकांच्या स्वाधीन करत आहेत. भारतीय संगीतातल्या दोन दिग्गजांच्या या वाटचालीत आता वाटसरू होत आहेत मराठी वाचकही... कुमार माझा सखा !
संगीतKumar Maza Sakha | कुमार माझा सखा
₹160.00Original price was: ₹160.00.₹120.00Current price is: ₹120.00. Save ₹40 Add to cart -
Sale! Add to cartभाबडा चिमणराव आणि बालनाटयातल्या दुष्ट चेटकिणीपासून हसवाफसवीतल्या एकसे एक सरस सहा भूमिकांपर्यंत धूम धमाल हसवणारे, चौकटराजा मधल्या नंदू आणि श्रीयुत गंगाधरे टिपरेतल्या आबांपासून लगे रहो मुन्नाभाईमधल्या गांधींपर्यंत घराघरांत पोहोचलेले दिलीप प्रभावळकर यांचा मिस्कील मानसपुत्र म्हणजे हा बोक्या सातबंडे ! तो आहे निर्मळ मनाचा नि धाडसी वृत्तीचा. व्रात्य पण वांड नाही व खोडकर पण खोडसाळ नाही. गरजूला मदत करणं व ढोंगी माणसांच्या वर्मावर घाला घालणं हा त्याचा धर्म ! प्रत्येक संकटातून, अग्निदिव्यातून तो सहीसलामत पार पडतो. दिलीप प्रभावळकरांची लेखनशैली मुळात मिस्किल नि खटयाळ. बोक्या सातबंडयासारखा समानधर्मी भेटला की, मग तर विचारायलाच नको. प्रभावळकरांच्या खटयाळपणाला उधाणच येतं. किशोरांना ते खुद्कन् हसवतात, रिझवतात. बोक्याच्या हाती आनंदाचं भिरभिरं देऊन त्याला ते मस्त घुमवतात! गुगली, 'नवी गुगली', 'हसगत', 'कागदी बाण' व 'झूम' नंतरचं प्रभावळकरांचं 'बोक्या सातबंडे' हे एक झकास पुस्तक ! प्रसन्न विनोदाचा शिडकावा करणारं.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेKumudchya Aaichi Lek | कुमुदच्या आईची लेक
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cartमराठीत स्त्रियांच्या आत्मवृत्तांना एक समृध्द परंपरा लाभलेली आहे. ही परंपरा उंचावणारे कुणास्तव कुणीतरी... हे यशोदा पाडगावकर यांचे अविस्मरणीय आत्मवृत्त. सासवडमध्ये यशोदाबाईंचे वडील ख्रिस्ती धर्माचे मिशनरी होते. तिथल्या बालपणाच्या सुखाच्या काळापासून हे आत्मवृत्त सुरू होते. एकाएकी हे सुखाचे दिवस संपतात. वडिलांचा अकस्मात मृत्यू होतो. कुटुंबाच्या प्रपंचाचे तारू हेलकावे खाऊ लागते...नियतीच्या चढउतारातले अनुभव यशोदाबाईंचे संवेदनक्षम मन नोंदत राहते: नोकरी आणि मुलांचे संगोपन या उसाभरीत आईची होणारी त्रेधा, भावंडांचे व स्वत:चे शाळा-कॉलेजांतले शिक्षण, मित्रमैत्रिणी, शिक्षक, वाढणारे वय, त-हात-हांच्या दुष्ट-सुष्ट व्यक्ती त्यांच्या अभिलाषा आणि सदिच्छा... प्रतिभावंत कवी म्हणून पुढे ख्यातनाम झालेल्या मंगेश पाडगावकरांवर जडलेली प्रीती. लग्नासाठी घरी झालेला तीव्र विरोध आणि तो निर्धाराने दूर ठेवून लग्नात झालेली परिणती...एका धर्माच्या संस्कृतीतून दुस-या धर्माच्या संस्कृतीत प्रवेश करत असताना आयुष्यभर करत राहावा लागलेला मानसिक संघर्ष...मिळालेला सन्मान आणि साहिलेल्या अवहेलना... अर्धशतकातूनही अधिक काळ अनुभवलेल्या विशाल जीवनकलहाचे रम्यभीषण रूप यशोदाबाई इथे संवेदनशीलतेने, सहजपणे चित्रित करतात. त्यांच्या जीवनविषयीच्या अनावर उत्सुकतेची, रसिक आणि आनंदी वृत्तीची, स्वभावातल्या ऋजुतेची आणि सोशिकतेची साक्ष सतत मिळत राहते. संसारातल्या सुखदु:खांच्या छायांच्या पलीकडे जाऊन त्या त्यांचे स्वरूप अलिप्तपणे पाहताना दिसतात....जीवनाचे निखळ रूपच त्यांना पाहायचे आहे हे जाणवते. हे रूप पाहत असताना, हरपत चाललेल्या श्रेयाचा झाकोळ त्यांच्या लेखनावर उतरत येतो. मी कशी जगत आले याविषयी मोकळेपणानं, अलिप्तपणानं लिहावं एवढीच या लिहिण्यामागची ऊर्मी होती, असे यशोदाबाईंनी मनोगतात म्हटले आहे. त्याचा निर्भर प्रत्यय इथे येतो.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेKunastav Kunitari | कुणास्तव कुणीतरी
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreनैतिकता म्हणजे अमुक आणि अनैतिकता म्हणजे तमुक म्हणून अमुकच बरोबर... असं अ ब क म्हणून अ क इतकं साधं समीकरण प्रत्यक्ष आयुष्यात नसतंच कधी ! चांगल्यापासून ते वाईट परिस्थितीपर्यंतच्या आवर्तनांमधले कसोटीचे क्षण पदोपदी नैतिकतेच्या आणि अनैतिकतेच्या मधली सीमारेषा धूसर करीत नेतात. ही मधली धूसर वाटणारी वाट, सुबोध जावडेकर यांच्या सर्व कथा नेमकी पकडतात. कुरुक्षेत्रावर अर्जुनासमोर उभे ठाकले होते, त्यापेक्षा कितीतरी गुंतागुंतीचे प्रश्न आज आपल्यापुढे आहेत. त्यांना सामोरं जावं लागतंय. या प्रश्नांना तोंड देताना सदसद्विवेकबुद्धी जागवणा-या या ख-या गोष्टी. एकीकडे तुमच्या, आमच्या जगण्यातली अगतिकता दाखवताना दुसरीकडे काळ्या ढगांची रुपेरी किनारही तेवढ्याच ताकदीनं अधोरेखित करतात.
कथासंग्रहKurukshetra | कुरुक्षेत्र
₹160.00Original price was: ₹160.00.₹120.00Current price is: ₹120.00. Save ₹40 Read more -
Sale! Add to cart'नर्मदा बचाव आंदोलन ! विस्थापित होणाऱ्या आदिवासींना लढण्याचं बळ मिळालं, ते या सशक्त जनआंदोलनानं. त्या बळावर त्यांनी आपलं घर-दार, जंगल, जमीन वाचवण्यासाठी दीर्घकाळ लढा दिला. त्या तीन दशकांच्या झुंजीची ही संघर्षमय सत्यकथा... आंदोलनाचा इतिहास, विस्थापनापूर्वीचं अन् नंतरचं आदिवासींचं जीवन, त्यांची संस्कृती, आदिवासी कार्यकर्त्यांची भूमिका अन् योगदान हे सारं या कथेतून उलगडत जातं. या लढ्याचा कणा असलेले दोन प्रमुख आदिवासी नेते ही कथा सांगताहेत आपल्या बोलीभाषेतून. त्यांच्या मुलाखतींमधून मांडलेला मौखिक इतिहास लढा नर्मदेचा... '
समाजकारण / राजकारणLadha Narmadecha | लढा नर्मदेचा
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreमधुमेहाचे निदान व उपचार यापेक्षा दैनंदिन जीवनात त्याला सांगाती म्हणून समजून घेणे जास्त महत्त्वाचे असते. हीच खरी त्याच्याशी मैत्रीपूर्ण लढत असते. पूर्णत: शास्त्रीय माहिती सोप्या भाषेत व थोडक्यात देणारे हे पुस्तक कोणालाही स्वत:चे जीवन आत्मविश्वासाने व सुखाने वाटचाल करण्यास मदत करू शकेल. मधुमेह या विषयावरचे लिखाण, पुस्तके इंग्रजी व मराठीत भरपूर झाली असली तरी आकडेवारीच्या बोजडपणामुळे, शास्त्रीय काटेकोरपणामुळे ती कंटाळवाणी वाटतात. आचरणात आणणे तर दूरच राहते. मधुमेहीच्या दैनंदिन जीवनात अधिक उपयुक्त होईल अशी माहिती सहज, सोप्या भाषेत व थोडक्यात देण्याची गरज होती. ती या पुस्तकाने भरून निघून मधुमेही अधिक आत्मविश्वासाने व सुखाने आपले जीवन समृध्द करतील अशी खात्री वाटते.
वैद्यकीयLadha Sakhreshi | लढा साखरेशी
₹130.00Original price was: ₹130.00.₹98.00Current price is: ₹98.00. Save ₹32 Read more
">
Skip to content