-
Sale! Add to cartगोजी : ठाण्याच्या शाळेत नववीत शिकणारी मुलगी. तिला पुस्तकातून भेटलेली अजब मैत्रीण - मुग्धा. करोना'च्या आजारावर प्रभावी लस शोधणारे शास्त्रज्ञ - दुष्यंत सावरकर. त्यांचे शत्रुराष्ट्राने अपहरण केले. गोजी अन् मुग्धा या जोडगोळीने सावरकरांचा शोध घेण्याचा निश्चय केला. आपल्या कामात दोघीजणी यशस्वी झाल्या का ? कोण होती मुग्धा ? कुठे होते तिचे जग ? क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारी, किशोरांना आपल्यासोबत ओढून नेणारी रहस्यकादंबरी.
कादंबरीGojee – Mugdha Ani Corona | गोजी-मुग्धा आणि करोना
₹120.00Original price was: ₹120.00.₹90.00Current price is: ₹90.00. Save ₹30 Add to cart -
Sale! Add to cart'पाच लाख म्हशी. दोन लाख गायी. अठराशे कर्मचारी. असंख्य उद्योजक. चाळीस लाख ग्राहक. या सा-यांचं नांदतं-गाजतं कुटुंब म्हणजे कोल्हापूरचा दूधसंघ गोकुळ . आणि या गोकुळ ला प्रगतिपथावर नेणारा नंदगोप म्हणजे अरूण नरके. सलग दहा वर्षं या संघाचं अध्यक्षपद भूषवणारे अरूण नरके म्हणजेच गोकुळ अन् गोकुळ म्हणजेच अरूण नरके असं समीकरणच सिद्ध झालेलं. म्हणूनच अरूण नरके यांनी सांगितलेलं आत्मकथन बनलंय गोकुळगाथा
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेGokulgatha | गोकुळगाथा
₹450.00Original price was: ₹450.00.₹338.00Current price is: ₹338.00. Save ₹112 Add to cart -
Sale! Add to cartएखाद्या संवेदनशील स्त्रीनं आपल्या जाणत्या सखीला कधी मनोगत तर कधी हृद्गत सांगावं, तसा या 'गोंदणखुणा' - चा आशय आहे. निसर्गातील एखाद्या घटकाचा अनपेक्षित साक्षात्कार, मानवी स्वभावातील अतर्क्य भावनाट्य, रुणझुणत्या कवितेच्या चरणाशी सहज घडलेला अर्थमेळ, स्त्री-संवेदनेशी जोडलेल्या घटना-प्रसंगांची चलतचित्र किंवा जीवनाच्या एखाद्या प्राणसूत्राचं स्वतःला निःसंदर्भ करून केलेलं आत्मचिंतन - अशा अनेक आशयसूत्रांची स्मरणी या लेख- संग्रहात आहे. त्यात क्षणात आपला आकार बदलणाऱ्या मेघांचं दर्शन आहे; तसंच शांतनिवांत आकाशाचं सूचक निःशब्दपणही आहे. अंतर्याम आणि भवताल यांतील तरल रेषा विरून जावी इतकी अनुभवाला सामोरं जाण्याची सिद्धता निघोजकरांकडे आहे. सुजाण वाचक 'गोंद णखुणा' पाहतील, नव्या दृष्टीनं पाहतील असा भरवसा वाटतो. हेमकिरण पत्की
All BooksGondankhuna | गोंदणखुणा
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cart'बालकुपोषण ही केवळ आदिवासी अन् आर्थिकदृष्टया निम्नस्तरातील वर्गाची समस्या नाही. मध्यमवर्गातही ती कमीअधिक प्रमाणात आढळते. ही समस्या सोडवणे शासनाची जबाबदारी आहे, असे म्हणून हात झटकणे ही शुद्ध आत्मवंचना आहे. महाराष्ट्रात लाखभर अंगणवाडी सेविका आणि साहाय्यिका तुटपुंज्या साधनांनिशी या समस्येशी लढत आहेत. पण तेवढे पुरेसे नाही. कौटुंबिक, सामाजिक, सांस्कृतिक पातळीवरही प्रयत्न व्हायला हवेत. महाराष्ट्रात राजमाता जिजाऊ मिशन यासाठी भरीव काम करत आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमधील अंगणवाडयांच्या प्रत्यक्ष पाहणीतून कुपोषणविरोधी लढयाचा मांडलेला लेखाजोखा.
रसग्रहण / समीक्षाGood Morning! Namaste! | गुडमॉर्निंग! नमस्ते!
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
स्थापत्य आणि नगररचना
Goshta Mumbai Firebrigadechi | गोष्ट मुंबई फायरब्रिगेडची
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Sale! Add to cartशेतकर् यांपासून कामगारांपर्यंत, उद्योगपतींपासून गृहिणीपर्यंत, अगदी नोकरदारापासून संतमहंतांपर्यंत प्रत्येकाचा प्रत्यक्षाप्रत्यक्ष बँकेशी संबंध येतोच. जशी व्यक्तीची अथवा संस्थेची कुठली ना कुठली बँक, तशी बँकांची बँक, सार् या देशाची बँक म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँक. कधी स्थापन झाली ही बँक ? कसा झाला या बँकेचा आजवरचा प्रवास ? स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात काय होती या बँकेची भूमिका अन् कार्यपद्धती ? देशातील सरकार, प्रशासन, अर्थव्यवस्था अन् सामान्य जनतेच्या दैनंदिन आयुष्यापासून दीर्घकालीन परिणामांपर्यंत अनेक घटकांवर परिणाम करणार् या धोरणांची आखणी करणारी बँक म्हणजे रिझर्व्ह बँक. भारतासारख्या खंडप्राय विशाल देशाच्या वाटचालीत महत्त्वपूर्ण सहभाग असणार् या रिझर्व्ह बँकेचा रोचक इतिहास अत्यंत रंजक पद्धतीने सांगत आहेत सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ विद्याधर अनास्कर. गोष्ट रिझर्व्ह बँकेची
All BooksGoshta Reserve Bankechi | गोष्ट रिझर्व्ह बँकेची
₹625.00Original price was: ₹625.00.₹469.00Current price is: ₹469.00. Save ₹156 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreकथेसाठी कठीण दिवस असताना हा वाड्मयप्रकार समर्थपणे हाताळणा-या आजच्या मोजक्या कथालेखकांपैकी मधुकर धर्मापुरीकर हे महत्वाचे नाव. आशय - विषयानुरूप लेखनशैली, कथेला विनोदी होऊ न देता कथेतला विनोद सांभाळणे आणि अनुभवांचा अगदी वेगळ्या प्रकारचा निवडलेला परिसर ही धर्मापुरीकरांच्या कथांची महत्वाची वैशिष्ट्ये. आजची कथा ही आशय-अनुभवाच्या दृष्टीने परिपक्व होत आहे, मात्र त्याकडेच अधिक लक्ष दिल्याने तिच्या गोष्टीरुपाला धक्का पोचतो आहे. मधुकर धर्मापुरीकर यांची कथा त्यांच्या कथनशैलीमुळे आपले गोष्टीरूप सांभाळून उभी असते. धर्मापुरीकारांची कथा वाचनीय होते आणि लक्षणीय ठरते ती यामुळेच.
कथासंग्रहGoshtivelhal | गोष्टीवेल्हाळ
₹140.00Original price was: ₹140.00.₹105.00Current price is: ₹105.00. Save ₹35 Read more -
Sale! Add to cartही संयुक्ता. दिल्लीसारख्या `कॉस्मोपॉलिटन' शहरात जन्मली, वाढली. तिला तुमच्या-आमच्याप्रमाणेच वेगवेगळ्या विषयांत रस होता. मग तिनं सरधोपटपणे महाविद्यालयीन शिक्षण न घेता, आपल्याला हवं तेच शिकायचं ठरवलं. आईवडीलही ग्रेटच ! त्यांनी तिला चक्क साथ दिली. मग ही मुलगी चेन्नईला हातमागावर विणकाम शिकली. गाणं शिकली. `इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठा'ची तिनं पदवी सुवर्णपदकासह मिळवली. त्यानंतर तिनं `नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन डिझाइनिंग' मधला पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमही पूर्ण केला. आता ती आंध्रप्रदेशातल्या पोचमपल्ली इथे हातमाग विणकरांच्या संस्थेमध्ये काम करते. निरनिराळ्या स्वयंसेवी संस्थांबरोबर तिचा संपर्क आहेच. परंतु विशेष म्हणजे आपलं काम करता करता मानवजातीच्या `समते'साठी ती झटते आहे. या ख-या गोष्टीचं तात्पर्य एकच - मनापासून वाटतं, तेच करा. यश हमखास आहे !
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेGostha : Eka Kharya Idiotchi | गोष्ट : एका ख-या ‘इडियट’ची
₹100.00Original price was: ₹100.00.₹75.00Current price is: ₹75.00. Save ₹25 Add to cart -
Sale! Add to cartआपल्या जगण्याच्या प्रवासात काही माणसे नकळतपणे येतात आणि आपल्या भावविश्वाचे कोपरे व्यापून घेतात. यातले काही दूरपर्यंत सोबत करतात, तर काही मध्येच थबकतात. त्यांच्या असण्या-नसण्याची सवय आपल्याला झालेली असते. त्यांच्या असण्याने आपण समृद्ध होत जातो, तर नसण्याने पोरकेपणाची भावना आत खोलवर कायमची ठणकत असते. कशी असतात ही माणसे ? उत्तुंग म्हणून मिरवण्यापासून सामान्य म्हणून स्वीकारण्या-नाकारण्यापर्यंतची ? अशी माणसे आपल्याला पुरती कळली या समजात आपण वावरत असतो; पण प्रत्यक्षात ती किती कळलेली असतात ? का ती अशी समजून घेताना आकलनाआधीच आपल्या परिघातून निसटून जातात ? आपल्या आयुष्यात आलेल्या आणि उभं-आडवं आयुष्यच व्यापून उरलेल्या या माणसांविषयीचा हा एक मनोज्ञ प्रवास. निरंतर चालणारा आणि तरीही चकवे निर्माण करणारा गोत्र
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेGotra | गोत्र
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Sale! Add to cart' वीजमंडळ, रेशनकार्ड, गॅस बँका, विमासेवा टेलिफोन, मोबाईल हाउसिंग सोसायटी विषयक नियम विविध शासकीय सेवा माहितीचा अधिकार ग्राहक संरक्षण कायदा केंद्र अन् राज्य सरकारची तक्रार-निवारण यंत्रणा रोजच्या आयुष्यातील अशा कितीतरी बाबींमध्ये आपण सारेजण ग्राहकाच्याच भूमिकेत वावरतो. गुणवत्तापूर्ण वस्तू अन् सेवा मिळण्याचा अधिकार ग्राहक म्हणून साऱ्यांनाच असतो. मात्र बरेचदा आपल्याला आपल्या या अधिकाराची जाणीव नसते. दैनंदिन जीवनातल्या कितीतरी गरजांबद्दलच्या अशा आपल्या अधिकारांची उपयुक्त माहिती देणारे - हरघडी येणाऱ्या अडचणींवर खात्रीशीर उपाय सांगणारे - ग्राहक राजा, सजग हो !
कायदाविषयक - अर्थव्यवहारGrahak Raja Sajag Ho | ग्राहक राजा, सजग हो!
₹180.00Original price was: ₹180.00.₹135.00Current price is: ₹135.00. Save ₹45 Add to cart
">
Skip to content
