-
Sale! Add to cartवारसाहक्काने मिळालेली वडिलोपार्जित संपत्ती असो किंवा स्वकष्टार्जित मालमत्ता असो, स्वामित्वहक्कासाराखी बौद्धिक संपदा असो किंवा ई-मेल अकाऊन्ट / फेसबुक इ. सारखी डिजिटल मालमत्ता असो, आपल्या निधनानंतर तिची नीट जपणूक व्हावी, असे वाटणा-या सर्वांनी वेळेवरच व्यवस्थापत्र करून ठेवले पाहिजे. वृद्धपकाळी, मृत्यूची चाहूल लागल्यावर घाईगडबडीत करावयाची ती गोष्ट नाही. समजून-उमजून योग्य वेळी आपल्या संपत्तीचे इच्छेनुरूप वाटप करून ठेवणे हे प्रत्येक प्रौढ, सधन माणसाचे कर्तव्यच आहे. शारीरिक व्याधींवरील उपचाराबाबतही प्रत्येक व्यक्ती योग्य वेळी आवश्यक सूचना आगाऊच देऊन ठेवू शकते. या सर्व बाबींची कायदेशीर अंमलबजावणी कशी करावी, याचा सोदाहरण सल्ला देणारे, एका कायदेविषयक तज्ज्ञाने लिहिलेले सोपे, सुबोध पुस्तक. कसे करावे ? व्यवस्थापत्र / इच्छापत्र / मृत्यपत्र / डिजिटल व्यवस्थापत्र आणि लिव्हिंग विल आगाऊ वैद्यकीय निर्देशांसह
कायदाविषयक - अर्थव्यवहारKase Karave? Vyavasthapan/ Ichapatra/ Mrutyupatra | कसे करावे? व्यवस्थापत्र / इच्छापत्र / मृत्युपत्र
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Sale! Add to cart' सदनिकेची (फ्लॅटची) खरेदी सोसायटी/अपार्टमेंटची स्थापना व त्यानंतर पूर्तता करावयाच्या बाबी आदर्श व्यवस्थापनासाठी मार्गदर्शक तत्त्वे देखभाल खर्चात कपात आपल्या घराच्या संरक्षणाची अन् तंदुरुस्तीची व्यवस्था पुनर्विकासाची प्रक्रिया पुनर्विक्रीचे (रिसेलचे) अन् घर-खरेदीचे सहजसोपे टप्पे जमीन विकत घेऊन घराचे बांधकाम घराची विक्री करतानाची प्रक्रिया सर्वांच्या मनातील घराशी संबंधित या सगळया मुद्दयांचे स्पष्टीकरण देणारे कशासाठी ? घरासाठी !
मार्गदर्शनपरKashasathi? Gharasathi! | कशासाठी? घरासाठी!
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartकाश्मीर :एक शापित नंदनवन याच नावाच्या १९९५ साली प्रसिद्घ झालेल्या ग्रंथाची ही संक्षिप्त आवृती. ग्रंथ संक्षिप्त केलेला असला तरी काश्मीर-समस्या मात्र वाढलेली आहे; अधिकच गंभीर, स्फोटक बनलेली आहे ! या ग्रंथाचा हेतू काश्मीर-प्रश्न मुळात काय आहे व तो का सुटत नाही, याचे सत्यकथन हा आहे. तेथील महाराजांना भारतात विलीन व्हावयाचे नव्हते, हा प्रवाद खरा आहे काय ? त्यांना पाकिस्तानात विलीन होण्याचा सल्ला भारताने का दिला होता ? संस्थानांच्या विलीकरणाचे भारताचे धोरण कोणते होते ? विलीन करून घेताना सार्वमताचे लेखी आश्वासन का देण्यात आले ? तरीही नंतर सार्वमत का घेतले गेले नाही ? घटनेत ३७० कलम कसे व कशासाठी आले ? पं. नेहरूंनी पंतप्रधान शेख अब्दुल्लांना कारागृहात का टाकले ? तेथे अराजकाची व दहशतवादाची सुरूवात केव्हा झाली ? या व अशा अनेक प्रश्नांची खरी उत्तरे या ग्रंथात सापडतील. भरभक्कम पुराव्यांनिशी यात मांडलेले दाहक सत्य कितीही अप्रिय वाटले तरी राष्ट्रासाठी ते समजून घ्यावेच लागेल. कोणत्याही राष्ट्रीय प्रश्नाच्या ख-या स्वरूपाचे अज्ञान हाच मूलत: एक राष्ट्रीय शाप आहे. म्हणूनच काश्मीर हे शापित नंदनवन ठरले आहे !
समाजकारण / राजकारणKashmir : Ek Shapit Nandanwan (Sankshipt Awrutti) | काश्मीर :एक शापित नंदनवन (संक्षिप्त आवृती)
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart -
Sale! Add to cartकाश्मीरमधील भारत-पाकिस्तान सीमा म्हणजे जगातील सर्वात अशांत आंतरराष्ट्रीय सीमारेषांपैकी एक. या सीमारेषेवरील प्रत्यक्ष परिस्थिती आणि जनजीवन जाणून घेण्यासाठी एक मध्यमवर्गीय स्त्री एकटीने प्रवास करण्याचा निर्णय घेते. इतकेच नाही तर या प्रवासात अत्यंत गरजेपुरतेच सामान आणि पैसे जवळ ठेवते. तिचा भरवसा आहे सामान्य काश्मिरी माणसाच्या चांगुलपणावर आणि मानवतेच्या मूल्यांवर. कसा घडला तिचा हा प्रवास? या प्रवासात तिला आलेल्या अनुभवांनी तिचा भरवसा भंगला की मजबूत झाला? पृथ्वीवरील स्वर्ग असे सार्थ वर्णन असलेल्या काश्मीरमधील निसर्गसौंदर्य, आलेल्या पाहुण्याची घरच्यासारखी मेहमाननवाजी करणारी काश्मिरी कुटुंबे, सीमारेषेच्या अलिकडे काय किंवा पलिकडे काय, सारख्याच जीवनाला सामोरे जाणारे जनसामान्य यांचे प्रत्ययकारी दर्शन घडवणारी सीमेवरच्या एकल प्रवासाची सत्यकथा
All BooksKashmiriyat | काश्मिरियत
₹450.00Original price was: ₹450.00.₹338.00Current price is: ₹338.00. Save ₹112 Add to cart -
Sale! Add to cart' गालापगोस म्हणजे कासवांचे बेट. ही बेटे आहेत सुदूर प्रशांत महासागरामध्ये. तीस-चाळीस लाख वर्षांपूर्वी ज्वालामुखीच्या स्फोटांतून बनलेली ही बेटे म्हणजे या वसुंधरेवरील सर्वांत तरुण एकाकी भूमी. अपघातानेच लाखभर वर्षांपूर्वी या बेटांवर काही मोजक्या सजीवांचा चंचुप्रवेश झाला. या अतिसंवेदनशील अधिवासामध्ये काही टिकले, काही संपले. मोजक्याच वनस्पती, मूठभर पशु-पक्षी. त्यांच्या जीवनसाखळ्या अगदीच प्राथमिक, संशोधकांसाठी जणू बाळबोध लिपीच. पहिल्यांदा ती वाचली सर चार्ल्स डार्विन यांनी, तोच उत्क्रांतिवादाचा जन्म. आजही माणूस तेथे पाहुणाच आहे, आणि पाहुण्याने पाहुण्यासारखेच राहायला हवे, नाही का? त्यासाठीच हा पुस्तक-प्रपंच.'
प्रवासKasvanche Bet | कासवांचे बेट
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cart'चोर चोरी करू शकत नाही, शासक कर लावू शकत नाही, भाऊबंदांमध्ये वाटणी होत नाही आणि तिचे ओझेही वहावे लागत नाही. अशी संपत्ती म्हणजे बौद्धिक संपदा. तरीसुद्धा तिचेही रक्षण करावेच लागते. अगदी व्यक्तिगत पातळीपासून सामूहिक अन् राष्ट्रीय स्तरापर्यंत ही सृजन संपत्ती जपावी लागते, वाढवावी लागते. ही बौद्धिक संपदा तुम्हाला देत असते विशिष्ट हक्क. पेटंट, कॉपीराइट, ट्रेडमार्क, भौगौलिक निर्देशक, इंडस्ट्रियल डिझाइन - अशा अनेक प्रकारांनी हे हक्क तुम्हाला मिळतात. कसे मिळवायचे हे हक्क ? कसे राखायचे हे हक्क ? कुणी या हक्कांचा भंग केल्यास तो रोखायचा कसा ? राष्ट्रीय अन् आंतरराष्ट्रीय कायद्यांची यात काय भूमिका असते ? अशा अनेक मुद्द्यांबाबत मोलाचे मार्गदर्शन करणारे - संशोधक-उद्योजकांपासून लेखक-प्रकाशकांपर्यंत, गीतकार-संगीतकारांपासून नाट्य-चित्रपट दिग्दर्शकांपर्यंत, चित्रकार-छायाचित्रकारांपासून इंजिनीअर-तंत्रज्ञांपर्यंत, साऱ्या सर्जनशील व्यक्तींना त्यांच्या अनमोल निर्मितीचे भान करून देणारे - कथा अकलेच्या कायद्याची
कायदाविषयक - अर्थव्यवहारKatha Aklechya Kaydyachi | कथा अकलेच्या कायद्याची
₹290.00Original price was: ₹290.00.₹218.00Current price is: ₹218.00. Save ₹72 Add to cart -
Sale! Add to cartही रंजक कथा आहे बारा अक्षरी नाव धारण करणा-या एका कल्लेदार व्यक्तीची ! ती आहे एका सामान्य कार्यकर्त्यापासून आमदार-खासदारकीपर्यंतच्या तिच्या प्रवासाची... तशीच ती आहे सरदार घराण्यात जन्मलेल्या आणि माणसावर मनस्वी प्रेम केलेल्या एका रुबाबदार व्यक्तीची. वयाच्या चोविसाव्या वर्षी शेतीच्या अभ्यासासाठी स्वत:च्या हिमतीवर अमेरिकेला गेलेल्या जिद्दी तरुणाची ! लोकल बोर्डापासून यूनोपर्यंत भारताचं प्रतिनिधित्व केलेल्या आणि सात मुख्यमंत्री आणि दहा पंतप्रधानांबरोबर काम करण्याची संधी लाभलेल्या एका दिलदार, लोकप्रिय नेत्याचीही !
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेKatha Bara Aksharanchi | कथा बारा अक्षरांची
₹225.00Original price was: ₹225.00.₹169.00Current price is: ₹169.00. Save ₹56 Add to cart -
Sale! Add to cartवाचनीयता व सुरसपणा हा लिखित मजकूरास अत्यंत आवश्यक असा गुण आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील प्रसिद्ध इंग्लिश नाटककार नोअेल कॉवर्ड म्हणतो ‘वाचकाचा नेहमी विचार करा. त्याला कधी बिचकू नका किंवा तुच्छ लेखू नका. त्याची नस पकडा, त्याला तुमच्या लेखनाच्या मोहात पाडा, त्याची उत्सुकता जागवा, त्याला उत्तेजित करा; गरज पडल्यास धक्का द्या, हसवा, रडवा; पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याला कधीही, कधीही, कधीही कंटाळा येऊ देऊ नका.’
या संग्रहातील कथा वाचकांना वाचनीय आणि सुरस वाटल्या, तर लेखक म्हणून मला समाधान वाटेलच; पण या कथांच्या आशयातून वाचकांना आणखी काही जाणवलं, तर या कथांमधून त्यांच्या अधिक जवळ पोचल्याचा आनंद मला लाभेल.
कथा चाळिशी‘वाचकाचा नेहमी विचार करा. त्याला कधी बिचकू नका िंकवा तुच्छ लेखू नका.
त्याची नस पकडा, त्याला तुमच्या लेखनाच्या मोहात पाडा, त्याची उत्सुकता जागवा,
त्याला उत्तेजित करा; गरज पडल्यास धक्का द्या, हसवा, रडवा;
पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याला कधीही, कधीही, कधीही कंटाळा येऊ देऊ नका.’
प्रसिद्ध इंग्लिश नाटककार नोअेल कॉवर्डजन्म-मृत्यू, व्याधी, दु:ख, स्वार्थ, परमार्थ,
अशी विविध आशयसूत्रं हाताळणार्या -
परिचिताला अपरिचित बनवणार्या
वास्तव अन् फँटसी अशा टोकांमध्ये पूल बांधणार्या
सुरस अन् वाचनीय कथांचा संग्रहकथासंग्रहKatha Chalishee | कथा चाळिशी
₹390.00Original price was: ₹390.00.₹293.00Current price is: ₹293.00. Save ₹97 Add to cart -
Sale! Add to cart'सुमारे सात दशकांपूर्वी आशिया खंडातल्या दोन देशांमध्ये एक शर्यत सुरू झाली. ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून भारत स्वतंत्र झाला आणि चीनमधील यादवी युद्धात साम्यवादी विजयी झाले. पंडित जवाहरलाल नेहरू आणि माओ झेडाँग हे दोन नेते आपापल्या देशांचे नवे नेते झाले. प्रारंभी काही काळ त्या दोघांमध्ये मैत्री नांदली खरी; पण थोड्याच काळात दोघांचीही वेगवेगळ्या मार्गांनी वाटचाल सुरू झाली आणि मग कळत-नकळत स्पर्धासुद्धा! मतभेदांना सीमासंघर्षाचीही जोड मिळाली. चीनमधील हुकूमशहांनी सुधारणावादी भूमिका स्वीकारली, काही मूल्यं पायदळी तुडवली; पण आर्थिक-औद्योगिक प्रगतीचा वेग प्रचंड वाढवला. महासत्ता बनवण्याच्या अगदी जवळ तो देश जाऊन पोचला... भारतात लोकशाही समाजवादाचा प्रयोग बरीच वर्षं चालू राहिला, नेते आले-गेले, नियोजनपूर्वक प्रगतीच्या योजना जाहीर झाल्या-फसल्या आणि तरीही जागतिकीकरणाच्या वेढ्यात उदार धोरणं स्वीकारणं भारतीय नेत्यांनाही भाग पडलं. आता हा देशही प्रगतीच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन ठेपला आहे. अशा स्थितीत बरीच पुढची मजल मारलेल्या चीनशी त्याची तुलना होणं स्वाभाविक आहे. दोन्ही देशांच्या प्रमुख नेत्यांची, त्यांच्या ध्येयधोरणांची, त्यांच्या यशापयशाची, देशांमधील अटळ चढउतारांची आणि भविष्यामधल्या शक्याशक्यतांची तुलना करीत सांगितलेली त्या शर्यतीची ही माहितीपूर्ण कथा.
इतिहासKatha Eka Sharyatichi | कथा एका शर्यतीची
₹400.00Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00. Save ₹100 Add to cart -
Sale! Add to cart'साडेतेरा अब्ज वर्षांपूर्वी झालेला महास्फोट - बिग बँग ! त्यातून जन्मलेलं असीम विश्व ! लाखो प्रकाशवर्षं अंतरावरच्या दीर्घिका ! कोट्यवधी तारे अन् कृष्णविवरं ! या सा-या अफाट पसा-याचा अंतराळातून वेध घेणा-या आजपर्यंत फारश्या ज्ञात नसलेल्या अनेक गोष्टींबद्दल ठोस पुरावे मिळवणा-या मानवी ज्ञानाच्या कक्षा सर्व बाजूंनी विस्तारणा-या अद्भुत प्रकल्पाची मन गुंग करणारी कहाणी... कथा हबल दुर्बिणीची...
विज्ञानKatha Habal Durbinichi | कथा हबल दुर्बिणीची
₹160.00Original price was: ₹160.00.₹120.00Current price is: ₹120.00. Save ₹40 Add to cart
">
Skip to content