-
Sale! Add to cartह्या ती ला विशिष्ट नाव नाही. स्त्री हीच तिची ओळख. आयुष्यभर तिला सोबत फक्त नानाविध दु:खांची ! धर्माच्या नावाखाली तिचा छळ मांडणा-या जाचक परंपरा खंडित झाल्या ख-या, पण प्रश्न संपले नाहीत. जगण्याच्या नव्या पद्धतीतून तिच्यासाठी नवे प्रश्न निर्माण होतच राहिले. यातनांचे, पीडेचे प्रकार बदलेले पण दुख:ची जात तीच-जीवघेणी! तिचं शिक्षण, तिचं आर्थिक स्वावलंबन, तिचं कर्तृत्व-सगळं खोट! खरं फक्त तिचं स्त्री असणं ! ती अडाणी कामकरी असो अथवा वकील, डॉक्टर, इंजीनियर असो, तिच्या स्तरात तिला भेटणारा पुरूष आणि त्याचा समाज तिची छळणूक करीतच राहिला. स्त्रीच्या जगण्याचा गेल्या शंभर वर्षांचा हा साहित्यिक इतिहास म्हणजे खरं तर प्रत्येकीची कथा !
कथासंग्रहTichi Katha | तिची कथा
₹175.00Original price was: ₹175.00.₹131.00Current price is: ₹131.00. Save ₹44 Add to cart -
Sale! Add to cartइनग्रिड बर्गमन. - जगाच्या दिलाची धडकन ! रॉबर्तो रोस्सेलिनी. - तिचा प्रतिभाशाली इटालियन दिग्दर्शक नवरा. सोनालिनी दासगुप्ता. - एक भारतीय बंगाली गृहिणी. प्रत्येक देखण्या स्त्रीच्या रसरसून प्रेमात पडणा-या आणि तेवढ्याच उत्कटतेनं प्रत्येक प्रेम नव्यानं जगणा-या रोस्सेलिनीच्या अजब प्रेमाची ही गजब कहाणी !
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेTichi Mohini | तिची मोहिनी
₹325.00Original price was: ₹325.00.₹244.00Current price is: ₹244.00. Save ₹81 Add to cart -
Sale! Add to cart३१ जुलै, १९२० ची रात्र. घनघोर पावसाचं अघोरी थैमान. दुसरा दिवस उजाडला खरा; पण मुंबईचं क्षितिज काळवंडलेलं, कोंडलेलं. सरदारगृहाच्या अवतीभवती माणसांचे थवे. त्या कुंद वातावरणात नि अलोट गर्दीत आसवांचे शब्द येरझारा घालताहेत. जड पावलांनी. एक युग संपलं. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. स्वातंत्र्यलक्ष्मीचा लाडका फकीर. अलम देशाचा कर्णधार. तेल्यातांबोळ्यांचा कैवारी. ब्रिटिशांचा कर्दनकाळ. असंख्य लोकचळवळींचा सूत्रधार. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. खंदा नि खंबीर नेता. कणखर नि करारी सरसेनानी. सावध नि संवेदनशील संघटक. एक ऑगस्ट, १९२०. एका तपस्येची अखेर. टिळक गेले; पण कळ्यांची फुलं करून. नव्या युगाचं बिगुल वाजवून. टिळकांच्या अखेरच्या वर्षांचा हा समग्र आणि मर्मग्राही आढावा. व्यासंगी पत्रकार अरविंद व्यं. गोखले यांच्या लेखणीतून. मंडालेचा राजबंदी' या ग्रंथानंतर - टिळकपर्व
इतिहासTilakparva | टिळकपर्व
₹500.00Original price was: ₹500.00.₹375.00Current price is: ₹375.00. Save ₹125 Add to cart -
Sale! Add to cartअंधश्रध्दानिर्मूलन व नरेंद्र दाभोलकर हे आज समानार्थी शब्द झाले आहेत. ही कमाई आहे पाव शतकाच्या अथक वाटचालीची अंधश्रध्दानिर्मूलनाचा विचार, उच्चार, आचार, संघर्ष व सैद्धांतिक मांडणी या पाचही आघड्यांवर अंनिस आणि नरेंद्र दाभोलकर कार्यरत आहेत. या क्षेत्रात या स्वरूपाचे असे व्यापक कार्य भारतातही अपवादानेच असेल. अंधश्रध्दानिर्मूलनाशी संबधित सर्व विषयांची अभ्यासपूर्ण, सखोल तात्विक मांडणी या पुस्तकात आहे. विषेश म्हणजे, परिणामकारक कृतिशीलतेमुळे यातील विचारांना आत्मप्रत्ययाची झळाळी प्राप्त झाली आहे. युगानुयुगे लागलेल्या अंधश्रद्धेच्या ग्रहणाचा तिमिरभेद करून तेजाकडे वाटचाल करता येईल, असा विश्वास वाचकांत निर्माण करण्यात हे पुस्तक मोलाची कामगिरी बजावेल. '
समाजकारण / राजकारणTimiratuni Tejakde | तिमिरातुनी तेजाकडे
₹600.00Original price was: ₹600.00.₹450.00Current price is: ₹450.00. Save ₹150 Add to cart -
Sale! Add to cart'घडणारं असतं पुष्कळ. काही त्यानं अस्वस्थ होणारे. काही त्यावर संतुलित विचार करणारे. काही त्यातून प्रत्यक्ष कृती करणारे. हे पुस्तक या साऱ्या 'काहीं' साठी. गणित म्हणतं, तीन त्रिक नऊ. पण सामाजिक वास्तव म्हणतं, तीन त्रिक दहा होऊ शकतात किंवा आठसुद्धा ! हे ज्यांना उमजलं अशा सर्वांसाठी चिकित्सा करणाऱ्या सर्वांसाठी निष्कर्षाची घाई नसलेल्या सर्वांसाठी आणि मोकळेपणानं प्रसन्न हसता येणाऱ्या प्रत्येकासाठी माणूस, सृष्टी आणि मानवनिर्मित व्यवस्था यांचे परस्परसंबंध आणि सामाजिक मूल्य यांच्याशी झटापट करणारं तीन त्रिक दहा
ललित लेखनTin Trik Daha | तीन त्रिक दहा
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartपन्नास वर्षांहूनही अधिक काळ अडवाणीजी माझे मित्र आणि निकटवर्ती सहकारी राहिले आहेत. राष्ट्रवादावरील अतूट श्रध्देशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही आणि तरीही वेळोवेळी उदभवणा-या परिस्थितीच्या गरजेनुसार राजकीय प्रतिसाद देताना आवश्यक ती लवचीकतासुध्दा त्यांनी दाखवली आहे. माझी अशी खात्री आहे की, देश माझा, मी देशाचा या त्यांच्या पुस्तकाला मोठया संख्येने वाचक मिळतील; कारण त्यात एका संवेदनशील माणसाच्या लक्षवेधी जीवनप्रवासाचे प्रतिबिंब पडले आहे... आणि अशा एका लोकविलक्षण नेत्याचेही की, ज्याच्या कारकिर्दीचा सर्वोत्तम टप्पा माझ्या अपेक्षेप्रमाणे अजूनही यायचा आहे. तो लवकरच यावा, अशी माझी परमेश्वराजवळ प्रार्थना आहे ! - भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी
कोशवाड्मयTisara Dhruva (Himalayadarshan & Everest Mahatmya) | तिसरा ध्रुव (हिमालयदर्शन व एव्हरेस्टमाहात्म्य)
₹325.00Original price was: ₹325.00.₹244.00Current price is: ₹244.00. Save ₹81 Add to cart -
Sale! Add to cartमानवी इतिहासातील समतावादी समाजरचनेचा अट्टाहासाने केलेला असा भव्य, महत्वाकांक्षी आणि क्लेशकारक प्रयोग संपला. पण ज्यासाठी रशियन जनतेने रक्त, घाम आणि अश्रू दिले त्या आदर्शांचे काय ? स्तिमित करून टाकणा-या सोवियेत क्रांतीचा रोमहर्षक, विस्तीर्ण पट...
समाजकारण / राजकारणTisri Kranti | तिसरी क्रांती
₹750.00Original price was: ₹750.00.₹563.00Current price is: ₹563.00. Save ₹187 Add to cart -
Sale! Add to cartपरमीट रूम, बार, हॉटेल ही छंदीफंदी लोकांची भुरळ घालणारी दुनिया. हे एक स्वतंत्र जग असते. तिथे झगमगाट, उच्चभ्रूंचा वावर आणि अय्याशी फेर धरत असते; तर दुसऱ्या बाजूला रोजीरोटीला महाग झालेले गोरगरीब, शोषित, पीडित लोक या दुनियेत स्वत:ला हरप्रकारे जाळून नेस्तनाबूत करत असतात. भारतासारख्या देशातील दोन वर्गांतील दरी पाहायची असेल, तर आपल्या जवळपासचे परमीट रूम, बार, हॉटेल हे एक उत्तम अनुभवक्षेत्र असते. अशा ठिकाणी काम करणाऱ्या कामगाराच्या आयुष्याचा पट रमेश रावळकर यांनी टिश्यू पेपर' या कादंबरीत चित्रित केलेला आहे. शोषितांच्या जगण्याचे भयावह रूप आपल्याला या कादंबरीत वाचावयास मिळते. मराठी साहित्यात अपवादानेच चित्रित होणारे अर्थशास्त्रीय वास्तव प्रकर्षाने वाचकास टोचण्या देऊ लागते. श्रीमंत, गर्भश्रीमंत, उच्चमध्यमवर्ग, मध्यमवर्ग, सामान्य माणूस आणि अतिसामान्यांचे गूढ विश्व हा लेखक टिश्यू पेपर' या कादंबरीत आपल्यासमोर ठेवतो. नाचणारी-गाणारी, पिणारी-पाजणारी, बेहोश होणारी, सांभाळणारी, स्वत:ला गाडून घेऊन पुन्हा उगवणारी आणि दुसऱ्यांना जगवणारी एक जीवनेच्छा इथे प्रवाहित होताना दिसते. भाषेची परिपूर्ण जाण, व्यक्तीच्या अंतर्मनाचा तळ शोधण्याची प्रचंड आकांक्षा यातून या कादंबरीचे अनुभवविश्व वाचकाला श्रीमंत करून जाते. माणूस होण्यासाठी ज्यांना ज्यांना डागण्या देणे गरजेचे आहे; त्या सर्वांना डागण्या देत कधी खोलवर जखम करत ही कादंबरी आपल्याला अस्सल साहित्यकृती वाचल्याचा अनुभव देते. प्रत्यक्ष जगलेले जीवनानुभव साहित्यात जसेच्या तसे ओतून एक जिवंत कलाकृती निर्माण करण्याचा प्रयत्न रमेश रावळकर यांनी टिश्यू पेपर' या कादंबरीत केलेला आहे. वाचक या कलाकृतीचे निश्चितच स्वागत करतील, याची मला खात्री वाटते ! राजन गवस
कादंबरीTissue Paper | टिश्यू पेपर
₹400.00Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00. Save ₹100 Add to cart -
Sale! Add to cart'नवा उद्योग सुरू करणे असो अथवा चालू उद्योग वाढवणे असो, उद्योजकाच्या पुढ्यात ठाकलेले असतात अडचणींचे डोंगर. त्यांच्यावर मात करायची; तर मनात हवा ध्यास, सायासात हवे सातत्य अन् डोक्यात हवी उत्तमाची आस. या ध्येयाने झपाटलेले समविचारी उद्योजक एकत्र आले, तर निर्माण होते एक वैशिष्ट्यपूर्ण चळवळ. ती केवळ आर्थिक यशाची शिखरे गाठत नाही, तर सर्वोत्तमा चे गौरीशंकर नजरेसमोर ठेवते. उद्योगक्षेत्राला नैतिक मूल्यांचा भक्कम पाया पुरवते. सतत उंचावणा-या दर्जाव्दारे उद्योगाची इमारत सुदृढ बनवते. संपूर्ण भारतीय उद्योगक्षितिजाला एक वेगळी झळाळी देण्याची क्षमता असलेल्या या चळवळीचे नाव आहे - टीएलसी. तरुणाईसाठी उद्योजकतेचा नवा मंत्र सांगणा-या या अनोख्या टीएलसी समुदाया ची ओळख करून देणारे टीएलसी - टीचिंग लर्निंग कम्युनिटी '
मार्गदर्शनपरTlc: Teaching Learning Community | टीएलसी : टीचिंग लर्निंग कम्युनिटी
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartकुसुमाग्रज - वि. वा. शिरवाडकर - आपल्यातून गेल्याला दोन वर्षे होतील. ते देहरूपाने अंतरले असले, तरी त्यांच्या साहित्यातून, आठवणींतून ते आपल्यात आहेतच. त्यांच्या साहित्यावर पुष्कळसे लिहिले गेले असले, तरी त्यांच्या समग्र साहित्यावरील चांगल्याशा परिचय-परामर्शात्मक ग्रंथाची उणीव भासतच होती. त्यांचे सलग असे प्रमाण चरित्रही नव्हते. ते काम प्राचार्य डॉ. के. रं. शिरवाडकरांच्या तो प्रवास सुंदर होता या ग्रंथाने केले आहे आणि ही उणीव चांगल्या प्रकाराने दूर केली आहे. केशवराव शिरवाडकर हे तात्यांचे धाकटे बंधू, त्यामुळे ग्रंथाला वैयक्तिक जिव्हाळयाचा ओलावा लाभला आहे आणि अधिकृतताही आली आहे. परंतु केशवराव हे उत्तम समीक्षकही आहेत. त्यामुळे या ग्रंथातील विवेचनात आवश्यक तेवढी अलिप्तता, तटस्थताही आली आहे. आत्मीयता आणि अलिप्तता यांच्या संमीलनाचा हा दुर्मिळ योग आहे. केशवरावांनी आपल्या पुस्तकामध्ये कुसुमाग्रजांच्या जीवनप्रवासाचा बालपणापासून मागोवा घेतला आहे. सामाजिक जाणीव, एकाकीपणा, माणूसवेड, मिस्कीलपणा, कलंदर वृत्ती, संकोची स्वभाव, दूरस्थता, प्रेम, सहिष्णुता अशा विविध आणि पुष्कळ वेळा विरोधीही प्रवृत्तींचा सुंदर गोफ म्हणजे तात्यासाहेबांचे जीवन. त्याचे सुरेख चित्रण आपल्याला तो प्रवास सुंदर होता मध्ये मिळते. या ग्रंथामध्ये कुसुमाग्रजांचे चरित्रकथन आणि साहित्य-परामर्श एकमेकांत इतके मिसळून गेले आहेत की, त्यातून एक इंद्रधनूचा सुंदर गोफ विणला गेला आहे. हा ग्रंथ वाचताना कुसुमाग्रजांचे जीवन आणि साहित्य एकमेळाने उभे राहते आणि एका उदास आनंदाने चित्तवृत्ती भारून जातात. सु. रा. चुनेकर
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेTo Pravas Sundar Hota | तो प्रवास सुंदर होता (कुसुमाग्रज-वि.वा.शिरवाडकर जीवन आणि साहित्य)
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart
">
Skip to content