-
Sale! Add to cart'परमेश्र्वराचा कॉम्प्यूटर हे या पुस्तकाचे शीर्षक वाचल्यानंतर या लिखाणाचा विषय माणूस हाच असावा हा आपला तर्क बरोबर आहे. पृथ्वीवरील सर्व जीवसृष्टीत आपण वेगळे आहोत असे मनुष्याला वाटते, ते त्याच्या सर्वस्पर्शी जाणिवेमुळे. या जाणिवेमुळे माणसाला शब्द सुचला आणि त्याची भावसृष्टी प्रचंड विस्तारली. असे वेगळेपण असले तरी प्रत्येक प्राणिमात्राची शरीराची आसक्ती हा स्थायीभाव पण त्याच्या सोबतीला आहेच. शरीर आणि जाणिव यामुळे सदैव अस्वस्थ असलेल्या माणसाच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात आणि द्वंद्वे उभी राहतात. मनुष्य यातून घडला- आजही असाच घडत आहे. प्रत्येकाच्या मनात उभ्या राहणा-या अशा प्रश्नांचा आणि माणसाच्या घडण्याचा मागोवा परमेश्र्वराचा कॉम्प्यूटर या लिखाणात घेतला आहे. लेखकाला वाटते की स्वत:च्या मनात डोकावण्याचाच हा एक अनुभव आहे. संवाद स्वरूपात मांडलेले हे लिखाण नाटक होते का का चिंतननाट्य ? काही का असेना-आपण वाचा आणि स्वत:च्या मनात डोकावण्याचा प्रत्यय आणि आनंद मिळतो का - तसेच लिखाणाचा शेवट हा माणसाच्या जाणिवेच्या मर्यादाच व्यक्त करितो का- हे सर्व आपणच ठरवा.
नाटक / नाट्यविषयकParmeshwaracha Computer | परमेश्वराचा कॉम्प्यूटर
₹30.00Original price was: ₹30.00.₹23.00Current price is: ₹23.00. Save ₹7 Add to cart -
Sale! Add to cartपर्यावरणरक्षणात पक्ष्यांची भूमिका महत्त्वाची आहे. परिसराच्या सफाई- स्वच्छतेपासून हवामानबदलाचा संदेश देण्यापर्यंत अनेक प्रकारची मदत पक्षी करत असतात. चला, या पुस्तकात अशा वेगवेगळ्या मित्रपक्ष्यांची ओळख करून घेऊया. पर्यावरणाचे रखवालदार
All BooksParyavarnache Rakhvaldar | पर्यावरणाचे रखवालदार
₹35.00Original price was: ₹35.00.₹26.00Current price is: ₹26.00. Save ₹9 Add to cart -
Sale! Add to cartप्रवरा-म्हाळुंगीचा स्वच्छंद तीर, देखणं संगमनेर, मायेचं घर, शालेय जीवन, तारुण्याचे दिवस अशी गोष्ट विवेक गाडगीळ सांगतात आणि तत्कालीन समाज, कुटुंब, गाव यांचा एक मौलिक ऐवज साकारत कथा पुढे जाते... मग एक होतकरू तरुण अभियंता आपल्या नवपरिणीत पत्नीला घेऊन अजस्र बांधकामक्षेत्राच्या नोकरीत पंचमहाभूतांशी नित्य नवी झुंज घेतो. आपल्या अफाट कर्तृत्वाने दक्षिण भारताचा सागरतीर, हिमालयाचे नि:शब्द पहाड, इराकची युद्धभूमी, अग्निभूमी, जीवनमरणाच्या निसरड्या वाटा यात एक चैतन्य फुलवतो. मानवी अस्तित्वाशी सगळे एकेक कडीने जोडतो, जणू जीवन फुलवणारे...
All BooksPashanache Pazar | पाषाणाचे पाझर
₹950.00Original price was: ₹950.00.₹713.00Current price is: ₹713.00. Save ₹237 Add to cart -
Sale! Add to cart'डॉ. अरुण जोशी हे एक नामवंत पशुवैद्य. घरातल्या कुत्र्यामांजरांपासून सर्कशीतल्या हत्तीघोडयांपर्यंत, गोठयातल्या गायीम्हशींपासून रानावनातल्या वाघसिंहांपर्यंत, पिंजऱ्यातल्या पोपटमैनेपासून घरटयातल्या गिधाडघुबडापर्यंत, अजस्र देवमाशापासून खेळकर डॉल्फिनपर्यंत असंख्य पशुपक्ष्यांच्या सहवासात ते वावरले. आयुष्यभर अनेक प्राण्यांची काळजी घेणाऱ्या, देखभाल करणाऱ्या अन् त्यांच्यावर उपचार करणाऱ्या, या प्राण्यांची स्वभाववैशिष्टये बारकाईने निरखणाऱ्या खऱ्याखुऱ्या प्राणिसख्याच्या रंजक आठवणी.
वैद्यकीयPashuvaidyachi Rojnishi | पशुवैद्याची रोजनीशी
₹160.00Original price was: ₹160.00.₹120.00Current price is: ₹120.00. Save ₹40 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read more' पातंजलयोगदर्शन - एक अभ्यास -- विविध संदर्भग्रंथांचा समावेश केल्यामुळे हा अभ्यासग्रंथ अतिशय श्रीमंत झाला आहे. ज्या आनंदापासून तो उमलला आहे, त्या आनंदाचे शिंपण लेखकाच्या शब्दातून होत आहे. आनंद ॠषींची भाषाशैलीही अलंकृत व नितळ आहे. त्यांच्या झरणीतून अनेक वेळा ओशोंचा झरा वाहतो आणि वाचक स्वत:ला विसरून त्यात डुंबायला लागतो. -मा अमृत साधना फीचर संपादक, ओशो टाइअिम्स, पुणे. --आनंद ॠषींनी--विषयाची उकल करताना दुर्बोधता, क्लिष्टता, संस्कृतप्रचुरता टाळून जास्तीत जास्त सुलभ व सोप्या शैलीत विषयाची मांडणी, अनेक उदाहरणांसहित केली आहे.-- हा ग्रंथ वाचनीय, मननीय व चिंतनीय आहे, यात शंका नाही. --योगायार्च श्रीकृष्ण व्यवहारे संपादक, ठाणे -योगतरंग, ठाणे. --डॉ. मिकाओ उसुई यांच्या रेकी या योगोपचार पध्दतीचा पातंजल योगावरच्या ग्रंथात समावेश करणारे आनंद ॠषी हे पहिलेच लेखक असावेत. आनंद ॠषींनी योगशास्त्राबाबत मूलभूत विचार करून, सामाजिक, नैतिक, आध्यात्मिक इत्यादी विविध दृष्टिकोनातून योगसूत्रांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे. ग्रंथ वाचनीय व्हावा याकडे त्यांनी विशेष लक्ष पुरविले आहे. - डॉ. अर्जुनदास बात्रा (निवृत्त) तत्त्वज्ञान - प्राध्यापक पुणे विद्यापीठ. --योगसूत्रांच्या अर्थाच्या सूक्ष्म छटा, अध्याहृत अर्थ उलगडून दाखविण्यात लेखक यशस्वी झाला आहे. लेखकाचा हा सखोल अभ्यास ओशोंच्या अंतर्बोधावर आधारलेला असल्यामुळे, प्रस्तुत युगाच्या संदर्भात तो समकालीन आहे. --स्वामी सत्य वेदांत कुलगुरू, ओशो मण्टिवर्सिटी, पुणे. '
संकीर्णPatanjal Yogdarshan | पातंजल योगदर्शन
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Read more -
Sale! Add to cartगेली सात दशकं मराठी साहित्यविश्वात डौलदार वाटचाल करणारी प्रकाशनसंस्था राजहंस प्रकाशन . गेली चाळीस वर्षं राजहंस चं सुकाणू समर्थपणे सांभाळणारे कप्तान दिलीप माजगावकर. अशा दिलीप माजगावकरांचा विविध नामवंतांशी या ह्रदयीचे त्या ह्रदयी घातले असा चिंतनशील, भावगर्भ पत्रसंवाद : सप्रेम नमस्कार . राजहंस च्या वाटचालीचं विस्तृत सिंहावलोकन करणारी आणि त्या अनुषंगानं महाराष्ट्राच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रपटाचा गेल्या पाऊण शतकाचा मागोवा घेणारी दिलीप माजगावकरांची प्रदीर्घ मुलाखत : प्रवास श्रेयसाकडे . दिगमा या चतुरस्र अन् लोभस व्यक्तिमत्त्वाला न्याहाळणारे त्यांच्या सुह्रदांचे लेख : असे दिसले दिगमा . या सा-याचा अंतर्भाव असलेलं महाराष्ट्राच्या साहित्यिक अन् सांस्कृतिक संचिताच्या इतिहासाचा जणू तुकडा वाटणारं पत्र आणि मैत्र ------------------------------------------------ गेली सात दशकं मराठी साहित्यविश्वात डौलदार वाटचाल करणारी प्रकाशनसंस्था राजहंस प्रकाशन . गेली चाळीस वर्षं राजहंस चं सुकाणू समर्थपणे सांभाळणारे कप्तान दिलीप माजगावकर. दिलीप माजगावकरांनी विविध प्रसंगी प्रकाशनासंबंधी अनुभवसिद्ध मतं मांडली आणि व्यवसायाच्या भवितव्याचा वेध घेतला. त्यांच्या वाणीनं विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्ती आणि साहित्यकृतींचा आस्थेवाईकपणे शोध घेतला. त्यांच्या अशा निवडक रसाळ भाषणांचं संकलन : अवधारिजो जी ! अनेकांच्या लेखनावर प्रकाशझोत टाकणाऱ्या दिलीप माजगावकरांची स्वतःची लेखणीही टोकदार, टवटवीत आणि आशयसंपन्न असल्याचं अधोरेखित होतं ते त्यांनी लिहिलेल्या व्यक्तिचित्रांतून. त्यांनी आंतरिक जिव्हाळ्यानं रेखाटलेली बारा विलक्षण व्यक्तिचित्रं. अंतरीचे उमटे बाहेरी व्यक्तिचित्रं आणि भाषणांतून उलगडलेला महाराष्ट्राच्या साहित्यिक व सांस्कृतिक संचिताचा छोटा पट वाणी आणि लेखणी
All BooksPatra Aani Maitra | पत्र आणि मैत्र
₹500.00Original price was: ₹500.00.₹375.00Current price is: ₹375.00. Save ₹125 Add to cart -
Sale! Add to cartआपल्या आजूबाजूच्या घटनांचा तिरकस लेखणीतून घेतलेला वेध... हे या पत्रापत्रीचं स्वरूप. तात्यासाहेब आणि माधवराव या जोडगोळीच्या साहाय्याने दिलीप प्रभावळकर हा पत्रप्रपंच मांडतात. यात कधी या दोघांचा रशियावारीतला पराक्रम हसवतो; तर कधी आफ्रिकावारीतले उद्योग हसू आणतात. याच पत्रांतून कधी आयपीएलवरचं भाष्य समोर येतं, तर कधी होर्डिंग्जच्या सुळसुळाटासंबंधीचं तिरकस मत.. तात्कालिक घटनांकडे पाहण्याचा प्रभावळकरांचा मिस्कीलपणा आणि या जोडगोळीची धम्माल यासाठी वाचावं असं ...
ललित लेखनPatrapatri | पत्रापत्री
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cart'पाडगांवकरांनी पावसाची इतकी अकल्पित रूपं इथे प्रकट केली आहेत, की पाऊस हा नुसता शब्द त्यांनी लिहिला, की तो गाऊ लागतो आणि त्या एका शब्दाच्या कवितेतला भारलेपणा गाण्याची अन् कवितेची सुरावट अंतर्मनाला ऐकवू लागतो. जगावेसे वाटावे एवढे एकच अखेरचे सत्य : तेवढेच मरणाच्या हातून निसटणारे अंतिम दान... पाडगांवकरांची पावसावरली कविता हे मरणाच्या हातून निसटणारे अमोल अंतिम दान रसिकाला देत आहे... श्रीनिवास विनायक कुलकर्णी
कवितासंग्रहPausgani | पाऊसगाणी
₹125.00Original price was: ₹125.00.₹94.00Current price is: ₹94.00. Save ₹31 Add to cart -
Sale! Add to cartमन पेटारा पेटारा, त्यात असे भरलेला । सुखदुःखे सजलेला सारा आयुष्यपसारा ।। किती भेटले, तुटले आणि कितीक मिटले । नव्या-जुन्या पावलांचा सदा जागता पहारा ।। कधी खुलते दालन, कधी झाकलेला कप्पा । कधी मीच पेटाऱ्यात, कधी माझ्यात पेटारा ।। असा पेटारा खुलता सांडे आतला पसारा । नाही नाही हो कचरा, मनमोराचा पिसारा ।। माझा पसारा भरावा कुणा दुजा पेटाऱ्यात । काळनदीच्या तीराला वाट पाहतो दुसरा ।। आयुष्यात भेटलेली माणसे, सतत वेढून राहिलेला निसर्ग, जणू कुटुंबाचेच घटक वाटावेत असे पशुपक्षी, अनवट जागा तुडवत केलेली भटकंती आणि या साऱ्यांच्या स्मृतींची मनाच्या पुस्तकाच्या पानांमध्ये जपलेली पाने आणि पिसे यातून साकारलेला - वाचकाला भावविभोर करणारा - पेटाऱ्यातला पसारा
ललित लेखनPetaryatala Pasara | पेटाऱ्यातला पसारा
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Sale! Add to cart१९४७ हिंदुस्थानची फाळणी झाली, पाकिस्तानची स्थापना झाली. १९७१ पाकिस्तानची फाळणी झाली. बांगलादेशाचा उदय झाला. अवघ्या पंचवीस वर्षांमध्ये घडलेल्या या दोन्ही उलथापालथी प्रचंड रक्तपातामुळे वादग्रस्त ठरल्या. इतिहासाला निर्णायक कलाटणी देणा-या त्या दोन्ही लक्षवेधी घटनांची मर्मभेदी कारणमीमांसा करणारे विचारवर्तक पुस्तक.
इतिहासPhalanee Te Phalanee | फाळणी ते फाळणी
₹225.00Original price was: ₹225.00.₹169.00Current price is: ₹169.00. Save ₹56 Add to cart
">
Skip to content