इतिहास
-
Sale! Add to cart'श्रीशिवराय VP HRD ? आँ ?? पुस्तकाच्या नावात काही घोटाळा झालाय का ? अजिबात नाही ! शिवाजीमहाराज स्वराज्यसंस्थापक होते, मुत्सद्दी राजकारणी होते, धुरंधर सेनानी होते, चारी दिशांना टपलेल्या शत्रूंना जरबेत ठेवणारे अन् रयतेचे अपत्यवत् पालन करणारे राज्यकर्ते होते. या साऱ्याबरोबरच हा जाणता राजा मानवी संसाधनांची प्रभावी योजना करणारा व्यवस्थापक होता. अष्टप्रधानांपासून शिलेदार-बारगिरांपर्यंत, सरदार-किल्लेदारांपासून चिटणीस-कारकुनांपर्यंत योग्य स्थानावर योग्य व्यक्तीची नेमणूक हे महाराजांच्या योजकत्वाच्या दूरदृष्टीचे वैशिष्ट्य. त्यांच्या या यशस्वी व्यवस्थापनाचा वर्तमानालाही मार्गदर्शक ठरणारा परिचय म्हणजेच श्रीशिवराय VP HRD ? '
इतिहासShrishivray Vp Hrd? | श्रीशिवराय VP HRD?
₹225.00Original price was: ₹225.00.₹169.00Current price is: ₹169.00. Save ₹56 Add to cart -
Sale! Add to cart'तो एक आव्हानात्मक कालखंड होता... परस्परविरोधी तत्त्वप्रणाली अन् द्वंद्वांनी भरलेल्या प्रादेशिक पक्षांचे प्राबल्य, आघाडी सरकार, आक्रमक विरोधी पक्ष या सगळ्यांनी विस्कळीत झालेला कालखंड... त्या काळात लोकसभेचे सभापती होते सोमनाथ चटर्जी. लोकसभा म्हणजे लोकशाहीचा एक महत्त्वपूर्ण आधारस्तंभ. आणि सभापतीपद म्हणजे जणू या लोकसभेचा मानदंडच. हा मानदंड पेलताना सोमनाथ चटर्जींना अनेक अग्निपरीक्षांना सामोरे जावे लागले. सदसद्विवेकाच्या कसाला उतरावे लागले. पक्षांच्या कुंपणांना पार करून विवेकनिष्ठेला साक्षी ठेवून घटनेचे श्रेष्ठत्व जपावे लागले. त्यांच्या काळाचा अन् कर्तृत्वाचा आलेख म्हणजे तत्त्वनिष्ठेची जपणूक
इतिहासTatwanishthatechi Japnuk | तत्त्वनिष्ठेची जपणूक
₹325.00Original price was: ₹325.00.₹244.00Current price is: ₹244.00. Save ₹81 Add to cart -
Sale! Add to cart'सारं काही आलबेल असतानाच सुरु झालेला गोळ्यांचा वर्षाव आणि साक्षात समोर उभा ठाकलेला मृत्यू... त्या दहशतवादी हल्ल्यानं संपूर्ण ताज हॉटेल हादरलं... रक्तरंजित थैमानाला शरण गेलेले लोक, त्यांच्या मदतीच्या आर्त हाका आणि कर्मचा-यांनी सुरु केलेला मदतीचा ओघ... मृत्यूच्या सावटाखाली घालवलेल्या 'त्या' चौदा तासांचा जीवघेणा अनुभव सांगताहेत, 'ताज'चे कर्मचारी अंकुर चावला...
इतिहासTe Chauda Tas (Taj Halla Aatun Anubhavtana) | ते चौदा तास (ताज हल्ला ‘आतून अनुभवताना)
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Sale! Add to cart३१ जुलै, १९२० ची रात्र. घनघोर पावसाचं अघोरी थैमान. दुसरा दिवस उजाडला खरा; पण मुंबईचं क्षितिज काळवंडलेलं, कोंडलेलं. सरदारगृहाच्या अवतीभवती माणसांचे थवे. त्या कुंद वातावरणात नि अलोट गर्दीत आसवांचे शब्द येरझारा घालताहेत. जड पावलांनी. एक युग संपलं. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. स्वातंत्र्यलक्ष्मीचा लाडका फकीर. अलम देशाचा कर्णधार. तेल्यातांबोळ्यांचा कैवारी. ब्रिटिशांचा कर्दनकाळ. असंख्य लोकचळवळींचा सूत्रधार. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. खंदा नि खंबीर नेता. कणखर नि करारी सरसेनानी. सावध नि संवेदनशील संघटक. एक ऑगस्ट, १९२०. एका तपस्येची अखेर. टिळक गेले; पण कळ्यांची फुलं करून. नव्या युगाचं बिगुल वाजवून. टिळकांच्या अखेरच्या वर्षांचा हा समग्र आणि मर्मग्राही आढावा. व्यासंगी पत्रकार अरविंद व्यं. गोखले यांच्या लेखणीतून. मंडालेचा राजबंदी' या ग्रंथानंतर - टिळकपर्व
इतिहासTilakparva | टिळकपर्व
₹500.00Original price was: ₹500.00.₹375.00Current price is: ₹375.00. Save ₹125 Add to cart -
Sale! Add to cart'प्राचीन काळात व्यापारी उद्देशाने सौदागरांचे तांडे देशीविदेशीचा भूगोल पालथा घालत. या तांड्यांबरोबर नट, नर्तक, वैदू, हेर, चोर असे घटकही सोबत जात. क्वचित परक्या भूगोलावर गुन्हेगारी धुडगूस घालत. आजचे भूराजकारण असेच काहीसे आहे. पृथ्वीवरील खनिजसंपत्ती आणि ती वाहून नेण्याचे व्यापारी मार्ग हे फक्त युरोप-अमेरिकेच्या ताब्यात हवेत, ही आजची अटीतटी मोठी आहे. त्यासाठी पाश्चात्त्य सांस्कृतिक संस्था, गुप्तचर यंत्रणा आणि शस्त्रलॉबी हातात हात घालून काम करतात. व्यापारी मार्गांवरील देशांना मांडलिक बनवण्याच्या नादात युद्धाचे वणवे पेटवून देतात. मध्यपूर्वेतील अशा युद्धकहाराची ही गोष्ट! '
इतिहासVavtal Peral Tar Vadalch Ugavel | वावटळ पेराल, तर वादळच उगवेल !
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cart'मराठ्यांच्या इतिहासात युगप्रवर्तक शिवछत्रपतींचा खराखुरा वारसदार शोभणारा अजिंक्य रणधुरंधर म्हणजे दुसरा पेशवा थोरला बाजीराव. ऐन विशीच्या उंबरठ्यावर वडलांच्या मृत्यूमुळे पेशवेपदाची जबाबदारी त्याच्या अंगावर येऊन पडली. त्याच्या क्षमतेबद्दल शंका बाळगणाऱ्या अनेक ज्येष्ठ सरदारांच्या मनांतली असूया आणि द्वेष दूर सारण्यासाठी हवे होते ते लक्षणीय यश बाजीरावाने अवघ्या चार वर्षांतच मिळवले. मराठा सैन्याजवळ प्रचंड तोफखाना नव्हता. तथापि ती उणीव खिजगणतीतही न घेता त्याने वेगवान घोडदळ कल्पकतेने वापरले. रणांगणाची नेमकी निवड करण्यात, भौगोलिक वैशिष्ट्यांचा लष्करी फायदा उठवण्यात आणि कमीत कमी शक्ती वापरून शत्रूला शरण आणण्यात तो कमालीचा यशस्वी होत गेला. ज्याच्या अश्वारोही युद्धनेतृत्वाची फील्डमार्शल माँटगोमेरीसारख्या सुप्रसिद्ध पाश्चिमात्य सेनानीनेसुद्धा गौरवपूर्ण दखल घेतली, तो हा स्वराज्यविस्तारक अजिंक्य वीर ! बाजीरावाच्या वीस वर्षांच्या कारकिर्दीतील विविध मोहिमांचा, त्याच्या अद्वितीय अश्वारोहणकौशल्याचा, अभिजात व्यूहरचनांचा, सरदारांपासून बारगीरांपर्यंत सर्वांनाच बरोबर घेऊन विजय खेचून आणणाऱ्या अलौकिक स्वभाववैशिष्ट्यांचा तपशीलवार वेध घेणारा हा ग्रंथ.'
इतिहासYa Sama Ha | या सम हा
₹460.00Original price was: ₹460.00.₹345.00Current price is: ₹345.00. Save ₹115 Add to cart -
Sale! Add to cartशत्रूच्या सैनिकांना ठार मारण्यासाठी माणसं किंवा बंदुकाच लागतात, असं थोडंच आहे! अदृश्य जीवजंतू किंवा निर्जीव रसायनंसुध्दा त्यासाठी पुरेशी ठरतात, असं विज्ञान सांगतं. आता तर हे तंत्रज्ञान ही फक्त काही देशांचीच मक्तेदारी राहिलेली नसून दहशतवादी संघटनांच्याही आवाक्यात ते तंत्रज्ञान आलंय. आपल्यासारख्या निरपराध नागरिकांसमोर कोणतं मरण केव्हा आणि कसं उभं ठाकेल, काहीही सांगता येत नाही, येणार नाही. त्या महाभयानक संघर्षाची खडानखडा बित्तंबातमी आपल्यासमोर मांडणारं खळबळजनक पुस्तक
इतिहासYuddha Jeevanche | युध्द जिवांचे
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart
">
Skip to content