कथासंग्रह
-
Sale! Add to cartमराठीतील जुन्या नव्या कथाकारांच्या गर्दीत काही नावे आरंभापासूनच वेगळी उमटून पडली, त्यात प्रिया तेंडुलकर हे नाव येते. हा त्यांचा तिसरा कथा-संग्रह. ज्याचा त्याचा प्रश्न, जन्मलेल्या प्रत्येकाला हे आधीचे. सहसा पांढरपेशा वाचकाला न भेटणारे अनुभव, त्यांची थेट व आरपार हाताळणी, कथेतील रौद्र नाटय हेरून ते साक्षात् समोर उभे करण्याचे सामर्थ्य आणि मानवी मनातला हळवा गुंता हळूवार हाताने सोडवून तो नेमका मांडण्याचे कौशल्य ही या कथांची वैशिष्टये. मात्र जीवनाकडे यात स्त्री-जीवन आले - पहाण्याची स्वत:ची एक स्वतंत्र दृष्टी हे या लेखनाचे मोठे वैशिष्टय म्हणावे लागेल. या कथांहून उजव्या कथा मराठीत भेटतील. या कथांहून डाव्या कथांचीही उणीव नाही. मात्र या कथांसारख्या कथा मराठीत फक्त प्रिया तेंडुलकर याच लिहू शकतात म्हणून या कथा-संग्रहाचे महत्त्व.
कथासंग्रहJave Tichya Vansha | जावे तिच्या वंशा
₹225.00Original price was: ₹225.00.₹169.00Current price is: ₹169.00. Save ₹56 Add to cart -
Sale! Add to cartइतरांची आत्मसंतुष्टता अणि अल्पसंतुष्टता लेखकाला भेटू शकत नाही. इतरांसारखे मन:स्वास्थ त्याच्या वाट्याला असत नाही. अज्ञानात सुख असेल, तर लेखक बहुतेक, आयुष्य दु:खात आणि तापात काढतो. प्रिया ही दु:खे शोधत जाते. तिचे आतापर्यंतचे छोटे आयुष्य म्हणजेच दु:खांच्या शोधातला एक प्रयोग किंवा अनेक प्रयोगांची मालिका आहे. शब्द देता येतात. लिहिण्याची हौसही देता येईल. शैली तर दिली घेतली जातच असते. परंतु जगण्याचा आशय देता येत नाही. हा आशय ज्याचा त्याने कमवावा लागतो, तो मिळवण्याची ईर्षा मुळातच असावी लागते. या अर्थाने प्रिया तेंडुलकर हिचे या पुस्तकातील लेखनकर्तृत्व तिचे स्वत:चे, स्व-कमाईचे आहे.
कथासंग्रहJyacha Tyacha Prashna | ज्याचा त्याचा प्रश्न
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Sale! Add to cartवाचनीयता व सुरसपणा हा लिखित मजकूरास अत्यंत आवश्यक असा गुण आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील प्रसिद्ध इंग्लिश नाटककार नोअेल कॉवर्ड म्हणतो ‘वाचकाचा नेहमी विचार करा. त्याला कधी बिचकू नका किंवा तुच्छ लेखू नका. त्याची नस पकडा, त्याला तुमच्या लेखनाच्या मोहात पाडा, त्याची उत्सुकता जागवा, त्याला उत्तेजित करा; गरज पडल्यास धक्का द्या, हसवा, रडवा; पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याला कधीही, कधीही, कधीही कंटाळा येऊ देऊ नका.’
या संग्रहातील कथा वाचकांना वाचनीय आणि सुरस वाटल्या, तर लेखक म्हणून मला समाधान वाटेलच; पण या कथांच्या आशयातून वाचकांना आणखी काही जाणवलं, तर या कथांमधून त्यांच्या अधिक जवळ पोचल्याचा आनंद मला लाभेल.
कथा चाळिशी‘वाचकाचा नेहमी विचार करा. त्याला कधी बिचकू नका िंकवा तुच्छ लेखू नका.
त्याची नस पकडा, त्याला तुमच्या लेखनाच्या मोहात पाडा, त्याची उत्सुकता जागवा,
त्याला उत्तेजित करा; गरज पडल्यास धक्का द्या, हसवा, रडवा;
पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याला कधीही, कधीही, कधीही कंटाळा येऊ देऊ नका.’
प्रसिद्ध इंग्लिश नाटककार नोअेल कॉवर्डजन्म-मृत्यू, व्याधी, दु:ख, स्वार्थ, परमार्थ,
अशी विविध आशयसूत्रं हाताळणार्या -
परिचिताला अपरिचित बनवणार्या
वास्तव अन् फँटसी अशा टोकांमध्ये पूल बांधणार्या
सुरस अन् वाचनीय कथांचा संग्रहकथासंग्रहKatha Chalishee | कथा चाळिशी
₹390.00Original price was: ₹390.00.₹292.00Current price is: ₹292.00. Save ₹98 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreनैतिकता म्हणजे अमुक आणि अनैतिकता म्हणजे तमुक म्हणून अमुकच बरोबर... असं अ ब क म्हणून अ क इतकं साधं समीकरण प्रत्यक्ष आयुष्यात नसतंच कधी ! चांगल्यापासून ते वाईट परिस्थितीपर्यंतच्या आवर्तनांमधले कसोटीचे क्षण पदोपदी नैतिकतेच्या आणि अनैतिकतेच्या मधली सीमारेषा धूसर करीत नेतात. ही मधली धूसर वाटणारी वाट, सुबोध जावडेकर यांच्या सर्व कथा नेमकी पकडतात. कुरुक्षेत्रावर अर्जुनासमोर उभे ठाकले होते, त्यापेक्षा कितीतरी गुंतागुंतीचे प्रश्न आज आपल्यापुढे आहेत. त्यांना सामोरं जावं लागतंय. या प्रश्नांना तोंड देताना सदसद्विवेकबुद्धी जागवणा-या या ख-या गोष्टी. एकीकडे तुमच्या, आमच्या जगण्यातली अगतिकता दाखवताना दुसरीकडे काळ्या ढगांची रुपेरी किनारही तेवढ्याच ताकदीनं अधोरेखित करतात.
कथासंग्रहKurukshetra | कुरुक्षेत्र
₹160.00Original price was: ₹160.00.₹120.00Current price is: ₹120.00. Save ₹40 Read more -
Sale! Add to cartयापुढं कुठं असशील तू? तुला प्रतीकात्मक सांगू का रजत, आपला मुक्काम सोडच, रस्तादेखील ठाऊक नसतो आपल्याला. आपण घर बंद करून जायला निघतो, सारी आवराआवर झालेली असते, काही घ्यायचं विसरलेलं नाही, अशीही जवळपास खात्री असते. कारण जे घेतलेलं नसतं, ते तसंच सोडून द्यायचं असतं. तरीही आपण एक शेवटची म्हणून चक्कर मारतो घरात. आवश्यक असं काही अगदी चुकून नाही ना राहिलेलं ? नजरचुकीनं ? गावा-देशांची, जाति-धर्माची वेस ओलांडून माणसा-माणसांमधल्या नातेसंबंधांचा नेमक्या शब्दांत वेध घेणा-या सानियाच्या दीर्घकथा.
कथासंग्रहOmiyage | ओमियागे
₹160.00Original price was: ₹160.00.₹120.00Current price is: ₹120.00. Save ₹40 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreतिनं पाहिले आहे ! ‘पंचतारांकित’ उपहारगृहातील रंगढंगांपासून रस्त्यावरच्या धुळीत बरबाद होऊन चाललेल्या निष्पाप बालिकेपर्यंतचे सगळे जग... हे जग जसेच्या तसे वाचकांसमोर उभे करणारी, कधी उपरोधिक तर कधी करुणार्द्र, कधी चिंतनशील तर कधी अल्लड हसरी अशी मनोज्ञ लेखनशैली तिच्यापाशी आहे. सत्यशोधकाची तत्त्वचिंतक बैठक बालपणापासूनच साहित्यिक पित्यामुळे तिला लाभली आहे. अन्यायाकरिता झगडणारी ‘रजनी’ तर ती आहेच! पण खरी आहे ती, हे जग सुंदर कधी होईल म्हणून आपले स्वप्नाळू डोळे जगाकडे लावून बसलेली स्वप्नवेडी प्रिया तेंडुलकर...
कथासंग्रहPanchtarankit | पंचतारांकित
₹125.00Original price was: ₹125.00.₹94.00Current price is: ₹94.00. Save ₹31 Read more -
Sale! Add to cartलहानपणी सुट्टीमध्ये जंगलात केलेली भटकंती. नोकरीनिमित्त धरणपरिसरातील विश्रामगृहातील एकांत. अशा रानवाटांवर अन् डोंगरदऱ्यांमध्ये रमताना सुचलेल्या या कथा म्हणजे जणू रानमेवाच. करवंद, जांभळं अन् टणटणीच्या झुडपांना येणारी- सुभग, चिमण्या अन् मुनियासारख्या रानपाखरांसाठी असणारी ही रानमेव्याची फळं म्हणजेच रायमुनिया
कथासंग्रहRaymunia | रायमुनिया
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart -
Sale! Add to cartकेवळ स्त्रियांच्या कथनात्मक साहित्यातच नव्हे, तर समग्र मराठी साहित्यपरंपरेमध्ये ज्यांचे स्थान लक्षणीय ठरते, अशा लेखकांमध्ये सानिया यांचा समावेश होतो. त्यांचे लेखन संख्यात्मक दृष्टीने मोजके असले, तरी ते निश्चितपणे गुणवान व कसदार आहे. आपल्याला भिडलेला, भावलेला अनुभव त्याच्या सूक्ष्म कडा-कंगो-यांसह प्रतीकात्मक भाषेत सानिया आपल्या कथांमधून साकार करतात. बाह्यविश्वातील घटना-घडामोडींपेक्षा माणसांच्या अंतर्मनातील हेलकावे-हालचाली शब्दांकित करणा-या या कथांना एकाच वेळेस समकालीन व सार्वत्रिक परिमाण प्राप्त होते. त्यामुळे आपली निजखूण शोधण्याच्या प्रवासात सानिया यांच्या निवडक कथांचे हे संपादन वाचकाला मोठेच साहाय्य करील, यात शंका नाही.
कथासंग्रहSampadit Saniya | संपादित सानिया
₹400.00Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00. Save ₹100 Add to cart -
Sale! Add to cartसंवेदनशील मनात सतत तरंग उठत असतात - तरंग भावनांचे, तरंग विचारांचे, तरंग कल्पनांचे. एखादी घटना, एखादी व्यक्ती, एखादे निमित्त पाण्यात पडणाऱ्या खड्याप्रमाणे मनात वेगवेगळ्या लाटा निर्माण करते. हे सारे तरंग अन् लाटा इतरांपर्यंतही पोहोचवाव्यात, या उद्देशाने त्यांना शब्दरूप दिले की, त्यातून आकार घेतात छोटेमोठे लेख. प्रगल्भपणे आयुष्याला सामोरे गेलेल्या एका संवेदनशील मनाच्या समंजस स्त्रीच्या लेखणीतून उतरलेले हे लेख म्हणजेच -
All BooksShabdanjali | शब्दांजली
₹175.00Original price was: ₹175.00.₹131.00Current price is: ₹131.00. Save ₹44 Add to cart -
Sale! Add to cartमृणालिनी चितळे यांच्या कथांत आधुनिक मध्यमवर्गीय जीवनातील स्पंदनं उमटलेली आहेत. शाळेत शिकणा-या मुलीपासून ते वृद्धाश्रमात राहणा-या वृद्धेपर्यंतच्या सर्व वयांतील व्यक्ती या कथासृष्टीत वावरतात. तीत माणसामाणसातला संघर्ष आहे. जिव्हाळाही आहे. अबोल ताण आहे. मन:पूर्वक प्रेमही आहे. मित्रमैत्रिणींच्या संवादात स्वत:च्या प्रश्नांना उत्तरं शोधणारी माणसं आहेत. हिमालयाच्या सहवासात स्वत:चं दु:ख विसरू शकणारी माणसंही आहेत. त्यांच्या सुखदु:खांचं मूळ बदलत्या आधुनिक जीवनाच्या आशाआकांक्षांमध्ये आहे. म्हणून या आजच्या काळाचा स्वर खेचून घेणा-या कथा आहेत.
कथासंग्रहSinar | सिनार
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart
">
Skip to content