कादंबरी
-
Out of stock
Out of stock
Sale! Read moreतुला राजकारणात दीर्घ काल टिकून तुझा उत्कर्ष साधावयाचा असेल तर मजप्रमाणे भुई धरून रहाणे शिकावे लागेल. राजकारणात भुई धरून रहाण्यास पर्याय नाही. राजकारण अनेक करतात परंतू कितीही विलंब लागला तरी जो धीर, पुढील नियोजन व प्रयत्न न सोडता व न कंटाळता संधीची वाट पहातो तोच अखेर यशस्वी संधिसाधू व राजकारणी होतो. आयुष्यात काय अथवा राजकारणात काय, कोणतीही संधी सहसा एकदाच येऊन संपत नसते ती परत येण्याची वाट पाहण्याचा पेशन्स संपल्याने आपण संपतो. संधी पुन्हा येते तेव्हा आपण नसतो. तर नगरपालपद मिळवण्याच्या हातघाईस तू आला आहेस व भलतेच काही तरी करीत आहेस, तसे करू नको. तू समजतो आहेस तसा, तू निवडलेला उ.पु. सेनेत जाऊन आपले अस्तित्व नगरास जाणवून देण्याचा शॉर्ट कट म्हणजे जवळचा मार्ग नगरपालपदाकडे जाणारा नसून तो प्रत्यक्ष दंगल न करता दंगलविरोधी कायद्याखाली तुरूंगात पोचणारा आहे. शहाणा राजकारणी सनदशीर राजकारणावर अविचल श्रध्दा बाळगणारा असतो. गरज पडल्यास तो दंगली व कत्तलीही घडवितो परंतू असे काही घडविल्याच्या आरोपातून नामानिराळा रहातो. घडवणारा तो व निषेध करणारा तोच अशी दुहेरी भूमिका जो कल्पकतेने बजावतो, तोच उच्चपदी पोचतो.
कादंबरीKadambari Don | कादंबरी दोन
₹175.00Original price was: ₹175.00.₹131.00Current price is: ₹131.00. Save ₹44 Read more -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreस्त्री-पुरुष संबंधांचा तटस्थपणे वेध घेणारी कादंबरी... स्त्री-पुरुष नात्याचा एवढा धीट व नि:संकोच शोध मराठी कादंबरीत क्वचितच कोणी घेतला असेल. या नात्याची अपरिहार्यता, सनातन गुंतागंत, पुरुषाचा उर्मट, आक्रमक अहंकार व त्यातून स्पष्ट होणारे त्याचे जन्मजात दुबळेपण व अपुरेपण आणि त्याचबरोबर वरवर दुबळ्या व परावलंबी वाटणा-या स्त्रीचे संयत, स्वयंपूर्ण व स्वयंभू असे आंतरिक सामर्थ्य विजय तेंडुलकरांचे वैशिष्टय असे की, तत्त्वचिंतकाची भूमिका न घेताही सरळ, साध्या प्रसंगांच्या मालिकांमधून ते या नर-मादी संबंधातील आदिस्तर कधी हळुवारपणे, तर कधी प्रक्षोभकरीत्या उलगडत जातात. खरे तर ही कहाणी आहे एका चौकोनी कुटुंबाची; किंवा त्या कुटुंबाच्या कुटुंबप्रमुखाची, भूकंपाप्रमाणे गदगदून हलवणा-या त्याच्या वासनामय स्वप्नाची, त्याच्यातील हट्टी पुरुषाची. पण तेंडुलकरांच्या स्पर्शाने ही कहाणी होऊन जाते ती सर्वसर्जनशील अशा आदिम स्त्री-शक्तीची.
कादंबरीKadambari Ek | कादंबरी एक
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Read more -
Sale! Add to cartही कादंबरी वर्तमान राजकारणाच्या वास्तवाला सोलून काढते. स्वातंत्र्योत्तर राजकारण स्वप्नाळू होते, पण विषाक्त नव्हते. विद्यमान राजकारण हे जातीजातींत, धर्माधर्मांत तंटे-बखेडे निर्माण करणारे आणि अराजकतेच्या दिशेने वेगाने जाणारे आहे. त्यामुळे देश अन् समाजाच्या एकसंधतेला तडे जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. असे राजकारण भयावह होण्याची शक्यता बळावते. अभिव्यक्ती अन् मतस्वातंत्र्य नाकारले जाणे, ही हुकूमशाहीच्या पावलांची नांदी असू शकते. राजकुमार बडोले यांनी विद्यमान राजकीय पट सिद्धहस्त लेखकाच्या प्रज्ञेने मांडला आहे. प्रज्ञावंत हा जुलमी व्यवस्थेचा कधीही बटीक नसतो. मानवाच्या मुक्तीचे हुंकार त्याच्या अभिव्यक्तीत असतात. मानवी प्रतिष्ठेची जोपासना ही त्याची अभिलाषा असते. मनुष्याचे स्वयंभूत्व ही त्याची प्रार्थना असते. ही कादंबरी मानवमुक्तीचा गजर करते. राजकुमार बडोले यांनी प्रत्यक्षपणे अनुभवलेले सत्ताकारण आणि सामान्य माणसाला जाणवणारी भारतीय व महाराष्ट्रीय राजकारणाविषयीची संवेदनशून्यता ठसठशीतपणे या कादंबरीतून व्यक्त होते. डॉ. ऋषीकेश कांबळे
All BooksKahoor : Eka Vadalache | काहूर एका वादळाचे
₹280.00Original price was: ₹280.00.₹210.00Current price is: ₹210.00. Save ₹70 Add to cart -
Sale! Add to cartएकोणिसाव्या शतकात कृपाबाई सत्यनादन यांनी इंग्रजी कादंबरी लिहिली, ही घटनाच महत्वपूर्ण. मुंबई इलाख्यातील धर्मांतरित जोडपे हरीपंत आणि राधाबाई. त्यांची कन्या कृपाबाई. विवाहानंतर कृपाबाई मद्रास प्रांतात राहिल्या. बुद्धीचे वरदान लाभलेल्या कृपाबाईंनी प्रकृती अस्वास्थ्याला तोंड देत लेखन केले. मुस्लिम शाळाही काढली. कमला या त्यांच्या पुस्तकरूपाने प्रकाशित झालेल्या पहिल्या कादंबरीचा हा अनुवाद. या कादंबरीत एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रातील कौटुंबिक - सामाजिक वातावरणाचे दर्शन घडते. पारंपारिक चौकटीतून बाहेर पडून नवे भान स्वीकारणारी ही नायिका ! रोहिणी तुकदेव यांच्या रसाळ शैलीमुळे सहज सुंदर झालेला हा भावानुवाद ....
कादंबरीKamala | कमला
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Sale! Add to cartवास्तव, जादुई वास्तव, आणि अतिवास्तवाच्या मिश्रणातून आकाराला आलेलं एक धूसर जग. त्यात आदिम वासना आहेत. भावनांचा कल्लोळ आहे. कथानकात घुसखोरी करणारी अन् त्यातून बाहेर पडणारी पात्रं आहेत. त्यांच्या दोऱ्या कधीकधी आपल्या हातात आहेत, अशा समजात गुरफटलेला लेखक आहे. तरीही या मजकुराबाहेरचा लेखक म्हणतो, 'वरील सर्व मजकूर खोटा आहे. किंबहुना खोटा खोटा आहे. पण खरा वाटावा असा आहे. कारण खोटं हे दुहेरी सत्य असतं.' प्रत्यक्ष अन् कल्पनेच्या अजब सरमिसळीतून साकारलेली अनवट कादंबरी. खोटं खोटं खरं
All BooksKhota Khota Pan Khara | खोटं खोटं पण खरं
₹220.00Original price was: ₹220.00.₹165.00Current price is: ₹165.00. Save ₹55 Add to cart -
Sale! Add to cartविशिष्ट काळातील शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक पर्यावरणाला कवेत घेणारी कोवळे वर्तमान ही कादंबरी केवळ कामाजी कार्लेकर या एका व्यक्तीची गोष्ट नाही. तिच्यातून उमटणारे समूहस्वर समष्टीच्या अंतरंगाची उकल करतात. किंबहुना म्हणूनच अर्जित केलेल्या ज्ञानपरंपरेतून जगण्याचा गवसलेला अर्थ व्यापक पटावरून मांडण्याचा हा धाडसी बाणा तुकोबांच्या दंभावर प्रहार करणाऱ्या फटकळ वृत्तीशी अनुबंध प्रस्थापित करतो. जातवास्तवाचे अंत:स्तर व प्रसंगी उफाळून येणाऱ्या त्यातील असंख्य चिवट गोष्टींची उकल समाजशास्त्रीय दृष्टीने करण्याची प्रभावी क्षमता श्रीकांत देशमुख यांच्या या कादंबरीतून प्रकटते. कोरडवाहू शेतकऱ्यांच्या कुळातील शिकणाऱ्या नव्या पिढीच्या नजरेतून ढासळत गेलेल्या शिक्षणक्षेत्राचे आणि तिथून प्रसवणाऱ्या नकली व बेगडी विचारांचे दयनीय चित्र कथानकातील चर्चा संवादातून आकार घेत जाते. समाजनिरीक्षणाचे बारकावे टिपत उपरोध, तिरकसपणा, मिस्कीलपणा यांच्यासह कथानकाचा विस्तार करणारी कथनशैली ही श्रीकांत देशमुख यांच्या लेखनाची खास वैशिष्ट्ये. श्री. व्यं. केतकर ते भालचंद्र नेमाडे या दोन अक्षांमधील समाजशास्त्रीय चिकित्सेच्या पटाशी नाते जोडणारी ही कादंबरी एक प्रभावी चिंतनशील संभाषित आहे. भिन्न विचारांचे आणि भिन्न विचारसरणींचे उभे-आडवे ताण समाजातील हरवलेल्या चेहऱ्यांच्या नाना व्यक्तींच्या बोलण्यातून सलगपणे उमटत जातात. परिणामी या कादंबरीची रचना एका दीर्घ स्वगतासारखी होत जाते. निरंतर चिंतनाच्या परिपाकातून या स्वगताला स्वत:चा आणि समूहचिंतनाचाही आकृतिबंध सापडलेला दिसतो. सतीश बडवे.
कादंबरीKovale Vartaman | कोवळे वर्तमान
₹500.00Original price was: ₹500.00.₹375.00Current price is: ₹375.00. Save ₹125 Add to cart -
Sale! Add to cartया पुस्तकात लंडननिवासी लेखक अरविंद रे लंडनचा एक वेगळाच, लपलेला कोपरा आपल्याला दाखवतात. इथं आहेत भारत, पाकिस्तान, पोलंड, ग्रीस, इस्टोनिया, इटली, बल्गेरिया, आफ्रिका अशा देशांतून लंडनमध्ये स्थलांतरित झालेली माणसं. मुकुंद दीक्षित या समंजस, सहृदयी इंग्रजी शिक्षकाच्या वर्गात ती माणसं दाखल होतात आणि आपल्यासमोर लंडन जीवनशैलीचे एकेक अनोखे पदर उलगडू लागतात. रक्तात भिनलेले स्वत:च्या मातीतले संस्कार विसरू शकतात का ही माणसं? वेळ आणि पैसा' ही ब्रिटिश संस्कृती कितपत आत्मसात करू शकतात ही माणसं? लंडनमध्ये स्थायिक होण्यासाठी राबराब राबणं.... पासपोर्ट्स जाळणं.... कागदी लग्न जुळवणं.... काय काय वाटा पळवाटा शोधतात ही माणसं ! लंडनमधील खाजगी इंग्रजी शाळा, त्यांचे लबाड संस्थाचालक ! शेअरींग हाऊसमध्ये दाटीवाटीनं राहणारे टेनंट्स, त्यांच्या व्यथा आणि कथा ! अरविंद रे ही सारी पात्रं, प्रसंग इतक्या चित्रमय, संवेदनशील, खेळकर शैलीत मांडतात की, हे पुस्तक उघडल्यावर पूर्ण केल्याशिवाय मिटणं अशक्य ! अ-निवासी भारतीयाची आपल्याला अंतर्मुख करणारी कहाणी.
All BooksLaplela London | लपलेलं लंडन
₹480.00Original price was: ₹480.00.₹360.00Current price is: ₹360.00. Save ₹120 Add to cart -
Sale! Add to cart'परेल-लालबागच्या गगनचुंबी टॉवरबनाखाली गाडलेल्या लाखो श्रमिकांचे हुंदके अन् उसासे... संपाच्या सुलतानीनं गिरणगावाला प्रथम चिरडलं, पाठोपाठ जागतिकीकरणाचा भूलभुलैय्या दाखवून गिरणबाबूंची हाडं नि फासोळया उखडल्या. चोरांची आणि थोरांचीही स्वप्नं एकजीव झाली. मुंबईत अंडरवर्ल्ड आणि ओव्हरवर्ल्डच्या सटिंगनं नंगा नाच ओढवला. शांघाय-सिंगापूरचं कुक्कू लावून चौदा हजार कोटी रुपयांच्या एफएसआयचा बाजार गरम केला गेला ! तुमच्या-आमच्या डोळयांसमोर लुटल्या गेलेल्या लाखो श्रमिकांच्या सार्वत्रिक फसवणुकीची एक काटेरी ठणकती महागाथा...
कादंबरीLust For Lalbag | लस्ट फॉर लालबाग
₹800.00Original price was: ₹800.00.₹600.00Current price is: ₹600.00. Save ₹200 Add to cart -
Sale! Add to cart'परेल-लालबागच्या गगनचुंबी टॉवरबनाखाली गाडलेल्या लाखो श्रमिकांचे हुंदके अन् उसासे... संपाच्या सुलतानीनं गिरणगावाला प्रथम चिरडलं, पाठोपाठ जागतिकीकरणाचा भूलभुलैय्या दाखवून गिरणबाबूंची हाडं नि फासोळया उखडल्या. चोरांची आणि थोरांचीही स्वप्नं एकजीव झाली. मुंबईत अंडरवर्ल्ड आणि ओव्हरवर्ल्डच्या सटिंगनं नंगा नाच ओढवला. शांघाय-सिंगापूरचं कुक्कू लावून चौदा हजार कोटी रुपयांच्या एफएसआयचा बाजार गरम केला गेला ! तुमच्या-आमच्या डोळयांसमोर लुटल्या गेलेल्या लाखो श्रमिकांच्या सार्वत्रिक फसवणुकीची एक काटेरी ठणकती महागाथा...
All BooksLust For Mumbai | लस्ट फॉर मुंबई
₹850.00Original price was: ₹850.00.₹638.00Current price is: ₹638.00. Save ₹212 Add to cart -
Sale! Add to cartअडीच हजार वर्षांपूर्वी या भूतलावर एक महापुरुष जन्मला. प्रज्ञा अन् परिश्रम यांच्या संगमातून त्याने सम्यक ज्ञानाची प्राप्ती केली. अखिल विश्वासाठी तो वंदनीय झाला. सिद्धार्थ गौतमाचा बुद्ध' बनला. मानवी आयुष्यातील दु:खाचा परिहार करण्यासाठी बुद्धाने चार आर्यसत्ये, अष्टांगमार्ग, प्रतीत्यसमुत्पाद यांच्या आधारे धम्मतत्त्वांचा प्रसार केला. ज्ञान, करुणा, दया, अहिंसा, शांती यांचा संदेश देणारा दीप प्रत्येकाने अंतर्मनात लावावा, ही शिकवण साऱ्या मानवजातीसाठी सांगितली. आज अडीच हजार वर्षांनंतरही बुद्धविचारांचा नंदादीप तेजाने तेवतोच आहे. राजपुत्र सिद्धार्थ ते तथागत बुद्ध या जीवनप्रवाहाचा मागोवा घेणारे - आजच्या अस्थिर, अनिश्चित परिस्थितीत; व्यक्तिगत अन् सामूहिक जीवनसंघर्षात अढळ ध्रुवासारखे मार्ग दाखवणारे चरित्र.
All BooksMahakarunik | महाकारुणिक
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart
">
Skip to content