- You cannot add "...Aani Mi | ... आणि मी" to the cart because the product is out of stock.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रे
-
Out of stock
Out of stock
Sale! Read more'सिनेमानाटकांच्या श्रेयनामावलींमध्ये सर्वांत ठळक अभिनेता- अभिनेत्रींचं नाव आणि अमुकतमुक असं म्हणून यादीच्या शेवटी छापण्याची पध्दत आहे. पण आपापल्या छोटया, सामान्य आयुष्यापुरते सर्वांत महत्त्वाचे असतो ते आपले आपणच. सतत वेगवेगळे अनुभव घेणारे! वेगवेगळी माणसं-कलावंत-संस्था-यंत्रणा ह्यांना सामोरे जाणारे ! त्यांच्याकडून कधी प्रोत्साहित, तर कधी नाउमेद होणारे ! आणि त्यातूनही प्रत्येक नवा दिवस हिरीरीने जगणारे ! संवेदनाक्षम मनानं, ललितरम्य शैलीमध्ये यातलीच काही संस्मरणं टिपली तर... तर साकार होतो ...आणि मी सारखा लेखसंग्रह. एकीकडे व्यक्तिगत अनुभव टिपणारं आणि दुसरीकडे त्याची सामाजिक परिमाणंही दाखवणारं !'
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रे…Aani Mi | … आणि मी
₹240.00Original price was: ₹240.00.₹180.00Current price is: ₹180.00. Save ₹60 Read more -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreविख्यात अणुशास्त्रज्ञ, स्वदेशी बनावटीच्या भारतीय क्षेपणास्त्रांचे शिल्पकार, डी.आर.डी.ओ.चे संचालक या नात्याने जनसामान्यांना सुपरिचित असणारे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आता भारताचे राष्ट्रपती झाले आहेत. त्यांच्याबाबत, त्यांच्या कार्याबाबत त्यांच्या लोकप्रियतेला साजेसे विपुल लेखन झाले असले तरीही त्यांच्या व्यक्तिमत्वाचे काही पैलू पुरेसे प्रकाशात आलेले नाहीत. एक मनस्वी, वृक्षप्रेमी पर्यावरणवादी...जिवाभावाचे सख्य जोडणारा एक वडीलधारा... ज्याचे जे श्रेय ते त्याला जाहीरपणे देऊ करणारा दिलदार संघनायक... आपद्ग्रस्तांच्या मदतीला धावून जाताना नोकरशाहीची कुंपणे ओलांडणारा मानवतावादी... कार्यासक्ती हा आपला गुण इतरांच्याही अंगी बाणावा यासाठी धडपडणारा एक हाडाचा शिक्षक...अशा विविध पैलूंवर त्यांच्या निकटवर्तीयांनी आठवणींच्या रूपाने टाकलेला हा प्रकाशझोत. डॉ. कलामांचे व्यक्तिमत्व त्यामुळे अधिकच झळाळून उठले, तर आश्चर्य वाटायला नको. इस्त्रोमधल्या त्यांच्याच एका जिवलग मित्राने डॉ. कलामाच्या व्यक्तिमत्वाचा घेतलेला वेध त्यांच्याबद्दलच्या आदरभावात भर घालतो, हेच त्याचे वैशिष्ट आहे.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेA.P.J Abdul Kalam Ek Vyaktivedh | ए.पी.जे. अब्दुल कलाम एक व्यक्तिवेध
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Read more -
Sale! Add to cartते फक्त धर्मप्रसारासाठी आलेले मिशनरी नव्हते. अन् रूढार्थानं त्यांचा धर्मही चर्चच्या चार भिंतीत बंदिस्त नव्हता. म्हणूनच भारतात आल्यावर ते भारताचे बनले. भारतीय लिपींमधून मुद्रण करण्यासाठी त्यांनी त्या त्या लिपीचे खिळे बनवले. रामायण, सांख्य तत्त्वज्ञान अन् अनेक संस्कृत ग्रंथांचं इंग्रजीत भाषांतर केलं. सतीबंदीचा कायदा करण्यासाठी पुढाकार घेतला. मातृभाषेतून शिक्षण देण्याच्या तत्त्वाचा पुरस्कार केला, त्यासाठी बंगाली भाषेतून शिक्षण देणारं कॉलेज काढलं. आणि हे सारं करता करता भारतही त्यांच्यात भिनला. त्यांनी भारतावर अन् भारतानं त्यांच्यावर ठसा उमटवला. त्यांच्या कर्तृत्वाचं, भारतप्रेमाचं सुंदर प्रतीक म्हणजे भारतीय टपालखात्यानं त्यांच्या जन्मदिनीची व्दिशताब्दी साजरी करताना काढलेलं विशेष तिकीट. इथल्या मातीत रूजलेल्या, इथल्या जानपदात रमलेल्या पण वर्तमानाला फारशी ओळख नसलेल्या एका कर्तृत्ववान महामानवाची प्रेरक चरितकहाणी -
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेAase Hote William Carry | असे होते विल्यम कॅरी
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartपं. जितेंद्र अभिषेकी. शिष्य, मैफलगायक, संगीतकार आणि गुरू ही त्यांची संगीतविश्वातील चार रूपं. स्वत:च स्वत:च्या तत्त्वांशी, ध्येयांशी, उद्दिष्टांशी स्पर्धा करत पराकोटीच्या तन्मयतेनं एकाच वेळी साकारलेल्या या चार भूमिका! त्यात आपण अव्वलच असलं पाहिजे, ही त्यांची आंतरिक उर्मी! त्यामुळे असेल, आपल्या प्रत्येक भूमिकेत वेगळं काही करण्याचा अट्टाहास त्यांनी केला नाही; पण आपोआप खूप काही वेगळं घडत गेलं. त्याविषयी संगीतवर्तुळात कौतुक होतं, कुतूहल होतं. पं. जसराजजी म्हणत असत, उस शिष्य का क्या कहना कि जिनके गाने पे उनके गुरुही हजार जान से फिदा हों।' तर पं. भीमसेन जोशींचा अनुभव होता, पं. जितेंद्र अभिषेकी हे रसिकांची मागणी असलेले कलाकार आहेत. त्यांच्याविषयी रसिकांच्या मनात एक वेगळं आकर्षण आहे.' ज्येष्ठ गायक-संगीतकार सुधीर फडके यांना बुवांच्या चालींमध्ये त्यांचं प्रतिभासंपन्न समृद्ध व्यक्तिमत्त्व दिसत असे, मीच काय, अनेक कीर्तिवंत संगीतकारांनी अभ्यास करावा, अशा त्यांच्या नाट्यसंगीतरचना आहेत.' ज्येष्ठ गायिका-अभिनेत्री ज्योत्स्नाबाई भोळे यांनी आपल्या गोव्याच्या गंपूची जडणघडण, त्याचा उत्कर्ष जवळून पाहिला होता. बुवांना गंपू म्हण-यांपैकी ज्योत्स्नाबाई एक होत्या. खूप मोठी शिष्यपरंपरा एका विशिष्ट पद्धतीनं निर्माण करण्याचं फार मोठं श्रेय जितेंद्रला आहे.' अशा या प्रतिभावान, चतुरस्र कलाकाराच्या व्यक्तिमत्त्वाचा अन् संगीतकर्तृत्वाचा वेध घेणारा चरित्रग्रंथ.
All BooksAbhishekee :Pandit Jitendra Abhisheki | अभिषेकी
₹500.00Original price was: ₹500.00.₹375.00Current price is: ₹375.00. Save ₹125 Add to cart -
Sale! Add to cart'एसीएन नंबियार... भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातले हे एक महत्त्वाचे, पण फारसे कुणाला माहीत नसणारे व्यक्तिमत्त्व ! इंडियन इंडिपेंडन्स लीगची युरोपातील तटबंदी सांभाळण्याची जबाबदारी सुभाषबाबूंनी ज्यांच्यावर सोपवली, ते एसीएन नंबियार... १९४७ पूर्वी आणि नंतरही पंडित जवाहरलाल नेहरूंचे जे विश्वासू, राजनैतिक सल्लागार होते, ते एसीएन नंबियार... एखाद्या वडीलधाऱ्या कुटुंबीयाप्रमाणे इंदिरा गांधी ज्या नानूंची काळजी घेत, त्यांना छोटीमोठी पत्रे पाठवत, ते एसीएन नंबियार... आजवर फारशा प्रकाशझोतात न आलेल्या एका गूढ व्यक्तिमत्त्वाचा परिचय घडवणारे आगळे पुस्तक.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेAcn Numbiyar | एसीएन नंबियार
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read more'बेळगावसारख्या छोटया गावातला हुशार पण हूड मुलगा ते भारतीय नौसेनेचे सरसेनापती - सरखेल! आपल्या नेतृत्वगुणांच्या बळावर हे शिखर गाठणारा मराठी दर्यासारंग. आजच्या तरुणाईच्या महत्त्वाकांक्षेला, कर्तृत्वाला वाव देणारे अथांग क्षेत्र म्हणजे सेनादलातील सहभाग. या सहभागासाठी आवाहन करणारे प्रेरणादायी चरित्र ॲडमिरल भास्कर सोमण नौसेनेचे सरखेल'
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेAdmiral Bhaskar Soman-Nouseneche Sarkhel | अॅडमिरल भास्कर सोमण- नौसेनेचे सरखेल
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Read more -
Sale! Add to cartस्वामी विवेकानंदांचे नाव आणि ढोबळमानाने त्यांचे चरित्र आपल्याला माहीत असते; पण संन्यास घेतल्यानंतरही स्वामीजींनी संवेदनशीलता जपली होती, जन्मदात्या आईसाठी कौटुंबिक भाऊबंदकीत लक्ष घालणे त्यांना भाग पडले होते, अगदी कोर्टकचे-याही कराव्या लागल्या होत्या... हा असा तपशील मात्र आपल्याला ठाऊक नसतो. त्यांच्या चरित्रातील अशा अज्ञात पैलूंवर प्रकाशझोत टाकणारे हे पुस्तक. स्वामीजींचे पाककौशल्य, त्यांच्या खानपानातल्या आवडीनिवडी, त्यांनी परदेशांत वेदांताप्रमाणेच बिर्याणीचाही केलेला प्रसार, त्यांचे चहावरचे कमालीचे प्रेम, त्यांना जडलेले त-हेत-हेचे आजार आणि त्यांच्या आरोग्यामध्ये सतत होत राहिलेले चढउतार, पशुपक्ष्यांबद्दलचे त्यांचे प्रेम, आपला अंतकाळ जवळ आल्याची जाणीव झाल्यावर त्यांनी केलेली कौटुंबिक निरवानिरव, त्यांनी सतत जवळ बाळगलेली गंगाजलाची कुपी... आणि सर्वांनाच चटका लावून गेलेले त्यांचे महानिर्वाण... हे आणि असे असंख्य अज्ञात पैलू उजेडात यावेत, या हेतूने 'शंकर' या टोपणनावाने प्रसिध्द असणा-या बंगाली साहित्यिकांनी विवेकानंदविषयक देशीविदेशी साहित्याचा धांडोळा घेऊन तयार केलेले हे पुस्तक बंगालमध्ये विक्रमी लोकप्रियता कमावणारे ठरले. आता ते थेट बंगालीतून मराठीत अवतरले आहे.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेAdnyat Vivekanand | अज्ञात विवेकानंद
₹275.00Original price was: ₹275.00.₹206.00Current price is: ₹206.00. Save ₹69 Add to cart -
Sale! Add to cartएका हातात पिस्तुलाची जळती आग दुस-या हातात स्फोटक निखारा. वेदनांच्या अन् यातनांच्या, जळत्या लाव्हातून हे अग्निपुत्र सशस्त्र क्रांतीची वाट चालले. भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी सर्वस्व अर्पण केल. अवघ्या अडीच वर्षांत ब्रिटीश साम्राज्याला विजचा तडाखा देणा-या हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचा तेजस्वी इतिहास.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेAganiputra | अग्निपुत्र
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Sale! Add to cart'तामिळनाडूमधील रामेश्वरम या छोटया धर्मक्षेत्री एका अशिक्षित नावाडयाच्या पोटी 1931मध्ये जन्मलेला हा मुलगा म्हणजेच देशातील भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणारे आजचे डॉ. ए पी जे अब्दुल कलाम. या आत्मचरित्रात त्यांनी एका बाजूने आपल्या आयुष्यातील व्यक्तिगत आणि व्यावसायिक संघर्ष चितारतानाच दुस-या बाजूला अग्नी, आकाश, पृथ्वी, त्रिशूल, नाग या घरोघरी पोहोचलेल्या नावांच्या क्षेपणास्त्रांची जडणघडणही फार सुंदरपणे वाचकांना सांगितलेली आहे. हे पुस्तक केवळ डॉ. अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र नसून स्वतंत्र भारताच्या तंत्रज्ञानविषयक लढाईचे एक स्पंदन आहे. जागतिक शस्त्रस्पर्धेच्या राजकारणाची आणि विज्ञानाची ती कहाणी आहे; तसेच स्वयंपूर्ण होण्यासाठी आपल्या देशाने केलेल्या संघर्षाचे ते मनोहारी खंडकाव्यही आहे.'
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेAgnipankh | अग्निपंख
₹395.00Original price was: ₹395.00.₹296.00Current price is: ₹296.00. Save ₹99 Add to cart -
Sale! Add to cart'ब्रेकिंग न्यूजच्या वेडयापिश्या घाईपूर्वीचे मराठी पत्रकारितेचे संथ पण विश्वासार्ह जग. या जगात अठ्ठेचाळीस उन्हाळे-पावसाळे पाहिलेल्या, वादळवारे साहसाने अंगावर घेतलेल्या, यशाचे मान-सन्मान आणि अपयशाचे तडाखे सोसलेल्या एका पत्रकार-संपादकाच्या जिंदादिल मुशाफिरीची ही रसाळ, व्यावसायिक आत्मकथा.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेAivaj | ऐवज
₹225.00Original price was: ₹225.00.₹169.00Current price is: ₹169.00. Save ₹56 Add to cart
">
Skip to content