चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रे
-
Sale! Add to cartती जन्माला आली. मरता-मरता वाचली. मग तिचं एक-एक व्यंग कळत गेलं. त्यातलं सर्वात मोठं-दृष्टीहीनता. मग सुरू झाल्या अडचणींच्या डोंगरामधल्या अंधारवाटा ! ना ती डगमगली. ना तिचे आई-वडील-बहीण हरले. डोळ्यांना पट्टी बांधून जिद्दीनं संसार करणा-या गांधारीइतकंच तिचं काळोखं विश्व समजावून घेणारी खंबीर आई. आणि तिच्या अथक साथीनं मनश्रीनं घेतलेली उत्तुंग भरारी -
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेManashree | मनश्री
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रे
Manatalya Bhavkala | मनातल्या भावकळ्या
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Sale! Add to cart'नेल्सन मंडेला म्हणजे दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदाचा शेवट. नेल्सन मंडेला म्हणजे प्रदीर्घ कारावासानंतरही सतेज राहिलेली दुर्दम्य ध्येयनिष्ठा. नेल्सन मंडेला म्हणजे सा-या मानवजातीसाठी, साऱ्या जगासाठी प्रकाशाची दिशा दाखवणारा महान दीपस्तंभ. इतिहासाच्या अर्धशतकाच्या पानावर आपली अमिट मुद्रा उमटवणा-या या महामानवाचे प्रेरणादायी चरित्र
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेMandela | मंडेला
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartही आहे एका कर्तबगार पत्रकार स्त्रीची खरीखुरी जीवनकथा. सबिता गोस्वामी यांची आत्मकथा, दुभंगलेल्या व्यक्तिमत्त्वाचा पती, पदरात दोन छोटया मुली, दुरावलेलं माहेर अन् दुखावणारं सासर. अस्तित्वाच्या झगडयासाठी कुटुंबाला सावरण्यासाठी ही एकटी बाई कणखरपणे उभी राहिली, पत्रकारितेच्या क्षेत्रात उतरली. त्यावेळी सभोवतीचा आसाम पेटलेला होता. आंदोलनं, उल्फा अन् गणपरिषदेच्या चळवळी, दहशतवाद्यांच्या हिंसक कारवाया यांच्या ज्वाला भोवती धडधडत होत्या. हा सारा वणवा, त्याचं विवेचन, त्याचे संभाव्य परिणाम यासंबंधी बीबीसी, ब्लिट्झ, द वीक अशा नामवंत वृत्तसंस्थांसाठी सबिता गोस्वामींनी केलेलं लिखाण म्हणजे आसामची चार दशकांची बखरच. समस्यांनी भरलेलं व्यक्तिगत आयुष्य आणि राजकीय, सामाजिक उलथापालथींनी भरलेला आसाम यांच्या दुहेरी पेडांनी विणलेली आत्मकथा.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेMangangechya Kathavar | मनगंगेच्या काठावर
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Sale! Add to cartमाणिक वर्मा' असे नाव उच्चारले की, कानामनात रुणझुणू लागतात असंख्य भावगीते, भक्तिगीते अन् नाट्यगीते. शास्त्रीय संगीतातही आपले वेगळे वैशिष्ट्यपूर्ण स्थान त्यांनी निर्माण केले होते. संगीतक्षेत्रात त्यांनी जशी लखलखती कारकीर्द साकारली, तसाच स्वतंत्र ठसा वर्मा कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने आपापल्या कार्यक्षेत्रात उमटवला. माणिकताईंचे पती अमर वर्मा हिंदी आणि उर्दूचे ख्यातकीर्त शायर. दोन कन्या - भारती आचरेकर अन् वंदना गुप्ते सुप्रसिद्ध अभिनेत्री, तर तिसरी कन्या राणी वर्मा नामवंत गायिका. चौथी कन्या अरुणा जयप्रकाश नामांकित फिजिओथेरपिस्ट. संपूर्ण वर्मा परिवार म्हणजे जणू विविध कलाक्षेत्रांमध्ये लाखो रसिकांच्या हृदयात अढळ स्थान मिळवणारी अनमोल रत्ने. माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त या समग्र परिवाराच्या कलाकर्तृत्वाचा वेध घेणार् या स्मृतिचित्रांचा वेधक शब्दपट -
All BooksManik Moti – Mani Varma Ani Parivar | माणिक मोती
₹450.00Original price was: ₹450.00.₹338.00Current price is: ₹338.00. Save ₹112 Add to cart -
Sale! Add to cartहे लखलखतं माणिक...मराठीत प्रथमच सगळंच भव्य-दिव्य आणि चमत्कारिक ! साता-यातल्या ताम्हणखो-यातली शिलेदार मंडळी गायकवाडांबरोबर बडोद्याला आली. त्यांनी तलवार गाजवली. म्हणून समस्त ताम्हाणे माणिक ह्या किताबानं गौरविले गेले. त्यातला एक कुलदिपक : गजानन यशवंत माणिक. ह्या मल्लविद्याविशारदाला बडोदेकर संस्थानिकांनी सांभाळलं. माणिकनं संस्थानात ऐतिहासिक शस्त्रागार निर्माण केलं. गुरू जुम्मादादांच्या स्मरणार्थ जुम्मादादा व्यायाम मंदिर स्थापन करून ते भरभराटीला आणलं. हकीम अब्दुल रहीमकडून युनानी वैद्यक आत्मसात केलं. अस्थिसंधान विद्या संपादन करून अनेकांना व्याधिमुक्त केलं. म.गांधींना शरीरमर्दनाची दीक्षा दिली. प्रतापशस्त्रागार हा त्या क्षेत्रातला पहिला ग्रंथ रचला. अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण मंडळ कार्यरत केलं. कुस्तीगीर तयार केले. मलखांब- पथकं उभारली. गायकवाडीला ललामभूत झालेलं हे लखलखतं माणिक , म्हणजेच लो.टिळकांनी गौरविलेले प्रोफेसर माणिकराव. त्यांचा हा शैलीसंपन्न परिचय मराठीत प्रथमच...
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेManikravanchi Charitrakatha | माणिकरावांची चरित्रकथा
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartमार्क इंग्लिस या माणसानं हिमदंशामुळे आपले दोन्ही पाय गमावले, त्यानंतर तब्बल चोवीस वर्षांनंतर दोन कृत्रिम पाय लावून तो एव्हरेस्ट शिखरावर चढला ! ही आहे मानवाच्या जिद्दीची आणि दुर्दम्य इच्छाशक्तीची एक प्रेरणादायी साहसकथा...
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेMark Englis | मार्क इंग्लिस
₹240.00Original price was: ₹240.00.₹180.00Current price is: ₹180.00. Save ₹60 Add to cart -
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रे
Marmadya : Doc Ashok Da Ranade Gaurav Granth | मर्मज्ञ’: डॉ.अशोक दा. रानडे गौरव ग्रंथ
₹400.00Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00. Save ₹100 Read more -
Sale! Add to cartखानदेशातील एक छोटेसे खेडे - दुसाणे. या खेड्यात जन्मलेला मुलगा - नागराज. आईबाप अशिक्षित. वडील सालदारकी करणारे. घरची परिस्थिती यथातथाच. नागराजच्या डोळ्यापुढे आदर्श होता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा. त्यांच्या जीवनचरित्रातून अन् कर्तृत्वातून स्फूर्ती घेलेल्या नागराजने सगळ्या हालअपेष्टा सोसल्या, पण शिक्षणाची कास नाही सोडली. शैक्षणिक पात्रता अन् परिस्थितीवर मात करण्याची जिद्द यांच्या जोरावर त्याने प्रशासकीय पद मिळवले. आपल्या कर्तृत्वाने आणि महत्त्वाकांक्षेने कारकिर्दीत जोमदार प्रगती केली. आजही सेवानिवृत्तीनंतर नागराज समाजकारणात आणि राजकारणात कार्यरत आहेत. गांजणा-या परिस्थितीवर मात करून जीवन यशस्वी करण्याची आकांक्षा बाळगना-या प्रत्येकाला प्रेरणा देणारे आत्मकथन.
All BooksMaza Ladha | माझा लढा
₹290.00Original price was: ₹290.00.₹218.00Current price is: ₹218.00. Save ₹72 Add to cart -
Sale! Add to cartदक्षिणगंगा गोदावरीच्या काठी वसलेलं, वाढलेलं नाशिक शहर. पुराणकाळात मुळं रूजलेली. इतिहासाच्या अवकाशात फांद्या फैलावलेल्या. आधुनिकतेच्या मोहोराचे धुमारे शाखेशाखेवर लगडलेलं प्राचीन तीर्थस्थळ ते आधुनिक सांस्कृतिक-औद्योगिक नगरी. नाशिक शहराच्या या वाटचालीचा एका पक्क्या नाशिककरानं रेखलेला हा ह्रदयंगम आलेख...
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेMaza Nashik | माझं नाशिक
₹120.00Original price was: ₹120.00.₹90.00Current price is: ₹90.00. Save ₹30 Add to cart
">
Skip to content
