चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रे
-
Sale! Add to cart'अग्रगण्य युरोपियन डिझायनर्सच्या बरोबरीनं काम केलेला, मिलान (इटली)च्या स्टुडिओ बोजेरीनं आणि लंडनच्या जे. वॉल्टर थॉम्पसन जाहिरात कंपनीनं सन्मानानं बोलावून घेतलेला पहिला आणि एकमेव भारतीय डिझायनर. इंग्लंडच्या राजघराण्याकडून F.C.S.D. पदवीनं सन्मानित झालेला एकमेव आशियाई. यानं भारतात पॅकेजिंग डिझाइन प्रथम आणलं. इंडस्ट्रिअल डिझाइनची सुरुवात केली. ग्राफिक डिझाइनला भारतीय चेहरा देण्याचा ध्यास घेतला. कला-विद्यापीठ उभं करण्याचं स्वप्न पाहिलं... 1960चं दशक सरताना रॉबी डिसिल्वा भारतात परतले, तेव्हा ते इथल्या डिझाइन क्षेत्राच्या वीस-पंचवीस वर्षं पुढेच होते.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेRoby Disilva Eka Manasvi Kalakaracha Pravas | रॉबी डिसिल्वा एका मनस्वी कलाकाराचा प्रवास
₹240.00Original price was: ₹240.00.₹180.00Current price is: ₹180.00. Save ₹60 Add to cart -
Sale! Add to cartज्या भूभागात यापूर्वी कधीही नृत्य नव्हतं, तिथे भगीरथ प्रयत्नांनी कथकनृत्य प्रस्थापित-प्रतिष्ठित करणाऱ्या, परंपरेची, अभिजाततेची मूल्यं उजागर करणाऱ्या, पारंपरिक कथक नृत्यकलेला कालसमांतर आशयाची संपन्नता बहाल करणाऱ्या रोहिणीताईंनी कलेचं उच्च स्तरावरचं व्यापक, सखोल, सौंदर्यशाली वैभव दाखवलं. जाणिजे यज्ञकर्म या भावनेनं हा नृत्ययज्ञ त्यांनी आयुष्यभर श्रद्धापूर्वक केला. भावसमृद्ध, ज्ञानवंत अशा व्युत्पन्नमती कलाकार, श्रेष्ठ गुरू, दूरदृष्टीच्या संस्थाचालक, कलामाध्यमाची साधना करणाऱ्या विचारवंत, संगीतरचनाकार, वाग्गेयकार, लेखिका, विद्यापीठीय चर्चेत नृत्यशिक्षण व नृत्यविचार यांचा समावेश करणाऱ्या अ ॅकॅडेमेशियन - अशा परिपूर्ण कलाकार - टोटल आर्टिस्ट - रोहिणी भाटे यांचं नृत्यक्षेत्रातील योगदानही स्वाभाविकच बहुआयामी, विविधरंगी ! त्यांच्या प्रातिभ कलाजीवनाचा वेधक पट म्हणजे रोहिणी निरंजनी
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेRohini Niranjani | रोहिणी निरांजनी
₹400.00Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00. Save ₹100 Add to cart -
Sale! Add to cartरोझलिंड फ्रँकलीन शास्त्रज्ञ म्हणून जितकी थोर होती तितकीच सामाजिक भान असणारी जबाबदार व्यक्ती होती... कुटुंबाविषयीची आस्था असणारी, प्रखर विज्ञाननिष्ठा जपणारी, कॅन्सरशी निकरानं लढा देणारी खंबीर तरुणी रोझलिंड... केवळ स्त्रियांसाठीच नव्हे, तर संपूर्ण विज्ञानजगतासाठी ती आदर्श ठरली... डीएनए संशोधनातलं तिचं श्रेय हडपलं जाऊनही ती चार अंगुळं वरच उरली...
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेRozlind Frankleen | रोझलिंड फ्रँकलीन
₹220.00Original price was: ₹220.00.₹165.00Current price is: ₹165.00. Save ₹55 Add to cart -
Sale! Add to cart'आनंद' मासिकाचे संपादक, आकाशवाणीवरील बालोद्यान कार्यक्रमातील नाना, ख्यातनाम बालसाहित्यिक अशा अनेकविध नात्यांनी मुलांमध्ये रमलेल्या गोपीनाथ तळवलकरांच्या आठवणी म्हणजे सहस्रधारा. या आत्मचरित्रात आत्मगौरव, आत्मसमर्थन, अहंकार यांचा स्पर्शही नाही. लेखकाच्या ॠजू व्यक्तिमत्त्वासारख्याच सौम्य, शीतल प्रवाहाने नटलेल्या आहेत या सहस्रधारा.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेSahastradhara | सहस्रधारा
₹45.00Original price was: ₹45.00.₹34.00Current price is: ₹34.00. Save ₹11 Add to cart -
Sale! Add to cartपद्मभूषण माधव गाडगीळ म्हणजे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व! निसर्गप्रेम हा माधव गाडगीळांचा श्वास अन् ध्यास. गेल्या पाच तपांचे सखोल संशोधन, भारतातील निसर्गाची अन् जीवशास्त्राची अद्भुत कोडी सोडवणारा प्रदीर्घ व्यासंग आणि सामान्यातल्या सामान्य माणसाप्रति मानत असलेले उत्तरदायित्व या सा-यांचे विलक्षण मिश्रण म्हणजे माधव गाडगीळ. साहित्यिक अंगाने अन् ललित शैलीने नटलेले या निसर्गवैज्ञानिकाचे आत्मवृत्त बनले आहे एक अद्भुत सफर. केवळ निसर्गप्रेमी वा निसर्ग-अभ्यासकांनाच नव्हे, तर भवतालाबद्दल कुतूहल असणार्या प्रत्येकाला एका वेगळ्या विविधरंगी जगाचे दर्शन घडवणारी जीवनसफर !
All BooksSahyachala Ani Mee : Ek Premkahani | सह्याचला आणि मी : एक प्रेमकहाणी
₹800.00Original price was: ₹800.00.₹600.00Current price is: ₹600.00. Save ₹200 Add to cart -
Sale! Add to cart'त्याच्या प्रवेशाआधी सजीवांचे होते निव्वळ गट - पशू, पक्षी, कीटक, जलचर, फळझाडे, फुलझाडे, वृक्ष, वेली... हा सारा पसारा त्यानं शिस्तीत मांडला. गटांमधल्या प्रत्येकाचं त्यानं बारसं केलं. माहीत असलेल्या सजीवांचं त्यानं केलं वर्गीकरण. प्रत्येक प्रकारच्या सजीवाला त्यानं बहाल केलं एकेक स्वतंत्र वैशिष्ट्यपूर्ण नाव. आणि हे नावच बनलं त्या सजीवाच्या जातीची ओळख. जीवशास्त्रानं ही वैज्ञानिक पद्धत कायमची स्वीकारली.'
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेSajeevancha Namdata : Carl Linnaeus | सजीवांचा नामदाता! कार्ल लिनिअस
₹160.00Original price was: ₹160.00.₹120.00Current price is: ₹120.00. Save ₹40 Add to cart -
Sale! Add to cartसांदणवाट म्हणजे पळवाट नव्हे अथवा चोरवाटही नव्हे, सांदणवाट म्हणजे वेगळी वाट. आयुष्यात कायम वेगळा मार्ग अस्तित्वात असतो, मात्र तो राजमार्ग नसतो. अशी वेगळी वाट निवडून त्यावर निग्रहाने पावले टाकणे हे एक प्रकारे आव्हानही असते अन् संधीही ! जीवनाची सुरुवात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत होऊनही डॉ. पंडित विद्यासागरांनी नंतरच्या आयुष्यात बहुतेक वेळा जाणीवपूर्वक वेगळी वाट निवडली. त्यामुळे वाट्याला आलेल्या विविध अनुभवांचा लेखाजोखा मांडणारे हे प्रेरणादायी आत्मकथन.
All BooksSandanvaat | सांदणवाट
₹600.00Original price was: ₹600.00.₹450.00Current price is: ₹450.00. Save ₹150 Add to cart -
Sale! Add to cart' आपल्या समाजबांधवांच्या उत्कर्षाला साहाय्यभूत व्हा. हा होता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश. बाबासाहेबांच्या विचारांच्या मुशीत घडलेल्या एका तरुणाने हा संदेश आपले जीवनध्येय बनवला. त्याला जाणवले - गरिबांना, शोषितांना अन् वंचितांना न्याय देण्यासाठी गरज असते कायद्याच्या कर्तव्यकठोर कारवाईची. अशा कारवाईची जागरूकपणे अंमलबजावणी करण्यासाठी उन्मत्त धनदांडगे, मुजोर राजकारणी, जातीयवादी अधिकारी यांच्या अत्याचारांच्या विरोधात तो ठामपणे उभा ठाकला ! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्मिलेल्या घटनेच्या चौकटीचाच भक्कम आधार घेत न्याय्य तत्त्वासाठी लढा देणाऱ्या आणि आपल्या हाती सोपवलेल्या प्रत्येक विभागावर कुशल व्यवस्थापनाचा ठसा उमटवणाऱ्या निग्रही अन् कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या कारकिर्दीचा पट मांडणारे संघर्षयात्री '
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेSangharshayatri | संघर्षयात्री : उत्तम खोब्रागडे
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Sale! Add to cartरा. स्व. संघाच्या शाखांतून तयार झालेल्या स्वयंसेवकांनी आवडीची कार्यक्षेत्रे निवडली. त्यात संघाच्या संस्कारबळावर विविध संस्थात्मक, संघटनात्मक कार्ये उभी केली. शिक्षण, संस्कार, कामगार, विद्यार्थी, उद्योग, आरोग्य, राजनीती अशा क्षेत्रांत आणि विविध सेवाकार्यांत संघस्वयंसेवकांनी कार्य केले आणि हाच शक्तिसाठा संघपरिवार म्हणून ख्यातनाम झाला. मंत्र छोटा, तंत्र सोपे । परि यशस्वी ठरले ते ।। रीत साधी, शिस्त बांधी । कार्य व्यापक उभवी ते ।। या संघगीताचा साक्षात्कार आज सार् या विश्वाला होत आहे. तरीही संघ समग्रपणे समजला, असे म्हणता येईल का ? कारण रोज माझ्या अवतीभवती वावरणारा, माझ्यासारखाच हा सामान्य माणूस, आश्चर्याने तोंडात बोट घालावे असे उत्तम कार्य कसा करू शकला बुवा, हे मनात येतेच. या आश्चर्यावर मात करून संघातील मानवी व्यवस्थापन बारकाईने न्याहाळले तर सामान्य माणसातल्या असामान्य क्षमता फुलवून मोठाली कामे करणारी संघटना म्हणजे रा. स्व. संघ हा बोध आपल्याला होतो.
All BooksSanghatil Manavi Vyavasthapan Eka Swayamsevakachya Najaretun | संघातील मानवी व्यवस्थापन
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Sale! Add to cart...मग ते आई-बाप म्हणतात मुलीला सिनेमा लाईनची हौस आहे, तिला सिनेमात टाकायचंय. त्या मुलीकडे बघून मला कळवळून येतं. मी सांगते शहाणे असाल, मुलीचं हित करायचं असेल तर तिला या लाईनकडे चुकूनही फिरकूसुद्धा देऊ नका. माझा अनुभव आहे त्या मागे. '
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेSangte Aika | सांगत्ये ऐका
₹100.00Original price was: ₹100.00.₹75.00Current price is: ₹75.00. Save ₹25 Add to cart
">
Skip to content