चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रे
-
Sale! Add to cart'माणसाची स्वत:ची कहाणी त्याच्या एकटयाची नसते. त्याच्या जीवनाचा भाग बनलेल्या व्यक्तींची अन् सभोवतालच्या परिसराचीही ती कहाणी असते. मराठवाडयात जन्मलेल्या, लहानाचा मोठा झालेल्या एका संवेदनशील वाङ्मय-अभ्यासकाची ही कहाणी. त्याची एकटयाची नाही, तर मराठवाडयाची अन् तिथल्या माणसांची कहाणी. एका बाजूला निजामी राजवटीचं मध्ययुगीन वातावरण, दुसरीकडे उर्वरित मराठी मुलखापासून नाळ तुटलेली. तरीही दीर्घ काळापासून चालत आलेल्या आपल्या सांस्कृतिक अन् वाङ्मयीन परंपरांचा वारसा अभिमानानं जपणारा मराठवाडा अन् तिथले मराठीभाषक. लेखकाच्या निमित्तानं साकारलेली त्याच्या जगाची ही कहाणी... लोभस एक गाव काही माणसं
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेLobhas Ek Gav – Kahi Mansa | लोभस एक गाव – काही माणसं
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreसर्वसमावेशकता हे या देशाचं वैशिष्ट्य आहे. देशातील सामान्य माणसावर माझा विश्वास आहे. हा सर्वसामान्य भारतीय माणूस भारतातील सर्व राजकारण्यांपेक्षा खूपच शहाणा आणि समजूतदार आहे. योग्य वेळी योग्य निर्णय तो घेतो. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत जनतेचं एक सामुदायिक शहाणपण प्रत्ययाला येतं. हेच शहाणपण भारतीय लोकशाहीचा कणा आहे. त्याच्या भरवशावर या देशाचं भवितव्य सुरक्षित आहे. सा-या भारतभर त्याच्या या प्रगल्भ जाणतेपणाचा मी आपल्या सहा दशकांच्या सार्वजनिक जीवनात काम करताना वारंवार अनुभव घेतला आहे. या जनतेचा विश्वास मला छपन्न वर्ष लाभला, यापेक्षा अधिक काय असू शकतं? शरद पवार गेली सहा दशकं देशाच्या जडणघडणीत महत्वपूर्ण सहभाग असणा-या नेत्यानं घेतलेला आपल्या राजकीय वाटचालीचा विश्लेषक वेध.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेLok Maze Sangati…(Rajakiya Atmakatha) | लोक माझे सांगाती…. (राजकीय आत्मकथा)
₹650.00Original price was: ₹650.00.₹488.00Current price is: ₹488.00. Save ₹162 Read more -
Sale! Add to cartतो होता जन्मानं ब्रिटिश; नाव होतं टी. ई. लॉरेन्स. पण आयुष्यभर तो लढला असंघटित अरबांच्या हक्कांसाठी. महानायक म्हणून जगभर गाजला तो लॉरेन्स ऑफ अरेबिया म्हणूनच ! अरबांना मुक्ती मिळवून देणा-या त्या अवलिया लढवय्याची अद्भुत कहाणी..
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेLorens Of Arebia | लॉरेन्स ऑफ अरेबिया
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cartसमाजानं घालून दिलेल्या रूढ-परंपरांच्या चौकटीच्या धाकाला न बधलेलं कर्वे घराणं. शिक्षणानं स्त्री स्वावलंबी बनेल या विश्र्वासानं स्त्री शिक्षणाचा आग्रह धरणारे आणि त्यासाठी आपलं सारं आयुष्य वेचणारे महर्षी कर्वे ! संतती नियमन आणि समागम स्वातंत्र्य या दोन गोष्टींनीच स्त्रीला मानसिक, शारीरिक आरोग्य लाभेल हे आपलं मत तर्कशुध्दपणे मांडताना समाजाशी एकाकी झुंज देणारे र. धों. कर्वे ! आणि सत्तेच्या खेळाला मान्यता न देता व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करणा-या गौरी देशपांडे ! या तीन नावांनी कर्वे घराण्याच्या तीन पिढया स्त्री-स्वातंत्र्याच्या प्रश्नांशी जोडल्या गेल्या. त्यांच्या रक्तातून वारसाहक्कानं प्रवाही झाले केवळ पुरोगामी विचार. स्त्री आज थोडंफार मोकळेपणानं जगत असेल तर त्या श्रेयात कर्वे घराण्याचा वाटा मोठा आहे. स्त्री-स्वातंत्र्याच्या इतिहासातील काही पाने कर्वे घराण्यातील या तीन व्यक्तिंचा इतिहासच आहेत.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेMaharshi Te Gauri | महर्षी ते गौरी
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Sale! Add to cart'महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर. आधुनिक भारताच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे हे दोन लोकोत्तर नेते. प्रत्यक्ष जीवनात जरी ते दोघे अनेकदा समोरासमोर उभे ठाकले, तरीही आता नव्या संदर्भात त्या दोघांच्या विचारांचा समन्वय घालून प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करणे गरजेचे आहे. हे दोन्ही महापुरुष दोन ध्रुवांसारखे लांब आहेत, असे वाटते; तथापि त्यांचे शाश्वत संदेश लक्षात घेऊन त्यांमध्ये सुसंवाद कसा साधता येईल, याचा हा प्रामाणिक प्रयत्न. '
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेMahatma Gandhi Ani Dr. Ambedkar: Sangharsha Ani Samanvay | महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकर : संघर्ष आणि समन्वय
₹400.00Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00. Save ₹100 Add to cart -
Sale! Add to cartविसाव्या शतकावर आपल्या अलौकिक कार्यानं आणि व्यक्तिमत्वामुळे ज्या लोकोत्तर व्यक्तींचा ठसा उमटला, त्यांमध्ये हेलन केलर ह्यांचं नाव अग्रगण्य आहे. अगदी लहानपणीच एका आजारपणात त्यांची दृष्टी गेली. तरीही अंधत्व, मुकेपणा आणि बधिरत्व अशा तिहेरी अपंगत्वाशी सामना देत त्यांनी आपलं आत्मनिर्भर स्वत्व शोधलं. पुढे हेलन केलर बोलायला तर शिकल्याच पण व्याख्यानंही देऊ लागल्या. वक्तृत्व, पत्रकारिता, साहित्य आणि अंधकल्याण अशा चौफेर कामगिरी त्यांनी बजावली. त्यामुळेच जगभरच्या अपंगांच्या दृष्टीनं हेलन केलर हे केवळ एक नाव नाही तर अंधारातून प्रकाशाकडे नेणारी एक स्फूर्तिज्योत आहे. त्यांच्या जीवनीतल्या शिक्षणपर्वातले थक्क करणारे अनुभव सांगणारं त्यांचं हे आत्मकथन माझी जीवनकहाणी !
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेMajhi Jeevan Kahani: Helan Kelar | माझी जीवन कहाणी: हेलन केलर
₹125.00Original price was: ₹125.00.₹94.00Current price is: ₹94.00. Save ₹31 Add to cart -
Sale! Add to cartपुळूजसारख्या छोट्याशा गावात बालपण अन् शिक्षण. अनेक अडचणींवर मात करून इंजिनीअर बनण्यापर्यंत मजल. आपल्या गुणवत्तेच्या बळावर शासकीय सेवेत प्रथम वर्गातील अधिकारपदावर निवड. त्यानंतर महाराष्ट्राच्या जलसंपदा विभागा'त मोलाचे योगदान अन् बहुआयामी कर्तृत्व. या व्यक्तिमत्त्वाचे नाव आहे सुरेश सोडळ. महाराष्ट्रातील जलसंपत्तीचा समतोल व शाश्वत विकास जागतिक संघटनेने निर्धारित केलेल्या सूत्राप्रमाणे होण्यासाठी, पुढच्या पिढीचे जीवनमान सुसह्य होण्यासाठी, राज्यातील जलक्षेत्रात सुधारणा करण्यासाठी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत सुरेश सोडळ सतत प्रयत्नशील राहिले. नावीन्य आणि परिश्रम या दोन्ही काठांमधून वाहणारा - गुणवत्तेने अन् कौशल्याने समृद्ध असलेला - सुरेश सोडळ यांच्या आयुष्याचा प्रवाह म्हणजे त्यांची आत्मकथा : माझी जीवनधारा
All BooksMajhi Jeevandhara | माझी जीवनधारा
₹270.00Original price was: ₹270.00.₹203.00Current price is: ₹203.00. Save ₹67 Add to cart -
Sale! Add to cart'सामान्यातल्या असामान्य स्त्रीचं हे आत्मकथन ! पार्वतीबाई आठवले ! १८७० मध्ये जन्मलेली, कोकणच्या खेडयात लहानाची मोठी झालेली एक निरक्षर स्त्री... वैधव्यानंतर केशवपन, परावलंबन हे दैवाचे भोग मानून जगणारी ! पण मुलाच्या काळजीनं पुण्यात बहीण बाया कर्वे यांच्याकडे म्हणजेच मेहुणे धोंडो केशव कर्वे यांच्या घरी आली आणि तिचं सारं जगच बदललं. या सामान्य स्त्रीतले असामान्य गुण प्रकटले. कर्वे यांचा अनाथ बालिकाश्रम हे तिचं जीवनकार्य झालं. या संस्थेला मदत मिळवण्यासाठी अनेक हालअपेष्टा सोसत ती भारतभर फिरली, इंग्लंड-अमेरिकेतही जाऊन आली. तिनं केलेलं हे आत्मकथन.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेMajhi Kahani | माझी कहाणी
₹100.00Original price was: ₹100.00.₹75.00Current price is: ₹75.00. Save ₹25 Add to cart -
Sale! Add to cart'ध्येयाचा शोध घेताना अनेक ब्रेक लागायचे, ठेचा लागायच्या. अनेकदा दोरी तुटलेल्या पतंगासारखी स्थिती व्हायची. माझ्या डोळयात भोळीभाबडी स्वप्नं होती. त्यांना प्रयत्नांची, कष्टांची जोड दिली. जेवढा मोठा संघर्ष, तेवढं मोठं यश ! काळ बदलतो, वेळ बदलते, पात्रं बदलतात आणि भूमिकाही ! बस् ! मनगटात, स्वप्नांना जिवंत करण्याची, पंखांत बळ निर्माण करण्याची, लाथ मारीन तिथं पाणी काढण्याची जिद्द आणि अविरत संघर्ष करण्याची तयारी ठेवावी लागते. माझ्यासारख्या तळागाळातल्या, कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या घरातल्या अपुऱ्या साधन-सामुग्रीनं आणि पराकोटीच्या ध्येयनिष्ठेनं कुठल्यातरी कोपऱ्यात ज्ञानसाधना करणाऱ्या अनेक एकलव्यांना दिशा दाखवण्यासाठी मी हा पुस्तक-प्रपंच केला आहे.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेMan Main Hai Vishwas (Jana Avrutti) | मन में है विश्र्वास
₹199.00Original price was: ₹199.00.₹149.00Current price is: ₹149.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartमाणूस जन्माला येतानाच काही नातीगोती घेऊन येतो. पुढे मग काही गावे आणि काही माणसे त्या गोतात सामील होतात. त्यांचेही मग त्याच्यावर संस्कार होऊ लागतात. त्या गावांच्या आणि त्या माणसांच्या सोबतीनेच तो वाढत जातो. त्याचे जीवन हे खऱ्या अर्थाने त्याचे स्वतंत्र राहतच नाही. या सगळ्यांच्या हातभाराने त्याचे जीवन फुलत राहते. आपले मूळ कोणते आहे आणि आपल्याला इतरांनी काय दिले आहे, याचा हिशोब मांडणे अवघड असते. सुधीर रसाळांनी समीक्षकदृष्टीच्या नेमकेपणाने अशा काही गावांबद्दल आणि माणसांबद्दल लिहिले आहे, अर्थातच त्याबरोबर स्वत:बद्दलही. रसाळांना जशी माणसे आठवतात, गावे आठवतात; तसा तो काळही आणि त्यावेळची संस्कृतीही आठवते. ही व्यक्तिचित्रे जशी काही गावांची आणि काही माणसांची आहेत, तशीच ती एका मावळलेल्या संस्कृतीचीही आहेत. नरेन्द्र चपळगावकर
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेManasa Jivhalyachi | माणसं जिव्हाळ्याची
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart
">
Skip to content