चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रे
-
Sale! Add to cartदिलीप प्रभावळकर म्हणजे एक चतुरस्र व्यक्तिमत्त्व. अष्टपैलू अभिनेता, प्रतिभावान साहित्यिक, बहुरंगी कलाकार, मिस्कील विनोदकार अशा विविध पैलूंनी त्यांचं व्यक्तित्व साकारलेलं आहे. दिलीप प्रभावळकरांच्या या झगमगत्या पैलूंची जडणघडण कशी झाली, याचा त्यांनीच घेतलेला रंगतदार वेध.
All BooksMi (Asa) Kasa Zalo? | मी (असा) कसा झालो ?
₹170.00Original price was: ₹170.00.₹128.00Current price is: ₹128.00. Save ₹42 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreइझाडोरा डंकन एक विख्यात अमेरिकन नृत्यांगना. क्लासिकल बॅलेच्या यांत्रिक अन् कृत्रिम नृत्यतंत्राविरुद्ध बंडखोरी करणारी मनस्विनी. स्वतःच्या अंतरातून व्यक्त होणारी तिची उन्मुक्त शैली म्हणजे तिच्या आत्म्याचा आविष्कारच ! कलेवरची असीम निष्ठा, प्रस्थापित प्रवाहाविरुद्ध जाण्याची जिद्द, तीक्ष्ण बुद्धिमत्ता अन् तरल संवेदनशीलता यांच्या बळावर तिनं उभारलं स्वतःचं स्वतंत्र नृत्यविश्व. म्हणूनच या प्रतिभावान नृत्यांगनेचं आयुष्य भावलं रोहिणीताईंसारख्या प्रतिभाशाली कलावतीला. देश, वेष, काळ, शैली सारंच वेगळं असणा-या या दोघींना बांधणा-या सहानुभावाच्या धाग्यातून अनुवादलेलं आत्मचरित्र मी इझाडोरा
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेMi Izadora | मी इझाडोरा
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Read more -
Sale! Add to cart'महंमद आमिर खान-जुन्या दिल्लीतील एका गरीब कुटुंबातील सालस मुलगा. दहावीच्या परीक्षेनंतर कराचीत राहणाऱ्या आपल्या मोठ्या बहिणीला भेटायला पहिल्यांदाच एकट्याने निघतो. परंतु दिल्ली सोडण्याआधीच गुप्तहेर यंत्रणेचे अधिकारी त्याला रस्त्यात गाठून त्याच्यावर पाकिस्तानातून एक पाकीट आणण्याची कामगिरी सोपवतात. अजाणतेपणी तो या कामास होकार देतो. पण कराचीत पोचल्यावर पोलिसांच्या भीतीपोटी तो ते पाकीट फेकून देऊन रिकाम्या हाताने दिल्लीला परततो. आणि सुरु होतात त्याच्या दुर्दैवाचे दशावतार: पोलिसांकडून अपहरण, गुप्तहेर यंत्रणेकडून अनन्वित छळ, खोट्या साक्षीपुराव्यांसह दहशवादी म्हणून तिहारमध्ये रवानगी, तुरुंगात बेदम मारहाण आणि चौदा वर्षांची एकांत कोठडी. परंतु महंमद आमिरची कहाणी म्हणजे फक्त एवढेच नाही. काळ्याकुट्ट अंधारातसुद्धा शिक्षणाचा, सच्छीलतेचा आणि आशेचा दिवा तेवत ठेवणाऱ्या जिद्दीचीसुद्धा ही कहाणी आहे. मी महंमद खान शपथेवर सांगतो की... हे निरपराध महंमद आमिरचे उद्वेगजन्य परंतु चांगुलपणावरचा विश्वास अबाधित ठेवणारे आत्मकथन होय.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेMi Mahammad Khan Shapthevar Sangto Ki | मी महंमद खान शपथेवर सांगतो की
₹180.00Original price was: ₹180.00.₹135.00Current price is: ₹135.00. Save ₹45 Add to cart -
Sale! Add to cartमी मिठाची बाहुली गेल्या शतकातलं चवथं दशक. जेमतेम पंधरा पावसाळे पाहिलेली एक मराठी मुलगी रंगभूमीवर पहिलं पाऊल ठेवते. अन् पाहता पाहता भाषेची भिंत ओलांडून मुंबईच्या गुजराथी-मारवाडी नाट्यसृष्टीत एक कुशल गायिका-अभिनेत्री म्हणून मानाचं स्थान मिळवते. तर ही गोष्ट आहे सुशीला लोटलीकरची. म्हणजेच वंदना मिश्र यांची. आणि प्रतिकूल परिस्थितीशी झुंजणा-या एका साध्या, पण मानी धैर्यशील कुटुंबाची. या गोष्टीत आहे अनामिक हुरहूर लावणा-या मुंबईचा अखंड वावर एखाद्या सिंगल पर्सन कोरसप्रमाणे. माणुसकीनं भारलेली अनेक लहान-थोर माणसं या पुस्तकात भेटतील अन् वाचकांना लळा लावतील. वंदनाताईच्या लिखाणात मौखिक परंपरेतला जिव्हाळा अन् आपुलकी आहे. त्यांच्या सांगण्यातूनच त्यांचं आत्मकथन सिद्ध झालंय. हे केवळ स्मरणरंजन नाही, हे आहे एका अपूर्व काळाचं अर्थगर्भ आत्मचिंतन.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेMi Mithachi Bahuli | मी मिठाची बाहुली
₹190.00Original price was: ₹190.00.₹143.00Current price is: ₹143.00. Save ₹47 Add to cart -
Sale! Add to cart' - ती एक मुलगी होती - एका मारवाडी कुटुंबातली. - ती शिकली. - मग ती यथावकाश पत्नी, माता झाली. - मग ती शेतकरी झाली, कवयित्री झाली, लेखिका झाली. - शेतक-यां चे सगळे प्रश्न, अडचणी, दु:ख अंगावर घेऊन पुन्हा बाई च्या प्रश्नांचाही हारा तिनं डोक्यावर सांभाळला. - अशा या एका शेतकरी-कवयित्री-लेखिके ची ही कहाणी! - पूर्णपणे सुफळ नव्हे, पूर्णपणे सपुर्ण ही नव्हे आणि तरीही ह्रदयाला हात घालणारी. '
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेMi Nahi Kunachi | मी नाही कुणाची…
₹125.00Original price was: ₹125.00.₹94.00Current price is: ₹94.00. Save ₹31 Add to cart -
Sale! Add to cartमरहूम उस्ताद अल्लादिया खांसाहेब जयपूर-अत्रौली घराण्याच्या विद्यमान गायकीचे उद्गाते जणू गायनाचे गौरीशंकर' ! त्यांच्या गायकीच्या आजच्या घडीला कार्यरत वारसदारांपैकी डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे सांगत आहेत त्यांची चरितकहाणी. ख्यालगायनाच्या पद्धतीनुसार रागबढत' किंवा उपज' या अंगाने विस्तारत साकारलेली खांसाहेबांची ही जीवनकथा. त्यातून वाचकापुढे उलगडत जातं कधी सौंदर्यपूर्ण, प्रमाणबध्द स्थापत्यासारखं खांसाहेबांचं व्यक्तिमत्त्व, कधी त्यांच्या पारिवारिक आणि गुरुशिष्य नातेसंबंधांचं नाजूक, जरतारी विणकाम. विविध प्रसंगांतून उजागर होतात खांसाहेबांच्या व्यक्तिमत्त्वातल्या मनोहारी रंगछटा. एखाद्या कादंबरीसारख्या सुरस, रोचक घटनांनी भरलेलं हे खांसाहेबांचं ललित चरित्र' म्हणजे रसिक वाचकांना तसेच अभिजात संगीताच्या साधकांना लाभलेली शब्दमैफिलीची पर्वणी.
All BooksMi…Alladiyakhan | मी… अल्लादियाखां
₹500.00Original price was: ₹500.00.₹375.00Current price is: ₹375.00. Save ₹125 Add to cart -
Sale! Add to cartगुजरातचे मुख्यमंत्री झाल्यापासून भारताचे पंतप्रधान या नात्याने सात वर्षांची कारकीर्द पूर्ण करीपर्यंत नरेंद्र मोदी यांनी जी मजल मारली, तिचा विविध क्षेत्रांमधील मान्यवर साक्षीदारांनी घेतलेला आढावा... प्रथम तेरा वर्षे राज्यात आणि नंतर केंद्रीय स्तरावर सात वर्षांत त्यांनी घडवलेल्या परिवर्तनाचा विस्तृत परिचय... अशक्य वाटणार् या अनेक गोष्टी शक्य करून दाखवणार् या एका किमयागार नेत्याच्या विलक्षण यशाचे रहस्य उलगडून दाखवणारा प्रभावी लेखसंग्रह. प्रस्तावना भारतरत्न लता मंगेशकर सहभागी लेखक पी. व्ही. सिंधू शोभना कामिनेनी सुरजित एस. भल्ला अमीश त्रिपाठी अमित शाह प्रदीप गुप्ता अनंत नागेश्वरन अरविंद पणगडिया डॉ. शमिका रवी उदय एस. कोटक अजय माथुर अनुपम खेर अशोक गुलाटी डॉ. देवी शेट्टी नंदन नीलेकणी नृपेन्द्र मिश्रा सद्गुरू सुधा मूर्ती अजित डोभाल (कीर्तिचक्रविजेते) मनोज लडवा, भरत बरई डॉ. एस. जयशंकर
All BooksModi@20 | मोदी@20
₹895.00Original price was: ₹895.00.₹671.00Current price is: ₹671.00. Save ₹224 Add to cart -
Sale! Add to cartजगात कुठेही मानवजात संकटात सापडली, की धावून जायचं, हा मदर तेरेसांचा सहज धर्म ; मग तो बांगलादेशचा महापूर असो, ग्वाटेमालातला भूकंप असो किंवा इथियोपियातला दुष्काळ असो. आयुष्याच्या उत्तरार्धात मात्र या सगळ्या जागी जाताना त्यांना आठवत असे, ती स्वत:ची जन्मभूमी अल्बानिया. आपल्या देशाच्या झालेल्या चिंध्या पाहून त्यांना क्लेश होत. त्या म्हणत, एक शेवटची इच्छा आहे, माझ्या जन्मभूमीत जाऊन कार्य करण्याची. तिथे माझी आज फार गरज आहे. कशी होती त्यांची जन्मभूमी ? त्यांचं बालपण ? त्यांच्या बालपणापासून ते मदर पर्यंतच्या प्रवासाची ही धावती ओळख.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेMother Terresa | मदर तेरेसा
₹140.00Original price was: ₹140.00.₹105.00Current price is: ₹105.00. Save ₹35 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreदेशासाठी कशा-कशाची पर्वा न करता प्राणांची आहुती देणारे ज्ञात-अज्ञात सैनिक. त्यांचे अस्तित्त्व आपण गृहीत धरतो आणि त्यांच्या भरवशावर आपण विश्वासाने, आनंदाने जगतो. अशा सैनिकांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या आयुष्याची ही झलक. कमालीच्या प्रासादिक पद्धतीने लिहिलेली. सैनिक नावाच्या माणसाला ओळखायला मदत करणारी !
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेMukkam: Army Post Office | मुक्काम : आर्मी पोस्ट ऑफिस
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Read more
">
Skip to content