रसग्रहण / समीक्षा
-
Out of stock
Out of stock
Sale! Read moreश्री. म.वा. धोंड हे कायम प्रवासात असतात. मुंबईतील साहित्य सहवास मधल्या आपल्या घरातल्या खुर्चीत बसून ते एक गाडी पकडतात. पिपात मेले . आनंदी गोपाळ . पोत . स्वीमी . लता मंगेशकरांनी गायिलेले तुकारामाचे अभंग. बालकवींची रमाई नाहीतर नाच ग घुमा . मूळ गाडी मर्यादित धावेची असली तरी धोंड ती आपल्याला हव्या त्या वेगाने फिरवतात. हे करताना त्यांचे दिशेने भान चुकत नाही. गाडीवरचे नियंत्रण सुटत नाही. अपघात घडत नाही. गाडी मोडत नाही. कोणत्याही कुशल ड्रायव्हर प्रमाणे या सगळ्याचे पक्के भान ते ठेवतात. पोचण्याचे ठिकाण ठरलेले असते पण वाटते जे जे भेटते ते स्वतंत्रपणे मन गुंतवणारे, चकित करणारे, दाद द्यावी असे असते. अशी कितीतरी ठिकाणे जागोजाग ते आपल्याला भेटवतात. यामुळेच हे प्रवास सरळ रेषेतले आणि कामापुरते नाहीत, हे मुक्त आणि मजेचे आहेत. वाचकाला बरोबर घेऊन या पुस्तकात श्री.धोंड यांनी असे एकुण अकरा प्रवास केले आहेत. त्यांची लेखनशैली व्यासंगी तितकीच ससीली, कधी गंभीर, कधी मिष्किल, कधी रंगेल आणि कधी चावटदेखील. गरजेनुसार यात उपरोधाची धार. अभ्यासाने सामान्य पंडितांना येते ते जाड्य या पुस्तकात औषधालाही सापडणार नाही. विजय तेंडुलकर
रसग्रहण / समीक्षाJalyatil Chandra | जाळयांतील चंद्र
₹140.00Original price was: ₹140.00.₹105.00Current price is: ₹105.00. Save ₹35 Read more -
Sale! Add to cartफ्रांझ काफ्का हा विसाव्या शतकातील एक महत्त्वाचा लेखक. त्याच्या मेटॅमॉर्फोसिस चे भाषांतर उपलब्ध करून द्यावे, याकरता डॉ. सुहास भास्कर जोशी हे अभिनंदनास पात्र आहेत. त्यांनी केलेले भाषांतर सुबोध आहे. मूळ कथेची आकृती आणि प्रकृती भाषांतरात उत्तम रीतीने आली आहे. प्रस्तुत भाषांतर मराठी वाचकांना एका अपूर्व व महान साहित्यकृतीच्या वाचनाचे समाधान देणारे आहे. याशिवाय या ग्रंथात काफ्काचा जीवनपट आणि त्याचे लेखन, मेटॅमॉर्फोसिस चे आस्वादक विश्लेषण, त्याच्याशी नाते सांगणा-या साहित्यकृतींचा परामर्श यांचा समावेश केलेला आहे. थोडक्यात, या ग्रंथाचा पैस मोठा आहे. ग्रंथाच्या शेवटी सुहास भास्कर जोशी म्हणतात, काफ्का आणि आणि मेटॅमॉर्फोसिस ला मरण नाही, किंबहुना मेटॅमॉर्फोसिस चे गारूड अजूनही कमी झालेले नाही. सुहास जोशींनी अत्यंत परिश्रम घेऊन हे गारूड मराठी वाचकांसमोर उभे केले, याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन ! वसंत आबाजी डहाके
All BooksKafkacha ‘Metamorphosis’ | काफ्काचं मेटॅमॉर्फोसिस’
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreनवकवी मानल्या जाणा-या विंदा करंदीकरांनी अन्य नवकवीपेक्षा वेगळी अशी विज्ञाननिष्ठ वास्तववादी कविता प्रथमच लिहिली. 'इहवादाचा स्वीकार आणि पारंपारिक आध्यात्मिक मूल्य व्यवस्थेला दिलेले प्रामाण्य यांत आपले जीवन दुभंगलेले आहे. आपल्या अनेक समस्यांचा उगम या दुभंगलेपणातच आहे. म्हणून पारंपारिक आध्यात्मिक मूल्यांना नाकारून इहवादाबरोबरच इहवादी मूल्य व्यवस्थेचा स्वीकार केल्याशिवाय आपले जीवन सुसंगत आणि अर्थपूर्ण बनणार नाही,' या जाणिवेतून त्यांच्या सामाजिक कवितेचा जन्म झालेला आहे. वैज्ञानिक इहवादी भूमिकेतून लिहिलेली स्त्रीपुरुषांमधील शृंगारसंबंधाविषयक कविता हे विंदांच्या कवितेचे खास वैशिष्ट्य. त्यांनी वैज्ञानिक दृष्टीकोणाच्या आधारे स्त्री आणि पुरुष यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि त्यांच्या नैसर्गिक जीवनोद्दष्टींचा वेध घेतला आहे. विंदा स्त्रीकडे विश्वातील सर्जनशक्तीचे प्रतीक म्हणून पाहतात. या जगतात स्त्रीचे अस्तित्त्व हेच प्राथमिक असून तिच्या अस्तित्त्वामुळेच पुरुषालाही 'पुरुष' म्हणून अस्तित्त्व लाभले आहे. विंदांच्या कवितेमुळे मराठी कवितेत या जाणीवा प्रथमच साकार झाल्या, त्यामुळे त्यांच्या कवितेला असाधारणत्व लाभले आहे. आततायी अभंग, संहिता, मुक्त सुनीते, तालचीत्रे, सूक्ते, गजल, निर्वाणीची गजल, विरूपिका असे काव्यारुपांचे अनेक प्रयोग विंदांनी केले, त्यामुळे मराठी काव्याक्षेत्र समृद्ध झाले आहे. विंदांच्या काव्य वैशिष्ट्यांची सांगोपांग आणि मार्मिक मीमांसा करणारा, काव्यरसिकांना, काव्याच्या अभ्यासकांना निश्चितच उपयुक्त ठरणारा ग्रंथ -
All BooksKavitayan | कवितायन
₹490.00Original price was: ₹490.00.₹368.00Current price is: ₹368.00. Save ₹122 Read more -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreहैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठातून मराठीचे प्रोफेसर आणि पदवी व पदव्युत्तर मराठी विभाग प्रमुख म्हणून सेवानिवृत्त झालेले डॉ. श्री.रं. कुलकर्णी हे मध्ययुगीन मराठी वाडमयाचे चिकित्सक संशोधक आणि गाढे अभ्यासक आहेत. नाथांचा भागवतधर्म , प्राचीन मराठी हस्तलिखिते : संशोधन आणि संपादन इत्यादी त्यांचे ग्रंथ त्यांच्या अभ्यासूपणाची आणि मुख्य म्हणजे संशोधकीय प्रज्ञाप्रतिभेची साक्ष देणारेच आहेत. डॉ.श्री.रं. कुलकर्णी यांचा एकूण सर्वच अभ्यास शास्त्रशुद्ध नवीनतम प्रमेये मांडणारा आणि साहित्याचा सांस्कृतिक अनुबंध मानणारा असा आहे; आणि प्रस्तुत मध्ययुगीन मराठी साहित्य : एक पुनर्विचार हा ग्रंथही याला अपवाद नाही. काल, परिस्थिती, सांस्कृतिक परंपरा, समाजजीवन आणि साहित्य यांचे परोपजीवित्व मध्ययुगीन मराठी साहित्यात जेवढे भक्कमपणे निदर्शनास येते, तेवढे अन्य कालखंडात क्वचितच आढळेल , या आपल्या गृहितकाचाच धांडोळा लेखकाने संपूर्ण ग्रंथभर कसोशीने घेतला आहे. मध्ययुगीन महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, सास्कृतिक स्थित्यंतरे आणि साहित्यनिर्मितीच्या क्षेत्रात घडून येणारी परिवर्तने यांचा परस्परसंबंध व आंतरक्रिया तपासून डॉ.श्री.रं.कुलकर्णी यांनी येथे नवसिद्धान्ताची प्रस्थापना केलेली आहे. मराठी वाड्.मयाच्या अभ्यासक्षेत्रात मूलभूत भर घालणारा हा ग्रंथ अभ्यासकांना समृद्धच करील. डॉ. द. दि. पुंडे
रसग्रहण / समीक्षाMadhyayugin Marathi Sahitya – Ek Punarvichar | मध्ययुगीन मराठी साहित्य – एक पुनर्विचार
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Read more -
Sale! Add to cartसतीश आळेकर लिखित- दिग्दर्शित 'महानिर्वाण' हे नाटक मराठी रंगभूमीवर अवतरले त्याला आज थोडीथोडकी नव्हे, तर पंचवीस वर्षे झाली. स्थल-काल-संस्कृतिविशिष्ट संदर्भ असलेले हे नाटक अन्य भारतीय भाषांत अनुवादित व मंचित झाले. अन्वयार्थाच्या अनेक शक्यता व क्षमता सुचविणा-या या नाटकाने अभ्यासकांना व रंगकर्मीनाही जणू एक आव्हान दिले. 'महानिर्वाण'च्या आतापर्यंत झालेल्या समीक्षेतून व या नाटकाच्या प्रयोगाशी संबंधित असलेल्या मराठी तसेच परभाषक कलावंतांनी शब्दबद्ध केलेल्या निर्मितीच्या कहाण्यांतून याचा पुरेपूर प्रत्यय येतो. हास्याचे वेदनेत रूपान्तर करणारे हे आख्यान - महानिर्वाण अजूनही पहिल्याइतकेच साग्रसंगीत, जोषात रंगते आहे आणि आताचे तरुण प्रेक्षकही त्याला पूर्वीइतकाच तन्मयतेने प्रतिसाद देत आहेत. अजूनही मृदंगावरची थाप तेवढीच कडकडीत पडते, हार्मोनियमचे सूर स्वच्छ- स्पष्टपणे उमटतात आणि नाटकाच्या अखेरीस येणारा देह जावो अथवा राहो हा तुकारामांचा अभंग आपल्याला व्याकूळ करतो. तिकडे रंगमंचावर लाल होत जाणा-या ज्वाळांनी वेढलेले भाऊ मरत असतात आणि त्या काही क्षणांत आपण रसरसून जगत असतो. असा अनुभव देणारी नाटके बहुधा अल्पच असतात. 'महानिर्वाण' हे अशा नाटकांपैकी एक आहे. म्हणूनच 'समीक्षा आणि संस्मरणे' या दोन्ही दृष्टींनी ते लक्षणीय ठरते.
रसग्रहण / समीक्षाMahanirvan : Samiksha Aani Sansmarne | महानिर्वाण : समीक्षा आणि संस्मरणे
₹425.00Original price was: ₹425.00.₹319.00Current price is: ₹319.00. Save ₹106 Add to cart -
Sale! Add to cart'जीवन, मृत्यू, ज्ञान, विज्ञान, ईश्वर अशा महत्त्वाच्या मूल्यांचा अर्थ कधी प्रत्यक्ष अनुभूतीतून, तर कधी कल्पनाशक्तीच्या साधनेतून, तर कधी चिंतनातून मर्ढेकर शोधतात. अशा प्रयत्नांचा मागोवा कविता समजून घेण्यास उपयुक्त ठरतो. मर्ढेकरांच्या कवितेतील महत्त्वाच्या विषयांचे कल्पनानिष्ठ संशोधन कसे झाले, याचा घेतलेला वेध. मर्ढेकरांची कविता
रसग्रहण / समीक्षाMardhekaranchi Kavita (Sanskrutik Samiksha) | मर्ढेकरांची कविता (सांस्कृतिक समीक्षा)
₹225.00Original price was: ₹225.00.₹169.00Current price is: ₹169.00. Save ₹56 Add to cart -
Sale! Add to cart'पंतप्रधान इंदिरा गांधी अनेक वर्षे प्रकाशझोतात राहिल्या. साहजिकच त्यांची अनेक रूपे सर्वसामान्यांसमोर आली. तथापि त्या सर्व रूपांपेक्षा अगदी वेगळ्या रूपात त्यांना पाहण्याची, अनुभवण्याची दुर्मीळ संधी त्यांच्या स्वीय डॉक्टरना लाभली. त्या डॉक्टरना इंदिराजी कशा दिसल्या, किती भावल्या, हे त्यांनी या पुस्तकात मोठ्या रोचकपणे सांगितले आहे. दृष्टीआडच्या इंदिरा गांधी
रसग्रहण / समीक्षाRajeev Sane Yanchi Sulat Tapasani | राजीव साने यांची सुलटतपासणी
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read more'नाटक पाहणे म्हणजे फक्त औट घटकेची करमणूक नाही. कधी हसवणारा, सुखवणारा, कधी रडवणारा, दुखवणारा कधी अंगावर धावणारा, कधी सारं मन सोलवटणारा, कधी बेभान करणारा, कधी आपल्याच मनाचा तळ धुंडणारा असा हा रंगभूमीवरचा खेळ. हा खेळ रंगून खेळणारे कलाकार प्रेक्षकांना निव्वळ गुंग करणारा खेळ दाखवत नाहीत, तर अविस्मरणीय असा जीवनानुभव देतात. अशा जीवनानुभवाच्या परिमाणाने रंगभूमीचे अवकाश भरून काढण्यासाठी धडपडणारी आधुनिक रंगभूमी. या आधुनिक रंगभूमीवरचे नाटक असते कसे ? दिसते कसेb? ते पहावे कसे ? ऐकावे कसे ? आणि मुख्य म्हणजे शोधावे कसे ? या सा-यांचे एक वेगळे भान देणारी समीक्षा.
रसग्रहण / समीक्षाRanga Natkache | रंग नाटकाचे
₹225.00Original price was: ₹225.00.₹169.00Current price is: ₹169.00. Save ₹56 Read more -
Sale! Add to cart'ज्ञानपीठ-पुरस्कारप्राप्त डॉ.भालचंद्र नेमाडे यांचा केवळ कादंबरीकारच नव्हे तर देशीयतेचा सिद्धांत मांडणारे समीक्षक या नात्याने मराठी वाङ्मयजगतात एक दबदबा आहे. मराठी लेखकांच्या साठोत्तरी पिढ्यांतील अनेक लेखकांचे ते एक श्रद्धास्थान आहेत. त्यांच्यावर कितीही प्रतिकूल टीका झाली, तरी अनेक लेखकांची त्यांच्यावरची श्रद्धा अढळ राहते. साठोत्तरी मराठी वाङ्मयक्षेत्रावर असा अभूतपूर्व प्रभाव पाडणारे ते एकमेव लेखक आहेत. त्यामुळे त्यांच्यावर लिहिल्या गेलेल्या वा लिहिल्या जाणाऱ्या अनुकूल वा प्रतिकूल लेखनाला आपोआपच भावनिक रंग चढलेले दिसून येतात. डॉ. सुधीर रसाळ यांनी डॉ. भालचंद्र नेमाड्यांच्या वाङ्मयविषयक भूमिकेची तटस्थ, अवैयक्तिक आणि वस्तुनिष्ठ चिकित्सा या ग्रंथात केली आहे. मराठी वाङ्मयात समीक्षक नेमाड्यांच्या समीक्षालेखनाचे मूल्य काय आणि एक समीक्षक या नात्याने मराठी समीक्षेत डॉ.नेमाड्यांचे स्थान काय, याची शास्त्रशुद्ध, तर्कबद्ध मीमांसा अन् मूल्यमापनात्मक समीक्षा म्हणजे समीक्षक भालचंद्र नेमाडे
रसग्रहण / समीक्षाSamikshak Bhalchandra Nemade | समीक्षक भालचंद्र नेमाडे
₹140.00Original price was: ₹140.00.₹105.00Current price is: ₹105.00. Save ₹35 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreजिगसॉबाबत पहिली गोष्ट म्हणजे अलीकडच्या काळात, व्यक्तिचित्रांच्याच नव्हे, तर इतर कोणत्याही पुस्तकानं मला इतकं गुंतवून ठेवलं नव्हतं. यातली बरीच माणसं माझ्या व्यक्तिविशिष्ट परिचयातली. त्यामुळे तीही उत्सुकता होती. पण लेख वाचल्यावर ह्या व्यक्तींची - अगदी जवळच्याही - नव्यानं ओळख होतेय, असं मला वाटलं. जी माणसं अपरिचित होती, तीही खूप जवळ, अगदी हस्तांदोलनाच्या अंतरावर आल्यासारखं वाटलं. ही तुमच्या लेखनाची करामत. ती मला खरोखरच थक्क करणारी होती. त्यात एक आनंददायक अपेक्षाभंग होता. इतकं अव्वल दर्जाचं लेखन तुम्ही करू शकता, हे मला माहीत नव्हतं. चित्रकार समोर ठेवलेल्या वस्तूचं वा दृश्याचं बारकाईनं निरीक्षण करतो आणि आपल्याला जाणवलेल्या रूपात, रंगात त्याचं चित्रण करतो - त्यात तटस्थता असते, पण त्रयस्थता नसते. निवड करताना त्या दृश्याशी तो एका भावबंधनाने जोडलेला असतो. विविध क्षेत्रांतील आणि पातळयांवरील व्यक्तींच्या वृत्तींची आणि कृतींची अलगद हातानं उकल करण्यात तुम्ही अशीच आप्तसंबंधांचं भान ठेवणारी तटस्थता राखलेली आहे. कोठेही भावविवशता नाही, पण कोरडेपणाही नाही. पाणलोट नाहीत, पण अधिक हृद्य वाटणारा ओलावा आहे. प्रेमादर अंध नाही, डोळस आहे. पण त्या दृष्टीतही सर्वत्र आत्मीयतेचं मार्दव आहे. आणि मुख्य म्हणजे ह्या सर्वाला समर्थक अशी नितळ, सरळ पण प्रगल्भ अशी भावशैली आहे. तिला मेकअप करण्याचा प्रयत्न (आम्ही करतो तसा) कोठेही दिसत नाही. एवढंच सांगतो, कलमाई तुमच्यावर प्रसन्न आहे. ती अधिक काही मागते आहे. - वि. वा. शिरवाडकर
रसग्रहण / समीक्षाSaptak | सप्तक
₹160.00Original price was: ₹160.00.₹120.00Current price is: ₹120.00. Save ₹40 Read more
">
Skip to content