संगीत
-
Sale! Add to cart'येथे चित्रित झालं आहे, लावणीचे विविध रंग-ढंग आणि संग दाखविणारं संगीत बारीचं जग ! यात कधी कलेची उन्मत्त बेहोषी आहे. तर कधी फुटल्यातुटल्या मनाची उदासी आहे. इथे कधी नाचणा-या मुलींच्या घुंगराचे दमदार आवाज ऐकू येतात. तर कधी त्यांच्या विझल्या मनाचे उसासेही जाणवतात. संगणक युगाच्या चकचकाटाला छेद देणारी संगीत बारीची स्वतःचीच लुकलुकणारी दुनिया आहे. या दुनियेची ओळख करून देणारे पुस्तक !
संगीतSangeet Bari | संगीत बारी
₹360.00Original price was: ₹360.00.₹270.00Current price is: ₹270.00. Save ₹90 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreडॉ. अशोक दा. रानडे यांच्या लिखाणातून नेहमीच वाचकाला संगीताबद्दलची नवी नजर मिळते. संगीतातील सृजनप्रक्रियेपासून सादरीकरणापर्यंत अनेकविध पैलूंना स्पर्श करणाऱ्या त्यांच्या लेखमालांचे निवडक संकलन म्हणजे हा ग्रंथ. शास्त्रोक्त संगीत, विविध संगीत-परंपरा, नाट्य-संगीत, भावगीत-गायन, संगीतातील साहित्यिक अंग अशा विविध विषयांची मार्मिक मांडणी हे या ग्रंथाचे आगळे वैशिष्ट्य. जयदेव-बैजू-होनाजी अशा इतिहासातून डोकावणाऱ्या कलाकारांपासून रवींद्रनाथ टागोर, गजाननबुवा जोशी, सुब्बलक्ष्मी ते लता मंगेशकर अन् आशा भोसले अशा कित्येक कलाकारांशी डॉ.रानडे वाचकाचे अलगद बोट धरून भेट घडवतात. डॉ. रानड्यांची रसाळ, नर्मविनोदी शैली, अनेक किस्से आणि चुटके यांनी नटलेले हे संगीत विचारप्रवर्तक लिखाण वाचकाला एखाद्या कथा-कादंबरीसारखे गुंतवून ठेवील. मैफलीत पेशकश करणाऱ्या कलाकारांनी, संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी आणि आस्वादक व अभ्यासक संगीतरसिकांनी संगीतकलेच्या व्यापकतेचे भान येण्यासाठी आवर्जून वाचायलाच हवा असा ग्रंथ.
संगीतSangeet Sangatee | संगीत संगती
₹325.00Original price was: ₹325.00.₹244.00Current price is: ₹244.00. Save ₹81 Read more -
Sale! Add to cartसंगीत म्हणजे स्वरांचा आणि स्पंदनांचा खेळ! अतिशय मोहक असे भावविश्व! संगीत न आवडणारी व्यक्ती विरळाच. संगीत कुठल्याही प्रकारचं असो... शास्त्रीय, उपशास्त्रीय, भावसंगीत, चित्रपटसंगीत, लोकसंगीत, पाश्चात्त्य संगीत - ते कुठल्या ना कुठल्या वळणावर आपल्या मनाशी, हृदयाशी संवाद साधतंच. भारतीय शास्त्रीय संगीत तर अशा अनेक संगीतप्रकारांची गंगोत्रीच! सागरासारखं विशाल, गहिरं असं हे संगीत केवळ अलौकिक! एक-एक राग म्हणजे सुंदर स्वरशिल्प! नेहा लिमये या अत्यंत बुद्धिमान, बहुश्रुत अशा लेखिकेनं शास्त्रीय राग उलगडून दाखवताना सिनेगीतांचा, भावगीतांचा उल्लेख केला आहे. ज्यामुळे सर्वच श्रोत्यांना अन् वाचकांनाही वेगळा अनुभव येईल आणि हे पुस्तक अनंत विचारधारांनी संवेदनशील रसिकांची मनं भिजवेल, याची मला खात्री आहे. सावनी शेंडे
All BooksShabda Soor Japoon Thev … | शब्द सूर जपून ठेव
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart -
Sale! Add to cart'डॉ. विद्याधर ओक हे ज्येष्ठ हार्मोनियमवादक, तसेच रागसंगीताचे व्यासंगी अभ्यासक. संगीताच्या ध्यासापोटी औषधविज्ञानक्षेत्रातील करियर सोडून संगीतसंशोधनात रमलेले संशोधक कलावंत. आपल्या कल्पक संशोधनातून श्रुतींची संख्या आणि स्थाने त्यांनी निश्चित केली. जगभरात मान्यताप्राप्त या संशोधनाचे फलित म्हणजेच २२ श्रुती हार्मोनियम. जिद्द, चिकाटी अन् अथक परिश्रमाने भरलेली त्यांची ही शोधगाथा सांगत आहेत प्रख्यात संगीतसमीक्षक आणि पत्रकार सदाशिव बाक्रे. श्रुतिविज्ञान व रागसौंदर्य
संगीतShrutividnyan Va Ragsaundarya | श्रुतिविज्ञान व रागसौंदर्य
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartभारतीय स्वरभाषेचा जन्म भावार्थसौंदर्य अभिव्यक्त होण्यासाठी म्हणूनच झाला आहे. यासाठी ज्या मार्गाचा अवलंब केला पाहिजे, त्या मार्गालाच शास्त्रीय संगीत म्हणणे योग्य ठरेल. या मार्गाचे पूर्ण अवलोकन किंवा पूर्ण ज्ञान हे रससिद्धांताच्या ज्ञानाखेरीज अपूर्ण आहे. भारताचे शास्त्रीय संगीत हे लोकरंजनापेक्षा, मनोरंजनापेक्षा आत्मरंजनासाठी आहे किंवा आत्माशोधासाठी, आत्मानंदासाठी आहे, असे म्हणणे अधिक योग्य ठरेल.
संगीतSwarartharamni | स्वरार्थरमणी
₹400.00Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00. Save ₹100 Add to cart -
संगीत
Swaryadnya | स्वरयज्ञ
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Read more -
Sale! Add to cartवाद्यांच्या विविधरंगी विश्र्वाचे आणि भारतीय संगीतसंस्कृतीचे अनोखे दर्शन घडवणारे वाद्यवेध आणि भारतीय संगीताची मूलतत्त्वे
संगीतVadyavedh | अलख
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreबासरीवर काही राग वाजवताना मर्यादा पडते ही गोष्ट पं.केशव गिंडे यांना अस्वस्थ करीत होती. अनेक वर्षे या अशा स्थितीत घालवल्यावर चिंतन-मननातून ही मर्यादा पार करण्याचे मार्ग त्यांना सापडले. त्यांच्या चिंतनातून नव्या प्रकारच्या बासरीचा जन्म तर झालाच; पण मंद्र, अतिमंद्र, मध्य, तार, अतितार अशा कुठल्याही सप्तकात लीलया फिरता येऊ शकेल अशा बासरीचा जन्म झाला. - पं.विकास कशाळकर पं.गिंडे गुरूजींनी हे पुस्तक लिहून मोठेच काम केले आहे. त्यांच्या चिकाटीला, नव्या वाटा शोधणा-या बुध्दीला आणि मऊ मुलायम सुराला, त्यांच्या संगीतातील शुध्दतेला माझा सलाम. हे पुस्तक दूरवर पसरेल आणि अनेकांना बासरी वाजवण्याची एवढेच नाही तर या वाद्यात प्रयोग करण्याची गोडी लागू शकेल. - डॉ.अनिल अवचट
संगीतVenu Vidnyan | वेणु विज्ञान
₹490.00Original price was: ₹490.00.₹368.00Current price is: ₹368.00. Save ₹122 Read more
">
Skip to content