संगीत
-
Out of stock
Out of stock
Sale! Read moreसंगीत या कमालीच्या अमूर्त आणि शब्दांचा जाच नाकारणा-या कलाप्रकाराची समीक्षा, सौंदर्य-शास्त्राचे व्याकरण टाळून, आस्वादक रूपाने कशी करावी याचा वस्तुपाठ हा ग्रंथ देतो. संगीतक्षेत्राच्या क्षितीजावर कायम घुटमळणा-या लक्षवेधी प्रश्नांवरील परखड चर्चेबरोबरच, अनेक तीर्थरूप आणि प्रात:स्मरणीय सांगीतिक व्यक्तिमत्वांचा सविस्तर व थेट वेध या ग्रंथात घेतला आहे. विलक्षण प्रत्ययकारी शैलीत लिहिलेला हा ग्रंथ म्हणजे नादब्रह्माची एक अखंड मैफलच आहे.
संगीतAswadak Sangeet Samiksha | आस्वादक संगीत समीक्षा
₹160.00Original price was: ₹160.00.₹120.00Current price is: ₹120.00. Save ₹40 Read more -
Sale! Add to cart‘सूक्ष्म को स्थूल का सदैव अवलोकन करना चाहिए तथा सूक्ष्म की ओर अग्रेसर होने तक ही स्थूल का अस्तित्व रहे' यह मूलमंत्र देता है हमारा भारतीय शास्त्रीय संगीत । कैसे चलता है यह स्थूल - सूक्ष्म का अंत:संचार ? किन सिध्दांतोंसे खिलता है हिंदुस्तानी संगीत ? घराने की सीमा का जतन करें या तोड दें ? साथ किसे कहते हैं? और संगत का क्या मतलब है? संगीत ही अर्चना, वही साधना, उपासना भी, इस मानक से तबले की तपश्चर्या में लीन तालयोगीका संगीत के बारेमें गहन, चौगिर्द चिंतन
All BooksAwartan (Hindi) | आवर्तन (हिंदी)
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart -
Sale! Add to cartसूक्ष्मानं स्थूलाचं भान ठेवावं अन् सूक्ष्माकडे झेपावण्यासाठीच स्थूलाचं अस्तित्व असावं हा आहे भारतीय संगीतचा मंत्र कसा चालतो हा स्थूल-सूक्ष्माचा अंतर्संवाद ? कोणत्या तत्त्वांमधून फुलतं हिंदुस्थानी संगीत ? घराण्यांची चौकट जोडावी की मोडावी ? साथ म्हणजे काय ? अन् संगत म्हणजे ? संगीत हीच अर्चना, तीच साधना, उपासना असं मानून तबला तपश्चर्येत रमलेल्या तालयोग्याचं संगीताबद्दलचं सखोल, चौफेर चिंतन आवर्तन
संगीतAwartan | आवर्तन (marathi)
₹375.00Original price was: ₹375.00.₹281.00Current price is: ₹281.00. Save ₹94 Add to cart -
Sale! Add to cartएखादा राग किंवा एकच बंदिश आपल्या देशात वेगवेगळ्या तर् हेनं गायली गेली आहे. मिले सूर मेरा तुम्हारा... कारण आपलं गाणं मिळतं-जुळतं, कारण आपण सगळे सारखे ' असल्या भ्रामक अन् सपक राष्ट्रीय एकात्मतेपेक्षा आपल्या रागसंगीतातील आर्काईव्ह साकार करणारी राष्ट्रीय व्यामिश्रता फार अस्सल अन् आकर्षक आहे. तीच आहे आपल्या संगीताच्या ठेव्याची श्रीमंती! या श्रीमंतीची नवी उमज आणि गाण्याची नवी समज करून देत आहेत सत्यशील देशपांडे. संगीतातील घराणी अन् त्यांची वैशिष्ट्यं, दिग्गज कलावंतांचे खुमासदार किस्से, रागसंगीताबद्दलचा वेगळा अनवट नजरिया अशा विविध गोष्टींनी नटलेलं हे पुस्तक केवळ वाचण्याचं नाही, तर ऐकण्याचंही आहे. पुस्तकात दिलेले QR कोड स्कॅन करून वाचक विविधरंगी मैफिलींचा सुश्राव्य आस्वाद घेऊ शकतात. समीक्षकांपासून रसिकांपर्यंत, पेन'सेनांपासून कान'सेनांपर्यंत सार् यांना सहप्रवासी बनवणारी एक सांगीतिक यात्रा !
All BooksGaan Gunagan | गान गुणगान
₹450.00Original price was: ₹450.00.₹338.00Current price is: ₹338.00. Save ₹112 Add to cart -
Sale! Add to cartसंगीत आपण का ऐकतो? वेळ कसा घालवावा, हा प्रश्न सोडवण्यासाठी नक्कीच नाही. जाणते-अजाणतेपणी संगीत जीवनाचे अविभाज्य अंग बनले आहे. जावेद अख्तर यांच्या शब्दात सांगायचे झाले, तर - धडकन ताल है, सांस है सूर, जीवन है एक गीत'. संगीत जुने असो वा नवे, आपले' असो वा त्यांचे' शास्त्रीय-उपशास्त्रीय असो वा चित्रपटसंगीत, त्यातले बारकावे जाणून घेण्याच्या मधुकर वृत्तीने वारंवार ऐकत राहिलो, तर सुरुवात होते कानसेन रसिक होण्यास! नवी-जुनी गाणी ऐकताना त्यामधील उमजलेल्या बारकाव्यांची आस्वादकाच्या भूमिकेतून केलेली मांडणी म्हणजे चित्रपटसंगीताची अन् वाद्यसंगीताची सुरीली मैफील -
All BooksGata Rahe… | गाता रहे…
₹500.00Original price was: ₹500.00.₹375.00Current price is: ₹375.00. Save ₹125 Add to cart -
Sale! Add to cartपौर्णिमेच्या रात्रीचं निरभ्र आकाश... ग्रह-तारे-नक्षत्रांचा सडा घातलाय वरती अन् हिरवागार गालिचा पसरलाय धरतीवरती ! असाच अपलक आभास नि आनंद होत राहतो, मदन मोहनची गीतसंपदा अनुभवताना ! मदन मोहन यांची गाणी दुःखी असतात? कोण म्हणतं? धैर्य लागतं दर्द आणि मदन मोहन समजायला. दुबळ्या माणसाचं काम नाही ते... इतक्या साऱ्या संगीतकारांच्या मेळ्यात, गज़लने प्रेमात पडण्यासाठी निवड केली ती मदन मोहनचीच, हा एक शुभयोगच... मदन मोहन अन् लताच्या गज़ल म्हणजे प्राजक्ताचे टप्पोरे अश्रूच ! मदन मोहनबरोबर फार चित्रपट करू शकलो नाही, याबद्दल गुलजार यांनी खेद प्रकट केला. अहो, आम्ही रसिक तर रोज हळहळत असतो ! मदन मोहन गेले पन्नाशीतच. पण गाणी टिकून राहिली. सच्ची कला काळाच्या भक्ष्यस्थानी कधीच पडत नाही... मदन मोहनच्या अमर संगीताचा, रसिक लेखक अंबरीश मिश्र यांनी घेतलेला ललितसुंदर शोध...
All BooksGazalgandharva Madan Mohan | गज़लगंधर्व मदन मोहन
₹180.00Original price was: ₹180.00.₹135.00Current price is: ₹135.00. Save ₹45 Add to cart -
Sale! Add to cart'भारतीय शास्त्रीय संगीत के क्षेत्र में अपनी बहुमुखी प्रतिभा से कभी न मिटनेवाली नाममुद्रा अंकित करनेवाले युगप्रवर्तक संगीतकार, वाग्गेयकार, गायक पंडीत कुमार गंधर्व की नब्बेवी जन्मजयंती के उपलक्ष्य में कालजयी कुमार गंधर्व यह ग्रंथ दो भागों में संपादित किया गया है। पंडित कुमार गंधर्व की प्रखर प्रतिभा, प्रयोगशीलता के संदर्भ में उनकी सांगीतिक विचारशीलता का मर्म समझाने का प्रयास इन ग्रंथो में किया गया है। हिंदी-अंग्रेजी(संयुक्त) एवं मराठी भाषाओं में छपे यह दोनों ग्रंथ स्वतंत्र हैं। इनमें समाविष्ट किये गए लेख भाषांतरित न होकर भिन्न भिन्न है। कभीभी, किसीभी पृष्ठ को खोलकर पढने का आनन्द पाठकों को इन संग्राह्य ग्रंथों के माध्यम से मिल सकेगा ।
संगीतKaljayi Kumar Gandharva (Hindi-English) | कालजयी कुमार गंधर्व (हिंदी-इंग्रजी)
₹1,000.00Original price was: ₹1,000.00.₹750.00Current price is: ₹750.00. Save ₹250 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read more'भारतीय शास्त्रीय कंठसंगीताच्या क्षेत्रामध्ये आपल्या बहुमुखी प्रतिभेची कधीही न पुसता येणारी ठाशीव मुद्रा उमटविणारे श्रेष्ठ वाग्गेयकार, संगीतकार व गायक म्हणजे कुमार गंधर्व ! त्यांच्या चैतन्यपूर्ण अस्तित्वाचा, प्रयोगशीलतेचा आणि वैचारिकतेचा शोध घेण्याचा प्रयत्न कालजयी कुमार गंधर्व या मराठी आणि हिंदी-इंग्रजी (संयुक्त) अशा द्विखंडात्मक ग्रंथामध्ये केला आहे. प्रत्येक खंड स्वतंत्र आहे. यामध्ये समाविष्ट केलेले लेख वेगवेगळे आहेत. भाषांतरित नाहीत. कोणाही रसिकाला कधीही, कोणतेही पान उघडून वाचावासा वाटेल, असा हा संग्राह्य ग्रंथ आहे.
संगीतKaljayi Kumar Gandharva (Marathi) | कालजयी कुमार गंधर्व (मराठी)
₹1,000.00Original price was: ₹1,000.00.₹750.00Current price is: ₹750.00. Save ₹250 Read more -
Sale! Add to cartहा आहे एका चिरंजीव मैत्रीचा प्रवास. म्यूझिक क्लासमधल्या बाकावर सुरू झालेला आणि पाच दशके फुलत गेलेला. मित्रांच्या या जोडीतले कुमार गंधर्व आपला चिरतरुण, सदाबहार स्वर मागे ठेवून अनंताच्या प्रवासाला गेले असले; तरी या मैत्रीचा प्रवास चालू आहे. डॉ. चंद्रशेखर रेळे यांच्या मनात तो रुणझुणतो आहे. असंख्य स्वरांनी, आठवणींच्या हिंदोळयांनी, स्मरणातून उमटणा-या चित्रपटांनी आणि कुमारांच्या आजही होणा-या अलौकिक स्पर्शांनी. दोस्तीचा हा विलक्षण ऐवज डॉ. रेळे आता वाचकांच्या स्वाधीन करत आहेत. भारतीय संगीतातल्या दोन दिग्गजांच्या या वाटचालीत आता वाटसरू होत आहेत मराठी वाचकही... कुमार माझा सखा !
संगीतKumar Maza Sakha | कुमार माझा सखा
₹160.00Original price was: ₹160.00.₹120.00Current price is: ₹120.00. Save ₹40 Add to cart
">
Skip to content