समाजकारण / राजकारण
-
समाजकारण / राजकारण
Panya Tuza Ranga Kasa? | पाण्या तुझा रंग कसा?
₹400.00Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00. Save ₹100 Add to cart -
Sale! Add to cartसमाजाने वेशीबाहेर ढकललेल्या आणि ख-याखु-या स्वातंत्र्यापासून आजही वंचित राहिलेल्या एका अन्यायग्रस्त जमातीची ही आक्रोशकथा आहे... त्या जमातीच्या व्यथावेदनांशी समरस होऊन त्या सग्यासोय-यांच्या उत्कर्षासाठी झटणा-या एका तळमळीच्या कार्यकर्त्याने ही मांडलेली कैफियत आहे...
समाजकारण / राजकारणParadhi | पारधी
₹450.00Original price was: ₹450.00.₹338.00Current price is: ₹338.00. Save ₹112 Add to cart -
Sale! Add to cart'मन म्हणजे काय? कुठे असते ते ? कसे घडते ते ? काय असते मनात ? काय चालते मनात ? मनाचे आरोग्य म्हणजे नेमके काय ? कसे राखायचे हे आरोग्य ? कसे रोखायचे औदासीन्य वा स्किझोफ्रीनियासारखे मनोविकार ? काय असतात मनोविकारांवरचे उपचार ? मनाचा अन् व्यक्तीच्या स्वभावाचा काय संबंध ? कसा जडतो संबंध व्यक्तीच्या मनाचा अन् समाजमानसाचा ? समाजातल्या रूढी अन् अंधश्रद्धांचा आणि मनाचा एकमेकांवर काय परिणाम होतो ? अशा आपल्याही मनात उठणा-या अनेक प्रश्नांची एक मनोविकारतज्ज्ञ आणि एक हाडाचा सामाजिक कार्यकर्ता अशा दोघांनी मिळून केलेली उकल
समाजकारण / राजकारणPrashna Manache | प्रश्न मनाचे
₹190.00Original price was: ₹190.00.₹143.00Current price is: ₹143.00. Save ₹47 Add to cart -
Sale! Add to cartप्रेषितांनी निर्माण केलेले हे (इस्लामचे) जागतिक आंदोलन त्यांच्या अनुयायांनी विजयी मोहिमांच्या लाटांवर स्वार होऊन, जगाच्या एका टोकापासून दुस-या टोकापर्यंत नेले. शतकानुशतके परस्परांत लढाया व रक्तपात करणा-या टोळ्यांची मायभूमी असलेला अरबस्थान अचानक चेतना निर्माण होऊन समान उद्देशाने पेटून उठला... जगाच्या कानांकोप-यात नेण्यासाठी त्यांनी इस्लामचा ध्वज हातात धरला... तीस वर्षांच्या आत - आदर्श खलिफांच्या काळात - त्यांनी प्रचंड साम्राज्य उभे केले, जे तेराशे वर्षे सातत्याने प्रयत्न करूनही रोमनांनी उभारलेल्या प्रचंड साम्राज्यापेक्षाही विशाल होते. - न्या. अमीर अली "हे ऐकून कोणीही अगदी चकित होऊन जाईल की, अरबस्थानच्या वाळवंटातून निघालेल्या व नव्या धर्मोत्साहाने पेटून उठलेल्या काही भटक्या टोळ्यांनी, विश्वास बसणार नाही इतक्या द्रुतगतीने, प्राचीन काळातील दोन महाबलाढ्य साम्राज्यांना जमीनदोस्त केले... केवळ तीस वर्षांच्या आत प्रेषित मुहंमद यांच्या अनुयायांनी इस्लामचा विजयी ध्वज एका टोकाला भारताच्या वेशीवर, तर दुस-या टोकाला अटलांटिकाच्या किना-यावर नेऊन उभा केला... (त्यांच्याकडून) दहा वर्षांच्या आत पराभूत होण्यासाठीच जणू सुमारे एक हजार वर्षे रोमनांच्या सैन्याला यशस्वी टक्कर देत पर्शियन साम्राज्य (तोवर) जिवंत राहिले होते. - मानवेंद्रनाथ रॉय इस्लामला मिळालेला हा विजय (जगातील) सर्व चमत्कारांतील महत्तम चमत्कार होय. प्रा. मसुदुल हसन / मानवेंद्रनाथ रॉय
समाजकारण / राजकारणPreshitannatrache Pahile Char Aadarsh Khalifa | प्रेषितांनंतरचे पहिले चार आदर्श खलिफा
₹850.00Original price was: ₹850.00.₹638.00Current price is: ₹638.00. Save ₹212 Add to cart -
Sale! Add to cartमला इथं स्त्रीच्या दुबळेपणाबद्दल बोलायचं नाहीय. पुरुषाच्या दुर्गुणांची यादीही वाचायची नाहीय. मला लिहायचंय ते स्त्रीच्या अंगभूत गुणवत्तेविषयी आणि प्रतिकूलतेवर मात करणा-या तिच्या कणखरपणाविषयी !
All BooksPunha Ekada ‘Stri-Purush’ Tulana | पुन्हा एकदा स्त्री पुरुष
₹275.00Original price was: ₹275.00.₹206.00Current price is: ₹206.00. Save ₹69 Add to cart -
Sale! Add to cart'जवळजवळ एक तप महाराष्ट टाइम्सचे विशेष प्रतिनिधी म्हणून राजधानी दिल्लीत काम करताना अशोक जैन यांनी अनेक राजकीय चढउतार पाहिले. जनता पक्षाची पडझड, इंदिरा गांधींचं पुनरागमन, जुन्या पक्षांची तोडफोड, नव्या पक्षांची स्थापना, इंदिरांजींची हत्या, राजीव गांधींची कारर्कीद -- या सर्व घडामोडीचे साक्षीदार असलेल्या जैन यांना कधी कोणाच्या नावाचा टिळा लावला नाही किंवा कोणत्याही पक्षाची पताका खांद्यावर घेतली नाही. एका तटस्थ पत्रकाराच्या भूमिकेतून त्यांनी अनेक नेत्यांची व घटनांची रोमहर्षक शब्दचित्र रेखाटून तो अवघा माहोल आपल्या रसरशीत शैलीत उभा केला. राजकारणाची व दिल्लीची स्पंदनं टिपणारं हे चटकदार लेखन जणू चकित करणा-या, चकविणा-या, चक्रावून टाकणा-या दिल्लीची आधुनिक बखरच ! धावती, ओघवती नि झगमगती ! '
समाजकारण / राजकारणRajdhanitun | राजधानीतून
₹480.00Original price was: ₹480.00.₹360.00Current price is: ₹360.00. Save ₹120 Add to cart -
Sale! Add to cartलेखकाला पूर्ण स्वातंत्र्य असेल, तरच त्याच्या मनातले लेखनात उतरते. अलीकडील काळात शासनाबरोबरच सामाजिक असहिष्णुतेचे दडपण लेखकावर येऊ लागले आहे. समाजात निर्माण झालेली दहशतीची भावना सामान्य माणसांपेक्षाही प्रतिभावंतांना अधिक जाणवते. मग एक तर ते स्तब्ध होतात किंवा वैचारिक संघर्षाला उभे राहतात. प्रत्येक जण सॉक्रेटिस होऊन शांतपणे विषाचा प्याला पिऊ शकत नसतो. त्याला मग न लिहून शहाणे तरी व्हावे लागते, अगर आपल्या स्वातंत्र्याची बूज राखणारा, त्याचा आदर करणारा उदार समाज अस्तित्वात येईल याची वाट पाहावी लागते. राजकारणातली मंडळींना, ते जाहीरपणे काहीही बोलत असले, तरी निर्भीड नागरिकांचे, लेखकांचे स्वातंत्र्य नकोच असते. साहित्यिक आपल्याला जागे करण्याचा प्रयत्न करीत असतात. पण मुख्य जबाबदारी असते आपली स्वत:ची. आपल्या विचार, लेखन आणि वाचनस्वातंत्र्याचे रक्षण जागरूकपणे आपणच करावयाचे असते. ही जागरूकता जपण्यासाठी विचार करणा-या प्रत्येक सुजाण व्यक्तीने आवर्जून वाचलेच पाहिजे, असे -
All BooksSahitya Ani Svatantrya | साहित्य आणि स्वातंत्र्य
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartयेशू ख्रिस्त म्हणजे सा-या जगाला दयेचा, शांतीचा संदेश देणारी करूणामूर्ती. पण त्या प्रेषिताची जन्मभूमी आणि कर्मभूमी असणारा पॅलेस्टाइनचा प्रदेश सध्या ज्यू विरूद्ध अरब अशा संघर्षाच्या दुष्टचक्रात सापडला आहे. त्या रक्तबंबाळ ख्रिस्तभूमीची व्यथा समजून घेण्याच्या इराद्याने वारंवार त्या प्रदेशाची यात्रा करून आलेल्या एका मानवतावादी ख्रिस्ती भाविकाची साक्षेपी निरीक्षणे नोंदवणारे हे पुस्तक. विसावे शतक व्यापणा-या ज्यू-अरब संघर्षाचा ऐतिहासिक वेध घेता घेता तीन धर्मांच्या श्रद्धांशी निगडीत असणा-या त्या प्रदेशाची आगळी सफरही घडवून आणणारे हे शैलीदार पुस्तक धुमसत्या पश्चिम आशियाकडे पाहण्याची एक नवी दृष्टी बहाल करते.
समाजकारण / राजकारणSangharshayatra Khristabhumichi | संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची
₹290.00Original price was: ₹290.00.₹218.00Current price is: ₹218.00. Save ₹72 Add to cart -
Sale! Add to cart'कोर्टाची पायरी चढणं नको, असंच बहुसंख्य महिलांना वाटत असतं. पण आता काळ बदललाय. जिथं कधीकाळी सतीबंदीचा कायदाही बिचकत करावा लागला होता, तिथंच आज लिव्ह-इन रिलेशनशिप ला कायद्याची मान्यता द्या, असा दबाव येतोय. जिथं स्वत: जन्माला घातलेल्या मुलावरसुद्धा बाईचा कायदेशीर अधिकार नव्हता, तिथंच आज सरोगसी द्वारे मूल मिळवण्याचा अधिकार हवासा वाटतो आहे. स्त्रीचा, तिच्या आणि समाजाच्याही मानसिकतेचा हा लांबलचक प्रवास समजून घेण्यासाठी आणि कायद्याबद्दलची किमान साक्षरता मिळवण्यासाठी सर्व महिलांनी हे पुस्तक वाचायलाच हवं.
समाजकारण / राजकारणSati Te Sarogasi | सती ते सरोगसी
₹225.00Original price was: ₹225.00.₹169.00Current price is: ₹169.00. Save ₹56 Add to cart -
Sale! Add to cartस्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे गैरसमज आणि विपर्यास असा दुहेरी शाप मिळालेले महापुरुष. अनुयायांनी त्यांना नीट जाणून घेतले नाही आणि विरोधकांनीही त्यांच्याबद्दलचे पूर्वग्रह कधी दूर सारले नाहीत. त्यांच्याबद्दलच्या मतमतांतराच्या गदारोळात त्यांचे खरे विचार समजून घेऊन त्यांचे मूल्यमापन करणे भल्याभल्या विचारवंतांनाही जमले नाही. या पार्श्वभूमीवर सावरकरी विचारांबद्दलच्या अनेक मूलभूत प्रश्नांची वस्तुनिष्ठ उत्तरे देणारा, खरे बुद्धिवादी सावरकर समजावून देणारा आणि गैरसमज व विपर्यास या दुहेरी शापातून त्या महापुरुषाची सुटका करणारा हा ग्रंथ... सावरकरांचे हिंदुत्व म्हणजे आहे तरी काय ? त्यांनी हिंदुराष्ट्राचा वा तथाकथित द्विराष्ट्रवादाचा पुरस्कार केला होता म्हणजे नक्की कशाचा पुरस्कार केला होता ? त्यांना अभिप्रेत असणा-या राज्यघटनेचा पाया कोणता होता धर्मग्रंथ की अद्ययावत बुद्धिप्रामाण्य ? त्या घटनेनुसार अहिंदूंना कोणकोणते हक्क मिळणार होते ? या व अशाच इतर असंख्य प्रश्नांची साधार, मूलगामी उत्तरे देणारा हा विचारप्रवर्तक ग्रंथ भारतीय राजकारणाचे धागेदोरे समजून घेऊ इच्छिणा-या सर्वांनी आवर्जून वाचलाच पाहिजे.
समाजकारण / राजकारणSavarkarancha Buddhivad Ani Hindutvavad | सावरकरांचा बुध्दिवाद आणि हिंदुत्ववाद
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart
">
Skip to content
