नवी पुस्तके, नवे विषय
-
Sale! Add to cartवि. ग. कानिटकर ख्यातनाम मराठी साहित्यिक, व्यासंगी वाचक, जागतिक राजकारणाचे अभ्यासक, बदलत्या समाजकारणाचे भाष्यकार, संतसाहित्याचे आस्वादक, कादंबरीकार, कथाकार, विनोदी, मार्मिक सदरलेखक. त्यांच्या अर्धशतकी साहित्यिक कारकिर्दीमधले हे काही महत्त्वाचे टप्पे. साक्षेपाने निवडलेले, संदर्भासह मांडलेले. लेखक काळाच्या पडद्याआड जातात. खूप सारं लेखन मागे ठेवून जातात. त्यांच्या पुनर्भेटीचा आनंद आणि त्यांच्या काळाचा पुनःप्रत्यय घेण्यासाठी अशा अक्षरछायेत काही काळ विसावायला हवंच
All BooksAksharchhaya | अक्षरछाया
₹750.00Original price was: ₹750.00.₹563.00Current price is: ₹563.00. Save ₹187 Add to cart -
Sale! Add to cartस्वयंपाकघर असो अथवा वास्तुशास्त्र. विद्यार्थी असोत अथवा पोलीस. प्रतिकारशक्तीचे वर्धन असो वा अवयवदान. वंध्यत्व असो वा गर्भारपण. विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या कितीतरी व्यक्ती. त्यांच्या कार्यपद्धतीचा, जीवनशैलीचा सम्यक विचार डोळ्यांपुढे ठेवून आहार-व्यायाम-विश्रांती-विचार या महत्त्वपूर्ण बाबींवर सोप्या पण अत्यावश्यक टिप्स देणारा आरोग्य संवाद
All BooksArogyasamvad | आरोग्य संवाद
₹320.00Original price was: ₹320.00.₹240.00Current price is: ₹240.00. Save ₹80 Add to cart -
Sale! Add to cart‘सूक्ष्म को स्थूल का सदैव अवलोकन करना चाहिए तथा सूक्ष्म की ओर अग्रेसर होने तक ही स्थूल का अस्तित्व रहे' यह मूलमंत्र देता है हमारा भारतीय शास्त्रीय संगीत । कैसे चलता है यह स्थूल - सूक्ष्म का अंत:संचार ? किन सिध्दांतोंसे खिलता है हिंदुस्तानी संगीत ? घराने की सीमा का जतन करें या तोड दें ? साथ किसे कहते हैं? और संगत का क्या मतलब है? संगीत ही अर्चना, वही साधना, उपासना भी, इस मानक से तबले की तपश्चर्या में लीन तालयोगीका संगीत के बारेमें गहन, चौगिर्द चिंतन
All BooksAwartan (Hindi) | आवर्तन (हिंदी)
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart -
Sale! Add to cartआज भारतात अनेक चॉकलेट उत्पादक दाखल झाले आहेत, परंतु कॅडबरीचं स्थान मात्र भारतीय मार्केटमध्ये आणि भारतीयांच्या मनात अढळ आहे. चहाच्या व्यापारातून सुरू झालेल्या एका छोट्या दुकानाचं एका मोठ्या उद्योगाच्या साम्राज्यात रूपांतर होण्याच्या पाठीमागे होते अथक प्रयत्न, सहनशीलता, चातुर्य, प्रत्येक पिढीनं दिलेलं योगदान, कर्मचाऱ्यांनी दिलेली प्रामाणिक साथ आणि ग्राहकांचा विश्वास.
नवी पुस्तके, नवे विषयCadbury | कॅडबरी
₹380.00Original price was: ₹380.00.₹285.00Current price is: ₹285.00. Save ₹95 Add to cart -
Sale! Add to cartपूर्व बंगालमधील सोळाव्या शतकातील कवयित्री चंद्रावती. लोकसारणीनं तिनं रचलेली काव्यं उत्तरकालीन बंगाली संशोधन परिश्रमपूर्वक अभ्यासली आणि जगासमोर आणली. आता डॉ. माधवी भट यांनी त्या कवयित्रीचा परिचय समग्रतेनं मराठी जगाला करून दिला आहे. यात चंद्रावतीच्या रचनांचा उत्तम अनुवाद तर वाचकांसमोर येतो शिवाय बंगाली लोकपरंपरेतले अतिशय गोड असे गीतरचनेचे प्रकारही परिचयाचे होतात. चंद्रावतीचं रामायण हे खरं तर 'सीतायन' आहे. पूर्व बंगालच्या मातीतून वर आलेल्या तिच्या काव्यात तिथल्या लोकगीतांचा दरवळ तर आहेच, पण शतकांच्या स्त्रीमनाचा अतिशय उत्कट असा आविष्कारही आहे. रामायणाचं स्त्रीदृष्टीनं केलेलं हे पुनर्वाचन अत्यंत हृदयस्पर्शी आहे. एका अल्पपरिचित पण सशक्त अशा भारतीय कवयित्रीची सर्वांगीण ओळख मराठी साहित्यविश्वाला करून दिल्याबद्दल डॉ. माधवी भट यांना मनःपूर्वक धन्यवाद.
All BooksChandravati Ramayan | चंद्रावती रामायण
₹550.00Original price was: ₹550.00.₹413.00Current price is: ₹413.00. Save ₹137 Add to cart -
Sale! Add to cartअफाट आर्थिक उलाढाल करणारं कॉर्पोरेट जग.
या जगात माणसं विकली जातात आणि खरेदी केली जातात.
त्यात फक्त पैसाच गुंतलेला नसतो.
त्यात गुंतलेले असतात अनेक भलेभुरे लोक.
अडकलेली असतात वेगवेगळ्या पातळ्यांवरची नाती.
पणाला लागतात नीति-अनीतीची परिमाणं.
घडवल्या अन् बिघडवल्या जातात कायद्याच्या चौकटी.
या चौकटींच्या एका टोकाला कुठलाही विधिनिषेध न बाळगता
हिंसेचं थैमान घालणारे क्रूर दहशतवादी ;
तर दुसर्या टोकाला कारस्थानाची फोड करत,
धागा धागा उलगडत त्याचा वेध घेणारा पोलीस अधिकारी.निर्दय अन् अमानुष कॉर्पोरेट जगाचा वेध घेणारी,
वाचकाला खिळवून ठेवणारी उत्कंठावर्धक कादंबरी.कादंबरीChittathararak | चित्तथरारक
₹400.00Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00. Save ₹100 Add to cart -
Sale! Add to cartत्याच्याजवळ ना पैसा होता, ना कुणाचे पाठबळ. हातावरचे पोट असलेले आईवडील अन् गरिबीच्या उन्हात उभे राहिलेले घर. पण तो फक्त नावापुरता 'ज्ञानेश्वर' नव्हता. आपल्या बुद्धिमत्तेला त्याने चिकाटीची धार चढवली. विलक्षण जिद्द अन् अभ्यासाच्या सातत्यातून तो प्रख्यात शल्यविशारद झाला. हा अवघड वळणाचा प्रवास सांगणारी एका समर्पित सर्जनची संघर्षकहाणी...
All BooksDhulakshare Te Shalyakaushalya | धुळाक्षरे ते शल्यकौशल्य
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart -
Add to cartपरदेशी भाषेतील कथाकारांच्या कथा वाचताना
अशा काही कथा काही वर्षांपूर्वी माझ्या वाचनात आल्या ज्या वाचल्यावर काहीतरी अद्भुत असं गवसल्याचा मला आनंद झाला.
या कथा माझ्या देशाच्या भूमीपासून हजारो मैल दूर असलेल्या भूमीत घडतात. यातील बर्याचशा माझ्या काळाच्या शंभर वर्षांपूर्वीच्या काळात घडतात. पण त्या मला माझ्या, आपल्या, सगळ्या जगाच्या वाटल्या. काल, आज आणि उद्याच्याही वाटल्या.
मला गवसलेल्या या कथा माझी भाषा बोलणार्यांपर्यंत पोहोचवणं मला आवश्यक आणि आनंददायी वाटणं हा असं वाटण्याचाच परिपाक...
-
Sale! Add to cartपौर्णिमेच्या रात्रीचं निरभ्र आकाश... ग्रह-तारे-नक्षत्रांचा सडा घातलाय वरती अन् हिरवागार गालिचा पसरलाय धरतीवरती ! असाच अपलक आभास नि आनंद होत राहतो, मदन मोहनची गीतसंपदा अनुभवताना ! मदन मोहन यांची गाणी दुःखी असतात? कोण म्हणतं? धैर्य लागतं दर्द आणि मदन मोहन समजायला. दुबळ्या माणसाचं काम नाही ते... इतक्या साऱ्या संगीतकारांच्या मेळ्यात, गज़लने प्रेमात पडण्यासाठी निवड केली ती मदन मोहनचीच, हा एक शुभयोगच... मदन मोहन अन् लताच्या गज़ल म्हणजे प्राजक्ताचे टप्पोरे अश्रूच ! मदन मोहनबरोबर फार चित्रपट करू शकलो नाही, याबद्दल गुलजार यांनी खेद प्रकट केला. अहो, आम्ही रसिक तर रोज हळहळत असतो ! मदन मोहन गेले पन्नाशीतच. पण गाणी टिकून राहिली. सच्ची कला काळाच्या भक्ष्यस्थानी कधीच पडत नाही... मदन मोहनच्या अमर संगीताचा, रसिक लेखक अंबरीश मिश्र यांनी घेतलेला ललितसुंदर शोध...
All BooksGazalgandharva Madan Mohan | गज़लगंधर्व मदन मोहन
₹180.00Original price was: ₹180.00.₹135.00Current price is: ₹135.00. Save ₹45 Add to cart -
Sale! Add to cartमाणूस, निसर्ग, शाळा आणि पाखरांसारखी मुलं हे एकनाथ आव्हाड यांचं भावजीवन. त्यातही आई हे त्यांचं परमदैवत. आईचं काळीज आपल्या कवितेतून नेमक्या आणि हृदयस्पर्शी शब्दांतून व्यक्त करताना त्यांचा विशुद्ध आत्मस्वर आपल्याला ऐकू येतो. आईच्या आणि मुलांच्या संदर्भात लिहिलेल्या कविता वाचताना वाटतं, की या कवीमध्ये एक मूल आहे, एक सुजाण शिक्षक आहे आणि छोटे साने गुरुजीही आहेत. माणुसकीवरील प्रगाढ श्रद्धेमुळं जीवनाकडे पाहताना त्यांना 'जगणं होईल हिरवंगार' असं वाटणं नैसर्गिक आहे. माणुसकीचा अमर्याद आशावाद उराशी बाळगणाऱ्या एकनाथ आव्हाड यांना अशाच प्रेरक लेखनासाठी माझे शुभाशीर्वाद. मधु मंगेश कर्णिक
All BooksJagana Hoil Hiravagar | जगणं होईल हिरवंगार
₹160.00Original price was: ₹160.00.₹120.00Current price is: ₹120.00. Save ₹40 Add to cart
">
Skip to content