All Books
-
Sale! Add to cartमुळात तिरपागडी माणसं मला आवडतात. इतरांना विचित्र वाटणार् या त्यांच्या आयुष्यात मी सहज शिरू शकतो. त्यांच्या आयुष्यातले तुकडे उचलून आणू शकतो. भणंग, सरकलेल्या, गोंधळलेल्या, बिचकलेल्या, कुचंबलेल्या आयुष्यांचे कुणाला न दिसणारे कप्पे मी आयुष्यभर चाचपत राहिलो आहे. त्यात ते १९७०चं दशक. कशाकशाने सतत धुमसत असलेल्या, पेटलेल्या माणसांच्या गर्दीत मी होतो. मीही त्या पेटलेल्या काळासारखाच... भणंग. बेबंद. कशाची पर्वा नसलेला. रक्त गरम होतं. - माणसांच्या त्या जंगलात भेटलेली मॅडम' आणि ओतूरच्या एका जुन्या, पडक्या वाड्याच्या भुसभुशीत जमिनी उकरत सुटलेली भागी! तिचा मुलगा झुंग्या, त्याची सर्कीट भावंडं आणि त्या विचित्र अंधारात लपून राहिलेले त्यांचे लैंगिक गुंते! - यांच्या या दोन दीर्घकथा ! एका गोष्टीत मीही आहे. - झुंग्याचं मांजर तो मी !!
All BooksDon Dirghakatha | दोन दीर्घकथा
₹225.00Original price was: ₹225.00.₹169.00Current price is: ₹169.00. Save ₹56 Add to cart -
Sale! Add to cartहे भुयार आहे की विवर हे समजत नाही. आणि दिवा दाखवायला कुणी नाही. आठवणींच्या गच्च रानात हरवल्यावर हाक द्यायला कुणी नाही. मडक्यांची पुन्हा माती होताना कुणीच सोबत नाही. आणि या वाहत्या नदीच्या पाण्याचा ठाव घेता येत नाही. हे नीट उमगल्यावर माणूस स्वतःशी बोलू लागतो का ? आणि हे असं स्वतःशी बोलणंच असतं का लिहिणं वगैरे ? लिहिणाऱ्या समोर ठाकणारे असे अनेक प्रश्न.. ज्यांची उत्तरं लिहिणाऱ्याला लिहिता लिहिताच उमगत जातात. दुसरे आपल्याला समजतात, तितके मूर्ख आपण खचितच नसतो. पण आपण स्वतःला समजतो, तितके शहाणेही आपण क्वचितच असतो ! लिहिताना आणि लिहिल्यावर काय काय झालं, यातली तथ्यं मी मांडताना हे शक्य आहे, की 'या तथ्यांच्या जबड्यातून निसटून, सत्य कदाचित् दूर कुठेतरी एकटंच बागडत असेल!'
All BooksDone That, Been There | डन दॅट बीन देअर
₹400.00Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00. Save ₹100 Add to cart -
Sale! Add to cartप्रदर्शन झालं, भिंतीवरची चित्रं ज्याच्यात्याच्या घरी गेली, की पोटात खड्डा पडतो : ... आता पुढे काय? मग आठवणी खरवडायला सुरुवात होते. खपल्या निघतात. मनात रुतून राहिलेले अनुभव... भिंतीवर खिळा ठोकावा तशा नजरेत ठोकल्या गेलेल्या इमेजेस... मी लगोरी लावायला लागतो. दगड एकमेकांवर रचतो, पुन्हा मोडतो, पुन्हा रचतो. काही म्हणता काही मनाला येत नाही. लगोरी उभी राहात नाही! या धडपडीतच ठेचकाळून मला माझ्या वाटा सापडत गेलेल्या आहेत. हरेक चित्रकाराला मिळालेला हा एक दैवी शाप आहे. डिव्हाईन कर्स! सब्जेक्ट... फॉर्म... काँपोझिशन्स.. कलर्स... टेक्श्चर्स... सतत शोधत राहायचं. लगोर्या लावत बसायचं. सुटका नाही. ती त ड फ ड सोसावीच लागते. बुडाखाली जाळ पेटलाय आणि डोक्यातल्या पातेल्यात काहीतरी शिजत घातलंय... अशी अवस्था! त्या चटक्यांचे काही तुकडे !
All BooksDont Paint The Clue | डोंट पेंट द क्लू –
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Sale! Add to cartदुष्काळी भाग. पाण्याचं दुर्भिक्ष्य. हजार अडचणी उभ्या ठाकलेल्या. पण माणदेशातील माणसं हिंमतीनं जगत असतात, कधी मागं हटत नाहीत. आत्महत्येचा वेडा विचार मनात आणत नाहीत. या माणसांसारखीच एक वेलवर्गीय वनस्पती - दौशाड'! इथल्या माणसासारखी जगणारी, ओढ्याकाठी, खडकावर, वाळूतसुद्धा पाणी नसताना वाढणारी. कितीही दुष्काळ असला; तरी ती दमत, थकत नाही, जोमानं फुलत राहते. जाड वेली, शेंडे, तुरे, गोफारे वागवत वाढत असते. तिला लाल फुलं अन् गोल अंडाकृती फळं असतात. सर्वांना सावली देते. भर उन्हाळ्यात ओढ्याकाठी शेळ्यामेंढ्या या दौशाड्याच्या सावलीत उभ्या राहतात आणि तिचा पाला खाऊन गुजराण करतात. अशी ही अडचणीतून वाट काढणारी वनस्पती. तिचं शास्त्रीय नाव Combretum-albidum-G.Don. प्रत्येक भागात तिची वेगवेगळी नावं - जसं दवशिरा, पिळुकी. आमच्या भागात तिला म्हणतात दौशाड'. ती सांगत असते, कितीही अडचणी, वाईट प्रसंग आले; तरी डरायचं नाही. तिचाच आदर्श आम्ही घेतला.
All BooksDoushad | दौशाड
₹680.00Original price was: ₹680.00.₹510.00Current price is: ₹510.00. Save ₹170 Add to cart -
Sale! Add to cartदुबई म्हणजे वाळवंटात निर्मिलेले जणू नंदनवनच ! जिद्द, मेहनत आणि दुर्दम्य आशावाद या त्रिगुणांच्या जोरावर अरबी माणसाने सर्वस्वी प्रतिकूल परिस्थितीवर मात केली. पाण्याच्या चार घोटांसाठी वणवण करणारा हा अरब आज सेंट्रली एअरकंडिशन घरातील सुखासीन आयुष्य जगतोय. हा बदल 'याचि देही याचि डोळा' अनुभवणाऱ्या मेघना अशोक वर्तक. १९७६ ते २०२५ या कालखंडात मेघनाताईंनी आपले पती श्री. अशोक वर्तक यांच्याबरोबर दुबईत वास्तव्य केले. मेघनाताईंच्या नजरेला बदलणारी दुबई जशी भावली, तशी त्यांनी ती शब्दांकित केली. दुबईच्या जीवनशैलीच्या प्रत्येक वैशिष्ट्यपूर्ण कंगोऱ्याचे कालानुरूप बदलते रंग आपल्याला आलेल्या अनुभवांसहित त्यांनी रेखाटले आहेत. आणि म्हणूनच स्थानिक वाचक दुबईच्या भूतवर्तमानाशी समरस होतील, त्यांना ही आपलीच गोष्ट वाटेल. दुबईचे यथार्थ दर्शन घडवणारे आणि दुबई-दर्शनाची ओढ लावणारे दुबई काल आणि आज
All BooksDubai : Kal Ani Aaj | दुबई : काल आणि आज
₹480.00Original price was: ₹480.00.₹360.00Current price is: ₹360.00. Save ₹120 Add to cart -
Sale! Add to cartदुर्दम्य म्हणजे नेमकं काय? जिगरी दोस्त मन्नू रावतचा फोन आला, हाऊ आर युअर लेग्ज, पंकज?'' नेहमीच्या टोलेजंग हास्यानिशी पंकज जोशींनी उत्तर दिले, कौनसी टांगें, मन्नू? टांगें तो अब हैंही नहीं!' त्यांच्या पोटात, मूत्रपिंडात आणि यकृतात एकूण नऊ गोळ्या घुसल्या होत्या. माणेकशा यातून केवळ जगलेच नाहीत, तर स्वतंत्र भारताचे पहिले फील्डमार्शलही झाले...! ले. जनरल एसपीपी थोरात, अॅृडमिरल भास्करराव सोमण, फील्डमार्शल सॅम माणेकशा, ले. जनरल प्रेम भगत, ले. जनरल सगतसिंग आणि ले. जनरल पंकज जोशी. भारतीय सैन्यदलातील पराक्रमाची सहा उत्तुंग शिखरे! त्यांच्या अमर कर्तृत्वाच्या या स्फूर्तिदायक कहाण्या...
All BooksDurdamya : Bharatiya Sainya Netruttvaache Uttung Shikhare | दुर्दम्य
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart -
Sale! Add to cartआयफेल टॉवर म्हणजे केवळ पॅरीसची नव्हे तर सार् या फ्रान्सची ओळख ! इंजिनीयिंरग मार्व्हल मानला जाणारा हा हजार फुटी उंच मनोरा आधी कल्पनेत पाहणारा अन् नंतर प्रत्यक्षात साकारणारा प्रतिभावान अभियंता : आयफेल गुस्ताव. अनेक चढउतारांनी भरलेले, यशोमालिकांनी रंगलेले अन् लोकापवादांनी माखलेले आयुष्य जगलेला हा अभियंता. त्याच्या या विलक्षण आयुष्याचा वेध घेणारे चरित्र !
All BooksEiffel | आयफेल
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Sale! Add to cartया आत्मकथनाचे लेखक समीर भिडे यांच्या आयुष्यात एक दिवस अचानक अत्यंत अकल्पित अशी घटना घडली. त्या घटनेने त्यांचे आयुष्य मुळापासून उन्मळून पडले. लाखात एकाच्या वाट्याला येणाऱ्या पक्षाघाताच्या झटक्याने त्यांचे आयुष्य कायमचे बदलून गेले. कधीही कल्पना केली नव्हती एवढे परावलंबित्व वाट्याला आले, नोकरी गमवावी लागली आणि पाठोपाठ घटस्फोटालाही सामोरे जावे लागले. पण एक दिवस अचानक ही त्यांच्या व्याधीची नाही, तर व्याधीतून पुनश्च उभे राहण्यासाठी निकराने दिलेल्या लढ्याची कथा आहे. या लढ्यासाठी त्यांना वेगवेगळ्या समाजांतील मित्रपरिवार आणि मदतनीसांची साथ मिळाली. हे आव्हान पेलताना पाश्चात्य वैद्यक आणि पौर्वात्य स्वास्थ्योपचारांचे साहाय्य लाभले. या प्रवासात समीर यांचा दृष्टिकोन कायम सकारात्मक आणि कृतज्ञ राहिला. त्यातूनच त्यांना वास्तव जसे आहे, तसे स्वीकारण्याचे बळ मिळाले. त्यांची ही कहाणी वाचताना वाचकालाही अकस्मात उद्भवलेल्या संकटाला धीराने सामोरे जाण्याचे बळ लाभेल याची खात्री वाटते.
All BooksEk Divas Achanak | एक दिवस अचानक
₹289.00Original price was: ₹289.00.₹217.00Current price is: ₹217.00. Save ₹72 Add to cart -
Sale! Add to cartहे एका शहाण्या मुलीचं मर्मस्पर्शी लिखाण आहे. तिच्यासाठी तिचं लेखन ही एक शोधाची वाट आहे. तिच्यामध्ये एक अतिशय उत्कट अशी शिकणारी मुलगी आहे. ती तिच्या लिखाणामधून स्वत:ला वाढवायला बघते. इतकी वाढण्याची धडपड मला फार कमी माणसांमध्ये दिसते. तिच्यात सतत एक ऊर्मी आहे, सतत एक उत्साह आहे. मोठ्ठा हात पसरून एखाद्या मुलीनी यावं ना, हे सगळं मला हवंय! असं म्हणत, तशी मला अमृता तिच्या लिखाणातून दिसते. एकूणच जीवन समजून घेण्याची या मुलीला फार असोशी आहे. शिवाय विचारपूर्वक जगण्याचं भान आहे आणि अशा जातीच्या माणसांना कायम अतृप्त, अस्वस्थ राहण्याचा एक शाप किंवा वर असतो. तोही तिला मिळालेला आहे, असं मला वाटतं. तिच्याभोवती घरीदारी नाटक, सिनेमा, चित्रं, संगीत, गाणं, नाचणं या सगळ्यांनी झणकारणारं वातावरण आहे आणि या झणकारणार् या वातावरणामध्ये ती स्वत:चा आवाज लावू पाहतीये. अतिशय प्रामाणिक आणि उत्कट अशा मुलीचा तो आवाज आहे आणि अमृता, तुझा आवाज आम्हाला छान ऐकू येतोय. डॉ. अरुणा ढेरे
All BooksEk Ulat.. Ek Sulat : Bhag 2 | एक उलट… एक सुलट भाग २
₹260.00Original price was: ₹260.00.₹195.00Current price is: ₹195.00. Save ₹65 Add to cart -
Sale! Add to cartहा गोंगाट म्हणजे केवळ ध्वनिप्रदूषण नाही. ही झुंज केवळ ध्वनिप्रदूषणाशी नाही. अतिक्रमणं करणार् या आणि जमिनी बळकावणार् या लँडमाफिया, राजकारणी, उद्योजक अन् नोकरशहा यांच्या अभद्र युतीशीही समांतरपणे द्यावा लागलेला लढा म्हणजे ही झुंज. ध्वनिप्रदूषणाविरोधात न्यायालयीन लढे देणार् या वैद्यकीय व्यावसायिकाचं रूपांतर सजग, कृतिशील लढवय्यात कसं झालं, हा प्रवास उलगडणारी
All BooksEk Zunj Gongatashee | एका झुंज गोंगटयाशी
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart
">
Skip to content