All Books
-
Sale! Add to cartआज आपणा सगळ्यांचे जीवन तणावग्रस्त आहे. तांत्रिक प्रगतीचा अनावर ओघ, सगळ्या व्यवसायांचे अन् व्यवहारांचे वैश्विकीकरण करण्याचा ध्यास, जीवनाच्या सर्व पैलूंचे सपाटीकरण करण्याचा हव्यास आणि तथाकथित विज्ञानाच्या ठोकळ चौकटीत मानवी आयुष्याचे प्रत्येक अंग बसवण्याचा आग्रह ही या युगाची वैशिष्ट्ये. वैद्यकीय क्षेत्रालाही ती लागू आहेत. विविध प्रकारच्या तांत्रिक प्रगतीतून वैद्यकशास्त्राचा चेहरा-मोहराच पालटून गेला आहे. वैद्यकाचे बदलत गेलेले हे प्रारूप भरकटत तर चालले नाही ना? समाजात शारीरिक, मानसिक आरोग्याचा प्रसार व्हावा, सर्वसामान्यांचे जीवन सोपे, सुखकर, आनंदी व्हावे - हे वैद्यकाचे ध्येय असावे, असे जर आपण मानले; तर सध्या चालू असलेला वैद्यकशास्त्राचा प्रवास योग्य दिशेने चाललेला आहे का? वैद्यकीय विवेकच भ्रष्ट होतो आहे का? वैद्यकीय व्यवसायाला ग्रासणार् या या नवनिर्मित समस्यांवर सखोल विचार करणारे, वैद्यकक्षेत्रातील जागल्याचे काम करणारे एका प्रामाणिक डॉक्टराचे साक्षेपी चिंतन
All BooksAdhunik Vaidyak : Tathya Ani Mithya | आधुनिक वैद्यक : तथ्य आणि मिथ्य
₹380.00Original price was: ₹380.00.₹285.00Current price is: ₹285.00. Save ₹95 Add to cart -
Sale! Add to cartआफ्रिकेत रंगला नृत्य मेळा भारतातल्या निवडक पक्ष्यांना आफ्रिकेतल्या नृत्यमहोत्सवाचे निमंत्रण आले. तिथे कोण कोण गेले आणि महोत्सव कसा पार पडला ? चला, वाचू या, या पुस्तकात !
All BooksAfriket Rangla Nrutya Mela | आफ्रिकेत रंगला नृत्य मेळा
₹80.00Original price was: ₹80.00.₹60.00Current price is: ₹60.00. Save ₹20 Add to cart -
Sale! Add to cartराजकारण आणि समाजकारण या दोन तलवारी एकाच म्यानात राहत नाहीत, हे वचन खोटं ठरवणार् या कार्यकर्त्या. स्थानिक प्रश्नांवर काम करताना वैश्विक घडामोडींचे भान ठेवून उत्तरे शोधणार् या नेत्या. आपत्ती व्यवस्थापनात स्त्रियांच्या गरजांचा आणि अडचणींचा स्वतंत्र विचार करणार् या कुशल व्यवस्थापक. तिसर् या जगातील स्त्रियांचे प्रश्न आंतरराष्ट्रीय मंचावर पोचवण्यासाठी धडपडणार् या अभ्यासक. उत्तम वक्कत्या आणि अभ्यासू लेखिका. नीलमताईंच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू या गप्पांमधून समोर येतात आणि उलगडत जाते एका सामाजिक कार्यकर्तीचे मानस व चिंतनशील राजकारणीचे अंतरंग.
All BooksAispais Gappa Neelamtainshee | ऐसपैस गप्पा नीलमताईंशी
₹360.00Original price was: ₹360.00.₹270.00Current price is: ₹270.00. Save ₹90 Add to cart -
Sale! Add to cartप्रा. स. ह. देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष सरत असताना त्यांच्या निवडक लेखांचा संग्रह ऐवज विचारांचा' प्रकाशित होत आहे. प्राध्यापक देशपांडे यांनी पाच दशकांहूनही अधिक काळ विपुल लेखन केले व महाराष्ट्राच्या विचार-विश्वावर स्वत:चा एक विशिष्ट ठसा उमटवला. राष्ट्रवाद' या विषयाचे त्यांचे लिखाण हे अनेक मान्यवरांकडून व व्यासपीठांवरून चर्चिले गेले. प्रस्तुत पुस्तकात स.हं.च्या लेखांची विभागणी राष्ट्रवाद', सामाजिक आणि आर्थिक', व्यक्तिचित्रे' आणि संकीर्ण' या चार प्रकारांत केली आहे. या सर्व लेखांतून श्री. देशपांडे यांची स्वतंत्र लेखन-शैली, विचारांतील सखोलता व सूक्ष्मता, तसेच तर्कशुद्ध व चिरेबंद मांडणी या बाबी वाचकाला सातत्याने जाणवत राहतील. आजही ताजे वाटणारे त्यांचे विचारगर्भ लेखन पुढील पिढ्यांनाही मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास वाटतो.
All BooksAiwaj Vicharancha | ऐवज विचारांचा
₹500.00Original price was: ₹500.00.₹375.00Current price is: ₹375.00. Save ₹125 Add to cart -
Sale! Add to cartकरुणेला काट्यांत बांधणा-या कोंडवाड्याला धर्म कधी म्हणू नये मानवतेचा मुडदा पाडणा-या क्रौर्याला शौर्य कधी म्हणू नये माणसांना व्होटबँक' बनवणा-या व्यवस्थेला लोकशाही म्हणू नये ते आणि आपण' अशा भेदभिंतींना घर कधी म्हणू नये दुरावा मनाचा वाढवी, त्याला स्तोत्र कधी म्हणू नये अनिष्ट प्रथा, कर्मठता, शोषण, अज्ञान अन् दारिद्र्य यांत पिचत असलेल्या समाजाच्या प्रगतीसाठी उमटलेला संवेदनशील सूर
All BooksAjaan Ani Chalisa | अजान आणि चालीसा
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Sale! Add to cartएक दिवस रेवाला तिच्याच चित्रातले रंग घेऊन आकाशात कुणीतरी काढलेले चित्र दिसले. कुणी काढले होते ते चित्र ? चला, वाचू या ही गोष्ट ! आकाशातले सप्तरंगी चित्र
All BooksAkashatle Saptarangi Chitra | आकाशातले सप्तरंगी चित्र
₹80.00Original price was: ₹80.00.₹60.00Current price is: ₹60.00. Save ₹20 Add to cart -
Sale! Add to cartवि. ग. कानिटकर ख्यातनाम मराठी साहित्यिक, व्यासंगी वाचक, जागतिक राजकारणाचे अभ्यासक, बदलत्या समाजकारणाचे भाष्यकार, संतसाहित्याचे आस्वादक, कादंबरीकार, कथाकार, विनोदी, मार्मिक सदरलेखक. त्यांच्या अर्धशतकी साहित्यिक कारकिर्दीमधले हे काही महत्त्वाचे टप्पे. साक्षेपाने निवडलेले, संदर्भासह मांडलेले. लेखक काळाच्या पडद्याआड जातात. खूप सारं लेखन मागे ठेवून जातात. त्यांच्या पुनर्भेटीचा आनंद आणि त्यांच्या काळाचा पुनःप्रत्यय घेण्यासाठी अशा अक्षरछायेत काही काळ विसावायला हवंच
All BooksAksharchhaya | अक्षरछाया
₹750.00Original price was: ₹750.00.₹563.00Current price is: ₹563.00. Save ₹187 Add to cart -
Sale! Add to cartनिसर्गाविषयीचे अपार कुतूहल आणि साहस करण्याची मनाची तयारी या बळावर कोल्हापुरातील एक सुविद्य मध्यमवर्गीय दांपत्य शिडाच्या बोटीतून अंटार्क्टिका मोहिमेवर जाते. एके काळी समुद्रबंदीच्या बेडीने आपल्या समाजाला जखडून ठेवले होते, याचे आज आश्चर्य वाटेल. तो काळ आता मागे पडला आहे. मात्र डॉ. गायत्री आणि डॉ. गुरुदास हर्षे यांनी इतरही कितीतरी सांकेतिक, पारंपरिक निर्बंधांच्या बेड्यांतून स्वतःला मोकळे करून घेतले आहे, हे या लेखनातून ठळकपणे जाणवते. त्यांची साहसकथा वाचताना त्या रोमांचक थराराचा अनुभव वाचकांनाही येतोच; पण निसर्गविज्ञान, इतिहास, भूगोल यांविषयीचे संदर्भआपले आकलन अधिक समृद्ध करतात. त्यामुळेच हा केवळ वैयक्तिक अनुभव न राहता एक प्रेरक, मार्गदर्शक ठेवाही ठरतो
All BooksAloukik Antarctia | अंटार्क्टिका
₹240.00Original price was: ₹240.00.₹180.00Current price is: ₹180.00. Save ₹60 Add to cart -
Sale! Add to cartया कहाणीचा नायक आहे - विनायक महादेव कुलकर्णी. एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेला. परिस्थितीशी झगडत शिकला सवरलेला. मोठ्या उमेदीनं तो बांधकामव्यवसायात शिरला. मात्र खाजगीकरण, उदारीकरण अन् जागतिकीकरण यांचे सुसाट वारे वाहू लागले. बघता बघता वादळाचं रूप घेतलेल्या या परिस्थितीनं विनायकच्या आयुष्यातही उलथापालथ घडवली. चांगल्या-वाइटाचा विचार न करता भौतिक सुखांमागे धावणारी आसक्ती, त्यातून मानसिक अस्वस्थता, भ्रष्ट आचरण, गुन्हेगारी वृत्ती, नैतिकतेचा ऱ्हास या चक्रव्यूहात सापडून विनायकची होलपट झाली. चक्रव्यूह भेदण्यात तो यशस्वी ठरला की धारातीर्थी पडला? मनावर चढणारी व्यावहारिक काजळी तो साफ करू शकला का? एकीकडे ऐहिक उपलब्धी, तर दुसरीकडे हरवलेले मन:स्वास्थ्य. एकीकडे भ्रष्टाचाराच्या गाळात रुतत जाणारी सामाजिक परिस्थिती, तर दुसरीकडे मनाची मशागत करणाऱ्या मूल्यांबद्दलची ओढ. एका संवेदनशील माणसाच्या आयुष्याची वेधक कहाणी.
All BooksAlwar Manachi Hurhur | अलवार मनाची हुरहुर
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartसंझगिरी आणि माझी दोस्ती उणीपुरी चाळीस वर्षांची. आमच्या (फिल्मी) आवडी, आमची नट-नट्या - संगीतकार - गायक यांच्याविषयाची मतं, आमचे आदर्श हे तंतोतंत जुळतात. फरक एवढाच (आणि तो केवढा तरी मोठा!) की तो हे सगळं सुरेख पद्धतीनं शब्दबद्ध करू शकतो, त्याच्या खास शैलीत वाचकांपर्यंत पोचवतो. मी फक्त मला हेच तर म्हणायचं होतं', असं मनाला समजावू शकतो. मला (आणि माझ्यासारख्या हजारो वाचकांना, रसिकांना) त्यानं लिहिलेलं मनोमन पटतं आणि खूप आवडतं. आवडावं, असंच तो लिहितो. कारण त्याला फिल्मी जगतातल्या लोकांबद्दल कुतूहल तर आहेच, शिवाय त्याचा त्याविषयीचा अभ्यास आहे, त्याची निरीक्षणं आहेत, हळवं करणाऱ्या आठवणी आहेत, त्यातले बारकावे (बऱ्याचदा गॉसिप्सही) त्याला माहीत आहेत. त्यामुळे या लोकप्रिय फिल्मस्टार्सबद्दलचं त्याचं - गप्पा मारल्यासारख्या, रसाळ आणि मिश्कील शैलीतलं - लेखन अत्यंत वाचनीय झालं आहे. दिलीप प्रभावळकर मेहमूद, किशोरकुमार, प्राण, हेलन या सर्वार्थानं मोठ्या कलाकारांच्या द्वारकानाथ संझगिरी यांनी खास त्यांच्या स्टाईलनं सांगितलेल्या गोष्टी आम्हाला वगळा...
All BooksAmhala Vagala | आम्हाला वगळा
₹290.00Original price was: ₹290.00.₹218.00Current price is: ₹218.00. Save ₹72 Add to cart
">
Skip to content