All Books
-
Sale! Add to cartही कहाणी आहे किशोरवयापासून जपलेल्या एका स्वप्नाची. त्यासाठी केलेल्या अपार शारीरिक, शैक्षणिक आणि मानसिक तयारीची, कष्टसाध्य यशाची, निष्ठेची आणि कर्तव्यबुद्धीची. पण.... एका क्षणात ती होते, कहाणी स्वप्नभंगाची आणि यातनांची. त्याच वेळी सोशिकतेची, दुर्दम्य इच्छाशक्तीची आणि समंजस स्वीकाराची. ही कहाणी केवळ आकाशात भरारी घेणारा वैमानिक कायमसाठी चाकाच्या खुर्चीत जखडबंद होतो त्याची नाही, तर पुनश्च राखेतून उगवतीकडे निग्रहाने झेपावतो, त्याची होय.
All BooksRakhetoon Ugavateekade | राखेतून उगवतीकडे
₹325.00Original price was: ₹325.00.₹244.00Current price is: ₹244.00. Save ₹81 Add to cart -
Sale! Add to cartस्वातंत्र्य-समतेची घोषणा करणारे नव्या समाजाचे संविधान अस्तित्वात आले. पण त्यातून नवी समाजरचना अस्तित्वात आली का? संविधानातील उद्दिष्टांचे अस्तित्व समाजमनाचा अविभाज्य भाग झाला का? या प्रश्नांची उत्तरे कवी नोमेश नारायण शोधू लागतात, तेव्हा त्यांच्या हाती उत्तरे येतात - कधी खैरलांजी', तर कधी रोहित वेमुला'! मग अशावेळी या कवीने काय करावे? कवीच्या हाती काय असते? कवीची ताकद कशात असते? या प्रश्नांची उत्तरे मात्र या कवीकडे निश्चितच आहेत, असे या संग्रहातील कवितांमधून दिसते. कवीच्या कवितांत प्रथमच विद्रोहाच्या ज्वाळातून तावून सुलाखून निघालेले फिनिक्स पक्ष्यासारखे सळसळते मन दिसते. नवनव्या प्रतीकांमधून व प्रतिमांमधून हा कवी विद्रोही कवितेच्या साचेबद्धपणातून मुक्त होताना दिसतो. ही कविता बुद्ध आणि बाबासाहेब यांच्या स्वप्नातील नव्या संस्कृतीचे जणू संविधान आहे. ती वैश्विक मानवी मूल्ये समाजमनात रुजविण्याचा आशावाद व्यक्त करते. व्यापक जीवनभान देण्याचा प्रयत्न करते. या कवितेतील शब्दप्रतिमा आणि प्रतीकांचे नावीन्य एकूणच आंबेडकरी मराठी कवितेला व रसिकांना पृथकअनुभूतीविश्वात घेऊन जाते. कवी मानवी संवेदना विशिष्ट चाकोरीतून वा विशिष्ट तत्त्वज्ञानातून व्यक्त करीत नाहीत, तर समग्रलक्ष्यी जीवनमूल्यांची व तत्त्वविचारांची पखरण करून मानवी संवेदना कवितेतून शब्दबद्ध करतात. आशय, अभिव्यक्ती व भाषा अशा काव्याच्या अंगांनी समृद्ध असलेली ही कविता केवळ आंबेडकरीच नव्हे तर समकालीन मराठी कवितेची कक्षा विस्तारणारी कविता आहे ! डॉ. प्रमोद मुनघाटे
All BooksRaktaphulnche Tatawe | रक्तफुलांचे ताटवे
₹180.00Original price was: ₹180.00.₹135.00Current price is: ₹135.00. Save ₹45 Add to cart -
Sale! Add to cartरंगीबेरंगी वातावरणात रंगलेले शैशव. नंतर रानावनात हिंडण्याची, निसर्गात रमण्याची नितांत आवड. कुंवार जंगलाचे अननुभूत सुख आणि अरण्यवासी आदिवासींचे निसर्गजीवन जवळून पाहताना मनावर पडलेली रानाची मोहिनी. या सार् यातून उमललेल्या कवितांच्या भावफुलांमधून श्वासाश्वासात सामावून गेलेला
All BooksRanagandh | रानगंध
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreमूळचे बेळगावचे जेष्ठ चित्रकार मारुती पाटील यांचा जन्म १९४५ चा. बालपणापासूनच गावातील निसर्गरम्य जीवनातून निर्माण झालेली कलेची आवड त्यांना पुढे बेळगावच्या चित्रमंदिर मधे कै. कलामहर्षी के. बी. कुलकर्णी या गुरुंच्या छत्र छायेत घेऊन गेली. पुणे मुंबई च्या प्रसिद्ध चित्रकला महाविद्यालयांमध्धील शिक्षणानंतर बराच काळ जाहिरात क्षेत्रात काम केल्यावर त्यांनी पुण्याच्या अभिनव कला महाविद्यालयात अध्यापक म्हणून नोकरी स्वीकारली ती केवळ चित्रकलेबद्दलच्या प्रेमामुळे, ओढीमुळे. जवळ जवळ चार दशके अध्यापना बरोबरच स्वतः चित्रनिर्मितीतून त्यांच्यातला चित्रकार त्यांनी जिवंत ठेवला. "रंग रेषांचे सोबती" या त्यांच्या पुस्तकात त्यांच्या कलाप्रवासाचे अनुभव व त्यांची काही चित्र आपल्याला बघायला मिळतील.
All BooksRang Reshanche Sobati | रंग रेषांचे सोबती
₹1,400.00Original price was: ₹1,400.00.₹1,050.00Current price is: ₹1,050.00. Save ₹350 Read more -
Sale! Add to cartA birthday. A mysterious book. A race against time... On the day she turns thirteen, Riya receives a strange and ancient gift a book with no words, only holes of different shapes and faded symbols. When Riya is swept into a magical world of castles, secret doors, riddles, and danger. Joined by her friend, Hero, the horse, Riya must travel across kingdoms to crack a riddle that will bring her back home. Along the way, she makes friends and faces tricky betrayals. With courage, cleverness and a big heart, she discovers that being a teen isn t just about growing up it's about stepping up. Will Riya find her way back home before time runs out?
All BooksRiya And The Red Book Adventure | Riya & the Red book adventure
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Sale! Add to cartरविवार असल्यामुळे शाळेला सुट्टी होती. पण रोहनने आई-बाबांना घरातल्या कामात मदत केली. चला, रोहनने काय काय केले, ते या पुस्तकात वाचू या.
All BooksRohancha Ravivar | रोहनचा रविवार
₹80.00Original price was: ₹80.00.₹60.00Current price is: ₹60.00. Save ₹20 Add to cart -
Sale! Add to cartकोडी घालायला, कोडी सोडवायला लहानमोठ्या सार् यांनाच आवडते. आणि हे कोड्यांचे पुस्तक तर लिहिले आहे एका बालमानसशास्त्रातील तज्ज्ञाने. मुलांबरोबर हसायला, दंगा करायला, खेळायला, गप्पागोष्टी - गाणी - विनोद करायला ज्यांना आवडते, त्यांना हे पुस्तक आवडेलच. पण ज्यांना हे सारे फारसे आवडत नाही, त्यांनाही हे पुस्तक वाचल्यानंतर या सार् यांतील आनंद चाखावासा वाटेल ! मग चला तर - भरपूर मजा करू या, भरपूर डोके चालवू या आणि त्यासाठी
All BooksSaare Kodyaat Padu Yaa | सारे कोड्यात पडू या
₹140.00Original price was: ₹140.00.₹105.00Current price is: ₹105.00. Save ₹35 Add to cart -
Sale! Add to cartदीपक पटवर्धन या विशीतील तरुणाने स्वरूपानंद पतसंस्थेसाठी स्वत:ला झोकून दिले आणि दहा हजार रुपयांवर सुरू झालेला प्रवास आज ६०० कोटींच्या पार नेला; तो विश्वासार्हता, कल्पकता आणि चोख आर्थिक शिस्तीच्या जोरावर. याच गुणांच्या जोरावर राजकारण आणि वाचक चळवळ यातही यशस्वी मुशाफिरी करून दाखविली. सार्वजनिक जीवनात नेकीने आणि नेटाने केलेल्या यशस्वी प्रयत्नांचे अनुभव कथन. या प्रांतातलं तुमचं शुद्ध-स्वच्छपण हे रत्नागिरीकरांना माहीत आहे, याची नोंद पक्षाच्या ‘सोशल मीडिआ टीम'नं घेतलेली आहे. तुमच्या या चारित्र्यसंपन्न प्रतिमेचा सार्वजनिक कार्याला उपयोग व्हावा. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य ‘कोकणात सहकार चळवळ कुठे आहे?’ असा जो प्रश्न केला जातो, त्याला स्वरूपानंदनं आदर्शरूपे उत्तर दिलंय. तिच्या यशाचं ‘दीपक पटवर्धन’ हे खरं रहस्य आहे. - नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री, भारत सरकार
All BooksSahakar Swaroopa | सहकार स्वरूपा
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cartभक्तीच्या नऊ प्रकारांत शेवटचा टप्पा असतो अमूर्त पूजेचा, असं त्या क्षेत्रातले जाणकार सांगतात. नवविधा भक्ती म्हणजे पहिला टप्पा मूर्तीच्या वा व्यक्तीच्या पायावर डोकं ठेवण्याचा, असे करत करत नवव्या टप्प्यावर समोर काहीच नसतं, तरी त्या काहीच नसण्याची पूजा करायची, असा. पर्यटनाचंही असंच असावं बहुधा, पहिला टप्पा हातात प्रेक्षणीय स्थळांची यादी घेऊन धावपळ करत यादीबरहुकूम एकेक स्थळ पाहिल्यावर त्या त्या नावासमोर 'टिक' करत जाण्याचा. नववा टप्पा हाती अशी कुठलीही यादी नसताना पर्यटनाचा निखळ आनंदानुभव घेण्याचा। ताज्या इंग्लंड दौऱ्यात या टप्प्याच्या खूप जवळ जाता आलं, असं म्हणता येईल. इंग्लंडचं अंतरंग उलगडून दाखवणारी अविस्मरणीय सफर !
All BooksSahebachya Deshat | साहेबाच्या देशात
₹370.00Original price was: ₹370.00.₹278.00Current price is: ₹278.00. Save ₹92 Add to cart -
Sale! Add to cartप्रवासाला जायचं असेल, विचारात फार वेळ दवडायचा नसेल, नुसतं आनंद-भरण मनात असेल; तर समोर युरोपचा नकाशा उघडावा कोणत्याही देशावर - अगदी डोळे बंद करून केलं, तरी हरकत नाही - बोट ठेवावं आणि फारसा पुढचा-मागचा विचार न करता खुशाल त्या देशाची सैर करावी. आनंदाची निश्चित हमी ! युरोपच्या भूमीत आनंदच 'अवघा रंग एक झाला' म्हणत समोर येतो. आपल्याला फक्त इतकंच करायचंय -त्याला मिठीत घ्यायचं !
All BooksSahebee Jagat | साहेबी जगात
₹400.00Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00. Save ₹100 Add to cart
">
Skip to content