All Books
-
Sale! Add to cartलेखकाला पूर्ण स्वातंत्र्य असेल, तरच त्याच्या मनातले लेखनात उतरते. अलीकडील काळात शासनाबरोबरच सामाजिक असहिष्णुतेचे दडपण लेखकावर येऊ लागले आहे. समाजात निर्माण झालेली दहशतीची भावना सामान्य माणसांपेक्षाही प्रतिभावंतांना अधिक जाणवते. मग एक तर ते स्तब्ध होतात किंवा वैचारिक संघर्षाला उभे राहतात. प्रत्येक जण सॉक्रेटिस होऊन शांतपणे विषाचा प्याला पिऊ शकत नसतो. त्याला मग न लिहून शहाणे तरी व्हावे लागते, अगर आपल्या स्वातंत्र्याची बूज राखणारा, त्याचा आदर करणारा उदार समाज अस्तित्वात येईल याची वाट पाहावी लागते. राजकारणातली मंडळींना, ते जाहीरपणे काहीही बोलत असले, तरी निर्भीड नागरिकांचे, लेखकांचे स्वातंत्र्य नकोच असते. साहित्यिक आपल्याला जागे करण्याचा प्रयत्न करीत असतात. पण मुख्य जबाबदारी असते आपली स्वत:ची. आपल्या विचार, लेखन आणि वाचनस्वातंत्र्याचे रक्षण जागरूकपणे आपणच करावयाचे असते. ही जागरूकता जपण्यासाठी विचार करणा-या प्रत्येक सुजाण व्यक्तीने आवर्जून वाचलेच पाहिजे, असे -
All BooksSahitya Ani Svatantrya | साहित्य आणि स्वातंत्र्य
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartपद्मभूषण माधव गाडगीळ म्हणजे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व! निसर्गप्रेम हा माधव गाडगीळांचा श्वास अन् ध्यास. गेल्या पाच तपांचे सखोल संशोधन, भारतातील निसर्गाची अन् जीवशास्त्राची अद्भुत कोडी सोडवणारा प्रदीर्घ व्यासंग आणि सामान्यातल्या सामान्य माणसाप्रति मानत असलेले उत्तरदायित्व या सा-यांचे विलक्षण मिश्रण म्हणजे माधव गाडगीळ. साहित्यिक अंगाने अन् ललित शैलीने नटलेले या निसर्गवैज्ञानिकाचे आत्मवृत्त बनले आहे एक अद्भुत सफर. केवळ निसर्गप्रेमी वा निसर्ग-अभ्यासकांनाच नव्हे, तर भवतालाबद्दल कुतूहल असणार्या प्रत्येकाला एका वेगळ्या विविधरंगी जगाचे दर्शन घडवणारी जीवनसफर !
All BooksSahyachala Ani Mee : Ek Premkahani | सह्याचला आणि मी : एक प्रेमकहाणी
₹800.00Original price was: ₹800.00.₹600.00Current price is: ₹600.00. Save ₹200 Add to cart -
Sale! Add to cartविसाव्या शतकामध्ये भारतात कर्करोगाविषयक संशोधनाचा पाया घालणार् या संशोधिका म्हणून कमल रणदिवे यांची विज्ञानविश्वात ओळख आहे. त्या हाडाच्या वैज्ञानिक तर होत्याच पण विज्ञानप्रसारासाठी समाजातल्या सगळ्यांना सामावून घेणारी दृष्टीही त्यांच्याकडे होती. आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करणार् या या वैज्ञानिकेचे चरित्र नव्या पिढ्यांना प्रेरणा देणारे आहे. सामाजिक जाणीव जपणार् या संशोधिका - कमल रणदिवे
All BooksSamajik Janiva Japnarya Sanshodhika-Kamal Randive | सामाजिक जाणीव जपणाऱ्या संशोधिका – कमल रणदिवे
₹80.00Original price was: ₹80.00.₹60.00Current price is: ₹60.00. Save ₹20 Add to cart -
Sale! Add to cartकोणत्याही रंगभूमीला ऐतिहासिकतेचे भान असले पाहिजे. त्याने दिशा स्पष्ट होतात. पुढचा मार्ग सुकर होऊ शकतो. हे पुस्तक तसे परिप्रेक्ष्य देऊ पाहते. साठोत्तर प्रायोगिक-समांतर मराठी रंगभूमीचे केवळ साक्षी नव्हे, तर निरनिराळ्या नात्याने प्रत्यक्ष सहभागी असलेले प्रतिभावान रंगकर्मी माधव वझे या विस्तृत परिप्रेक्ष्याचे दर्शन घडवत आहेत. त्यांनी अनेक संदर्भबिंदूंच्या मदतीने पल्याड (एकोणीस-विसाव्या शतकातील युरोप, अमेरिका व रशिया) अन् अल्याड (वीस-एकविसाव्या शतकातील प्रायोगिक- समांतर मराठी रंगभूमी) यांचा घेतलेला अभ्यासपूर्ण वेध.
All BooksSamantar Rangabhumi : Palyad-Alyad | समांतर रंगभूमी
₹290.00Original price was: ₹290.00.₹218.00Current price is: ₹218.00. Save ₹72 Add to cart -
Sale! Add to cartकाळाचे निदान करणे अवघड असते. समाजचिंतक आणि सर्जनशील लेखक ते करण्याचा आपापल्या परीने प्रयत्न करीत असतात. काळाचा तळठाव धुंडाळून मानवी जगण्याच्या अंगोपांगांना वेढून राहणार् या काळसंदर्भांचा उलगडा करण्याचा, आपल्या काळाला समजून घेण्याचा हा एक भाग असतो. गेल्या दशक-दोन दशकांपासून ही प्रक्रिया अधिकाधिक गुंतागुंताची आणि अतर्क्य होत चालली आहे. कारण माणूसपणाच्या विकसनशीलतेला आकार देण्याची आकांक्षा बाळगून असलेल्या आणि गेल्या शतकापासून गतिमान झालेल्या आधुनिकीकरण - अत्याधुनिकीकरण या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणार् या अनेकानेक बाबींची विपरीतता समकाळाच्या संभ्रमित रूपाला आकार देणारी ठरली आहे. त्यातील एका दुखर् या वेदनेचा माग काढण्याच्या भूमिकेतून पी. विठ्ठल यांची ही कादंबरी आपल्यासमोर येते. डॉ. आशुतोष पाटील आपल्या जगण्याचा एक भाग असलेला गुंता उकलून त्याच्या दाहक विरूपाचे दर्शन प्रत्ययकारीपणे घडवणारी कादंबरी.
All BooksSambhramachee Goshta | संभ्रमाची गोष्ट
₹380.00Original price was: ₹380.00.₹285.00Current price is: ₹285.00. Save ₹95 Add to cart -
Sale! Add to cartसांदणवाट म्हणजे पळवाट नव्हे अथवा चोरवाटही नव्हे, सांदणवाट म्हणजे वेगळी वाट. आयुष्यात कायम वेगळा मार्ग अस्तित्वात असतो, मात्र तो राजमार्ग नसतो. अशी वेगळी वाट निवडून त्यावर निग्रहाने पावले टाकणे हे एक प्रकारे आव्हानही असते अन् संधीही ! जीवनाची सुरुवात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत होऊनही डॉ. पंडित विद्यासागरांनी नंतरच्या आयुष्यात बहुतेक वेळा जाणीवपूर्वक वेगळी वाट निवडली. त्यामुळे वाट्याला आलेल्या विविध अनुभवांचा लेखाजोखा मांडणारे हे प्रेरणादायी आत्मकथन.
All BooksSandanvaat | सांदणवाट
₹600.00Original price was: ₹600.00.₹450.00Current price is: ₹450.00. Save ₹150 Add to cart -
Sale! Add to cartअलिकडे अनेक तरुण-तरुणी अमेरिकेत स्थायिक झालीत. निरनिराळ्या कारणांनी त्यांचे पालक तिथे जातात. अगदी वेगळ्या जीवनशैलीला सामोरे जाताना जीवनानुभवाला नवे परिमाण मिळते, नवी नाती जुळून येतात. सहयोग, सहवास, सहजीवनाने आनंद द्विगुणित होतो. सुखदु:खाच्या हिंदोळ्यावर झुलणार् या प्रेमी युगुलांची कहाणी सांगणारी अनोखी कादंबरी.
All BooksSandhiprakash | संधिप्रकाश
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cartलोकसत्ता च्या लोकरंग पुरवणीत दर रविवारी नियमितपणे एक वर्षभर सांगतो ऐका ह्या शीर्षकांतर्गत मनोहर पारनेरकरांनी हे लेख लिहिले. शीर्षकाच्या दोन शब्दांत लेखमालेचा उद्देश पूर्णत: सामावलेला होता : संवाद. मी सांगतो आहे, तुम्ही ऐका. पारनेरकरांच्या ह्या सादेला वाचकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला आणि त्यांचं सांगणं ऐकण्यात वाचक रंगून गेले. हे लेख वाचून आपण होतो त्याहून मनाने, ज्ञानाने अधिक समृद्ध झालो आहोत, असे वाचकांना नक्कीच वाटेल. तितका ह्या लेखांचा आवाका आहे. शांता गोखले
All BooksSangato Aika… | सांगतो ऐका…
₹380.00Original price was: ₹380.00.₹285.00Current price is: ₹285.00. Save ₹95 Add to cart -
Sale! Add to cartरा. स्व. संघाच्या शाखांतून तयार झालेल्या स्वयंसेवकांनी आवडीची कार्यक्षेत्रे निवडली. त्यात संघाच्या संस्कारबळावर विविध संस्थात्मक, संघटनात्मक कार्ये उभी केली. शिक्षण, संस्कार, कामगार, विद्यार्थी, उद्योग, आरोग्य, राजनीती अशा क्षेत्रांत आणि विविध सेवाकार्यांत संघस्वयंसेवकांनी कार्य केले आणि हाच शक्तिसाठा संघपरिवार म्हणून ख्यातनाम झाला. मंत्र छोटा, तंत्र सोपे । परि यशस्वी ठरले ते ।। रीत साधी, शिस्त बांधी । कार्य व्यापक उभवी ते ।। या संघगीताचा साक्षात्कार आज सार् या विश्वाला होत आहे. तरीही संघ समग्रपणे समजला, असे म्हणता येईल का ? कारण रोज माझ्या अवतीभवती वावरणारा, माझ्यासारखाच हा सामान्य माणूस, आश्चर्याने तोंडात बोट घालावे असे उत्तम कार्य कसा करू शकला बुवा, हे मनात येतेच. या आश्चर्यावर मात करून संघातील मानवी व्यवस्थापन बारकाईने न्याहाळले तर सामान्य माणसातल्या असामान्य क्षमता फुलवून मोठाली कामे करणारी संघटना म्हणजे रा. स्व. संघ हा बोध आपल्याला होतो.
All BooksSanghatil Manavi Vyavasthapan Eka Swayamsevakachya Najaretun | संघातील मानवी व्यवस्थापन
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Sale! Add to cartअथ संवादकौशल्यम् संवादाने मते मांडावीत संवादातून मने सांधावीत संवादाने आश्वस्त करावे संवादातून विकल्प मिटवावे संवाद सकारात्मक, हेच यशाचे गमक संवादकौशल्य, उत्तम व्यक्तिमत्त्वाचे सूचक हेच सारे सविस्तर मांडणारे पुस्तक. भाषण, संभाषण, वाद, संवाद, नॅरेशन, प्रेझेंटेशन अशा सर्व ठिकाणी खात्रीने उपयोगी पडणारे. संवाद मार्गदर्शकच जणू !
All BooksSanvaadatun Vyaktimattvakade | संवादातून व्यक्तिमत्वाकडे
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart
">
Skip to content