WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Astitvavad Aani Marathi Kadambari | अस्तित्ववाद आणि मराठी कादंबरी

लेखक: Rekha Inamdar-Sane | रेखा इनामदार - साने

Original price was: ₹350.00.Current price is: ₹263.00. Save ₹87

Availability: 25 in stock

पाश्चात्य तत्त्वज्ञानाच्या इतिहासात अस्तित्ववादी विचारसरणाने क्रांतीच घडविली. या घटनेचे श्रेय कीर्केगार्ड, नीत्शे, यास्पर्स, मार्सेल, हायडेगर, काम्यू व सार्त्र यांच्याकडे जाते. अस्तित्ववादाने सुमारे चारेक दशके पाश्चिमात्य जगतातील साहित्यनिर्मिती, समीक्षादृष्टी व कलाविचार यांवर आपली कायमची मुद्रा उमटविली. दोन महायुध्दांच्या आसपासचे राजकीय- सामाजिक वातवरण , स्तब्ध झालेला धर्मविचार, उद्ध्वस्त समाजमानस आणि बेभरवशाचे व्यक्तिजीवन

यांचा अस्तित्ववादाच्या उदयाशी व विकासाशी जवळचा संबंध आहे. १९६० ते १९८० या कालावधीत मराठी साहित्य व समीक्षा यांवरही अस्तित्ववादाचा प्रभाव होता. रेखा इनामदार-साने यांनी 'अस्तित्ववाद आणि मराठी कादंबरी' या ग्रंथामधून अस्तित्ववादाच्या उदयाशी तसेच जडणघडणीची नेटकी मीमांसा केली आहे. तसेच आस्तिकता-नास्तिकता, निवडीचे स्वातंत्र्य, परात्मता, असंगतता, अस्सल जीवनसरणी इत्यादी अस्तित्ववादी आशयसूत्रांचा सप्रमाण उलगडा केला आहे. तत्वज्ञान आणि साहित्य यांमधील परस्परसंबंधाची सूक्ष्म चिकित्सा करून मराठी कादंबरीविश्वात मूलगामी परिवर्तन घडविणा-या 'कोसला', 'बॅरिस्टर अनिरूध्द धोपेश्वरकर,' 'पुत्र', 'सात सक्कं त्रेचाळीस', 'एन्कीच्या राज्यात' या कादंब-याचे अस्तित्ववादाशी असणारे नाते त्यांनी विश्लेषणपूर्वक स्पष्ट केले आहे. अस्तित्ववाद आणि कादंबरी या दोहोंचे सांगोपांग विवरण करणारा हा मराठीतील पहिला ग्रंथ आहे. विलास खोले

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 2 cm
प्रकाशन तारीख : सप्टेंबर 2004
बुक कोड : I-03-2004
वजन : 275 g
पाने : 240
आर्टिस्ट : सतीश देशपांडे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : सप्टेंबर 2024

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">