WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Sujan Palak Vhava Kasa? | सुजाण पालक व्हावं कसं?

लेखक: Shivraj Gorle | शिवराज गोर्ले

Original price was: ₹275.00.Current price is: ₹206.00. Save ₹69

Availability: 25 in stock

आपली मुलं मोठी व्हावीत, चांगली व्हावीत, यशस्वी व्हावीत... असं कुठल्या पालकांना वाटत नाही ? पण हे साधायचं कसं, हा आजच्या पालकांपुढचा प्रश्न आहे. जग झपाटयानं बदलतं आहे, जीवनशैली बदलते आहे. टीव्ही, कॉम्प्यूटर, इंटरनेट, मोबाईल... अशा माध्यमांच्या प्रभावात आणि वाढत्या स्पर्धेच्या ताण-तणावात वाढणा-या आजच्या मुलांवर संस्कार तरी कसे आणि कुठले करायचे

? आजची मुलं ऐकतच नसतील, तर त्यांना शिस्त तरी कशी लावायची ? त्याहीपुढे जाऊन पोटच्या पोरांना प्रेम देण्याइतकी फुरसतही आज पालकांकडे नसेल, तर...? पालक असणं वेगळं आणि पालक होणं वेगळं ! पालक 'होणं' हे एक 'घडणं' असतं. आजच्या काळात पालक 'होणं' म्हणजेच 'सुजाण पालक' होणं. दिवसेंदिवस आव्हानात्मक होत चाललेलं पालकत्व पेलत असतानाच, पालक असण्यातला आनंदही अनुभवता येणं म्हणजे 'सुजाण पालक' होणं ! 'सुजाण पालकत्वाचा' हा मंत्र सुलभ शैलीत उलगडून सांगणारं हे मराठीतलं अद्ययावत असं 'गाईड' पालकांच्या संग्रही असायलाच हवं. पूर्वीच झालेल्या किंवा होऊ घातलेल्या... सर्वांच्याच !

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : जानेवारी 2008
बुक कोड : A-04-2008
वजन : 245 g
पाने : 224
आर्टिस्ट : सतीश देशपांडे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : मार्च 2013

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">