WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!

आम्ही 'राजहंसी'

             शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी १९५२ मध्ये स्थापन केलेली ‘राजहंस प्रकाशन ही मराठीतील प्रतिष्ठीत प्रकाशन संस्था आहे. मराठी साप्ताहिकांमध्ये वेगळी नाममुद्रा उमटविणाऱ्या माणूस साप्ताहिकाचे संस्थापक-संपादक श्री. ग. माजगावकर हे १९५७ साली राजहंसमध्ये आले आणि या दोघांच्या प्रयत्नातून ही प्रकाशनसंस्था आकार घेत गेली. पु. ल. देशपांडे यांनी गौरवलेले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे ‘राजा शिवछत्रपती’ हे राजहंसी पुस्तक घराघरात पोहोचले. ‘राजहंस प्रकाशना’ चे संवर्धक श्री. ग. माजगावकर यांची सजग सामाजिक जाणीव, वैचारिक मोकळेपणा, निरनिराळ्या राजकीय आणि सामाजिक चळवळींबद्दलची आस्था या साऱ्यांचा ठसा ‘राजहंस प्रकाशना’च्या पुस्तकांवर पडला व तो आजही कायम आहे.

             श्री.ग. माजगावकरांचे धाकटे बंधू दिलीप माजगावकर १९६६ साली ‘राजहंस’ मध्ये दाखल झाले. आता ते संस्थेचे संचालक म्हणून काम पाहतात. कालानुरूप विषयांची निवड, त्यासाठी योग्य लेखक, उत्कृष्ट निर्मितीमूल्ये आणि वाचकांपर्यंत पुस्तके पोहोचविण्यासाठी राबविलेले अभिनव उपक्रम यातून दिलीप माजगावकर यांनी राजहंसचा पाया भक्कम केला. विषयांची विविधता वाढल्यावर उत्तम संपादन करणारे चिकित्सक संपादक मंडळ दिलीप माजगावकर यांनी उभे केले. विषयांचे वैविध्य, आशयाची समृद्धी अशी राजहंसची ओळख मराठी वाचकांमध्ये होऊ लागली, याबरोबर प्रकाशन संस्थेसाठी आवश्यक अशा वितरण आणि विक्री या घटकांवर योग्य भर देण्यास दिलीप माजगावकर यांनी सुरूवात केली. मुंबई, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आणि गोवा या ठिकाणी राजहंसच्या शाखा असून पुस्तक विक्रीचे जाळे उभे राहिले आहे.

             प्रेरणादायी चरित्रे आणि आत्मचरित्रांचे समृद्ध दालन, राजकीय व ऐतिहासिक विषयांवरील व समाजकारणावरील प्रभावी पुस्तके ही ‘राजहंस’ची ठळक वैशिष्ट्ये. याचबरोबर विज्ञान, पर्यावरण, अंधश्रध्दानिर्मूलन, ललित साहित्य अशा विषयांवरील पुस्तके प्रकाशित करण्यात राजहंसने आघाडी घेतली. नवे विषय आणि नवे लेखक यांबाबत ‘राजहंस प्रकाशन’ नेहमी स्वागतशील असते. ‘राजहंस प्रकाशना’ ने वाचकांपुढे आणलेल्या अनेक लेखकांनी त्यांच्या क्षेत्रातील आपल्या कामाने आणि त्यासंबंधीच्या लेखनाने आगळेवेगळे स्थान उभे केले आहे. राजहंसच्या ग्रंथसूचीमध्ये सर्व वाड्ःमयप्रकार आहेतच, पण त्यातही चरित्र, आत्मचरित्र, इतिहास, समाजकारण, राजकारण आणि विज्ञान ही ‘राजहंस प्रकाशना’ ची नाममुद्रा उमटलेली खास दालने आहेत. प्रकाशन संस्थेचे स्वत:चे संपादक मंडळ ही ‘राजहंस’ची भक्कम बाजू असून राजहंसच्या दर्जेदार निर्मितीमध्ये विविध विषयांवर प्रभुत्व असणाऱ्या जाणत्या संपादकांचे योगदान महत्वाचे आहे.

आमचा दृष्टिकोन

  • विषयांचं वैविध्य आणि आशयाची समृद्धी असलेलं लेखन वाचकांपर्यंत पोहोचवणं.
  • उत्तम संपादन व उत्कृष्ट निर्मितिमूल्यांवर भर देत महाराष्ट्रात सर्वत्र पुस्तकवितरणाची व्यवस्था करणं.

आमची उद्दिष्टे

  • ग्रामीण लेखकांपासून नेते, अभिनेते यांच्यापर्यंत मान्यवर लेखकांचे विविध साहित्यप्रकारातले लेखन प्रकाशित करणं. छापील पुस्तकांसोबत किंडल एडिशन वाचकांना उपलब्ध करून देणं.
  • वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी यूट्यूब, फेसबुक, इनस्टाग्राम या समाजमाध्यमांचा प्रभावी उपयोग करणं.

We Are Rajhansi​

           Founded in 1952 by Shivshahir Babasaheb Purandare, Rajhans Prakashan is one of the prestigious publishing houses in Marathi. Shri. G. Majgaonkar, the founder-editor of Manus, a weekly that created a distinctive identity among Marathi weeklies, joined Rajhans in 1957. Through the efforts of these two visionaries, the publishing house gradually took shape. Raja Shivchhatrapati, the celebrated book by Shivshahir Babasaheb Purandare, praised by P. L. Deshpande, reached households across Maharashtra and became one of Rajhans Prakashan’s most iconic publications.

       The social awareness, intellectual openness, and keen interest in various political and social movements of Shri. G. Majgaonkar, who nurtured Rajhans Prakashan, left a lasting imprint on the books published by Rajhans—a legacy that continues to this day.

         Shri. G. Majgaonkar’s younger brother, Dilip Majgaonkar, joined Rajhans in 1966. He now serves as the Director of the organization. Through the timely selection of subjects, identifying the right authors, maintaining excellent production values, and introducing innovative initiatives to take books to readers, Dilip Majgaonkar strengthened the foundation of Rajhans. As the range of subjects expanded, he established a discerning editorial team known for its expertise and high-quality editing.

        Rajhans gradually became known among Marathi readers for its diversity of subjects and richness of content. Alongside publishing, Dilip Majgaonkar also placed due emphasis on distribution and sales, essential components of a successful publishing house. Today, Rajhans has branches in Mumbai, Nagpur, Aurangabad, Nashik, Kolhapur, Satara, Sangli, Solapur, and Goa, creating a widespread network for book distribution and sales.

      An extensive collection of inspiring biographies and autobiographies, along with influential books on politics, history, and social issues, are among the distinctive features of Rajhans. The publishing house has also taken a leading role in publishing books on science, environment, eradication of superstition, and literary fiction.

        Rajhans Prakashan has always welcomed new subjects and new authors. Many writers introduced to readers by Rajhans have established a distinctive position in their respective fields through their work and writings

        The Rajhans catalogue encompasses virtually every genre of literature, with particularly strong collections in biography, autobiography, history, social issues, politics, and science—subjects that have become hallmarks of Rajhans Prakashan.

        The publishing house’s in-house editorial team remains one of Rajhans’s greatest strengths. The contribution of knowledgeable editors with expertise across diverse subjects has played an important role in maintaining the high standards and quality of Rajhans publications.

Our Approach

  • To bring writing characterized by diverse subjects and rich content to readers.

  • To establish a book distribution network across Maharashtra, emphasizing excellent editing and superior production quality.

Our Objectives

  • Publishing works across various genres by distinguished authors, ranging from rural writers to political figures and actors.

  • Making Kindle editions available to readers alongside printed books.

  • Effectively utilizing social media platforms like YouTube, Facebook, and Instagram to reach readers.

आमची वाटचाल

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याकडून ‘राजहंस’ची स्थापना.
१९५२
१९५७
‘माणूस’कार श्री. ग. माजगावकर यांचा ‘राजहंस’मध्ये प्रवेश.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या ‘राजा शिवछत्रपती’ या पुस्तकाचे प्रकाशन.
१९५९
१९६६
दिलीप माजगावकर यांचा ‘राजहंस’मध्ये प्रवेश.
वीणा गवाणकर यांचे ‘एक होता कार्व्हर’ प्रकाशित.
१९८१
१९८८
विश्वास पाटील यांचे ‘पानिपत’ प्रकाशित.
प्रकाशन कार्यासाठी 'मुंबई मराठी साहित्य संघा'चा 'वि.पु. भागवत पुरस्कार'.
१९९१
१९९२
विश्वास पाटील यांच्या ‘झाडाझडती’ या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार.
अनिल झणकर यांच्या ‘सिनेमाची गोष्ट’ या पुस्तकाला राष्ट्रपती पुरस्कार.
१९९३
१९९४
‘सृष्टिविज्ञानगाथा’ हा कोश प्रकाशित.
डॉ. जयंत नारळीकर यांचे ‘आकाशाशी जडले नाते’ प्रकाशित.
१९९८
१९९८
विश्वास पाटील यांचे ‘महानायक’ प्रकाशित.
‘राजहंस’ला ‘फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स, नवी दिल्ली’ तर्फे ‘डिस्टिंग्विश अवॉर्ड’.
२००८
२०१३
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ- श्री. पु. भागवत पुरस्कार.
म. सा. प. पुणे यांच्यातर्फे मा. दिलीप माजगावकर यांना जीवनगौरव.
२०१९
२०२०
अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ- दिलीप माजगावकर यांना जीवनगौरव.
'द फेडेरेशन ऑफ पब्लिशर्स अँड बुकसेलर्स, न्यू दिल्ली' - सुवर्ण पुरस्कार.
२०२२
२०२६
लोकमत वृत्तसमूहातर्फे मा. दिलीप माजगावकर यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’.
0+
प्रकाशित पुस्तके
0+
'राजहंसी' लेखक
0+
पुरस्कार व सन्मान
0+
वर्षांचा अनुभव

नेतृत्व व टीम

श्री. ग. माजगावकर

संचालक

दिलीप माजगावकर

संचालक

रेखा दिलीप माजगावकर

संचालक

डॉ. सदानंद बोरसे

संचालक आणि संपादक

शिरीष शेवाळकर

व्यवस्थापकीय संचालक

श्री. ग. माजगावकर

श्री. ग. माजगावकर

संचालक

अधिक वाचा ➝
दिलीप माजगावकर

दिलीप माजगावकर

संचालक

अधिक वाचा ➝
रेखा दिलीप माजगावकर

रेखा दिलीप माजगावकर

संचालक

अधिक वाचा ➝
डॉ. सदानंद बोरसे

डॉ. सदानंद बोरसे

संचालक आणि संपादक

अधिक वाचा ➝
शिरीष शेवाळकर

शिरीष शेवाळकर

व्यवस्थापकीय संचालक

अधिक वाचा ➝
आनंद वासुदेव हर्डीकर

आनंद वासुदेव हर्डीकर

संपादक

अधिक वाचा ➝
विनया खडपेकर

विनया खडपेकर

संपादक

अधिक वाचा ➝
करुणा गोखले

करुणा गोखले

संपादक

अधिक वाचा ➝
शिरीष सहस्रबुद्धे

शिरीष सहस्रबुद्धे

संपादक

अधिक वाचा ➝
डॉ. प्रिया प्रदीप निघोजकर

डॉ. प्रिया प्रदीप निघोजकर

‘ग्रंथवेध’ या गृहमासिकाच्या संपादक

अधिक वाचा ➝
विशाखा पाटील

विशाखा पाटील

सल्लागार - संपादक

अधिक वाचा ➝

आनंद वासुदेव हर्डीकर

संपादक

विनया खडपेकर

संपादक

करुणा गोखले

संपादक

शिरीष सहस्रबुद्धे

संपादक

डॉ. प्रिया प्रदीप निघोजकर

‘ग्रंथवेध’या गृहमासिकाच्या संपादक

विशाखा पाटील

सल्लागार -संपादक

पुरस्कार व सन्मान

Year Book title Author
१९९२ झाडाझडती विश्वास पाटील
२०११ बोक्या सातबंडे भाग ४ दिलीप प्रभावळकर
२००६ बोल माधवी आसावरी काकडे
२०१२ पांथस्थ शारदा साठे
२०१३ सुबोध बायबल फादर फ्रान्सिस दिब्रेटो
२०१७ खारीच्या वाटा ल. म. कडू
२०१७ गौहरजान म्हणतात मला सुजाता देशमुख
२०२२ मी संदर्भ पोखरतोय पवन नालट
२०२३ ब्राम्होस अभय सदावर्ते
२०२४ विंदांचे गद्यरूप सुधीर रसाळ
२०२५ काळ्या निळ्या रेषा राजू बाविस्कर
Year Book title Author Trust/Co
2026 पाकिस्तान मतलब क्या ? श्रीधर लोणी मराठी ग्रंथोत्तेजक संस्था
2026 गोष्ट रिझर्व्ह बँकेची विद्याधर अनास्कर -
2026 दौशाड डॉ. नंदकुमार राऊत मराठी भाषा संवर्धन संस्था राज्यस्तरीय
2026 मी... अल्लादियाखां अश्विनी भिडे देशपांडे शब्द सारथी संस्था, पुणे
Year Book title Author Name of award Trust/Co
2026 पाकिस्तान मतलब क्या ? श्रीधर लोणी आद्य सरसंचालक डॉ. हेडगेवार ग्रंथगौरव उत्कर्ष मंडळ विलेपारले
2026 गोदणखुणा डॉ. प्रिया निघोजकर स्व. विमलताई देशमुख पद्मगंधा प्रतिष्ठान, नागपूर
2026 आबाली प्रमोद धायगुडे स्व. शांताबाई शेकदार पद्मगंधा प्रतिष्ठान, नागपूर
2026 वस्त्रगाथा विनय नारकर श्री के क्षीरसागर पुरस्कार यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार
2026 माझे शाळेतले प्रयोग स्मिता गौड कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार
2026 १६९५ स्मार्ट रोबो सुरेश वांदिले साने गुरुजी पुरस्कार यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार
2026 चारा खा आणि पाणी प्या डॉ. उमेश करंबेळकर यदुनाथ थत्ते पुरस्कार यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार
2026 - डॉ. उमेश करंबेळकर कादंबरीकार ना. ह. आपटे श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज नगर
2026 गोदणखुणा डॉ. प्रिया निघोजकर - महिला विकास मंडळ, कुलाबा सन्मान
2026 दौशाड डॉ. नंदकुमार राऊत दया पवार पुरस्कार आशादीप उत्कृष्ट
2026 सोबत सांजवेळची पद्मजा मेहेंदळे - मराठी ग्रंथोत्तेजक संस्था
2026 - दिलीप माजगावकर जीवनगौरव साहित्य पुरस्कार दै. लोकमत
2026 नृत्यमय जग... नर्तनाचा धर्म शमा भाटे - लोकमत साहित्य पुरस्कार
2026 काळ्यानिळ्या रेषा राजू बाविस्कर - साहित्य अकादमी, नवी दिल्ली
2026 १६९५ स्मार्ट रोबो सुरेश वांदिले - मराठी भाषा संवर्धन संस्था राज्यस्तरीय
2026 एक उलट एक सुलट भाग २ अमृता सुभाष - अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका संस्था

अभिप्राय

आमची कहाणी आपली कहाणी नुकतच पुस्तक वाचून झालं...तुमचे सगळे अनुभव इतके वास्तव आहेत..जणू काही आपल्या मनात जे सुरू आहे अगदी तेच तुम्ही लिहून काढलं आहे...आपली नवीन ठिकाणी होणारी बदली..मनाची होणारीउलाघाल..मुलाना आणि स्वतःला त्या ठिकाणी जुळवून घेणं...नवीन लोकांशी जुळवून घेणं..स्थानिकराजकारण.. तिथली सर्व बर्‍या वाईट प्रवृत्तीची लोकं..स्थानिक भाषा..खात्यात येणारे अनुभव हे सगळे relateकरू शकते...प्रत्येक अधिकाऱ्याने आणि त्याच्या कुटुंबियांनी तर हे पुस्तक वाचलेच पाहिजे पण इतर क्षेत्रातीललोकांना राजकारण प्रशासन कसं एकमेकांशी जोडलेले आहे आणि कुटुंबीयांना सतत अशा बदलत्या जागांमध्येजुळवून घेणं किती अवघड आहे.. तारेवरची कसरत आहे हे ही समजेल...तुमच्या मनातले सगळे सल मग तेपतीच्या कामाच्या व्यस्ततेमुळे असो..की लोकाना मदत करून ही त्यांच्याकडून आलेले कटू अनुभव असोतकी आपले रहाणे वागणे विचार करणे हे तत्त्वाशी सतत तावून सुलाखून घेणे असो..तुमच्या संवेदनशीलमनातील ही सगळी आंदोलनं वाचकांच्या...
ज्येष्ठ दिग्दर्शिका, लेखिका, अभिनेत्री प्रतिमा कुलकर्णी यांची माझ्या 'क्लोज एंकाउंटर्स ' या पुस्तकावर अतिशय संवेदनशील प्रतिक्रिया.. पुरू, काल रात्री पुस्तक वाचून संपवलं. तू पाठवल्यावर लगेच सुरू केलं आणि भराभर वाचतही गेले, पण अचानक काही काम सुरू झालं आणि खंड पडला. राजम्मा पर्यंत येऊन खंड पडला होता. फार विषण्ण वाटत होतं. कदाचित म्हणूनच पटकन परत जाणं झालं नसाव. असो. तू म्हणालास ते अगदी बरोबर आहे. तुझ्या पुस्तकाने.मला एका वेगळ्या आणि अनोळखी जगाची सफर घडवून आणली. त्याबद्दल तुझे खूप आभार. पुस्तक वाचून, नाटक बघून जगात अनेक प्रकारची माणसं आणि त्यांची अनेक प्रकारची आयुष्य असतात हे माहीत होते पण इतक्या जवळून नाही. इतक्या अंगांनी तर नाहीच. पुस्तक फार सुंदर आहे असं म्हणवत नाही, तरीही ते तसं आहेच. अस्सल, जिवंत माणसांचं जिवंत चित्रण आहे...
पिढीजात : आखीवरेखीव वाटा टाळून निर्मिलेली अजरामर कलाकृती. स्नेही श्रीकांत देशमुख यांनी आपल्या 'पिढीजात'या थोरामोठ्यांकडून बहुवाचित, बहुचर्चित, बहुसमिक्षित कांदबरीतून येथील सामाजिक, आर्थिक, प्रशासकीय व राजकीय व्यवस्थेची 'पिढीजात' वर्तणूक कशी शोषक स्वरूपाचीच आहे, याचे आपल्या लेखणीतून त्यांच्या स्वानुभवातील अनुभवकथन केलेले आहेत. त्यामुळे ही कादंबरी काल्पनिक कथानकाधारीत नसून वास्तवाधारीत आहे हे नक्की ! कोणताही लेखक कोणतीही साहित्यकृती केवळ कल्पनेवर आरूढ होऊन लिहूच शकत नाही. स्वानुभवाच्या धाग्यांची गुंफण त्यात असतेच, हे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरू नये. श्रीकांत देशमुख हे माझे सहकर्मी मित्र म्हणून त्यांचे सर्व अनुभव आमच्यासारख्या सहकर्मींच्या पाहणीतले, स्वानुभवातले आणि म्हणून मनाला थेट भिडणारे आहेत. कादंबरीकाराने वाचकांच्याच वास्तव आयुष्याचे, घटनांचेच चित्र जसेच्या तसे रेखाटले आहे, असे वाटावे इतकी या कादंबरीतील मांडणी वाचकाला जवळची वाटणारी आहे. सहकार क्षेत्र हे राजकारणगर्भित असले तरी 'पिढीजात'चा नायक...
मराठीतील प्रवासवर्णनांच्या नेहमीच्या पायवाटा सोडून अनवट वाटांवरील अनेक अनोळखी जागा, व्यक्ती आणि गांवे यांची खास कुबेर शैलीत खुमासदार ओळख करून देणारे हे वाचनीय पुस्तक आहे.
साहेबांच्या देशात हे पुस्तक विशेषतः त्या वाचकांसाठी महत्त्वाचं आहे, ज्यांना इतिहास, समाज आणि संस्कृती यांचा परस्परसंबंध समजून घ्यायचा आहे. हे…
Scroll to Top
">