-
Sale! Add to cartशरद जोशी शेतकरी आंदोलनाचे अखिल भारतीय नेते यूनोची नोकरी सोडून ते स्विट्झरलंडहून परतले आणि त्यांनी भारतीय शेतकऱ्यांमध्ये जागृतीचा मंत्रजागर आरंभला- सभा, शिबिरं, आंदोलनं, प्रशिक्षण ... कॉलेजात शिकणारी वसुंधरा काशीकर जनसंसदेत सहभागी झाली. शिक्षणाबरोबरच तिच्या जीवनात एक आगळा अध्याय सुरू झाला- शरद जोशी नंतर सतरा वर्षांच्या सहवासात ती पाहत गेली त्यांचं कर्तृत्व ती त्यांना विचारत गेली कितीतरी प्रश्न- त्यांच्याविषयी, स्वतःविषयी, भोवतालच्या परिास्थिंतीविषयी या जिज्ञासू, संवेदनशील मुलीला त्यांनी भरभरून उत्तरं दिली. त्यातून तिला दिसलेले शरद जोशी... शेतकऱ्यांचा देव, पण एकाकी माणूस! बुद्धिवादी, अहंकारी, तरी भावनांनी ओथंबलेले, किचकट अर्थशास्त्राच्या मुळाशी भिडणारे आणि सर्व कला-वाङ्मयांवरही प्रेम करणारे मनातले विचार आचरणात उतरवून स्वतःचा आरपार शोध घेणारे शरद जोशी शोध अस्वस्थ कल्लोळाचा!
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेSharad Joshi – Shodh Asavastha Kallolacha! | शरद जोशी – शोध अस्वस्थ कल्लोळाचा!
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartशेअर म्हणजे कंपनीच्या मालमत्तेवर आपला हक्क आणि नफ्यात पूर्ण हिस्सेदारी; पण कंपनीला तोटा झाला, तर मात्र आपल्यावर काहीच जबाबदारी नाही. चांगल्या शेअर्समुळे म्हणून तर समृद्धीची गंगाच दारी अवतरू शकते. पण मुळात शेअर्स म्हणजे काय ? ते मिळतात कुठे ? चांगले शेअर्स नेमके ओळखायचे कसे ? त्यांच्या खरेदीची व विक्रीची योग्य वेळ कोणती ? इन्ट्रा-डे आणि डिलिव्हरी व्यवहारांतील खाचाखोचा कोणत्या ? कंपनीची कार्यक्षमता नेमकी कशी जोखायची ? ताळेबंद व नफा- तोटा पत्रक कसे वाचायचे ? एखादी कंपनी उद्यासुद्धा फायद्यात राहील की नाही, हे इंटरनेटवरील उपलब्ध माहितीवरून आजच ओळखायचे कसे ? नेमके हेच तर सारे सांगितले आहे या पुस्तकात ! तुमच्या सा-या शंकांचे अत्यंत सोप्या शब्दांत निरसन करणारे मराठीतील एकमेव सचित्र पुस्तक शेअर बाजार जुगार? छे, बुद्धिबळाचा डाव !
कायदाविषयक - अर्थव्यवहारShare Bajar – Jugar? Che Buddhibalacha Dav! | शेअर बाजार – जुगार? छे, बुद्धिबळाचा डाव!
₹400.00Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00. Save ₹100 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreबघता बघता विसावं शतक संपलं. काय दिलं त्यानं मानवजातीला ? गर्दी, प्रदूषण, संहारविद्या, सर्वनाशाची बीजं; का पदार्थविज्ञान, रसायन, दळणवळण, अंतराळ-संशोधन अशा शास्त्रांची मूलतत्त्वं ? मार्कोनी, फॅरेडे, रॉबर्ट गोडार्ड, राईट बंधू, आइन्स्टाइन, नील्स बोहर, जोहान मेंडेल, इयान विल्मुट अशा अगणित शास्त्रज्ञांनी अनेक विषयांत शोध लावून समृध्द केलेल्या विसाव्या शतकातील निवडक शोधांची ओळख करून देणारा ग्रंथ.
विज्ञानShatak Shodhanche | शतक शोधांचे
₹1,000.00Original price was: ₹1,000.00.₹750.00Current price is: ₹750.00. Save ₹250 Read more -
Sale! Add to cartज्ञानपीठ विजेते तपोधन साहित्यिक वि.स.खांडेकर यांनी १९७२ साली अगत्याने लिहिलं, काळाची नाडी रवींद्र पिंगे ह्यांना सापडली आहे. ते मर्माचं तेवढंच, पण काव्यात्मक लिहितात. त्यांच्याकडून माझ्या अपेक्षा आहेत. त्यानंतर पिंगे ह्यांनी जवळपास दोनशे मर्मग्राही व्यक्तिचित्रं लिहिली. घाटदार रचना,शब्दसौष्ठव आणि डोळस गुणग्राहकता ही भाऊसाहेब खांडेकरांनी टिपलेली पिंगे ह्यांची लेखनवैशिष्टयं शतपावली ह्या पुरस्कारप्राप्त संग्रहात लखलखीत दिसतात.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेShatpavali | शतपावली
₹190.00Original price was: ₹190.00.₹143.00Current price is: ₹143.00. Save ₹47 Add to cart -
Sale! Add to cart'साने गुरुजींच्या लेखणीतून नव्हे तर थेट हृदयातून उमटलेलं पुस्तक - श्यामची आई . मातृप्रेमाचं महन्मंगल स्तोत्र असं या पुस्तकाचं सार्थ वर्णन करणाऱ्या आचार्य अत्र्यांनी त्याच्यावर सुवर्णपदक विजेता ठरलेला चित्रपट बनवला. या चित्रपटात श्याम च्या भूमिकेसाठी निवड झाली, माधव वझे या शाळकरी मुलाची. वर्षभर चाललेली चित्रपटाची निर्मिती, त्या वर्षभरात आचार्य अत्रे नावाच्या विलक्षण व्यक्तिमत्त्वाचं घडलेलं लोभस दर्शन आणि वनमालाबाई, बाबुराव पेंढारकर, सरस्वतीबाई बोडस यांच्यासारख्या अनेक कलाकारांचा लाभलेला सहवास या साऱ्यांच्या अम्लान आठवणींचे माधव वझे यांच्या मनावर उमटलेले ठसे म्हणजे श्यामची आई , आचार्य अत्रे आणि मी
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेShaymchi Aai Acharya Atre Aani Me | श्यामची आई आचार्य अत्रे आणि मी
₹180.00Original price was: ₹180.00.₹135.00Current price is: ₹135.00. Save ₹45 Add to cart -
Sale! Add to cartशेपटी हा अनेक प्राण्यांच्या शरीराचा महत्त्वाचा आणि अतिशय उपयुक्त अवयव आहे. ठरावीक प्राण्यांनाच हा अवयव का मिळाला ? शेपटीचे काय काय उपयोग असतात ? शेपटी नसती, तर त्यांना जगता आले असते का ? चला, या पुस्तकात शोधू या अशा अनेक प्रश्नांची उत्तरे. शेपटीच्या गोष्टी
All BooksShepteechya Goshtee | शेपटीच्या गोष्टी
₹60.00Original price was: ₹60.00.₹45.00Current price is: ₹45.00. Save ₹15 Add to cart -
पर्यावरण
Sheti Israelchi | शेती इस्त्राईलची
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Read more -
Sale! Add to cartअणुवैज्ञानिक म्हणून प्रसिध्द असणारे सुरेश हावरे शिर्डीच्या श्री साईसंस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्षही आहेत आणि अनेक नवोद्योगांना प्रेरणा देणारे यशस्वी उद्योजकही आहेत. विज्ञानातील विवेक आणि श्रद्धेतील सेवाभाव यांची सुयोग्य सांगड घातली की, सत्कार्याला कसे असंख्य धुमारे फुटतात, याचे त्यांनी घडवलेले दर्शना कल्पक तर आहेच, पण प्रयत्नवादाला प्रोत्साहक असे पाठबळ देणारेसुध्दा आहे. गेल्या काही वर्षांत विविध ठिकाणी, निरनिराळ्या प्रसंगी त्यांनी केलेल्या भाषणांमुळे अनेकांना यशाचा मूलमंत्र गवसला. कित्येकांना जीवनातील सुखासमाधानाची गुरुकिल्ली मिळाली. ज्यांनी ज्यांनी ही भाषणे ऐकली, ते ते सारे प्रभावित झाले. त्या भाषणांमध्ये विखुरलेले संस्कारधन संकलित स्वरूपात अधिक व्यापक प्रमाणावर उपलब्ध होण्याची गरज जाणवली. समाजातल्या धडपडणाऱ्या तरूणांना पुढील वाटचालीत दिलासा देऊ शकेल, अशी ही 'शिदोरी' म्हणूनच प्रसिध्द होते आहे. बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे सुरेश हावरे यांचे अनुभवांतून साकारलेले ही प्रेरणादायी बोल. विधायक वातेवरच्या असंख्य पांथस्थांना ही 'शिदोरी' खचितच मोलाची वाटेल.
संकीर्णShidori Part 1 | शिदोरी भाग १
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cartशिदोरी म्हणजे संचित. माणसाच्या सोबत असलेली हक्काची मीठ - भाकर. आपल्या आयुष्यातील उत्कट, कातर अनुभवांनी दिलेलं शहाणपण. जगण्याच्या प्रवासात आलेल्या घटनांनी दिलेली सार्थ शिकवण हीसुद्धा शिदोरीच. कधी संदेशाच्या रूपात, कधी आशीर्वादाच्या रूपात. शिदोरी भूक भागवतेच, पण ती तुम्हाला आधार देते, बळ देते, ऊर्जा देते, चैतन्य देते. विचारांची शिदोरी पडताना सावरते, गोंधळताना स्थिर ठेवते, निराशेत मनावर फुंकर मारते आणि अतिविश्वासाच्या, अतिउन्मादाच्या वेळी आपल्याला लगामही घालते. हातांचे पंख करण्याची ताकद शिदोरीत असते , काट्यांकुट्यांतून वाट काढण्याचं शहाणपण शिदोरीत असतं आणि अतिउत्साहात भरारी घेण्याची अतिशयोक्त रिस्क घेताना थोपवण्याचं चतुरपणही शिदोरीत असतं. ऊर्जेनं भरलेली, सकारांनी गजबजलेली, आत्मविश्वासानं सजवलेली आणि बंधुभावनेनं बहरलेली. विचारांची भूक लागलेल्यांना पोटभर देणारी.. या पुस्तकाचं पान न् पान उलगडताना, डॉ. सुरेश हावरे यांचा तेजानं भरलेला, मदतीच्या भावनेनं कृपामय झालेला, साऱ्या बांधवांसाठी उत्कर्षाचं, उद्धाराचं पसायदान मागणारा 'हसतमुख चेहरा' दिसत राहतो, ही या विचारांची एक उजवी बाजू आहे. अरुण म्हात्रे
All BooksShidori Part2 | शिदोरी भाग २
₹230.00Original price was: ₹230.00.₹173.00Current price is: ₹173.00. Save ₹57 Add to cart -
Sale! Add to cartअनघड शैलीतले हे पुस्तक वाचताना आपल्याला गेल्या पिढीतील एक कलंदर, जिद्दी कार्यकर्ता आणि त्याच्या ध्यासात तितक्याच तन्मयतेने सहभागी होणारी त्याची पत्नी भेटते. डोमरीसारख्या आडवळणी गावात 'गुरुकुल' चालवण्याचा सुदामकाका आणि सिंधूमामींनी घेतलेला निर्णय हिशोबी शहाणपण बाळगणाऱ्या जगाला पटणे अवघड आहे. पण नवनिर्मितीसाठी बऱ्याचदा हिशोबी शहाणपणापेक्षा बेहिशोबी वेडेपणाच गरजेचा असतो, याची आठवण हे पुस्तक वाचताना परत एकदा होते. नीलेश निमकर
All BooksShikshnachya Ovya | शिक्षणाच्या ओव्या
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart
">
Skip to content