इतिहास
-
Sale! Add to cartसा-या जगाची झोप उडवणा-या भावी महासत्तेची उण्यापु-या अर्ध शतकाची चित्तथरारक कथा. स्वाभिमानाने सजलेली, रक्ताने माखलेली !
इतिहासDragan Jaga Zalyavar (Lokawrutti) | ड्रॅगन जागा झाल्यावर (लोकआवृत्ती)
₹425.00Original price was: ₹425.00.₹319.00Current price is: ₹319.00. Save ₹106 Add to cart -
Sale! Add to cartपानिपत ही मराठयांच्या इतिहासातील भळभळती जखम. दिल्लीवर जरीपटका फडकवण्याचे स्वप्न पानिपतच्या पराभवामुळे धुळीला मिळाले. मराठयांची उत्तरेकडील घोडदौड थांबली. मात्र पानिपतच्या पराभवाचे तरंग दक्षिणेतही उमटल्यावाचून राहिले नाहीत. मराठयांच्या पराभवाची वार्ता कळताच हैदर अली, निजाम यांना स्फुरण चढले व ते अधिक त्वेषाने मराठयांविरुध्द एकत्र आले. त्याचवेळी दक्षिणेत मोगलांना जिवाच्या कराराने रोखून धरणा-या मराठा सरदारांकडे पानिपतच्या मन्वंतरानंतर पुणे, सातारा व कोल्हापूर या तिन्ही मराठा सत्ताकेंद्रांचे दुर्लक्ष होऊ लागले. तरीसुध्दा तंजावरपर्यंत पसरलेल्या मराठयांनी स्वबळावर हैदर अली, निजाम, इंग्रज आणि पाँडेचरीतील फ्रेंच यांच्याशी झुंज देणे सुरूच ठेवले. या चारही आक्रमकांना जिवात जीव असेपर्यंत तोंड देऊन दक्षिणेतील गुत्तीचे राज्य मराठयांच्या हातून सुटू नये, यासाठी शर्थीचे प्रयत्न करणारे मुरारीराव घोरपडे हे शेवटचे मराठा सेनापती. हैदरच्या विरोधात त्यांनी दिलेली एकाकी झुंज हा मराठयांच्या शौर्याचा, अतुलनीय घोडदळाचा व त्याचवेळी आपसातील दुफळीचा, फंदफितुरीचा आणि मराठा सत्ताकेंद्रांनी अवलंबलेल्या चुकीच्या धोरणांचा दाखलाच म्हणता येईल.
इतिहासEk Zunj Sharthichi | एक झुंज शर्थीची
₹225.00Original price was: ₹225.00.₹169.00Current price is: ₹169.00. Save ₹56 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreबघता बघता आपल्या स्वातंत्र्याला ६० वर्षे झाली. आपले स्वातंत्र्य आणि त्याच वेळी देशाची झालेली फाळणी या एकाच नाण्याच्या दोन बाजू. तथापि एकूण स्वातंत्र्यलढ्याबद्दल आपल्याकडे जेवढा अभ्यास केला गेला आहे, तेवढा फाळणीबद्दल, त्यावेळी घडलेल्या हिंसाचाराबद्दल आणि अभूतपूर्व स्थलांतराबद्दल मात्र झालेला नाही. ज्येष्ठ सनदी अधिकारी (माजी केंद्रीय गृहसचिव) माधव गोडबोले यांनी द होलोकॉस्ट ऑफ इंडियन पार्टिशन : ॲन इन्क्वेस्ट या आपल्या ग्रंथामध्ये मात्र फाळणीची सर्वांगीण व सखोल चिकित्सा केली आहे. त्यासाठी त्यांनी सर्व संबंधित नेत्यांच्या चरित्रांमधील तो १८ महिन्यांचा कालखंड बारकाईने तर अभ्यासला आहेच, पण असंख्य सरकारी कागदपत्रांचा, अहवालांचा, फायलींवरील टिपणांचासुद्धा धांडोळा घेतला आहे. एखाददुस-या नेत्याला जबाबदार धरण्याऐवजी असंख्य गुंतागुंतीचे घटक प्रकाशझोतात आणले आहेत. कसल्याही अभिनिवेशाच्या आहारी न जाता त्यांनी केलेली मांडणी म्हणूनच विचारांना चालना देणारी ठरली आहे. माधव गोडबोले यांच्या त्या महत्त्वपूर्ण ग्रंथाचा त्यांच्या पत्नी सुजाता गोडबोले यांनी केलेला हा मराठी अनुवाद.
इतिहासFalniche Hatyakand | फाळणीचे हत्याकांड
₹450.00Original price was: ₹450.00.₹338.00Current price is: ₹338.00. Save ₹112 Read more -
इतिहास
Fidel Che Aani Kranti | फिडेल, चे आणि क्रांती
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Sale! Add to cart'गांधी या माणसात अशी काही चुंबकीय शक्ती होती, की राजबिंडे, देखणे व्यक्तिमत्त्व लाभलेले नसतानाही भलेभले त्यांना भेटताक्षणीच त्यांच्या प्रेमात पडत. गांधीजी पहिल्याच भेटीत आपल्याला कसे दिसले, याचे मनमोकळे वर्णन असंख्य देशीविदेशी मान्यवरांनी करून ठेवले आहे. चार्ली चॅप्लिन, रोमँ रोलाँ, लुई फिशर, एडगर स्नो, विल्यम शिरर... सरोजिनी नायडू, विनोबा भावे, आचार्य कृपलानी, निर्मल कुमार बोस, राजेंद्र प्रसाद... अशा पन्नास नामवंतांचा या मांदियाळीत समावेश आहे. अशा वेधक उता-यांचे अनोखे संकलन गांधी प्रथम त्यांस पाहता...
इतिहासGandhi: Pratham Tyas Pahata | गांधी : प्रथम त्यांस पाहता…
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cart' स्वातंत्र्यवीरांची मृत्यूनंतरही विटंबना केलीच पाहिजे का? - नरहर कुरुंदकर सावरकरांना न्यायालयाने गांधीहत्येच्या आरोपातून पूर्णपणे निर्दोष ठरविले असताही गेल्या पंधरा वर्षांपासून त्यांना बदनाम करण्याची मोहीम कशी चालू आहे? त्यांच्याविरुद्ध न्यायालयात पुरावा तरी कोणता होता? गांधीहत्येनंतर वीस वर्षांनी नियुक्त झालेला कपूर आयोग हा न्यायालयाच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यासाठी होता काय ? अहवालात आयोगाने सावरकरांना दोषी धरणारे अधिकारबाह्य मतप्रदर्शन कसे केले ? आयोगासमोर कोणता नवा पुरावा तरी आला होता काय ? मुंबई व दिल्ली पोलिसांनी बनावट कागदपत्रे कशी तयार केली होती ? सावरकरांचे गांधीजी, काँग्रेस व नेहरूंचे सरकार यांच्याशी संबंध कसे होते ? शेवटच्या काळात गोडसे सावरकरांच्या विरोधी का झाला होता ? गांधीहत्येमुळे सावरकरवादावर होणाऱ्या विपरीत व आत्मघातक परिणामाचा विचार तरी सावरकरांनी केला असेल की नाही ? - अशा सर्व प्रश्नांचा कायदा, वास्तव, तर्क व न्यायबुद्धी यांच्या आधारे अभ्यासपूर्ण चिकित्सा करणारा ग्रंथ.
इतिहासGandhihatya Aani Savarkaranchi Badnami | गांधीहत्या आणि सावरकरांची बदनामी
₹425.00Original price was: ₹425.00.₹319.00Current price is: ₹319.00. Save ₹106 Add to cart -
Sale! Add to cart'महात्मा गांधी हे विसाव्या शतकातील एक लोकोत्तर नेते होते. जगातील एका बलाढय साम्राज्याला नामोहरम करताना त्यांनी अहिंसात्मक सत्याग्रहाचे अभिनव साधन वापरले. त्या साधनाची महती जगभर पसरली. त्यांच्या जीवनातून अनेकांना नवी प्रेरणा मिळाली'... हे सारे काही आपण ऐकून असतो; पण याबद्दलचा महत्त्वाचा तपशील मात्र आपल्याला ठाऊक नसतो. नेमका तो तपशील पुरवणारे हे पुस्तक... गांधीजींच्या असामान्य नेतृत्वगुणांची ते मीमांसाही करते, त्या गुणांमुळे मिळालेल्या यशाची कथाही सांगते आणि देशोदेशीच्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या कार्यकर्तृत्वावर गांधीजींच्या विभूतिमत्त्वाचा कसा, कोणता प्रभाव पडला, याचे सविस्तर, सोदाहरण विवेचनही करते. अनेक देशीविदेशी भाषांमध्ये अनुवादित झालेले हे पुस्तक आता मराठी वाचकांच्या भेटीला...
इतिहासGandhijinche Asamanya Netrutva | गांधीजींचे असामान्य नेतृत्व
₹325.00Original price was: ₹325.00.₹244.00Current price is: ₹244.00. Save ₹81 Add to cart -
Sale! Add to cartहेडलीचं व्यक्तिमत्व आकर्षक. वागणं सभ्य अन् सुसंस्कृत. स्वभाव नम्र, ऋजू, मनमिळाऊ. स्वत:च्या वडलांकडून मायेचा ओलावा न मिळालेल्या राहुलला हेडलीता सहवास म्हणजे मनाला उभारी देणारं हक्काचं विश्रांतीस्थान वाटू लागलं. पण हेडलीच्या चेह-यावरचा हा दिखाऊ मुखवटा जेव्हा दूर झाला, तेव्हा- २६ नोव्हेंबरच्या मुंबईवरील हल्लाचं नियोजन करणारा भेसून सैतानी चेहरा राहुलसमोर आला तेव्हा-
इतिहासHedly Aani Me | हेडली आणि मी
₹240.00Original price was: ₹240.00.₹180.00Current price is: ₹180.00. Save ₹60 Add to cart -
Sale! Add to cartकोणतेही अस्तित्व निखळ चांगले किंवा निखळ वाईट नसते. प्रत्येक अस्तित्वाचा काही उद्देश असतो. शतकपूर्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या हिंदुत्व परिवार आणि मार्क्सवादी परिवारावरसुद्धा चांगल्या वाईटाचे शिक्के बसले. स्वातंत्र्याचे उद्दिष्ट साध्य झाल्यावर काँग्रेस परिवार देशाच्या राजकारणात वैचारिक कोलांट्याउड्या मारत राहिला. काळाच्या ओघात काही पक्ष नाहीसे झाले, तर काहींचे अस्तित्व मर्यादित राहीले. अनेक चांगल्या संघटना आणि संस्था डबघाईला आल्या किंवा त्यांचे महत्त्व कमी झाले. पण हिंदुत्व परिवार आणि मार्क्सवादी परिवार यांनी त्यांची तत्त्वे आणि त्यांची कॅडर यांच्या बळावर ठाम उभे राहून, हातात सत्ता असताना व नसतानाही देशाच्या राजकारणात आणि समाजकारणात महत्त्वाची भूमिका निभावली. हे दोन परिवार आणि भारत यांच्या राजकीय वाटचालीचा हा मागोवा.
All BooksHindutava, Marxvaad Ani Bharat | हिंदुत्व, मार्क्सवाद आणि भारत
₹1,000.00Original price was: ₹1,000.00.₹750.00Current price is: ₹750.00. Save ₹250 Add to cart -
Sale! Add to cart'इंदिरा गांधी या कर्तबगार पंतप्रधानांचे हे सरळसाधे चरित्रकथन नाही; ते आहे त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत घडलेल्या अनेकानेक खळबळजनक घटनांचे विश्लेषण. बांगलादेश युद्धापासून ब्ल्यू स्टार मोहिमेपर्यंत, अंतर्गत आणीबाणीपासून खलिस्तानी चळवळीपर्यंत, बँकांच्या राष्ट्रीयीकरणापासून असंख्य घटनादुरुस्त्यांपर्यंत... इंदिराजींनी जी जी धोरणे अनुसरली, ती कितपत यशस्वी ठरली आणि किती फसली, याचे एका ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्याने केलेले हे समतोल मूल्यमापन जुन्या आठवणी जागवील आणि काही महत्त्वाच्या धड्यांची उजळणीही करायला लावील.
इतिहासIndira Gandhi : Ek Vadali Parva | इंदिरा गांधी : एक वादळी पर्व
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart
">
Skip to content
