इतिहास
-
Out of stock
Out of stock
Sale! Read moreराष्ट्रध्वज म्हणजे केवळ रंगीबेरंगी कापड नव्हे, त्यात असलेले उभे-आडवे धागे तर आपल्या तनमनातील जाज्वल्य राष्ट्रप्रेमाचे आणि इथल्या सर्व जातींना, धर्मांना, पंथांना एकत्र बांधणा-या राष्ट्रप्रेमाचे धागे आहेत. गेल्या पाच हजार वर्षांत परकीय आक्रमकांना परतवून लावताना आपल्या पूर्वजांनी केलेल्या पराक्रमाचा साक्षीदार असणा-या ध्वजाचा हा इतिहास. इंग्रजांविरूध्दच्या राष्ट्रीय स्वातंत्र्यसंग्रामातील एक अनमोल शस्त्र असणारा तिरंगा ध्वज आज स्वातंत्र्यानंतर शेजारच्या परकीय आक्रमकांच्या मनात धडकी भरवतो ! आपल्या राष्ट्रीय मानचिन्हाच्या इतिहासाचा आणि वर्तमानाचा घेतलेला हा वेध !
इतिहासRashtradhwaj : Prachin Te Arvachin | राष्ट्रध्वज : प्राचीन ते अर्वाचीन
₹120.00Original price was: ₹120.00.₹90.00Current price is: ₹90.00. Save ₹30 Read more -
इतिहास
Sanghachya Itihasatil Alpadnyat Adhyay | संघाच्या इतिहासातील अल्पज्ञात अध्याय
₹30.00Original price was: ₹30.00.₹23.00Current price is: ₹23.00. Save ₹7 Add to cart -
इतिहास
Sattavanna Te Sattechalis (Lokavrutti) | सत्तावन्न ते सत्तेचाळीस (लोकआवृत्ती)
₹600.00Original price was: ₹600.00.₹450.00Current price is: ₹450.00. Save ₹150 Read more -
Sale! Add to cartसाल १९९१. २१ मे ची रात्र. घडयाळात १० वाजून २० मिनिटं झालेली. ती तरूणी आदरानं झुकली. तिचा हात त्यांच्या पावलांच्या दिशेनं गेला... आणि अचानक कानठळया बसवणारा स्फोट झाला. धुराचे ढग विरले आणि समोर आला छिन्नविछिन्न मृतदेहांचा रक्तामांसाचा चिखल... ही आहे मन गोठवणारी कहाणी. थरारक पण उदास करणारी. राजीव गांधींना कोणी व का मारलं ? हे गूढ उकलण्यासाठी मग भारत सरकारनं पाचारण केलं, ते डी.आर. कार्तिकेयन यांना. त्यांच्या अथक परिश्रमाची आणि तपासाची ही कथा...
इतिहासSatyameva Jayate: Shodh Rajeev Hatyecha | सत्यमेव जयते : शोध राजीव हत्येचा
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cart'कितीही वाटले, तरी आपले शेजारी बदलता येत नाहीत. पाकिस्तान आणि चीन... हे आपले दोन सख्खे शेजारी देश. अगदी सुरुवातीपासूनच आपल्याला पाण्यात पाहणारे, आपल्याशी लढून हरवायची खुमखुमी बाळगणारे आणि भल्याबुऱ्या मार्गांनी सतत आपल्या कुरापती काढणारेदेखील ! जागतिक महासत्ता बनण्याच्या मार्गावर वेगाने झेपावणारा चीन आणि भारतद्वेषापायी कोणत्याही थराला जाऊ शकणारा पाकिस्तान हे दोन देश संगनमताने आपल्याला आव्हान देऊ पाहात आहेत. त्या दोघांच्या व्यूहरचनेचा दीर्घकालीन आढावा घेणारे हे पुस्तक प्रत्येक देशप्रेमी नागरिकाला सावधानतेचा अगदी समयोचित इशाराही देत आहे...
इतिहासSavadh Aika… | सावध ऐका…
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Sale! Add to cartशिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचा मानदंड ! त्यांच्या पराक्रमाची गाथा अनेक चरित्रकारांनी आजवर गायिलेली आहे आणि पुढेही गातील. न्यायमूर्ती रानडे यांनी 'मराठी राष्ट्राची' निर्मिती ही शिवाजीराजाची थोर देशसेवा असा सिद्धांत मांडला. डॉ. सुरेंद्रनाथ सेन यांनी त्यांच्या प्रशासनाचे आणि लष्करी पद्धतीचे विवेचन केले. परंतु 'मराठी राज्य' आर्थिकदृष्ट्या कसे सबल होईल यासाठी शिवरायांनी जे प्रयत्न केले त्याचा आजवर साकल्याने फारसा विचार झाला नाही. 'शिवकालीन महाराष्ट्र' या ग्रंथात, समकालीन साधनांच्या साहाय्याने १७ व्या शतकातील आर्थिक जीवनाचा विचार प्रथमच इतक्या विस्तृतपणे मांडला आहे. मराठ्यांचे राज्य म्हणजे लुटारूंचे राज्य अथवा लष्करी राजवट अथवा सरंजामशाही नसून ते 'बहुत जनांसी आधारू' असे लोकांचे राज्य होते, त्या राज्याच्या राजमुद्रेत 'भद्राय' राजते अशी अक्षरे होता, आणि 'धाकुटपणा'पासून माणसाचे माणस वळखतात असे अभिमानाने म्हणणा-या 'स्वामी'ने निर्माण केलेले ते 'कल्याणकारी' राज्य होते त्याचा विस्तार छोटासा असला तरी 'आर्थिकदृष्ट्या' त्याला स्थैर्य येण्यासाठी शिवरायांनी केलेल्या प्रयत्नांचे येथे विवेचन केले आहे आणि हेच या ग्रंथाचे आगळे-वेगळेपण आहे.
इतिहासShivakalin Maharashtra | शिवकालीन महाराष्ट्र
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Sale! Add to cart'मराठी लोकांना आपल्या इतिहासाचा खूप अभिमान वाटतो. महाराष्ट्राला इतिहास आहे, इतर प्रांतांना फक्त भूगोल आहे, असे अभिनिवेशाने म्हणण्यापर्यंत कधीकधी आपली मजल जाते. तथापि आपले इतिहासाबद्दलचे ज्ञान मात्र मध्ययुगापर्यंत - शिवपूर्वकालापर्यंत - जाऊन थबकते. त्यापूर्वीचा समृध्द इतिहास, सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीपर्यंत विस्तारता येणारी त्याची मर्यादा, त्या प्रदीर्घ कालखंडातील विविध स्थित्यंतरे आणि चढउतार याबाबत मात्र आपल्याला पुरेशी माहिती नसते. हा ग्रंथ ती तशी माहिती करून देणारा वैशिष्टयपूर्ण ग्रंथ आहे. सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, यादव इ. राज्यकर्त्या घराण्यांच्या इतिहासाची दखल घेत पुढे जाणारा हा ग्रंथ शिवशाहीला आणि पेशवाईलाही आपल्या कवेत घेतो आणि इतिहासाचा तो धागा संयुक्त महाराष्ट्राच्या यशस्वी आंदोलनापर्यंत - अगदी आजच्या महाराष्ट्रापर्यंत - आणून सोडतो. जवळजवळ दोन हजार वर्षांच्या इतिहासातील अनेक स्थित्यंतरांचा साकल्याने वेध घेणारा हा ग्रंथ महाराष्ट्राच्या वर्तमानाकडे व भविष्याकडेही वेगळया नजरेने पाहण्याची दृष्टी आपल्याला देतो... इतिहासाची गती चक्राकार असते, असे डॉ. राम मनोहर लोहिया यांचे मत होते. उत्पत्ती, स्थिती आणि विनाश या अवस्थांच्या फेऱ्यांतून वरखाली होणारे इतिहासचक्र नीट न्याहाळले, तर आपल्याला अनेक बोचऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात. सर्व महाराष्ट्रप्रेमींनी आवर्जून वाचावा व संग्रही बाळगावा, असा साधार, साक्षेपी इतिहासग्रंथ... '
इतिहासShodh Maharashtracha | शोध महाराष्ट्राचा
₹600.00Original price was: ₹600.00.₹450.00Current price is: ₹450.00. Save ₹150 Add to cart -
Sale! Add to cartश्रीलंका... अंतर्गत संघर्षाने हैराण झालेला आपला शेजारी देश. प्रभाकरनसारख्या अट्टल दहशतवाद्याने दिलेल्या आव्हानावर त्या देशाने कशी मात केली, याची एका निष्णात लष्करी अधिकाऱ्याने सांगितलेली रक्तरंजित, रोमांचकारी हकिगत...
इतिहासShrilankechi Sangharshagatha | श्रीलंकेची संघर्षगाथा
₹325.00Original price was: ₹325.00.₹244.00Current price is: ₹244.00. Save ₹81 Add to cart -
Sale! Add to cart'श्रीशिवराय IAS? आँ ? पुस्तकाच्या नावात काही घोटाळा झालाय का ? अजिबात नाही! शिवाजीमहाराज स्वराज्यसंस्थापक होते, मुत्सद्दी राजकारणी होते, धुरंधर सेनानी होते, चारी दिशांना टपलेल्या शत्रूंना जरबेत ठेवणारे अन् रयतेचे अपत्यवत् पालन करणारे राज्यकर्ते होते. या साऱ्याबरोबरच हा जाणता राजा अत्यंत कुशल प्रशासक होता. महाराजांच्या पस्तीस वर्षांच्या कारकिर्दीत लढाया आणि प्रशासकीय कामकाज यांच्या काळाचे प्रमाण १:४ असे आहे. आजही आदर्श प्रशासनाचा वस्तुपाठ ठरावा, अशा त्यांच्या कुशल सुशासनाचा परिचय म्हणजेच श्रीशिवराय IAS? '
इतिहासShrishivray Ias? | श्रीशिवराय I A S ?
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cart'श्रीशिवराय MBA FINANCE ? आँ ?? पुस्तकाच्या नावात काही घोटाळा झालाय का ? अजिबात नाही ! शिवाजीमहाराज स्वराज्यसंस्थापक होते, मुत्सद्दी राजकारणी होते, धुरंधर सेनानी होते, चारी दिशांना टपलेल्या शत्रूंना जरबेत ठेवणारे अन् रयतेचे अपत्यवत् पालन करणारे राज्यकर्ते होते. या सा-याबरोबरच हा जाणता राजा कुशल, धोरणी अन् यशस्वी अर्थतज्ज्ञ होता. नंतर भारतभर पसरलेल्या मराठी साम्राज्याचा भक्कम पाया होता श्रीशिवरायांनी राबवलेले खंबीर अर्थधोरण. महाराजांच्या या यशस्वी अर्थकारणाचा साक्षेपी परिचय म्हणजेच श्रीशिवराय MBA FINANCE
इतिहासShrishivray Mba Finance? Maharajanche Yashasvi Arthakaran | श्रीशिवराय M B A FINANCE? महाराजांचे यशस्वी अर्थकारण
₹225.00Original price was: ₹225.00.₹169.00Current price is: ₹169.00. Save ₹56 Add to cart
">
Skip to content
