इतिहास
-
Sale! Add to cart' जनसंहार शब्द उच्चारताच सर्वप्रथम डोळ्यांपुढे येते दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिटलरने लक्षावधी ज्यूंची केलेली अमानुष हत्या. पण दुसऱ्या महायुद्धापूर्वी आणि नंतरही मानवी इतिहासात अशी भीषण हत्याकांडे अन् असा क्रूर जनसंहार घडलेला आहे. माणसाच्या मनात दडलेली क्रौर्यभावना या जनसंहाराला कारणीभूत ठरते का ? जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या काळात, वेगवेगळ्या कारणांनी भडकणाऱ्या या भयंकर वणव्याचा अभ्यासपूर्ण वेध.
इतिहासJansanhar | जनसंहार
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cart'भारत स्वतंत्र झाल्यावर जवाहरलाल नेहरूंचे पुरोगामी, संवेदनाक्षम आणि द्रष्टे नेतृत्व लाभले म्हणूनच संसदीय लोकशाहीची सुदृढ पायाभरणी होऊ शकली आणि धर्मनिरपेक्ष शासनव्यवस्था स्थिरावू शकली. या दोन्ही बाबतींतील नेहरूंचे योगदान न विसरता येण्याजोगे आहे. अर्थात काश्मीरचा रेंगाळलेला संघर्ष, चीनबरोबरचा चिघळलेला सीमावाद अशा अनेक समस्यांचे ओझेदेखील त्यांच्या चुकांमुळेच आपल्याला अजूनही वाहावे लागते आहे. तथापि जमाखर्चाचा हिशोब मांडायचाच झाला, तर नेहरूंनी दिलेल्या देणग्यांचे पारडे निश्चितच जड आहे. हे पुस्तक म्हणजे त्यांच्या उत्तुंग नेतृत्वाच्या प्रदीर्घ कारकिर्दीचे सिंहावलोकन आहे.
इतिहासJawaharlal Nehrunche Netrutva Ek Sinhavalokan | जवाहरलाल नेहरूंचे नेतृत्व एक सिंहावलोकन
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cartविशेषणांची उधळण केली, तरीही ज्यांचे वर्णन पुरे होऊ शकणार नाही, अशा शिवाजी महाराजांचा सर्वाधिक लक्षणीय गुणविशेष म्हणजे त्यांचे युद्धनेतृत्त्व ! राजांनी असंख्य लहानमोठे विजय मिळवले त्यांना काही बोचरे पराभव पत्करावे लागले. पण त्या पराभवांचे विजयात रूपांतर करण्याची किमया त्यांनी करून दाखवली. तो पराक्रम घडवतानाच त्यांनी जे डावपेच लढवले, ज्या युक्त्या प्रयुक्त्या योजल्या, ज्या व्यूहरचना आखल्या, त्यांचे लष्करी विश्लेषण करून दाखवणारा हा ग्रंथ. प्राचीन - अर्वाचीन युध्दशास्त्राच्या लष्करी सूत्रांच्या प्रकाशात महाराजांच्या अलौकिकत्वाचे झळाळते दर्शन घडवणारा आणि जागतिक सेनानीच्या नामावळीत त्यांचे अग्रहक्काचे स्थान अधोरेखित करणारा हा ग्रंथ प्रत्येक शिवप्रेमी देशभक्ताच्या संग्रही हवाच ! जयतु शिवाजी जयतु शिवाजी
इतिहासJayatu Shivaji, Jayatu Shivaji | जयतु शिवाजी, जयतु शिवाजी
₹630.00Original price was: ₹630.00.₹473.00Current price is: ₹473.00. Save ₹157 Add to cart -
Sale! Add to cartशेकडो हजारो वर्षांपासून जगाच्या विविध प्रदेशांमधून विविध धर्मांचे, विविध संस्कृतींचे लोक भारतातील समृद्धीने आकर्षित होऊन येथे आले आणि स्थायिक झाले. यातील काही सत्ता कमावण्यासाठी, काही नोकरी-व्यवसायासाठी तर काही धर्मप्रचारासाठी आले. येथे सत्ता कमावताना आणि ती राखताना अनेकांनी येथील स्थानिकांशी राजनैतिक धूर्तता आणि क्रूरतेने व्यवहार केले. परंतु त्यातील अनेकांनी त्यांच्या विविध क्षेत्रांमध्ये भारतीयांसाठी कितीतरी चांगले कार्यही केले, अनेक येथेच स्थायिक होऊन भारतीय भूमीशी एकरूप झाले. अशा भारतप्रेमींपैकी अनेक जण आता विस्मृतीत गेले आहेत. या भारतप्रेमींच्या मौलिक योगदानाचा आढावा...
इतिहासJe Ale Te Ramle | जे आले ते रमले
₹430.00Original price was: ₹430.00.₹323.00Current price is: ₹323.00. Save ₹107 Add to cart -
Sale! Add to cart'कलम ३७० रद्द करण्याच्या ऐतिहासिक व अकल्पित निर्णयामुळे उठलेले वादळ अजूनही घोंघावत आहे आणि त्यात अनेक बाबी दृष्टीआड होत आहेत वा केल्या जात आहेत. १९४७-४८च्या काश्मीरमधील युद्धजन्य परिस्थितीपेक्षाही शेख अब्दुल्लांच्या दुराग्रहामुळे कलम ३७० राज्यघटनेत समाविष्ट करावे लागले. महाराजा हरिसिंग यांनी हिंदुस्थानात संमीलित होण्यास संमती दिल्यानंतरही काश्मीरच्या जनतेचे मत अजमावावे, हा काँग्रेसचा आग्रह होता; पण त्याची परिणती ३७०व्या कलमात होईल आणि शेख अब्दुल्लांच्या अवास्तव मागण्या भारताच्या राज्यघटनेचा विपर्यास करतील, ही कल्पनाही कोणी केली नव्हती. नेहरूंना माणसांची पारख नव्हती. काश्मीरसाठी वेगळी राज्यघटना, वेगळे नागरिकत्व, वेगळा ध्वज आणि सदर-इ-रियासत व पंतप्रधान ही पदे, अशा बहुतेक सर्व मागण्या दिल्ली करारान्वये मान्य झाल्या. सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? हा प्रश्न लोकमान्य टिळकांनी ब्रिटिश सरकारला विचारला होता. तोच प्रश्न तत्कालीन सरकारला विचारणे आवश्यक होते. गेली ७० वर्षे अनेक प्रयत्न करूनही काश्मीर प्रश्नाची सोडवणूक होऊ शकलेली नाही; कारण शेवटी सर्व चर्चा कलम ३७० वर येऊन थांबत असे. हे कलम रद्द केल्याने निर्माण झालेले प्रश्न वैधानिक व भावनिक आहेत. त्यांची सखोल चर्चा या पुस्तकात केली आहे.
इतिहासKalam 370: Aagraha Ani Duragraha | कलम ३७० : आग्रह आणि दुराग्रह
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Sale! Add to cart'सुमारे सात दशकांपूर्वी आशिया खंडातल्या दोन देशांमध्ये एक शर्यत सुरू झाली. ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून भारत स्वतंत्र झाला आणि चीनमधील यादवी युद्धात साम्यवादी विजयी झाले. पंडित जवाहरलाल नेहरू आणि माओ झेडाँग हे दोन नेते आपापल्या देशांचे नवे नेते झाले. प्रारंभी काही काळ त्या दोघांमध्ये मैत्री नांदली खरी; पण थोड्याच काळात दोघांचीही वेगवेगळ्या मार्गांनी वाटचाल सुरू झाली आणि मग कळत-नकळत स्पर्धासुद्धा! मतभेदांना सीमासंघर्षाचीही जोड मिळाली. चीनमधील हुकूमशहांनी सुधारणावादी भूमिका स्वीकारली, काही मूल्यं पायदळी तुडवली; पण आर्थिक-औद्योगिक प्रगतीचा वेग प्रचंड वाढवला. महासत्ता बनवण्याच्या अगदी जवळ तो देश जाऊन पोचला... भारतात लोकशाही समाजवादाचा प्रयोग बरीच वर्षं चालू राहिला, नेते आले-गेले, नियोजनपूर्वक प्रगतीच्या योजना जाहीर झाल्या-फसल्या आणि तरीही जागतिकीकरणाच्या वेढ्यात उदार धोरणं स्वीकारणं भारतीय नेत्यांनाही भाग पडलं. आता हा देशही प्रगतीच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन ठेपला आहे. अशा स्थितीत बरीच पुढची मजल मारलेल्या चीनशी त्याची तुलना होणं स्वाभाविक आहे. दोन्ही देशांच्या प्रमुख नेत्यांची, त्यांच्या ध्येयधोरणांची, त्यांच्या यशापयशाची, देशांमधील अटळ चढउतारांची आणि भविष्यामधल्या शक्याशक्यतांची तुलना करीत सांगितलेली त्या शर्यतीची ही माहितीपूर्ण कथा.
इतिहासKatha Eka Sharyatichi | कथा एका शर्यतीची
₹400.00Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00. Save ₹100 Add to cart -
Sale! Add to cartभारतीय इतिहासाला निर्णायक राष्ट्रीय वळण लावणारे महापुरुष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ! त्यांचे व्यक्तिमत्त्व समाजाला नेहमीच प्रेरणा देत आले. मध्यंतरीचा काही काळ सोडला, तर सतत त्यांची प्रतिमा देशीविदेशी कलाकारांना आव्हान देत आली, आवाहन करीत आली. असंख्य चित्रकारांनी छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातले अगणित चित्तथरारक, रोमहर्षक प्रसंग चितारले; तर कित्येक शिल्पकारांनी कधी अर्धाकृती, कधी पूर्णाकृती, तर कधी अश्वारूढ शिवाजी महाराज घडवले. त्यांच्या त्या त्या कलाविष्कारामागे दडलेल्या संघर्षकथासुद्धा तितक्याच लक्षणीय आहेत. कुणाची स्वप्ने साकार झाली, गौरवली गेली; तर कुणाकुणाची स्वप्ने भंग पावली, अधुरी राहिली. अशा असंख्य कथांचे आणि तशाच व्यथांचे हे अनोखे संकलन. सर्वांच्या केंद्रस्थानी आहेत, ते मात्र हिंदवी स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ! भारतीय कलेतिहासाचे साहित्यिक जतन-संवर्धन करण्याचा ध्यास घेतलेल्या सुहास बहुळकरांच्या वैशिष्ट्यपूर्ण चित्रकथी शैलीतले हे पुस्तक म्हणजे इतिहास, चित्रकला आणि शिल्पकला या तिन्ही क्षेत्रांतील असंख्य मान्यवरांच्या अतुलनीय कार्यकर्तृत्वाला दिलेली मानवंदनाच आहे !
All BooksKatha Shivchitranchya, Vyatha Shivasmarakachya ! | कथा शिवचित्रांच्या व्यथा शिवस्मारकांच्या
₹1,000.00Original price was: ₹1,000.00.₹750.00Current price is: ₹750.00. Save ₹250 Add to cart -
Sale! Add to cart'पद्मश्री डॉ. म. के. ढवळीकर. पुरातत्त्वातील अनेक कूटस्थळांचा वेध घेणारे जागतिक कीर्तीचे पुरातत्त्वज्ञ. सहजसोपी लेखनशैली अन् नेटकी मांडणी यामुळे पुरातत्त्वासारखा व्यापक विषय त्यांनी रंजक आणि रुचिपूर्ण बनवला. प्राचीन सिंधू संस्कृती, वैदिक संस्कृती, प्राचीन काळातील पर्यावरण, प्राचीन भारतीय कला, स्थापत्य अन् त्यातून उलगडणारे लोकजीवन, गणेश या दैवताची उत्क्रांती असे विविध विषय त्यांनी अनेक पुस्तकांमधून वाचकांसाठी सुबोध बनवले. इसवीसनपूर्व तिसरे सहस्रक ते इसवीसनपूर्व पहिले सहस्रक या कालखंडात घडलेल्या सांस्कृतिक संक्रमणाच्या विविध पैलूंचा आढावा घेत डॉ. ढवळीकर या पुस्तकात मागोवा घेत आहेत एका आजवर न उलगडलेल्या प्रश्नाचा - कोण होते सिंधू लोक ? '
इतिहासKon Hote Sindhu Lok? | कोण होते सिंधू लोक ?
₹180.00Original price was: ₹180.00.₹135.00Current price is: ₹135.00. Save ₹45 Add to cart -
Sale! Add to cart'सिंधु संस्कृती म्हटले की आपले मन प्राचीन काळाकडे खेचले जाते. शेकडो वर्षे आपल्या विस्मरणात गेलेल्या त्या संस्कृतीचे अवशेष १९२१-२२ साली अचानक प्रकाशझोतात आले आणि भारतीय इतिहासाबद्दलच्या देशीविदेशी विद्वानांच्या कल्पना पूर्णपणे बदलल्या. आपल्या भारतीय भूमीत सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी नांदत असलेल्या त्या अत्यंत वैभवशाली संस्कृतीचा म्हणावा तसा परिचय मात्र अजूनही सर्वसामान्यांपर्यंत पोचलेला नाही. ती मोठी सांस्कृतिक उणीव भरून काढणारे हे महत्त्वपूर्ण पुस्तक आहे. सिंधु संस्कृतीतील वैशिष्टयपूर्ण नगररचना, समाज आणि शासनयंत्रणा यांचे परस्परसंबंध, तत्कालीन समाजाच्या विविध धार्मिक व आर्थिक समजुती, त्या लोकांची सौंदर्यदृष्टी व कलासाधना... या आणि इतरही अनेक अंगांनी त्या पुरातन संस्कृतीचा वेध घेणारे हे पुस्तक एका व्यासंगी प्राच्यविद्यापंडिताने लिहिले आहे. सामान्यांना सहज समजेल अशा शैलीत लिहिलेले हे पुस्तक वाचकांचे कुतूहल शमवील, जिज्ञासा जागी करील आणि प्राचीन इतिहासाकडे डोळस नजरेने पाहण्याची प्रेरणा देईल.'
इतिहासKone Eke Kali: Sindhu Sanskruti | कोणे एके काळी : सिंधु संस्कृती
₹130.00Original price was: ₹130.00.₹98.00Current price is: ₹98.00. Save ₹32 Add to cart -
Sale! Add to cartआपला शेजार आपल्याला बदलता येत नाही. गेली अनेक शतकं आपला शेजारी असलेल्या चीनबरोबरचे आपले संबंध विलक्षण गुंतागुंतीचे. विशेषत: माओंच्या कारकिर्दीत झालेल्या १९६२ च्या युद्धानंतर हे संबंध चांगलेच ताणले गेले. वास्तविक आजचा चीन आणि माओंचा चीन यात जमीन - अस्मानाचा फरक. साम्यवादाचं नाव लावणाऱ्या चीनमध्ये आज प्रत्यक्षात प्रारूप आहे नियंत्रित-भांडवलशाही चं. चीन जितका आधुनिक, तितकाच ऐतिहासिकही. आधुनिकतेच्या महामार्गावर वेगाने पुढे जाताना एखाद्या वळणावर आपली प्राचीनता सोडून द्यावी, असं चीनच्या कोणत्याही सत्ताधीशाला वाटलेलं नाही, मग ते माओ असोत, डेंग असोत वा आजचे क्षी जिनपिंग. हे असे विसंवाद वागवत वागवत पुढे जाणं हे चीनच्या रक्तातच असावं. आजही भारताबरोबरचा संघर्ष असेल वा अमेरिकेशी स्पर्धा- चिनी सत्ताधीश आपली धोरणं ठरवताना इतिहासात दडलेल्या सूत्रांचा आधार घेत असतात. हे चकित करणारं विलक्षण चिनी प्रारूप समजावून देणारं-
All BooksMade In China | मेड इन चायना
₹550.00Original price was: ₹550.00.₹413.00Current price is: ₹413.00. Save ₹137 Add to cart
">
Skip to content