कादंबरी
-
Sale! Add to cartअडतीस कोटी देशबांधवांची गुलामीतून मुक्तता; याच एका प्राणप्रिय ध्येयासाठी एका कडव्या, लढवय्या देशभक्ताने अर्ध्या जगात मारलेली गरुडभरारी ! जीवनभरचा धगधगता संघर्ष, जिवलग स्वकीयांशी आणि ब्रिटिश साम्राज्यासारख्या परकीयांशीही. त्याला व्यक्ती म्हणून नव्हे, तर एक लढाऊ राष्ट्र मानून, जपानसारख्या हिशेबी देशानेही अभूतपूर्व मदत केली. 'चलो दिल्ली'ची त्याची गर्जना साकारण्यासाठी इंफाळ-कोहिमा-ब्रह्मदेशाच्या अरण्यात जुंपला एक घना रणसंग्राम ! नियतीच्या आडव्यातिडव्या भेसूर नाचानेही ज्याची कवचकुंडले कधीही निस्तेज झाली नाहीत असा - महानायक ! देशोदेशींच्या दफ्तरखान्यांत आजवर अडकून पडलेल्या दुर्मिळ दस्तऐवजांचा, नव्या संशोधित कागदपत्रांचा वेध घेऊन व त्या 'रणवाटा'वरून भ्रमण करून चितारलेली नेताजींची अपरिचित जीवनकहाणी.
कादंबरीMahanayak (Sampadit Avrutti) | महानायक (संपादित आवृत्ती)
₹650.00Original price was: ₹650.00.₹488.00Current price is: ₹488.00. Save ₹162 Add to cart -
Sale! Add to cartते भारतात आले दीडशे वर्षांपूर्वी. चहाच्या मळयात राबायला त्यांना फसवून आणलं होतं. या परक्या जमिनीत त्यांनी स्वत:ला रुजवलं, वाढवलं. या देशालाच आपला अन् इथल्या माणसांना आप्त मानलं. अचानक उठलं एक चक्रीवादळ. त्यांचा मूळचा देश अन् हा आताचा देश यांच्यात सुरू झालेलं युध्द. त्या चक्रीवादळानं त्यांच्या आयुष्याची वाताहत केली. त्यांना मुळापासून उखडून निर्वासित बनवलं. १९६२च्या भारत-चीन युध्दामुळे ससेहोलपट झालेल्या देशोधडीला लागलेल्या भारतातील चिनी वंशाच्या जनसमूहाची करुण कहाणी.
कादंबरीMakam | माकाम
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cartशनिवारवाड्यावरील जरीपटका ब्रिटिशांनी खाली उतरवला आणि भारतात एक नवी व्यवस्था आकारास यायला सुरुवात झाली. या संक्रमणकाळातील घडामोडींत आपल्या समाजापासून पोरका झालेला, नेटिवांचं भलं कशात आहे, जिंकण्यात की हरण्यात? ह्या प्रश्नाशी झगडत स्वातंत्र्ययुध्दात सहभागी झालेला नर्मद. आणि एकविसाव्या शतकाच्या सीमारेषेवर, सर्व मानवी विश्वच प्रचंड गतीने बदलत असताना, सामान्य माणसाच्या बाजूने चळवळीत लढणारा, तरीही अंतिम परिणामाबद्दल संभ्रमित असलेला गौतम. स्थळकाळाचे संदर्भ वेगळे...पण हे दोघेही आपापल्या वर्तमानात शोध घेताहेत माणसामाणसातील नात्याचा, त्याच्या भविष्याचा. संक्रमणकाळातील माणूस आणि समाज यांचा शोध घेणारी कादंबरी.
कादंबरीManwantar | मन्वंतर
₹180.00Original price was: ₹180.00.₹135.00Current price is: ₹135.00. Save ₹45 Add to cart -
Sale! Add to cartकोणतेही आयुष्य फक्त दुर्दैवी किंवा सुदैवी नसते. बघणा-यांना ते तसे दिसते. 'मसाज' मधला 'मी' ही या स्थूल वर्गवारीत बसवलेला नाही. त्याच्या संमिश्र आणि एकमेव आयुष्याचा शोध मी माझ्या पध्दतीने घेतला आहे. - विजय तेंडुलकर
कादंबरीMasaj | मसाज
₹110.00Original price was: ₹110.00.₹83.00Current price is: ₹83.00. Save ₹27 Add to cart -
Sale! Add to cartमोगलाई' ही कादंबरी वाचली, आवडली. ही कादंबरी लेखकाच्या आधीच्या कादंबरीलेखनाचे - धरणसूक्त'चे पुढचे पाऊल आहे. या कादंबरीचे वेगळेपण असे की, येथे धरणांच्या उभारणीबरोबरच मानवी संबंधांचे, त्यांच्या व्यक्तिमत्त्वांचे अधिक चांगले चित्रण केले आहे. शिवाय यात समाजातील विविध स्तरांचे चित्रण आले आहे. समाजकारणापासून राजकारणापर्यंतची विविध क्षेत्रेही या कादंबरीतून प्रकट झाली आहेत. त्यामुळे ही कादंबरी जीवनचित्रणाच्या दृष्टीने अधिक समृद्ध आहे. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले मागास समजल्या जाणाऱ्या भागात सृजनाच्या सोहळ्यात गुंतलेल्या हातांनी अन् मनांच्या कसदार मशागतीनी नवी कार्यसंस्कृती उभारणाऱ्या अभियंत्याची गुंतवून ठेवणारी कहाणी...
All BooksMogalaee | मोगलाई
₹400.00Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00. Save ₹100 Add to cart -
Sale! Add to cartडिमोना ही इस्रायलची छुपी अणुभट्टी.
तिचं रहस्य ‘दि संडे टाइम्स' या दैनिकासमोर उघड करणारा
इस्रायली जागल्या मोर्देचाई व्हॅनुनू.
पण हे इस्रायलला कसं चालणार ?
मग त्यानं एका मदनिकेकरवी व्हॅनुनूवर टाकलं सौंदर्याचं जाळं.
व्हॅनुनूला स्वत:च्या जाळ्यात ओढून ‘मोसाद' या गुप्तचर यंत्रणेला व्हॅनुनूचं अपहरण करण्यात मदत करणारी चेरील बेंटॉव्ह उर्फ सिंडी.
सिंडी एकाच वेळी ‘सीआयए' आणि ‘मोसाद' या दोन यंत्रणांसाठी गुप्तहेर म्हणून काम करत होती का?
युनायटेड स्टेट्स , फ्रान्स, बेल्जियम आणि दक्षिण आफ्रिका
या राष्ट्रांनी इस्रायलला आण्विक ज्ञान आणि तंत्रज्ञान मिळवण्यात गुप्तपणे कशी मदत केली?
अपहरणानंतर मोर्देचाई व्हॅनुनू डिमोनाचं रहस्य उघड करू शकला का?
तो आपल्या ध्येयात यशस्वी झाला का?
सिंडीचं पुढे काय झालं?
या सर्व घटनांवर भेदक प्रकाश टाकणारी,
इस्रायलच्या ‘मोसाद' या गुप्तचर यंत्रणेचं क्रूर जाळं छेदणार्याे जागल्याची कहाणी...All BooksMosad Mohini | मोसाद मोहिनी
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cartरक्ताच्या नात्याचा संबंध देखील उरला नाही, अशा घराच्या रगाड्याला जुंपलेली ती आहे सत्तर वर्षांची निपुत्रिक बालविधवा. तिला कादंबरीची नायिका तरी कसे म्हणायचे ! आहे खरी कथाभागाच्या केंद्रस्थानी. उसन्या नातेवाईकांच्या मुला-बाळांना मायेच्या घट्ट धाग्यांनी जखडून ठेवणारी. शेतीला जखडलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबाची ससेहोलपट, त्यामुळे नव्या-जुन्या पिढ्यांमध्ये होणारी घुसमट, वंशसातत्याची सनातन आस, पुरुषी संस्कृतीने स्त्रियांच्या व्यापक सर्जनशीलतेकडे फिरविलेली पाठ आणि उच्चकुलीनतेचा टेंभा मिरविणा-या घराण्याच्या अंधा-या तळघरातील अज्ञात रहस्ये अशा विविध स्तरांवर वावरणा-या व-हाडच्या पाश्र्वभूमीवरील या बहुपदरी व गुंतागुंतीच्या कादंबरीत तसे अनेक नायक व नायिका सापडतील. मग या वृद्धेलाच नायिका का करू नये ? तिनेच आपल्या कर्तृत्वाने व निष्ठेने या घराण्याच्या परंपरा जपून त्यांना नवी वळणे दिली आहेत. अखेर प्रत्येक घरातील वैशिष्ट्यपूर्ण कुलसंस्कृती, आचार-विचार व स्वयंपाक-संस्कृती देखील डोळ्यात तेल घालून जतन करतात व त्यात भर घालतात त्या परक्या घरातून आलेल्या स्त्रियाच ना !
कादंबरीMukhavta (Lokaavrutti) | मुखवटा (लोकआवृत्ती)
₹400.00Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00. Save ₹100 Add to cart -
Sale! Add to cart'कॉलेजचं पहिलं वर्ष नव्याची उत्कंठा, रॅगिंगची भीती. टेस्ट, प्रॅक्टिकल, परीक्षा अन् मस्ती, गॅदरिंग, ट्रिप, दंगा, प्रेमसुध्दा ! ही कहाणी फक्त ओमची नाही. ती म्हटली तर आपल्या सा-यांचीच आहे. ही कहाणी आहे तरुण वयात पाऊल टाकतानाच्या अवस्थांतराची. तिला व्यक्तिगत संक्रमणाचा संदर्भ आहे, तसाच जागतिकीकरणाच्या आरंभखुणांचाही. हा कहाणीपट जसा ओमच्या वाढीचा आहे, तसाच त्याच्या मित्रमैत्रिणी, पालक, शिक्षक, भवताल - या सा-यांच्या बदलाचाही आहे. या वयातला रम्य सळसळता प्रवास म्हणजे पुढच्या आयुष्याच्या पोटात जपली जाणारी मखमली आठवण. ती आठवण उलगडणारी कादंबरी
कादंबरीMularambha | मुळारंभ
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Sale! Add to cartडॉ. रघुनाथ माशेलकर (FRS) जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ व थोर मानवतावादी विचारवंत पुस्तक वाचताना आपण सहप्रवासी कधी होतो ते समजतच नाही, ही त्यातली खरी गंमत आहे. त्या दोन मित्रांच्या गप्पांत आपण रंगून जातो, जणू तो काळ जगू लागतो, त्यायोगे आपल्या ज्ञानात तर भर पडतेच, पण आपण नकळत सुज्ञतेचे धडेही आत्मसात करतो.... कृष्णाच्या दैवी रूपापल्याड नेणारी ही शिकवण आहे... प्रत्येकाने वाचायलाच हवं असं हे पुस्तक आहे, हे मी आवर्जून सांगेन. डॉ. सुचेता परांजपे संस्कृत, वेदिक स्टडीज' आणि इंडॉलॉजी'; मध्ये जगभर मान्यताप्राप्त विदुषी; अमेरिकन, जर्मन विद्यापीठात प्राध्यापिका (BORI) महाभारत चिकित्सक आवृत्ती';च्या समितीवर; फग्र्युसन कॉलेज फेलो दोन निरनिराळ्या व्यक्तींनी एकत्र येऊन प्राचीन इतिहासाला आजच्या संदर्भात आणून एक अतिशय वाचनीय आणि उत्सुकता वाढवणारं वाङ्मय लिहायचं ही काही साधीसुधी गोष्ट नाही. खूप अवघड मार्ग आहे हा. कुठेही, अगदी काळाबद्दलही चूक नाही; सगळं कसं एकसंध. आपल्या प्राचीन परंपरा आणि वाङ्मय यांना कारण नसताना धुत्कारणा-या नवीन पिढीचे डोळे उघडणारं हे मनोरंजक पुस्तक सर्वांनीच वाचावं असं आहे. डॉ. मोहन आगाशे मानसोपचारतज्ञ, कलाकार, संगीत नाटक अकादमी पुरस्कारविजेते अगदी सामान्य परिस्थितीमधील गंमत शोधण्याची हातोटी लेखकांपाशी आहे आणि ही विनोदबुद्धी मला आनंददायी वाटली... पुस्तकाची भाषा सहज आहे. अनेक बोधकथा आणि दंतकथा सांगताना वापरलेली दोन पात्रांमधील संवादात्मक शैली मनोवेधक असल्यामुळे पुस्तक हातांतून सोडवत नाही... अनुभवानुसार हे पुस्तक वाचून झाल्यावरसुद्धा दीर्घकाळ माझ्या स्मरणात राहील.
All BooksNandighosh-Yatra – Shrikrishnakatha : Vedh Nava | नंदीघोष – यात्रा
₹280.00Original price was: ₹280.00.₹210.00Current price is: ₹210.00. Save ₹70 Add to cart -
Sale! Add to cartकेनेथ अँडरसन हा पट्टीचा शिकारी. मात्र त्याची बंदूक वेध घ्यायची ती फक्त नरभक्षक बनलेल्या वाघांचा अन् बिबळ्यांचा. जंगलाशी नाळ जोडली गेलेला हा शिकारी जंगल वाचायला तर शिकलाच; शिवाय जंगलात राहणाऱ्या वन्य जमाती, त्यांची जीवनशैली, रूढी अन् प्रथा, जगण्याची साधनं या साऱ्यांचंही त्यानं बारकाईनं निरीक्षण केलं. दक्षिण भारतात वेगवेगळ्या ठिकाणी अवघ्या पंचक्रोशीत दहशत माजवणाऱ्या नरभक्षकांना हिमतीनं अन् हिकमतीनं टिपणाऱ्या या निष्णात शिकाऱ्यानं सांगितलेल्या स्वानुभवाच्या थरारक शिकारकथा नरभक्षकाच्या मागावर
कादंबरीNarabhakshakachya Magavar | नरभक्षकाच्या मागावर
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart
">
Skip to content